डिनायल (denial) या इंग्रजी शब्दाचा शब्दकोषातील अर्थ आहे काहितरी नाकारण्याची कृती. या शब्दाच्या अर्थाच्या जवळपास जाणारा मराठी शब्दप्रयोग आहे "कानावर हात ठेवणे".
आपल्यावरील प्रतिहल्ला परतवून लावणे ही कुठल्याही प्राण्याची उपजत प्रेरणा असते. त्यामुळे जेव्हा हल्ला करणार्याचा आपण सामना करु शकतो अशी खात्री त्या प्राण्याला पटली की तो पलटवाराला तयार होतो. किंवा आपण हल्ला करण्याचा सामना करु शकत नाही असं जर त्या प्राण्याला वाटलं तर तो हल्ला करणार्यापासून दूर पळून जातो. या वस्तूस्थितीला मानसशास्त्र "लढा किंवा पळा" (फाईट ऑर फ्लाईट) म्हणून ओळखते. लिहिताना मी हे जरी दोन वाक्यात लिहू शकलो तरी प्रत्यक्षात ही त्या क्षणी शरीरांतर्गत होणारी खुपच गुंतागुंतीची प्रक्रिया असते. यातील अजून गंमतीचा भाग असा की प्रत्येक वेळी त्या प्राण्यावर प्रत्यक्षात असा हल्ला झालेला असतोच असे नाही. काही वेळा त्या प्राण्याचा विविध कारणांमुळे हल्ला झालेला नसूनही हल्ला झाला आहे असा समज होतो. आणि मग हा प्राणी या न झालेल्या हल्ल्याविरोधात सावध होतो. आणि याला मनुष्यप्राणीही अपवाद नाही असो.
हे सारं झालं शारीरीक हल्ल्याच्या बाबतीत. हा हल्ला शाब्दिक असेल तर? हल्ल्याचं जाऊ दया. कुणी आपल्याला न रुचणारं, न आवडणारं काही ऐकवण्याचा प्रयत्न करत असेल तर? अशा वेळी काही माणसं ते ऐकवले जाणारे विचार बरेच वेळा वस्तूस्थिती असूनही माणसं ते विचार क्लेशदायक आहेत म्हणून त्यांना सामोरं जात नाहीत. ती वस्तूस्थिती नाकारतात. कानावर हात ठेवतात, ऐकून न ऐकल्यासारखं करतात. हा जणू काही त्यांच्यावरील विचारांचा हल्ला असतो आणि ते विचार नाकारणे हा एक प्रकारचा बचावात्मक पवित्रा (defence mechanisms) असतो.
काही वेळेला एखादं सुर्यप्रकाशाईतकं स्वच्छ वास्तव दिसत असताना एखादया व्यक्तीची त्या वास्तवाला सामोरं जायची तयारी नसते. आणि हे सारं अंतर्मानाच्या पातळीवर होत असतं. त्या व्यक्तीला आपण एखादं ढळढळीत सत्य नाकारत आहोत याची जाणिवही नसते. तो त्या व्यक्तीच्या मनाने घेतलेला बचावात्मक पवित्रा असतो जेणेकरुन त्या विचारांचा, वास्तवाचा त्या व्यक्तीला त्रास होणार नाही.
हा नकारात्मक पवित्रा व्यक्तीगणिक बदलतो. काही व्यक्ती सत्य ढळढळीतपणे नाकारतात. काही व्यक्ती अंशतः वस्तूस्थिती स्विकारतात. काही वस्तूस्थितीचा स्विकार जरी पुर्णपणे करतात मात्र त्या वस्तूस्थितीला ते तितकेसे गांभिर्याने घेत नाहीत. काही त्याची जबाबदारी दुसर्यावर ढकलतात. व्यक्ती तितक्या प्रकृती.
याची उदाहरणे जागोजागी आपल्या पाहण्यात येतात. एखाद्या घरातील कर्ता मुलगा दारुच्या व्यसनात ठार बुडून जातो. बायको-मुलांचे हाल होतात. म्हातारे आई-वडील हाय खातात. कुणी हे सारं त्या व्यसनी व्यक्तीस समजावण्याचा प्रयत्न केला तर तो कानावर हात तर ठेवतोच, अधिक "त्यांना काय झाले आहे, ते सारे मजेत आहेत. उलट त्यांच्यामुळेच तर मी दारुच्या नादी लागलो" असे समजावणार्यालाच सुनावतो. एखादा अहंमन्य, आत्मकेंद्री माणूस आयुष्यभर आपल्याच धूंदीत जगतो. आपल्यामागे इतरांची फरफट होतेय हे त्याच्या गावीही नसते. कुणी समजवायला गेले तर समजावणार्यालाच वेडयात काढतो.
