Skip to main content

क्विन...

लेखक पिलीयन रायडर यांनी मंगळवार, 01/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
परवा खुप दिवसांनी थेटर मध्ये जाऊन पिक्चर पाहिला.. पॉपकॉर्न खात.. क्विन! आवडला.. जाम आवडला.. क्विन मध्ये कंगनाचा अभिनय.. कथानक.. संवाद.. गाणी वगैरे सगळच आवडण्या सारखं असलं तरी मला तो वेगळ्याच कारणांसाठी आवडलाय.. भारत वर्षातली.. दिल्लीकडची.. अत्यंत पारंपारिक वातावरणात वाढलेली एक मुलगी.. अगदी लहान सहान गोष्टी पण आई वडीलांना विचारुन करणार.. बाहेर जाताना भावाला घेऊन जाणार.. पुढे जॉब करायचा की नाही हे होणार्‍या नवर्‍याला विचारणार.. तिच्याच शब्दात सांगायचं तर .."तुम सिर्फ नाम लो.. मैने उन सबकी बात सुनी है.." कॅटेगरी.. तिचं लग्न मोडतं.. भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. एक तर ते झालंच पाहिजे.. दुसरं ते जातीमध्येच झालं पाहिजे, मग गाढवाशी का होईना.. पण परजातीतील कर्तुत्ववान पुरुष सुद्धा त्या गाढवापुढे किस झाड की पत्ती..शिवाय लग्न योग्य वयातच झालंच पाहिजे नाही तर मग आख्या जगाला तुमची काळजी करावी लागते.. कारण लग्ना शिवाय आयुष्य म्हणजे.. छे.. उपमा देण्यालायक सुद्धा उरत नाही.. असं लग्न मोडलं म्हणजे तुम्ही खरं तर जीव द्यायला हवा.. कारण काहिही असो.. चुक मुलीची असते.. "आता आपलं कस्सं होणार" हा प्रश्न पण त्यांनाच पडायला हवा.. मुलांना ह्या चिंता नसतात..* पण रानी "अब मेरा क्या होगा.." च्या गम मध्ये न डुबता चक्क स्वतःच्या हनिमुनच्या तिकीटावर पॅरिसला जाते..! मला हेच्च लई लई आवडलं.. तिची कारणमीमांसा काही का असेना.. आयडिया भारी आहे.. तिथे गेल्यावर तिला खुप वेगळं आयुष्य पहायला मिळतं.. वेगळेच लोक.. त्यांच्या विचित्रच पद्धती.. मुल्य वेगळी.. विचार वेगळे.. त्यांनाही त्यांची दु:ख.. पण त्याची ओझी वाहताना कुणी दिसत नाही.. "दु:खाच्या अलंकरणाची दिप्ती.." बाजुला सारुन चक्क आनंदी रहाण्याची उलटीच रीत.. रानीला कुणी फालतु (भोचक) प्रश्न विचारत नाही.. रानी दारुच्या नशेत जी काही बकवास करते ते ही शांतपणे ऐकुन घेतल्या जातं.. स्वतःच्या (इन मिन छटाक) आयुष्यातुन आलेल्या अनुभवांमधुन सल्ले कुणी देत नाही.. सल्ले नाहीत?! गेलाबाजार "क्या पता..कल हो ना हो" टाईप कॅचलाईन्स पण नाहीत? मग लोकांची आयुष्य बदलणार कशी? अरे "बस उसकी एक बातने मेरी तो दुनियाही बदलदी" बॉलीवुडची बदाम सत्ती आहे.. इथेच तर गेम सुरु होतो ना जिंदगी बदलण्याचा... कशी बदलणार मग दुनिया आता? मीच हैराण..परेशान झाले... किमान रानी स्वगता मधुन स्वतःला उलगडुन दाखवत आहे असं तरी दाखवायचं.. मग तरी प्रेक्षकांना समजेल पिक्चर आणि त्यातला अर्थ.. कारण प्रेक्षक चित्रपटातलं सगळ्यात मुर्ख पात्र असतं.. त्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स ची कोडी घालण्यावर बॉलीवुडचा विश्वास नाही.. त्यामुळे ह्या न त्या प्रकारे शब्दबंबाळ डायलॉग मधुन त्याला "जिंदगी".."मोहोब्बत"..विषयी तत्वज्ञान नाही दिलं तर मग घरी जाऊन त्याची जिंदगी कशी बदलणार? पण इथे एकंदरीत कुणी कुणाला काहीच उलगडुन दाखवत नाही.. सगळेच समजुन घेतात.. रानी सगळा राग फक्त दात ओठ खाउन.. केस मोकळे सोडून नाचुन व्यक्त करते.. पुर्वी एकदा नातेवाईकां समोर नाचल्याबद्दल होणार्‍या नवर्‍याच्या शिव्या खाल्याचा प्रसंग आठवुन फक्त एक छ्द्मी हास्य.. बास.. आणि पुन्हा हंगामा हो गया..सुरु.. रानीला ३ मुलांसोबत रहावं लागतं.. आधी त्यांना घाबरलेली रानी नंतर चक्क त्यांची मैत्रीण होते.. एका स्ट्रिप क्लब मध्ये जाऊन नाचते.. गाडी चालवते..एका स्पर्धेत जाउन तिथल्या लोकांना पाणीपुरी खाऊ घालते.. एक लिप किस पण करते.. रानीला ह्या सगळ्या दरम्यान काही नवीन सापडत नाही.. फकत तिच्यात जो आत्मविश्वास आहे ह्याची तिला कल्पनाच नसते तो तेवढा सापडतो.. आता एवढी मोठी गोष्ट गवसल्यावर हिरोईन कशी आमुलाग्र बदलली पाहिजे.. बॉलीवुडमध्ये हिरोईन आमुलाग्र बदलते म्हणजे ती खरं तर ड्रेसची लांबी, केसांची हेअर स्टाईल आणि तोंडावरती अत्यंत सहनशीलच्या ऐवजी माजोरडे भाव एवढंच बदलत असते.. आणि हो मग तिनी १-२ तरी मोठे डायलॉग मारले पाहिजेत.. मग हिरो स्तब्ध व्हायला पाहिजे..