✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छगनलालांचे सापळे (भाग ५)

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 08/24/2013 - 09:14  ·  लेख
लेख
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/22197 त्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो होतो.आज काय काम करायचे त्याची योजना कालच तयार करून ठेवली होती.अशोकला रात्रीच कामाची कल्पना देवून ठेवली होती.तसा आमच्याकडे स्टाफ कमीच होता.बॉक्सेस आणि पी.सी.बी. आणि इतर इलेक्टॉनिक्स आयटेम आम्ही बाहेरून मागवत होतो.(लंगड्या घोड्यांकडून). ("लंगडे घोडे" ही औद्योगिक क्षेत्रातील एक वेगळीच जमात आहे.घोडा नाठाळ असेल तर त्याला एक लोढणे बांधतात.त्यामुळे घोडा जास्त जोरात धावु शकत नाही.साहेब मात्र आपल्या घोड्याचा एक पाय कापत होता. प्रत्येक कं.च्या आधाराखाली इतरही काही कं. वाढत असतात.ह्या कं. शक्यतो सप्लायर असतात.साहेबाने असे ३/४ सप्लायर बांधून ठेवले होते.त्यांचे पेमेंट दर ठरवलेले होते आणि मुदत कागदोपत्री ९० दिवसांची होती.साहेबाने त्यांचे पैसे कधीच वेळेवर दिले नाहीत.तो सगळ्यांना २,३ आणि ४ नं.चे चेक्स देत असे. ते कधीच वटत नसत.१२० दिवस झाले की मग मात्र १ नं.चा चेक देत असे.५ महिने साहेब त्यांचे पैसे बिन व्याजी वापरत असे.पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे सप्लायर मंडळी त्यांचा बिसनेस वाढवू शकत नसत आणि त्यामुळे मिळेल त्या दराने साहेबाशी व्यवहार करत.) तर अशा लंगड्या घोड्यांकडून बरेचसे सामान येत होते. त्यामुळे असेम्बींग साठी ४ माणसे आणि टेस्टींग साठी २ माणसे (मी आणि अशोक) असा आमचा ६ माणसांचाच स्टाफ होता.कायद्याप्रमाणे आम्हाला युनियन बांधता येत न्हवती. ७ पेक्षा जास्त माणसे असतील तरच युनियन बांधता येत होती.कायद्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे लावण्यात साहेब हुषार होता. वेळप्रसंगी आम्ही सगळेच जण आपापली कामे वाटून घेत होतो आणि इतरही कामे करत होतो.(चहा करण्या पासून ते झाडू मारण्या पर्यंत..) स.९ ते सं.६ असे ऑफीसचे टायमिंग होते.मी ८:४५ लाच ऑफीसला पोहोचत होतो.सगळ्या किल्ल्या माझ्याकडे आणि अशोक कडे होत्या.त्यासुमारास मोबाईल नुकताच बाजारात आला होता. इनकमिंग कॉलला देखील पैसे पडत होते.येत्या एक दोन महिन्यांत आम्हाला पण मोबाईल मिळेल अशी आवई पण उठली होती.त्यादिवशी माझ्याकडे मोबाईल न्हवता.जवळ १० वा. मी ओफीस मध्ये पोहोचलो.नेहमी प्रमाणे लेथ मशिनवर नजर टाकली.विवेकचे काम सुरु झाले होते.असेम्ब्ली लाईन वर प्रकाश आणि विजय पी.सी.बी. आणि काँपोनंटसशी झटापट करत होते तर महेश आज फाइल्स धुंडाळत बसला होता.अशोक कुठेच दिसत न्हवता.मी सहज म्हणून साहेबाच्या केबिन मध्ये नजर टाकली तर... साहेब येवून बसलेले होते.ऐन वेळी माझ्या नशिबाने खेळ दाखवले.... आता जे होईल ते बघू, ह्या विचारात मी माझ्या टेबलावर येवून बसलो.अपेक्षेप्रमाणे २/३ मिनिटातच साहेबाचे बोलावणे आलेच.केबिनमध्ये गेलो तर साहेबाने हसून स्वागत केले.गेल्या महिन्याभराचा सगळा रिपोर्ट त्याच्या हातात होता.सरासरी आम्ही दिवसाला १० मशिन तयार करायला हवी होती. आणि आम्ही ११ ते १२ मशिन करून देत होतो. (खरे तर आम्ही १६ मशिन पण बनवू शकलो असतो.अशोकचे पण म्हणणे असेच होते पण मीच मोडता घातला.एकदा १५च्या वर गेलो की साहेब २०चे टार्गेट ठेवायला कमी करणार नाही आणि मग आपल्याला १ ते २ तास फावला वेळ मिळणार नाही.मी जेवायला घरीच जात असे.जेवून झोपून मग २ ते २:३० पर्यंत कामावर येत असे. ३ ते ४ मी आणि अशोक उद्याच्या कामाची तयारी करत असू. ४ वा. अशोक घरी जायला निघत असे.वेळ-काळ बघून आमचे इतर सहकारी (मी त्यांना कधीच कामगार म्हणून वागवले नाही) दुपारी १२ ते २ सुट्टी घेत.साहेबाचा वाण नाही तर गूण आम्हाला पण लागला होता. माझ्या आणि अशोकच्या प्रगतीवर साहेब खूष झाला होता.जवळ जवळ ६० ते ७० मशिन्स तयार होती आणि अजून १२० मशिन्सची ऑर्डर त्याच्या कडे होती.मार्केटची भूक ४०० ते ५०० होती आणि आता तर ती वाढतच जाणार होती.महाराष्ट्र आणि गुजरात मधील कारभाराची कुणकुण इतर राज्यात पण पसरली होती.साहेबाने इतर राज्यांत पण जाळे विणून ठेवले होतेच.गळाला एक मोठे राज्य लागले होतेच आणि एक छोटा मासा स्वतःहून तयार झाला होता.