आता प्रश्न हा आहे की अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असल्यास काय करायचे? उत्तर सोपं नाही. समोरच्या व्यक्तीला काही समस्या असेल आणि ती व्यक्ती समस्या नाकारत असेल तर त्या व्यक्तीपर्यंत पोहचणे अवघड असते. वास्तव स्विकारण्याईतपत मनाची तयारी नसल्यामुळे एक अभेद्य भींत त्या व्यक्तीने आपल्यासमोर उभी केलेली असते.
अशावेळी मानसोपचार क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे, त्या व्यक्तीस *समुपदेशकाकडे घेऊन जाणे हा प्रभावी उपाय ठरतो.
* समस्याग्रस्त व्यक्तीस समुपदेशकाकडे घेऊन जाणे हे मुळ समस्येपेक्षा अधिक तापदायक प्रकार होऊ शकतो. निदान भारतात तरी. त्यावर पुन्हा कधी तरी. :)
वाचने
14640
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
डिनायल'ला अत्यंत अचूक पकडलस
एक अतिशय चांगला विषय...
+१
In reply to एक अतिशय चांगला विषय... by मुक्त विहारि
छान लिहिलंस रे.
उत्तम विषय
मानसशास्त्र हे सर्वात अविकसीत शास्त्र आहे...!
In reply to उत्तम विषय by पैसा
सदरील प्रतिसाद
In reply to मानसशास्त्र हे सर्वात अविकसीत शास्त्र आहे...! by आत्मशून्य
"यासाठीच ते मेंदु "ड्ल"
In reply to मानसशास्त्र हे सर्वात अविकसीत शास्त्र आहे...! by आत्मशून्य
फायनली...! वेलकम टु द कॉन्व्हरसेशन सर.
In reply to "यासाठीच ते मेंदु "ड्ल" by सुबोध खरे
यासाठीच ते मेंदु "ड्ल"
In reply to "यासाठीच ते मेंदु "ड्ल" by सुबोध खरे
:(
In reply to यासाठीच ते मेंदु "ड्ल" by स्पंदना
धन्या मस्त लेख. बर्याचदा हा
काका आपण माझ्याप्रमाणेच चिकीत्सक आहात...!
In reply to धन्या मस्त लेख. बर्याचदा हा by प्रकाश घाटपांडे
निशेध
In reply to काका आपण माझ्याप्रमाणेच चिकीत्सक आहात...! by आत्मशून्य
गेली पाचेक वर्षे हा प्रकार
+१
In reply to गेली पाचेक वर्षे हा प्रकार by सूड
आता आपण डिनायल्सच्या
डिनायल
तुम्ही पहिली जी दोन उदाहरणे
In reply to डिनायल by सुबोध खरे
दुसरे उदाहरण आपण म्हणता तसे
In reply to तुम्ही पहिली जी दोन उदाहरणे by मनीषा
हो. मलाही ती दोन्ही उदाहरणे
In reply to दुसरे उदाहरण आपण म्हणता तसे by सुबोध खरे
जी उदहरणं दिली आहेत तशी
In reply to डिनायल by सुबोध खरे
तुम्ही म्हणताय तसं डिनायलच्या
In reply to जी उदहरणं दिली आहेत तशी by कवितानागेश
आजुबाजुचे समुपदेशकाकडे जाउन
In reply to तुम्ही म्हणताय तसं डिनायलच्या by धन्या
ओह अच्छा!
In reply to आजुबाजुचे समुपदेशकाकडे जाउन by आत्मशून्य
तुम्हाला केंव्हा न्यायचे ?
In reply to ओह अच्छा! by आत्मशून्य
वेल कम टु दी कॉन्वरसेशन सर!
In reply to तुम्हाला केंव्हा न्यायचे ? by संजय क्षीरसागर
आणी संक्षी सर एक महत्वाचे सांगायचे होते...
In reply to वेल कम टु दी कॉन्वरसेशन सर! by आत्मशून्य
काही दुवे
In reply to डिनायल by सुबोध खरे
मुद्दाम गहन विचार करणार्
विचार योग्य आहे की अयोग्य ?
In reply to मुद्दाम गहन विचार करणार् by सुबोध खरे
माझ्या मते हे वाक्य जरा
In reply to विचार योग्य आहे की अयोग्य ? by आत्मशून्य
पुढे जाऊन जर ती व्यक्ती
In reply to माझ्या मते हे वाक्य जरा by आनन्दा
I am allways right, not customor
अहं नाही. फक्त निपक्षपाती वास्तव आहे.