मग ती ताडताड तिथुन निघुन जाणार..मग हिरोला उपरती व्हायला पाहिजे.. (हे उलटं ही होऊ शकतं.. हिरोईन कपड्यांची लांबी कमी करते.. मग हिरो तिला भारतीय संस्कृतीबद्दल ऐकवतो.. मग हिरोइन स्तब्ध.. मग हिरो ताडताड जाणार..हिरोईनला उपरती..) इथेही हिरोईन बदलते आणि हिरोला उपरती होते.. फक्त मधल्या स्टेप्स घडत नाहीत.. म्हणजे कंगना अजुनही तिला कंफरटेबल वाटेल अशाच नॉर्मल कपड्यात असते.. सतत घट्ट उराशी बाळगलेला स्वेटर तेवढा काढते.. पण ते कदाचित तिची भीती ओसरत जाते तसं ती जात मोकळी होते हे दाखवण्या इतपतच.. ती कूणालाही स्तब्ध करत नाही.. अवाक करत नाही.. कुण्णा कुण्णाला तिच्या शब्दबंबाळ डायलॉगमुळे उपरती होते नाही.. कुणाचही आयुष्य एक पल मध्ये बदलत नाही.. बरं इथवर तरी ठिक आहे.. पण जेव्हा हिरोला उपरती होऊन तो रानी कडे येतो.. तेव्हा तरी "जिंदगी" आणि "मोहोब्बत" च्या फुलबाज्या उडणार असं मला वाटत होतं.. पण छे.. चांगली रडुन पडून "तुम ऐसा कैसे कर सकते हो मेरे साथ विजय????" असे आर्त प्रश्न विचारायचे सोडुन ही बया रॉक शो ला निघुन जाते.. कमाल आहे.. अरे प्यार सामने रो रहा है.. माफी की भीक मांग रहा है.. डायलॉग मारने की सुवर्णसंधी डायरेक्टर दे रहा है.. तर ह्या पोरीला पुन्हा कधी न भेटु शकणारे मित्र महत्वाचे वाटतात? "ये बाते हम दिल्ली मे भी कर सकते है.." असा लॉजिकल डायलॉग मारुन हिरोईन मित्रांना भेटायला जाते?? छे.. असं कुठे घडतं का? म्हणलं ठिके.. पण शेवटी "प्यार की च जीत" होत असते.. त्यामुळे तिथे तरी हरदासाची कथा मूळपदावर येईलच.. पण हे भगवान! आता जरी प्यार भीक मागत असला तरी उद्या ह्याच प्यार सोबत "लग्न" नामक गोष्ट झाल्यावर प्यार नवरा बनुन परत डोक्यावर मिर्‍या वाटणार, सासु घरात किटी पार्टी आणि पार्लर मध्ये अडकवणार हे संभाव्य धोके लक्षात घेऊन हिरोईन चक्क साखरपुड्याची अंगठी परत देऊन निघुन जाते.. काहीही म्हणजे अगदी काहीही झालं तरी बये लग्न आणि नवरा महत्वाचा ही "भारतीय संस्कृतीची" आणि प्यारे के आगे सब गुनाह माफ असतात ही बॉलीवुडची आम्हाला शिकवण आहे..त्यामुळे अगदी ऐन्वेळेस नवरा मुलगा मागे हटला तरी कुणी ना कुणी बोहल्यावर उभं राहुन "प्रसंग निभवायचा".. म्हणजे त्या अभागी मुली सोबत लग्न करायचं.. मग ती मुलगी आयुष्यभर त्याला परमेश्वर मानुन "मै धरा की धुल हूं" म्हणणार.. एक तर ही रानी घरात तोंड लपवुन बसायचं सोडुन पॅरिसला जाते.. तिथे चक्क आनंदात रहाते (दु:ख उगाळत बसणे हा बायकांचा आवडता छंद आहे).. आणि आता नवरा "झाली म्हणलो ना चुक..प्रत्येकाच्या आयुष्यात होते.. आता काय पाया पडु का तुझ्या?" अशी मोठ्या मनानी माफी मागतो तर ही त्याला नाकारते.. तेरी ये जुर्रत?? थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. स्वतःचे विचार नसतात बाळगायचे, निर्णय असे नसतात घ्यायचे मुलींनी.. त्यातही तु कितीही मॉडर्न असलीस (कितीही लहान कपड्यात वावरणारी बोल्ड अभिनेत्री = मॉडर्न, खुल्या विचारांची, स्वतंत्र स्त्री) तरी जेव्हा सवाल इश्क, मोहोब्बत का असतो तेव्हा तू डोकं गहाणच ठेवायचं असतं.. अगं स्वतःला आमुलाग्र बदलायला तयार होतात हिरवणी (म्हण्जे रिव्हर्स केस.. तोकड्या कपड्यातुन बॅक टु साडी फॉर हिरोज सेक..).. आणि तू चक्क माफी नाकारतेस हिरोला? अंगठी परत करतेस??? मी कानात प्राण आणुन आता एका मोठ्या डायलॉगची वाट पहात होते.. पण नाही.. "थँक्यु" व्यतिरिक्त चकार शब्द नाही.. काही मोठी मोठी स्पष्टीकरणं नाहीत.. शाब्दिक थोबाडित मारणं नाही.. आयुष्यभर गप्प बसुन पिक्चरच्या शेवटाला दुनियाभरची बडबड करुन समोरच्याला (आपल्याला बोलता येतं आणि १० ओळी सलग बोलु शकु एवढी अक्कल आपल्याला आहे हे दाखवुन) अवाक करण्याचा प्लान नाही.. "हमारा रास्ता जरुर एक है लेकीन मंजिल नही.." टाईप छळ नाही.. फक्त एक "थँक्यु".. विथ स्माइल..! ?? व्हाय??? हम्म.... आय गेस बिकॉज शी इज जस्ट "क्विन".. ए क्विन विदाऊट ड्रामा..! *- हे सगळं माझं बॉलिवुड ग्यान आहे.. माझी मतं नाहीत.. त्यामुळे कुठल्याच मुक्ती मोर्चांनी माझ्यावर धावुन येऊ नये.. मी उत्तरं देत बसण्याचा टाईमपास करणार नाहीये..

वाचने 36387
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

In reply to by धन्या

चित्रपट परिक्षण हे मनात जसा चित्रपट उमटत जाईल तस केलं जातं. त्यात स्वतःला काय वाटत हे लिहीलं जाव असच अपेक्षित असत. फारएण्डच्या परिक्षणात तो त्याला आवडलेले कोपरे समोर ठेवतो अन आपल्याला हसू फुटत. मग येथेच का हा आक्षेप?

In reply to by धन्या

तुम्हाला नाही हो! राही ताईला म्हणतेय. आता कुठ काय उत्तर द्यायच हे जरा गंडल असेल तर माफी द्या सरकार.

चित्रपट आणि परीक्षण, दोन्हीही! भारतात "लग्न" ही तशीही फार्फार डेंजर गोष्ट आहे.. मुलींसाठी तर फारचं.. , एक तर ते झालंच पाहिजे.. +१ (पुढचे कितीही १ तुम्ही समजुन घ्या.) :)

'क्वीन'च्या निमित्ताने केलेली टिप्पणी सेक्सी आहे, आवडली. 'फॅशन' नामक मधुर भांडारकरी गिरणीत जिने चांगलं काम केलं होतं तिथे अशा चित्रपटात तिने फार चांगलं काम केलं असेल याबद्दल शंका नाही. 'क्वीन' बघेनच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझी प्रतिक्रिया अपेक्षित होती! तुला कदाचित सगळ्यात चांगले समजु शकत असेल की मला का आवडला क्वीन..!!

In reply to by पिलीयन रायडर

खरंतर ही गंगा उलट्या दिशेने आहे. मुक्त वातावरण आणि अभिव्यक्तीलाच नॉर्मल समजणाऱ्या मला, तुझ्या किंचित जास्त झालेल्या किंवा प्रमाणात असणाऱ्या अभिनिवेशामुळेच आजूबाजूला काय आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली. स्त्रिया-मुलींच्या हसण्या-बोलण्या-लेण्यावरची बंधनं कोणेएकेकाळीच इतिहासजमा झाली आहेत, अशा प्रकारचे माझे गैरसमज दूर होतात. एकविसाव्या शतकाच्या हस्तिदंती इमल्यातून असे लेख मला बाहेर काढतात. याच कारणासाठी अधूनमधून तू आणि मस्त कलंदरनेही लिहीत रहावं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रिया-मुलींच्या हसण्या-बोलण्या-लेण्यावरची बंधनं कोणेएकेकाळीच इतिहासजमा झाली आहेत, अशा प्रकारचे माझे गैरसमज दूर होतात. +७८६ सर्व वादाचे खरे मूळ, बोले तो फसाद की जड हेच आहे. बरेच जणांसाठी समाज तोच असतो जो त्यांच्या आसपास दिसतो. त्यामुळे मतभेद होतात. आणि भारतासारख्या कमीलीची सामाजिक तसेच आर्थिक विषमता असलेल्या देशात आधुनिकता आणि सुधारणेबाबत बाबत वेगवेगळी मते येणारच. असो, चित्रपट पाहिला नाही पण परीक्षण आणि प्रतिसादांवरून आशय समजला. सामाजिक तसेच मानसिक बंधने झुगारणारी नायिका. आता चित्रपटातील नायिका कोणत्या बॅकग्राऊंडमधील दाखवली आहे यावरून तिच्यासाठी बंधने झुगारणे म्हणजे काय हे ठरत असावे असा साधा सोपा विचार केला की संपले. तिने जे केले नेमके तेच प्रत्येक भगिनीने केले पाहिजे असा अर्थ काढला की वाद होणारच.

In reply to by तुमचा अभिषेक

आता चित्रपटातील नायिका कोणत्या बॅकग्राऊंडमधील दाखवली आहे यावरून तिच्यासाठी बंधने झुगारणे म्हणजे काय हे ठरत असावे असा साधा सोपा विचार केला की संपले.
क्लास !!! सामान्य बाब काय आणि अपसामान्य बाब काय हे व्यक्ती आणि परिस्थीतीगणिक बदलत असतं. त्यात सरसकटीकरण होऊ शकत नाही.

In reply to by धन्या

सामान्य बाब काय आणि अपसामान्य बाब काय हे व्यक्ती आणि परिस्थीतीगणिक बदलत असतं. त्यात सरसकटीकरण होऊ शकत नाही.
सुरेख धनाजीराव!

लेख आवडला होता. पण चित्रपट उशीरा पाहिला म्हणून प्रतिसाद आता दिला आहे.. चित्रपट आवडला. दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य, गल्ल्याची काळजी या नावाखाली काही फॅन्टसीज़ आणि टोनिन्ग डौन खपून जावेत. सहज बोलीतले संवाद आणि रोजवापराच्या दिल्लीबोलीचा डिक्शनमध्ये सांभाळलेला लहेजा खूप आवडला. काही संवादांची लेखिका खुद्द कंगना राणावत आहे हे शीर्षकात पाहिल्यावर आश्चर्य वाटले. चिगो, सव्यसाची यांचे प्रतिसाद आवडले. स्वेटर पर्समध्ये कोंबणे आणि तो अ‍ॅलिस वाला टीशर्ट मलाही खूप आवडले. आमीर खान त्याच्या एका चित्रपटात (रोमन हॉलिडे चा री-री-रीमेक?) आपली टोपी सांभाळत असतो त्याची आठवण झाली. दिग्दर्शकाला पैकीच्यापैकी मार्क. परीक्षण चुरचुरीत आणि खमंग आहेच पण 'तडका' अंमळ जास्तच झालाय असे वाटले. आक्रमक अभिनिवेश (किंचित्सा) टाळता आला असता तर बरे झाले असते. अप्पा जोगळेकरांचा सरसकटीकरणाचा मुद्दाही थोडाफार पटला. शेवटी, ऑल सेड अँड डन, लेखाच्या वाचनीयतेला शंभरपैकी एक हजार गुण.

In reply to by पिलीयन रायडर

पिरा मलाही अगदी नॉर्मल वाटतोय तुझा लेख. स्पष्ट शब्दात लिहिलेला, शब्दांची आतिषबाजी न करता जे आहे जस आहे तस सांगणारा. >> थोर भारतीय संस्कृती आणि बॉलीवुडका वास्ता है तुम्हे रानी.. असं मुलींना "अलाऊड" नसतं ग.. >> हे तर खासच!!!

गेल्या शनिवारीच हा चित्रपट पाहिला. खूप आवडला. बरेच वर्षांनी एका वेगळ्या विषयाची एवढी चांगली हाताळणी केलेला चित्रपट बघायला मिळाला म्हणून समाधानी होतो. उत्साहाने या चित्रपटाबद्द्लचे मत व्यक्त करण्यासाठी चेपू उघडले तर चित्रपटाबद्द्ल पहिलीच पोस्ट एका नवपरिणित दांपत्याची दिसली ज्यातील स्त्रीचे पहिले नाव अन आडनाव दोन्ही बदलले होते. आजच्या काळात हा प्रकार अजिबात पटत नसल्याने चित्रपटाबद्द्ल लिहिण्याचा उत्साह मावळला.

In reply to by श्रीरंग_जोशी

वेळ मिळताच बघण्यात येईल. पहिले नाव बदलणे मला तत्त्वशः अजिबात पटत नाही. खासकरून हल्ली जेव्हा लग्न विशीच्या उत्तरार्धात होतात. मात्र आडनाव बदलण्याबाबत मात्र विरोधी मत आहे. आडनावाला फॅमिली नेम असे जे संबोधले जाते ते सार्थ आहे असे मला वाटते. अर्थात तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणा. माझ्या लग्नात माझ्या बायकोचे नाव बदलून काहीतरी भारतीय ठेव असा आग्रह बर्‍याच जणांनी केला. कमीत कमी ज्युलियाचे जुईली कर वगैरे पर्यंत. ह्यात मुख्यतः बायकाच होत्या हे विशेष. असो.

In reply to by लंबूटांग

>>माझ्या लग्नात माझ्या बायकोचे नाव बदलून काहीतरी भारतीय ठेव असा आग्रह बर्‍याच जणांनी केला. कमीत कमी ज्युलियाचे जुईली कर वगैरे पर्यंत. ह्यात मुख्यतः बायकाच होत्या हे विशेष. असो. अच्छा, म्हणजे त्या परदेशस्थ आहेत तर !!

In reply to by सूड

अर्रे मीच परदेशस्थ आहे. ती तर स्वदेशातच आहे ;). प्रतिसाद टंकताना पराचीच आठवण आलेली पण ते नावात कमीत कमी बदल कर, पण कर हे हायलाईट करायचे होते.

स्वतःच्या हनिमुनच्या तिकीटावर पॅरिसला जाते.
चित्रपट पाहण्याचा योग अद्यापि न आल्याने या वाक्यासंदर्भात थोडी शंका मनात आली आहे. लग्नापूर्वीच लग्न मोडण्याची शक्यता वगैरे गृहित धरून आपआपली हनिमूनची तिकीटे काढण्याची प्रथा उत्तरेत रुढ आहे काय? की लग्न मोडल्याचे लक्षात आल्यानंतर आता आपआपला हनिमून साजरा करुया म्हणून तिकीट काढण्यात आले आहे? दारु पिणे किंवा स्ट्रिप क्लब मध्ये जाऊन नाचणे यामुळे खरी स्त्रीमुक्ती होईल की नाही याबाबत शंका आहे. अशा पद्धतीची स्त्रीमुक्ती ही टीपिकल बॉलीवूडी वाटली. (टिप्पणी फक्त चित्रपटाच्या कंटेंटबाबतच केली आहे. वरील लेखाबाबत काही आक्षेप नाही).

In reply to by आजानुकर्ण

>>>चित्रपट पाहण्याचा योग अद्यापि न आल्याने या वाक्यासंदर्भात थोडी शंका मनात आली आहे. लग्नापूर्वीच लग्न मोडण्याची शक्यता वगैरे गृहित धरून आपआपली हनिमूनची तिकीटे काढण्याची प्रथा उत्तरेत रुढ आहे काय? की लग्न मोडल्याचे लक्षात आल्यानंतर आता आपआपला हनिमून साजरा करुया म्हणून तिकीट काढण्यात आले आहे? >>> हनिमूनची तिकिटे दोघांचीही तिनेच पैसे वाचवून आणि हौसेनी काढली असतात आणि तो लग्नाच्या आदल्या दिवशी लग्न मोडतो. लग्नाआधी तिकिटे काढण्यात काय गैर आहे? आमच्याही हनिमूनची तिकिटे आधीच काढलेली होति. रेल्वेनी गेलो होतो आणि रेल्वेचं रिझरवेशन ६० दिवस आधीच कराव लागत. >>> दारु पिणे किंवा स्ट्रिप क्लब मध्ये जाऊन नाचणे यामुळे खरी स्त्रीमुक्ती होईल की नाही याबाबत शंका आहे. अशा पद्धतीची स्त्रीमुक्ती ही टीपिकल बॉलीवूडी वाटली. >>> कृपया जमल्यास निर्लेप मनानी पिक्चर पाहा.

In reply to by स्वप्नांची राणी

हनिमूनची तिकिटे दोघांचीही तिनेच पैसे वाचवून आणि हौसेनी काढली असतात
हं ... म्हणजे सुरूवातीलाच तिने काही पुरुषप्रधान संस्कृतीचे संकेत मोडलेले दाखवले आहेत तर. उदा - मुलानेच दोघांचाही सगळा खर्च करणे, हा संकेत. दारू पिणे आणि स्ट्रिप क्लबमधे जाणे हे जरी रानीने केलेलं असलं तरी ते तिचं साध्य नसावं. तिचं साध्य, तिचा हेतू स्वतःचा शोध घेणे असा असावा. आपल्यासाठी पूर्ण अनोळखी वातावरणात जाऊन स्वतःचा शोध घेण्याला परंपरेतही मान्यता आहे. उदाहरणार्थ "केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार". (स्त्रीमुक्तीवादींची तक्रार अशी असते की या गोष्टी बाईने केल्या की त्याबद्दल नाराजी व्यक्त होते.)

In reply to by आजानुकर्ण

चित्रपटाचा कंटेंट हा आहे की तिला भेटलेल्या एका मैत्रीणीचे पॅकेज दुसर्‍या एका मुलीला देण्यासाठी ती पत्ता विचारत स्ट्रीप्टीज स्ट्रीटवर जाते. आता अर्थातच कारण विचाराल? चुकली की काय म्हणाल? नाही हो! दुसर कोणत काम मिळेपर्यंत स्ट्रीप्टीज मधले पैसे घरी पाठवत असते ती अन घरुन आलेली पत्रे या पत्त्यावर येउ नयेत म्हणुन मैत्रेणीच्या पत्त्यावर मागवत असते. अर्थात हिरॉइन स्ट्रीप्टीज स्ट्रीटवर तिला शोधत जाते. एव्हढा उअहापोह बास झाला. पण जगात असही जगलं जात हे दाखवायचा प्रयत्न असावा तो अन एका मध्यमवर्गिय मुलीच्या साध्या दुखा:पेक्षा बराच संघर्ष असलेला दिसतो.

सिनेमा पहावा असे वाटत असताना आपले परीक्षण वाचले आणि लगेच रात्रो सिनेमा पाहिला परीक्षण आवडले होतेच पण सिनेमा पाहिल्यानंतर ते जास्तच आवडले सिनेमा आवडला !! अवांतर : काही वर्षापूर्वी TV वर एक मराठी सिनेमा पाहिला . त्या सिनेमाची नायक /नायिका माहित नाहीत . नायकाच्या वडिलांचे काम करणारे श्री बाळ कर्वे आठवतात नायक वडिलांना कोकणात पैसे पाठवताना दमून शेवटी नायिकेच्या वडिलाकडून मिळालेले पैसे [जे हुंडा म्हणून नाही तर ----]वडिलांना पाठवून कोकणातले घर दुरुस्त करण्यास मदत करतो पैसे मिळवत असताना त्याचे नायिकेकडे होणारे दुर्लक्ष ,नायिकेच्या भावनांचा होणारा चोळामोळा याचे सुरेख दर्शन घडवले आहे . याचा शेवट अफलातून दाखवला आहे नायक कर्तव्य पूर्ति [वडिलांची घर दुरुस्तीची इच्छा पूर्ण करणे ]करून नायिकेस आता आपण लग्न करू म्हणतो तेंव्हा ती नाही म्हणते नायक जेंव्हा तुझ्या वडिलांचे पैसे परत करीन म्हणतो तेंव्हा ती त्याची गरज नाही असे म्हणून त्याच्या जवळून उठून चालू लागते ---- अगदी राणी सारखी !!!

क्वीन पाहिला नव्हता. एका मित्राला तो बी ग्रेड पिक्चर वाटतो असेही म्हणालो होतो. एकुण बर्‍याच जणांनी नंतर चांगला आहे म्हणुन सांगितले. आत्ता नक्की बघेन.

वाचून मजा आली. 'क्वीन' मला आवडला. कंगनाने चांगलं काम केलं आहे. आणि स्टोरी अशी काही नसली तरी जे काही दाखवलं आहे ते बघायला मजा वाटते. तिला खूप सहकार्य देणारे खोलीमित्र भेटतात हा खूपच मोठा योगायोग.

In reply to by समीरसूर

धन्यवाद..!! ह्या निमित्ताने लेखाविषयी प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार.. इथे कितीही दंगा झालेला असला तरी खुप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतिक्रियाही आहेत. पहिल्यांदाच माझ्या लिखाणाला इतक्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह प्रतिसाद मिळालेला पाहुन खुपच मस्त वाटलं..! दंगा करणार्‍यांनी सतत माझा धागा बोर्डावर पहिल्या दुसर्‍या नंबर वर राहील ह्याची काळजी घेतली आणि म्हणुनच प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता धाग्याने शंभरी गाठली म्हणुन त्यांचेही आभार... (आता तर चक्क द्विशतकाकडे वाटचाल आहे.. पण ते वरचे ७०-८० प्रतिसाद लेखावर नाहीत म्हणुन त्यांचं अप्रुप नाही..) पण ह्या लेखाला आणि ह्या विषयाला माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ देऊ शकते तेवढा मी दिला आहे.. ह्या उप्पर मी इथे वेळ घालवु शकत नाही.. त्यामुळे माझ्या कडुन ह्या धाग्यावर लेखन सीमा.. धन्यवाद...

चित्रपट बघितला नाहीये अजून. पण बघणारच्च आहे. ट्रेलर आवडलेला आहे. कथा ऐकलीये ती ही आवडलेली आहे. कंगना मला आवडतेच. डायना हेडनही. कंगनाने तर संवाद लेखनही केले आहे जोडीने. सगळ्यात बेष्ट म्हणजे कथेचा शेवट आवडला आहे. (कथा ऐकत असताना सिनेमाचे वेगळेपण जाणवत होते, पण परंपरागत शेवट करून घाण करणार अशी खात्री होती, तिथे सुखद अपेक्षाभंग झाला!) एका मैत्रिणीने बरीच स्तुतीही केली आहे या सिनेमाची. नुसती कथा वगैरेच नव्हे तर दिग्दर्शनातले, मांडणीतले बारकावेही खूप सुंदर घेतले आहेत असे समजते. लेख आवडला. मग काही 'मुख्य' प्रतिसाद वाचले म्हणून लेख परत वाचावा असं वाटलं. परत वाचला, तर परत आवडला. स्त्रीमुक्तीच्या नावाखाली काय वाट्टेल ते असं सिनेमातही असेल असे वाटत नाही किंवा या लेखातही तसे काही असावे असे वाटले नाही. पिरा, लिहित रहा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ती लिसा हेडन आहे. 'बाबूजी'च्या देखील हृदयात ज्या सुंदरीला बघून कळ येते ती लिसा हेडन (चित्रपटातली विजयालक्ष्मी). रानीच्या धाकट्या भावाचा (वय १२) देखील कलिजा जी खल्लास करते ती लिसा हेडन. :-)

In reply to by समीरसूर

लिसा हेडनचाही रोल निव्वळ अप्रतिम आहे.. एकदम कडक.. शिवाय चित्रपटात काही चांगलेच बोल्ड सीन सुद्धा आहेत.. पण लिसा हेडनने असल्या सहजतेने ते केले आहेत की चित्रपटाच्या फ्लो मध्ये सहज सामावुन जातात.. उगाच अंगावर येत नाहीत. एवढ्या चर्चेतही कुणाला ते आक्षेपार्ह वाटले नाहीत हे विशेष...

In reply to by पिलीयन रायडर

पण नंतर अ‍ॅम्स्टरडॅममध्ये जी खालिस उर्दू मध्ये बोलणारी युवती दाखवली आहे, तिच्या कपड्यांवर आम्ही काहीसे खफा झालो. म्हणजे आम्ही हा चित्रपट आमच्या बेगम आणि आमच्या बेगमचे अब्बूजान यांच्या समवेत पाहिला. त्यामुळे आम्हास या युवतीचे प्रसंग बघतांना खूप अवघडल्यासारखे होत होते. निदान म्हणून तरी तिने थोडे जियादा कपडे परिधान करायला हवे होते असे वाटले. पण ती आणि तिची अदा मात्र कातिल होती यात काही शक नाही. कोई शक?

In reply to by समीरसूर

मी कितीही मुक्त असले तरी मी आमच्या शौहरच्या डोळ्यावर लग्गेच हात ठेवला..!! मलाही तिथे अवघ्डल्या सारखं झालं.. पण ती एकदम बिन्धास्त असा अभिनय कॅमेरा समोर करत होती ह्याच राहुन राहुन आश्चर्य वाटलं..

In reply to by पिलीयन रायडर

:-) माझ्या डोळ्यांवर कुणी (सुदैवाने) हात ठेवला नाही. ;-) आमची जान-ए-बहार बहुतेक आपल्या अब्बूंना असले सीन्स बघून काय वाटत असेल या खयालाने परेशान झाल्यामुळे अशी खबरदारी घ्यायची विसरली असेल.

In reply to by पिलीयन रायडर

बदनसीब नाही एवढे खरे! :-) नाहीतर आजकालच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेजचे उत्तर ताबडतोब नाही आले तरी स्वतःला बदनसीब समजतात काही लोकं. :-)

In reply to by समीरसूर

आजकालच्या जमान्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या मेसेजचे उत्तर ताबडतोब नाही आले तरी स्वतःला बदनसीब समजतात काही लोकं. Smile>>> +++++++ १ अणुभव णाही पण असे लोक पहिले आहेत . :D

परिक्षण आवडले खुपच...चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे आता...बघेनच..

हे काय गौडमहाराष्ट्र आहे ? इथले काही प्रतिसाद अचानक कमी का झालेत ?

ताई.. मस्त लिह्ल आहेस! माझी बहिण एवढ छान लिहिते याचा अभिमान आहे :)

नितांत सुंदर चित्रपटाचे तितकेच सुंदर परिक्षण. अजुन येवु द्यात.

ती भारतातून निघताना ती जड बॅग कशीबशी सांभाळत असते आणि परत येताना मस्त खांद्यावर ओझं मारुन येते ते जाम आवडलं.. दु:ख उगाळत बसल्यासारखं ते ओझं ओढत ओढत नेण्यापेक्षा न कुरकुरता मस्त अ‍ॅक्सेप्ट करुन पुढे जाण्याचा बदल आवडला..

In reply to by पिशी अबोली

मला अजुन एक आवडलेली गोष्ट म्हणाजे तिच्या हातावरची मेंदी.. जेव्हा ती नुकतीच मेंदी काढुन नवर्‍याला भेटायला जाते तेव्हा तिच्या मेंदीचे कण टेबल वर पडतात.. आणि विजय ते लगेच झटकुन टाकतो.. पुढे पुढे मेंदी गडद होते आणि पॅरिसला जाईस्तोवर एकदम गडद दिसते.. पण हळु हळु तिचा रंग सुटताना दाखवला आहे.. शेवटच्या काही द्रुष्यात तर अर्धी मुर्धी राहिलेली हलक्या केशरी रंगाची मेंदी.. जणु काही लग्नासाठी तयार झालेली..त्या रंगात रंगलेली.. मग लग्न मोडल्याचा दु:खात बुडालेली रानी.. हळु हळु त्यातुन बाहेर येतेय.. जशी मेंदी सुटत जाते तशी कंगना पण बंधनातुन मोकळी होत जाते..!! कंगनाने खरच मेम्दी लावुन सलग डेट्स दिल्या असणार.. म्हणुनच हा इफ्फेक्ट घेता आला असेल..

पण बॉलीवुड भारतीय स्त्रियांची जी मानसिकता उभी करत आहे ती नक्किच अतिशय किळसवाणी आहे. एक मिपाकर म्हणून बॉलीवुडची हि उभी मानसीकता बघता मला शरम वाटली.
*- हे सगळं माझं बॉलिवुड ग्यान आहे.. माझी मतं नाहीत.. त्यामुळे कुठल्याच मुक्ती मोर्चांनी माझ्यावर धावुन येऊ नये.. मी उत्तरं देत बसण्याचा टाईमपास करणार नाहीये..
अशक्य.

In reply to by आत्मशून्य

पण बॉलीवुड भारतीय स्त्रियांची जी मानसिकता उभी करत आहे ती नक्किच अतिशय किळसवाणी आहे.
उसगावात काम करत असताना माझ्यासोबत काम करणार्‍या एका आम्रिकन आज्जींनी मला आऊटसोर्स्ड चित्रपटाची तबकडी दिली होती. चित्रपटाचा शेवट शिसारी आणणारा होता. त्या आज्जींच्या "नाईस मुव्ही हां" ला उत्तर देताना मी "हा चित्रपट कुणा एका स्त्रीचा व्यक्तीगत अनुभव असूही शकेल. मात्र भारतीय स्त्रीयांचं प्रातिनिधिक उदाहरण नव्हे." असं कळवळून समजावलं होतं.

मस्त लिहिलं आहेस परिक्षण. एकदम चाबूक :) वाचताना मजा आली. सही पंचेस आहेत. चित्रपटही पाहिला. खूप आवडला. एकदम वेगळे कथानक. सुंदर डिरेक्शन. शेवट पण छानच. कंगनाने भूमिका अप्रतिम वठवली आहे. आणि बाकीही बर्‍याच जणांची अ‍ॅक्टिंग आवडली.

धागाविषय वा प्रतिसादाच्या निमीत्ताने झालेली चर्चा वाचुन नेहमीप्रमाणे मौज वाटली, लेखन वाचुन समाधान झाले, प्रत्येक गोष्टीत अर्थ लपलेला असतो आणि तो शोधुन काढण्याचे कसब लेखणीत शब्दोशब्दी जाणवले, आम्हीच स्साले येडपट , आम्ही गपचुप टिव्ही वर ते हिन्दीमदी डब केलेले तेलगु चित्रपट बघतो, स्त्री-स्वातंत्र्य ई.ई पेक्षा हिरो पोरीला कसा पटविततो हेच लक्ष देत असतो , जमलच कधी तर ७२ मैल, जोगवा असे काही चित्रपट पहात असतो .....असो ... हा वाद मक्तेदारीचा नाहीये आणि नसावा ....मला कोणीतरी आधी स्त्री-स्वातंत्र्य ची व्याख्या सांगावी व मग त्या क्वीन मध्ये त्यातला काय अर्थ दडलेला आहे आहे समजावे , नंतर मग इथ अनाहिताची गरज का भासली असावी हे ही समजावे , शिवाय प्रायव्हसी का व कशासाठी असते हे ही सांगावे ,.. पामर

In reply to by सुहास..

कोणाची कशी व्याख्या माहीत नाही पण मी तरी व्यक्ती स्वातंत्र्य तेच सार्‍यांचे स्वातंत्र्य मानेन.

एवढा गदारोळ झालाय म्हटल्यावर शिनेमा बघायला जाणे भाग आहे. ;) लंबूटांगा, आज आम्ही चाललोय, येताय का दोघेही? आज ३. ५० दुपारी. विकासदादा, तुम्ही सगळेजण येताय का? पाहून आल्यावर इथे प्रतिसादासाठी रुमाल टाकून ठेवतीये.

In reply to by रेवती

आत्ताच पाहून आले. शिनेमा चांगला झाला आहे. आवडला. भयानक आवडेल असे वाटले होते पण ९०% आवडला. कदाचित आधी इथली चर्चा वाचल्याने पुढे काय होणार याची कल्पना आली होती. आता इथल्या ग्रोसरी स्टोरातून याची डिव्हीडी आणून ठेवीन कधीतरी बघायला म्हणून! शेवटी रॉकगाणी ऐकायला जाते तेंव्हाचा कपडा भयंकर आवडला. किंवा एक हिरवा आणि एक पांढरा गुलाबी स्कर्ट!

अवांतरच वाटेल, पण बेगड्या गोष्टी स्त्रिमुक्ती न्हवे यावर झणझणीत अंजनही आहे. इथे तर कोणी कोणाला बंधनात टाकले न्हवते....

In reply to by बॅटमॅन

हो ना आणि एका स्त्रीने केले आहे तर कौतुकाचा वर्षावच होत आहे नाही अगदी.. जराही दंगा नाही की वाद नाहीत.. की संपादकांचा हस्तक्षेप नाही.. सगळं कस गुडीगुडी.. आणि हो.. जे काही आहे ते सगळं लेखिका "स्त्री" आहे म्हणुन.. बाकी लेख चांगला वाईट , हे मुद्दे गौण्च.. (तुम्ही अजुनही काड्याच सारत आहात ते ठाऊक आहे.. )

In reply to by बॅटमॅन

यानुशंगाने अवांतरात (वाटेल) प्रतिसाद लिहला आहे, पण दुर्लक्षण्याजोगी गोष्ट नक्किच नाही.
हेच लेखन कुणा पुरुषानं केलं असतं तर आत्तापावेतो त्यावर विडंबनं आणि कुचेष्टेचा पाऊस पडला असता.
:) हे आधिच लिहलं होतं.पण संपादीत झाले असावे अथवा नाही ते परत पाहिले नाही. पण सकाळमधील बातमी गंभीर आहे हे नक्कि. आणी लग्नसंस्थेपेक्षा स्वराचार बळावतोय हे चिंताजनक आहे.

In reply to by आत्मशून्य

स्वैराचार म्हणजे नक्की काय. वयाची तिशी उलटून जाते तरी मुले मुली व्हर्जिन राहतात. यात कोणता अभिमान आहे. भारतात हे असे घडते याचा खेद वाटतो. सकाळच्या वेळी जोरदार प्रेशर येते तेव्हा नेमके कोणीतरी आत असेल तर काय होते. तासे होउ नये यासाठी तरी बाथरुममधे तारुण्य वाया जाणे बंद झाले पाहिजे.