Book traversal links for छगनलालांचे सापळे (भाग ५)

  • ‹ छगनलालांचे सापळे (भाग ४)
  • Up
  • छगनलालांचे सापळे (भाग ६) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
16215 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

छान कथाभाग

अनिरुद्ध प
Sat, 08/24/2013 - 16:48 नवीन
सगळे भाग आजच एकापाठोपाठ वाचले चान्गले जमले आहे पु भा प्र.
  • Log in or register to post comments

लिंक लागायला जरा वेळ लागला,पण

स्पंदना
Sat, 08/24/2013 - 18:03 नवीन
लिंक लागायला जरा वेळ लागला,पण मग एकदम समजल. मस्तु!
  • Log in or register to post comments

हाही भाग उत्तम

श्रीरंग_जोशी
Sat, 08/24/2013 - 20:48 नवीन
साडेतेरा महिन्यांची प्रतिक्षा फळाला आली :-). कथानकाच्या पुढील घटनाक्रमासाठी वातावरणनिर्मिती परिणामकारकपणे झाली आहे. पुढील भागांची उत्कंठा वाढलेली आहे.
  • Log in or register to post comments

सगळे भाग आजच वाचले. मस्त आहेत

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/24/2013 - 20:50 नवीन
सगळे भाग आजच वाचले. मस्त आहेत. पुढचे भाग भरभर टाका.
  • Log in or register to post comments

बरेच दिवसांनी!

पैसा
Sun, 08/25/2013 - 16:10 नवीन
आधीचा भाग परत एकदा वाचला, मग परत लिंक जुळली. पुढचा भाग लवकर येऊ द्या. हा भागही मस्त जमला आहे. मधे गॅप पडल्यासारखे वाटत नाहीये!
  • Log in or register to post comments

छान

होबासराव
गुरुवार, 08/29/2013 - 14:39 नवीन
पुढिल भागाची वाट पाहतोय......
  • Log in or register to post comments

पुढचा भाग

अमित खोजे
Fri, 03/07/2014 - 03:30 नवीन
पुढचा भाग येतोय का? वाट पाहतोय
  • Log in or register to post comments

हेच मंतो , पुढचा भाग कदी ?

जेपी
Fri, 03/07/2014 - 09:00 नवीन
हेच मंतो , पुढचा भाग कदी ?
  • Log in or register to post comments

जबरा...

योगी९००
Fri, 03/07/2014 - 09:49 नवीन
सगळे भाग आजच एकापाठोपाठ वाचले....बर्‍याच दिवसांनी अशा तर्‍हेची कथा वाचायला मिळाली... आवडेश... पुढील भाग लवकर येऊ द्या...
  • Log in or register to post comments

ही लेखमाला होती?

आतिवास
Fri, 03/07/2014 - 11:30 नवीन
ही लेखमाला होती? ;-) बरं, आता आधीचे भाग वाचते. हा भाग वाचला, आवडला. पण प्रत्यक्षात या भागात काही घडलं नाही असं जाणवलं. कदाचित आधीचे भाग वाचल्यावर समजेल काय घडतंय ते!
  • Log in or register to post comments

खुप छान

प्रमोद देर्देकर
Fri, 03/07/2014 - 11:44 नवीन
ओ मु.वि साहेब मस्त लिहताय की. सगळे भाग एका दमात वाचुन संपवले . तब्बल ४ महिने झाले की शेवटाचा भाग येवुन. आता लवकर पुढचा भाग येवुद्या. उत्सुकता लागुन राहिली आहे.
  • Log in or register to post comments

आवडलेले लेखन.

आत्मशून्य
Fri, 03/07/2014 - 12:49 नवीन
थांबवु नका.
  • Log in or register to post comments

मला वाटेल तेंव्हा मी लिहीतो....

मुक्त विहारि
Sat, 03/15/2014 - 23:35 नवीन
तुमच्या सल्ल्याची मला गरज नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

पुन्हा सांगतो प्लिज... सरांची बाधा टाळा.

