Skip to main content

पंचाईत

बुधवार, 04/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते .... काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ... आता हेच बघा ना, परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ?? आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ?? मी प्ले ग्रुप ला जाते .... च्यामारी, मराठी मध्ये शाळा म्हणालो तर मी गावंढळ का ?? खरं सांगू का ?? मला नाही आवडत रिमिक्स गाणी ऐकायला किंवा चेतन भगत ची पुस्तक वाचायला,,म्हणजे मला ते बिल्कूलच जमत नाही असा काही नाही .... कधी मूड लागला तर वाचतो पण .... मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)... मग होते पंचाईत ... खरं सांगाव तर आपण बावळट ठरतो आणि खोटं बोलायची सोयच नाही .... असाच मुंबई वरून एकदा येत होतो, समोर च्या सीट वर एक आजोबा बसले होते, बराच वेळ त्यांची चुळबुळ चालली होती ... बर आपण काही बोलाव तर त्यांची नात त्यांच्या बरोबर होती .... असेल १५-१६ वर्षांची ( दिसायला पण बरी होती)... कानात इयरफोन लाऊन गाणी ऐकत होती ... आजोबा तसेच, अस्वस्थ .... शेवटी राहवेना म्हणून आजोबांना विचारलं "काही होतंय का तुम्हाला ?? काही हव आहे का ?" इतक बोलायचा अवकाश ते घडाघडा बोलायला लागले ... किती साधं होतं ते बोलणं , पण ऐकणारं कोणीतरी असावं इतकंच हवं होत त्यांना .... नात शेजारी असताना हि वेळ का येते ?? मी त्यांच्याशी बोलायला लागलो तर त्या मुलीने खूप विचित्र नजरेनी बघितलं .... थोडा वेळ गप्पा मारून मी पण मग शांत बसलो .... पण आत कुठे तरी काहीतरी हललं होतं हे मात्र खरं .... इथे पण माझंच काहीतरी चुकलं का?? मला तर नाही वाटत तसं .... मग माझीच अशी पंचाईत का होते ?? का तुमचं पण असंच होतं ?? तुम्ही द्याल का या प्रश्नाच उत्तर ?? टाळू शकता का तुम्ही अशी पंचाईत??
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7490
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

निर्लज्ज व्हावे. समोरचा काय विचार करतो, काय करायचंय आपल्याला?? उगा जास्त बोलून राहिला तर "मेरे मन को भाया मैने कुत्ता काट के खाया" असं त्याला ऐकवून टाकायचं. अन् तिरस्कार वगैरे नसेल हो तो, आश्चर्य किंवा कुतूहलपण असेल..

In reply to by लॉरी टांगटूंगकर

"मेरे मन को भाया मैने कुत्ता काट के खाया"
वर "लोमडी का दूध पी के पला है ये जगीरा" असं जोरात ओरडायचं... जाम भारी इफेक्ट येतो...

In reply to by आदूबाळ

झकास, अण्भवाचे बोल का? हा डायलॉग मारायला मेरठच्या एका मित्राकडून शिकलो होतो. कुठल्या शिनेमा मधला आहे काय? क्रिएटीव्हीटी आपलीच असल्यास _/\_

In reply to by लॉरी टांगटूंगकर

च्यायला, तुला चायना गेट नाय म्हायती? 'चम्मा चम्मा बाजे रे मेरी' पैंजनिया म्हणत उर्मिला नं कसलं भारी वेल्लाभटचं सर्किट ट्रेनिंग केलंय. लई भारी. ;)

In reply to by लॉरी टांगटूंगकर

माझी कसली डोंबल्याची क्रिएटिविटी? हा "चायना गेट" चित्रपटातल्या व्हिलनचा (जगीरा) ड्वायलॉक आहे. अभिनेता मुकेश तिवारीचा पहिला चित्रपट. तिवारी म्हणजे गंगाजल मधला "बच्चा यादव".

In reply to by आदूबाळ

लहान असताना पाहीलेला रे. काहीही आठवत नाही. शिनेमा न जमल्यास सर्कीट ट्रेनिंग तर नक्की शोधतो वेळ मिळाल्यावर ..

फाट्यावर मारणेच उत्तम. ल्हानपणापासून अशा नजरांची सवय आहे, पुढे पुढे अजून सरप्राइजवायला लै मज्जा येते =)) च्यायचे साले मूर्खागमनी.

In reply to by बॅटमॅन

चेतन भगत .... कधी मूड लागला तर वाचतो पण .... मी अस सांगितलं ना कि मला नाही आवडत हे सगळ, कि समोरच्या माणसाची नजर लगेच तिरस्कार का काय म्हणतात ते, त्याने भरून जाते ... (मुलगी असेल तर १० पट जास्तच)
व्हू दा हेल इज चेतन भोगत…भगत व्हॉटेवर (चेहऱ्यावर तुसडेपणाचे भाव), आय नो ओन्ली जॉर्ज ऑरवेल,डैन ब्राऊन ,जे आर आर etc. ओन्ली…ग्रो अप हनी ;)

In reply to by मालोजीराव

हू? चेतन भगत? दॅट चीप थर्ड रेट फूल? बाकीची पुरवणी तर झकासच. या प्रभावळीतली दोनचार नावे फेकली की समोरचा गार!!! एशीवाला नै आक्शी बर्फवाला गार!!!!

मिपा वर निर्ल्लज असण्याचे फायदे असा नावाचा धागा आहे .तो वाचा

त्यात काय झाले मग? मी "जयोस्तुते " मन लावुन ऐकतो हे बघितल्यावर एका कलीगने असेच वाकडे तोंड केले होते. माझ्या वयाच्या मानाने मी खुपच म्हातारी गाणी ऐकतो असे तिचे म्हणणे पडले. जयोस्तुते म्हातारे कसे आणि मुळात कुठलेही गाणे म्हातारे कसे असु शकते हे मला कळाले नाही. मग मी तिला "जयोस्तुते ऐकत नाहिस तु?" असे अजुन आश्चर्याने विचारले. जयोस्तुते च्या पुढचे गाणे कमिने मधले होते ते बघुन ती बेशुद्धावस्थेत जाण्याच्या मार्गावर होती ;)

वर म्हटल्याप्रमाणे असल्या वायझेड लोकांना फाट्यावरच मारावे. च्यायला गॅजेट्स ची आवड असल्यावर माणूस काय लगेच स्टीव जॉब्स, बिल गेट्स बनतो काय आणि नसलेला काय कफल्लक फकीर का?

In reply to by चावटमेला

गॅजेटस् ची आवड असावी ,पण त्यापायी माणसाकडे दुर्लक्ष होऊ नये. नाहीतर जगात काय चाल्लेय त्याची खबर आणि घरात काय चाल्लेय माहीत नाही अशी अवस्था

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

नाहीतर जगात काय चाल्लेय त्याची खबर आणि घरात काय चाल्लेय माहीत नाही अशी अवस्था
कारण... फेस्बुकावर हजार मित्र गल्लीत विचारत नाही कुत्रं!

मुळात बर्याचश्या गाजेटप्रेमी टाईप मंडळींना आपण फाट्यावर मारले गेलेलो आहोत हेच कळंत नाही …फाट्यावर मारणार्याचं दुर्दैव दुसरं काय

नुसते फाट्यावर मारून उपयोग नाही (बर्‍याचदा त्यांना ते कळतच नाही), अशा लोकांना समजावून/उलगडून सांगावं लागतं की "तुम्हाला फाट्यावर मारले जात आहे". :D असे प्रश्न विचारणार्‍यांकडे आपण उत्तर देण्याआधीच दुप्पट विचित्र नजरेने पहावे... म्हणजे समजा मला कुणी असे चेतन भगत वाचतोस का वगैरे विचारलं की मी उत्तर देण्याऐवजी अतीविचित्र कटाक्ष टाकून भगत्या कसा टाकावू आणि चोथा लेखक आहे वगैरे पाल्हाळ लावेन की समोरचा एकदम डीफेन्सीव मोड मधे गेला पाहीजे. बाकी गोष्टींना हेच लॉजिक लाऊन पहा. मात्रा शक्यतो लागू पडते. ;)

एका आयटी कंपनीत मी रोज 'सकाळ' वाचतो म्हणून माझ्याकडेही अशाच काहीश्या नजरेने पाहिल्याचे मला आठवत... विशेष म्हणजे यात मराठी लोकच जास्त आहेत....

'पुलं देशपांडे ह्यांच्या लेखनात आवडण्यासारखं काय आहे एवढं मोठं? मला नाही बाई आवडत पुलं.' असं म्हणणारी मुलगी पाहिली आहे. अशा वेळी, आंबा, पेढे न आवडणारी माणसेही ह्या जगात आहेत ह्या विचारांनी मनाची समजुत काढायची झालं. आता, मला नाही का वाटंत की पेप्सी, कोक मध्ये काय आहे एवढं आवडण्यासारखं? पण नविन पिढीला आवडतंच नं? तसंच असावं.

In reply to by प्रभाकर पेठकर

आवड एकेकाची हे ठीक आहे , पण हे लोक समोरच्याची आवड लक्षात न घेत त्याला अश्मयुगीन ठरवून मोकळे होतात ते डोक्यात जातं.

In reply to by लोटीया_पठाण

अशावेळी आपणही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की गपगार होतात हे पाहिलं आहे. चेत्या (मूळ नाव बदलले आहे) भगत आणि इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा वाचून साहित्याबद्दल बडबड करणारी जमात पाहिली की एक थोतरीत ठेवून द्यावीशी वाटते.

In reply to by बॅटमॅन

>>>इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा 'रद्दड' सदरात गणल्या जाण्याच्या लायकीचं पुस्तक आहे असं वैयक्तिक मत आहे.

In reply to by प्यारे१

बर्‍या सुरुवातीनंतर स्टिरिओटाईप्ड होत गेले त्यात गंडले. तुलनेने रामायण ३३९२ ए.डी. हे जब्राट आहे. अणुयुद्धानंतरच्या भविष्यकाळात रामायण कथा गोवली आहे. रामाच्या धनुष्याची प्रत्यंचा इलेक्ट्रिक तर रावण हा म्यूटंट दाखवलाय.

In reply to by प्यारे१

शिवा ट्रायोलोजी मधला काहीही वाचलं नाहीय, पण आमिष त्रिपाठींनी बरीच चिकित्सा वगैरे करून सत्य मांडलाय असं चाहते / वाचक सांगतात.

In reply to by लोटीया_पठाण

वाचूनच बोललोय. @ स्पा, अमिष त्रिपाठीचा ड्यु आयडी असला तर? म्हणून गोग्गो. हल्ली जपावं लागतं ब्वा फार. ;)

In reply to by लोटीया_पठाण

अश्मयुगीन ठरवून मोकळे होतात.
ही पण त्यांची एक आवड म्हणून दुर्लक्ष करावे. दूर्लक्ष हे त्यांना राग येऊ नये म्हणून नाही तर आपल्याला वैफल्य येऊ नये म्हणून. फारातफार त्यांची उघडउघड किव करणारे दांत विचकावे. असो.
एक थोतरीत ठेवून द्यावीशी वाटते.
'थोतरीत ठेवून द्यावी' ह्या सारखा मस्तं शब्दप्रयोग नाही. कमीतकमी शब्दांत भरपूर आशय आणि भावना व्यक्त करणारा शब्दप्रयोग.

In reply to by प्रभाकर पेठकर

'थोतरीत ठेवून द्यावी' ह्या सारखा मस्तं शब्दप्रयोग नाही. कमीतकमी शब्दांत भरपूर आशय आणि भावना व्यक्त करणारा शब्दप्रयोग.
एकदम सहमत!!!!!!!!!

चेत्या (मूळ नाव बदलले आहे) भगत आणि इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा वाचून साहित्याबद्दल बडबड करणारी जमात पाहिली की एक थोतरीत ठेवून द्यावीशी वाटते
अगदि अगदि. असल्या फालतू गोष्टींनी स्टेटस सिम्बॉल ठरायला लागलेत आज काल. वॉन्नबी का काय म्हणतात ना विंग्रजीत तसला प्रकार आहे सगळा. अशा वॉन्नबी लोकांच्या पुण्यातील आज काल च्या फिरण्याच्या जागा - फिनिक्स मॉल, अ‍ॅमनोरा मॉल इ. इ.

In reply to by चावटमेला

अगदि अगदि. असल्या फालतू गोष्टींनी स्टेटस सिम्बॉल ठरायला लागलेत आज काल. वॉन्नबी का काय म्हणतात ना विंग्रजीत तसला प्रकार आहे सगळा. अशा वॉन्नबी लोकांच्या पुण्यातील आज काल च्या फिरण्याच्या जागा - फिनिक्स मॉल, अ‍ॅमनोरा मॉल इ. इ.
नुस्तेच वॉन्नाबी, जगन्नाथपंडितांच्या "न हिन्दुर्न यवन:" ची आठवण करून देणारे.

In reply to by चावटमेला

मलातर तुळशीबागेत फिरायला जाम आवडते ब्वॉ...दुपारचे मस्त जेवुन निघायचे घरुन.जिलब्या मारुतीच्या मागच्या गल्लीत गाडी लावायची आणि कल्पना साडी च्या बाजुला ताक किंवा लस्सी पिउन नंतर मस्त फिरत राहायचे. भांडी म्हणु नका, पितळी मुर्ती,समया काय नी काय.वाटल्यास पुढे मंडईमध्ये जाउन भाजी खरेदी,झाडे,खते,काळे सुगंधी वगैरे ३-४ तास फुल टाईमपास

मी बरेच वर्ष नोकिया चा 1100 असा एक आतिभारी फोन वापरत होतो...बाहेर गेलो की हमखास मे तो टेबल वॉर काढून ठेवत असे....मला नेहमीच " विशेष " नजारांचा सामना करावा लगे....पण ह्याचा एक लाई भारी फायदा असा की रेस्टोरेंट मधे मित्रांबरोबर गेल्यावर मला वेटर बिल कधीच आणून देत नसे....:)

माझ्या कडे पण मराठी लोक मराठी गाण किंवा मराठी मुव्ही, साहित्य, नाटक या बद्द्ल बोलायला लागले की खुपच विचित्र नजरेने बघतात. मग मलाच आपण खुप ओउट डेटड झालो आहोत अस वाटत....

त्यात कसली पंचाईत करून घ्यायची? मी आहे हा/ही अशी आहे. तुमच्यासाठी काही करत नाहीये. तुला आवडत नसेल तर गेलास तेल लावीत. असा अ‍ॅटिट्युड पायजे!

In reply to by पैसा

तुला आवडत नसेल तर गेलास तेल लावीत.
किंवा बिनतेलाचा, किंवा गंतव्य स्थल हे तथाकथित सर्वसमावेशक असून एका विशिष्ट प्राणिविशेषाशी संबंधित असणे, वैग्रेही शेवट असतात.

मी अश्यावेळी खिश्यातुन गाय छाप चुना पुडी काढुन फक्त हातात ठेवतो. मग माझ्याकडे विचित्र नजरेने काय कुणी बघतच नाही... :-))