In reply to I am allways right, not customor by सुबोध खरे
डिनायल? हे काय असतं बुवा? मला
वेलकम सर!
In reply to डिनायल? हे काय असतं बुवा? मला by राजेश घासकडवी
प्रतिक्रीया देणेबाब डिनायल मोडमधे न गेल्याबद्दल
In reply to वेलकम सर! by आत्मशून्य
@ राजेश घासकडवी -
तुमच्या वाक्याचा अर्थ ०% कळला
In reply to @ राजेश घासकडवी - by आत्मशून्य
तो प्रतिसाद घासकडवींना अर्पित होता
In reply to तुमच्या वाक्याचा अर्थ ०% कळला by मनीषा
हो का सॉरी ! आणि असो ...
In reply to तो प्रतिसाद घासकडवींना अर्पित होता by आत्मशून्य
मीच सॉरी!
In reply to हो का सॉरी ! आणि असो ... by मनीषा
या वैदन्यानिक धाग्यावर खेदाने नमूद करावेसे वाटते की एकानेही
मंत्र शक्ती बद्दल सहज आठवल म्हणून
In reply to या वैदन्यानिक धाग्यावर खेदाने नमूद करावेसे वाटते की एकानेही by आत्मशून्य
चर्चा वाचतोय...
In reply to या वैदन्यानिक धाग्यावर खेदाने नमूद करावेसे वाटते की एकानेही by आत्मशून्य
मला वाटतय डिनायल अन अंगचोरपणा
मला वाटतय डिनायल अन अंगचोरपणा
In reply to मला वाटतय डिनायल अन अंगचोरपणा by स्पंदना
मी तुम्ही लेखात दिलेली
In reply to मला वाटतय डिनायल अन अंगचोरपणा by धन्या
प्रतिसाद आवडला...!
In reply to मी तुम्ही लेखात दिलेली by स्पंदना
एक प्रश्न...
In reply to प्रतिसाद आवडला...! by आत्मशून्य
:D हा हा हा ! जाने दो.. सरजी.
In reply to एक प्रश्न... by मदनबाण
उदाहरण
चांगला मुद्दा
In reply to उदाहरण by पैसा
मला पर्सनली असे वाटते की
In reply to चांगला मुद्दा by माहितगार
अवांतर
In reply to मला पर्सनली असे वाटते की by आनन्दा
विषयाशी संबंधीतच वाटते
In reply to अवांतर by बॅटमॅन
म्हणजे
In reply to चांगला मुद्दा by माहितगार
डिनायल मधून बाहेर काढणे; माझा दृष्टिकोण (प्रतिसाद भाग १)
In reply to म्हणजे by पैसा
मला वाटते मी वरच त्याचे उत्तर
In reply to डिनायल मधून बाहेर काढणे; माझा दृष्टिकोण (प्रतिसाद भाग १) by माहितगार
सहमत
In reply to मला वाटते मी वरच त्याचे उत्तर by आनन्दा
डिनायल मधून बाहेर काढणे; माझा दृष्टिकोण (प्रतिसाद भाग २)
In reply to म्हणजे by पैसा
डिनायल मधून बाहेर काढणे; माझा दृष्टिकोण (प्रतिसाद भाग ३)
In reply to म्हणजे by पैसा
भवतालची परिस्थिती
In reply to डिनायल मधून बाहेर काढणे; माझा दृष्टिकोण (प्रतिसाद भाग ३) by माहितगार
Response Options हा दुवा बघा
In reply to भवतालची परिस्थिती by पैसा
कशासाठी?
In reply to Response Options हा दुवा बघा by माहितगार
क्षमस्व
In reply to कशासाठी? by पैसा
दुखावायचा हेतू नाही
In reply to क्षमस्व by माहितगार
बरोबर
In reply to दुखावायचा हेतू नाही by पैसा
हमको मालूम है जन्नत की हकीकत
प्लस वन
In reply to हमको मालूम है जन्नत की हकीकत by गवि
दारूसारखंच, अगदी मर्यादित
In reply to प्लस वन by राजेश घासकडवी
अवांतर
बहोत खूब
In reply to अवांतर by माहितगार
हे पण असतं ना
होय.
In reply to हे पण असतं ना by इरसाल
अगदी बरोबर
In reply to होय. by धन्या
याचा प्रॅक्टीकल उपयोग कसा केला जातो ?
In reply to अगदी बरोबर by इरसाल
पण
मला आहे की!!
In reply to पण by सस्नेह
अगदी सहज उदाहरण
In reply to मला आहे की!! by कवितानागेश
आत्मू'बाबा स्मायलीवाले!यांच्या मताशी सहमत.