आत्मशून्य
Sat, 03/15/2014 - 23:48 नवीन
ते फार चांगले लक्षण नाही. उठसुठ "मी, माझा, माझे" असे स्वतःचा उल्लेख असलेले धागे काढणे अथवा काढायला लावणेपेक्षा तुमचा अनूल्लेख असलेले तुमचे धागे अतिशय सुरेख आहेत. तुम्ही स्वतःला जितके अनुल्लेखाने माराल तिक्तके तुमचे लिखाण सकस होत जाइल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

परत एकदा....

मुक्त विहारि
Sat, 03/15/2014 - 23:54 नवीन
मी तुमच्या साठी लिहीत नाही... तुम्हाला काय योग्य वाटते आणि काय नाही, ह्याच्याशी मला काही घेणे देणे नाही.... जोपर्यंत संपादक मंडळींना माझ्या लिखाणाविषयी आक्षेप नाही, तोपर्यंत मी लिहाणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

कॉमनसेन्सला गहन विचार बनवु नका. कारण...

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 00:04 नवीन
मी तुमच्या साठी लिहीत नाही...
सर असेच म्हणायचे.
तुम्हाला काय योग्य वाटते आणि काय नाही, ह्याच्याशी मला काही घेणे देणे नाही....
कुणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले.
जोपर्यंत संपादक मंडळींना माझ्या लिखाणाविषयी आक्षेप नाही, तोपर्यंत मी लिहाणार.
आपले लिखाण उत्तरोतर सकस होत जावो व दुधो, भलो, फुलो न्हावो, हीच इश्वरचरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी सामान्य माणूस असल्याने गहन विचार मला झेपत नाहीत....

मुक्त विहारि
Sun, 03/16/2014 - 00:11 नवीन
"सर असेच म्हणायचे." कुठले सर? त्यांचा आणि माझा काय संबंध? "कुणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त आपलं एक निरीक्षण नोंदवले." तुमचे निरीक्षण तुमच्या पाशी, आमचे लेखन आमच्यापाशी.....तुमच्या निरीक्षणाशी मला काही घेणेदेणे नाही....... "आपले लिखाण उत्तरोतर सकस होत जावो व दुधो, भलो, फुलो न्हावो, हीच इश्वरचरणी प्रार्थना." तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

तुमच्या निरीक्षणाशी मला काही

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 00:14 नवीन
तुमच्या निरीक्षणाशी मला काही घेणेदेणे नाही.......
मग त्याला प्रतिसाद प्रपंच का करताय ?
कुठले सर? त्यांचा आणि माझा काय संबंध?
तुमची आणी त्यांची "प्रतिसादात्मक वागणुक" एकसमान आहे हे सोडले तर इतर कोणताही संबंध मी तरी जोडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मग त्याला प्रतिसाद प्रपंच का करताय ?

मुक्त विहारि
Sun, 03/16/2014 - 00:17 नवीन
योग्य बोललात.... मी थांबतो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

सगळ्या गोष्टी मीच शिकवायच्या का ?

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 00:19 नवीन
बास करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्ही मला शिकवा...असे मी म्हणालो का?

मुक्त विहारि
Sun, 03/16/2014 - 00:28 नवीन
मग कशाला उगाच माझा शिक्षक व्हायचा प्रयत्न करत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अरे अजुन थांबला नाहीत ? कमाल आहे तुमच्यातल्या विसंगतीची

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 00:32 नवीन
मग कशाला उगाच माझा शिक्षक व्हायचा प्रयत्न करत आहात?
कारण मी जे सांगतोय ते तुम्ही "योग्य" असे बोलताय व ते अनुसरत आहात असे लिहताय म्हणून. थोडक्यात आपणच माझे विद्यार्थी बनायची हौस सोडा मे तुमचा कधीच शीक्षकशीन्हवतो हे आपोआप उमजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी कशाला तुम्हाला शिक्षक समजीन?

मुक्त विहारि
Sun, 03/16/2014 - 00:34 नवीन
तुमच्यापेक्षा बरेच थोर लोक इथे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

नेमक्या. याच कारणाने तर मला मिपा आवडते.

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 00:40 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नशीब.....निदान इथे तरी एकवाक्यता आली....

मुक्त विहारि
Sun, 03/16/2014 - 00:44 नवीन
तुमच्यापेक्षा बरेच थोर लोक इथे आहेत..... म्हणून आम्हाला पण मिपा आवडते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

नक्किच.

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 00:51 नवीन
आणी हे फार चांगले लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरो हो..

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 00:53 नवीन
आता थांबणार की... अजुन काही लिहायचे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

हम्म! बहुतेक लिहण्यासारखे काही नसावे.

आत्मशून्य
Sun, 03/16/2014 - 01:01 नवीन
मग आता जर मन हलके जाहले असेल तर आपणास पुन्हा सांगतो तुम्हाला मिपा कोणत्याही कारणाने आवडो, तुमी जो पर्यंत स्वतःला अनुल्लेखाने मारणार नाही तो पर्यंत तुम्हाला सकस लिखाण कधीही करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा