एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो.
वाटेत , पुणं सुटल्यावर लगेच तासाभरात शिरवळला गाडी चाऊ-म्याऊ ला थांबली.
लग्गेच पोरं आणी त्यांच्या आया सरसावल्या [खरं म्हणजे आयाच] :-
चला रे कुणाला शुवा-शिया करायच्या असतील तर उरकून घ्या....
काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या) तर पोरांना बळंच उभं करून ..
श....श.... करत होत्या.
मला वाटायला लागलं - पोरांना सोडून इतर सगळ्यांना होईल कि काय !
असो. तर शुवा-खाणी झाल्यावर सगळे गाडीत बसू लागले, तर तेवढ्यात सोहमला नेमकी नं.२ ला लागली [नतद्रष्ट मेलं]
"आई.., शी लागली"
"अरे बावळटा जा की मग" - यश
सोहमला जोरात लागलेली , तरीही तेवढ्यात त्याची आई धावत पळत आलीच.
"मूर्खा...सॅनिटायझर घेवून जा"
सोहमही इतका आद्न्याधारक की जीव [?] मुठीत धरून त्यानी ती सॅनिटायझर नामक पवित्र जलाची पुचुक-पुचुक करणारी बाटली आधी घेतली आणी मगच गडी शी करायला गेला.
################
नंतर पुन्हा बसमध्ये बसल्यावर कळलं , की पोरांना उलट्या होवू नयेत म्हणून प्रत्येक मुलाला कुठली तरी गोळी (प्रत्येकीएक ह्या प्रमाणात) आगाऊच देवू केली होती म्हणे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
बस्स! झालं??
एवढीच गोष्ट??
बघा बुवा आता...
In reply to बस्स! झालं?? by प्रभाकर पेठकर
बघा बुवा आता...
बरं मग?
बरं मग?
मग असं की... हाxxचं राहिलं
In reply to बरं मग? by बिपिन कार्यकर्ते
मग असं की... हाxxचं राहिलं बाजूला
नि sanitizer आला हाताला
क्रमशः टंकायचं राहीलं की काय
क्रमशः टंकायचं राहीलं की काय बॉ??
तुमच्या आजूबाजूला आहेत का अशी
In reply to क्रमशः टंकायचं राहीलं की काय by कोमल
तुमच्या आजूबाजूला आहेत का अशी स्टराइल किड्स ?
:)
आवडलं. पण लेख सुरू होता होताच संपला की वो! आणखी वाचायला आवडलं असतं.
काय लिहायचं ज्योती[ताई]
In reply to :) by पैसा
काय लिहायचं ज्योती[ताई] अज्जून ?
अहो, मधे चंद्रपूरला ट्रिपने गेलो होतो , तर एका पालकाने, कार्टनभरून औषधं घेतलेली,त्याच्या भल्या-मोठ्ठ्य्या .... ३ जणांच्या कुटुंबाकरिता.
समझनेवालेको......इशारे की भी जरूरत नही है
मस्तय
ह्यानिमित्ताने एक जुनी आठवण जगी झाली ...
आम्ही १०वीत असताना पुण्याला ट्रिप गेली होती , तेव्हा गुरु नावाचा एक पोरगा शिरवळला ओकला होता अन त्याघटने वर आम्ही कविता रचली होती
"ने मजसी ने , परत सातार्याला ,
ड्रायव्हरा प्राण तळमळला ...मळमळला ...शिरवळला "
=))
ने मजसी ने , परत सातार्याला
In reply to मस्तय by प्रसाद गोडबोले
अरारारारा =)) =)) =)) =))
विडंबना हात सळसळला, सळसळला, गिरीजा ;)
(No subject)
In reply to मस्तय by प्रसाद गोडबोले
:)) :)) :))
(No subject)
In reply to मस्तय by प्रसाद गोडबोले
चित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाही
ऑ ?
काय लिहायचे म्हणून काही लिहायचे का काय ?
आणि मग एकदम...
सोहमला जोरात लागलेली , तरीही तेवढ्यात त्याची आई धावत पळत आलीच.
??
सहल शाळेची होती, का सोसायटीची ?
सहल शाळेची होती, का सोसायटीची ?
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
कुणाची का असेना ? शिरवळला शी लागली हा मुद्दा आहे इथे =))
अवांतर : शी लागणे ह्या वाक्यप्रचाराचा उदग्म कोणत्या भाशेतुन झालाय हे कोडे अजुन उलगडले नाही ... शी ह्या श्ब्दाची व्युत्पत्ती काय ? ( अशाच एका दुसर्याच शब्दाची व्युत्पत्ती कालच सापडली आहे ...)
हे ज्याम म्हन्जी ज्याम
In reply to सहल शाळेची होती, का सोसायटीची ? by प्रसाद गोडबोले
हे ज्याम म्हन्जी ज्याम आवडल्यालं हाय !
शी!!!
In reply to सहल शाळेची होती, का सोसायटीची ? by प्रसाद गोडबोले
शी लागणे ह्या वाक्यप्रचाराचा उदग्म कोणत्या भाशेतुन झालाय हे कोडे अजुन उलगडले नाही ... शी ह्या श्ब्दाची व्युत्पत्ती काय ?
शी !! य्याक !! कुठलीही व्युत्पत्ती काय शोधताय? शी लागली या ऐवजी शी आली हे जास्त चपखल बसते.
( अशाच एका दुसर्याच शब्दाची व्युत्पत्ती कालच सापडली आहे ...)
बाकी दुसरा शब्द कोणता?
तसं नाही राजकुमारा, अरे, ह्या
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
तसं नाही राजकुमारा, अरे, ह्या शाळेत, पालक-शिक्षक , मुलं असं नेहमी एकत्र जात असतो.
नुकतंच आनंदवनातही आम्ही जावून आलो. मी सुधा पालकच आहे.
वि आर गोइंग टु क्लिन
वि आर गोइंग टु क्लिन अवरसेल्वज टु डेथ! अस एकदा टिव्हीवर एक महाशय म्हणले होते ते आठवल.
शाळेच्या सहलीसोबत पालक
शाळेच्या सहलीसोबत पालक जाण्याची प्रथा प्रथमच ऐकली. लेखातली भावना समजली. अतिस्वच्छतेच्या नादाने पोरांची किमान प्रतिकारशक्तीही अशक्त करुन टाकली जात आहे की काय असं वाटतं.
का कोण जाणे पण हे समजत असूनही माझ्या पोराबाबत मीही स्वच्छतेबाबत असाच काटेकोर राहतो. माझ्या लहानपणी गल्ली क्रिकेटात गटारात मारलेले ओले बॉल हाताने बाहेर काढून मातीत घासून "स्वच्छ" करण्याचे आणि पुन्हा बॉलिंग टाकण्याचे दिवस आठवत असतानाही..
शाळेच्या सहली हा तर अप्रतिम विषय आहे. माझी शाळा आठवडाभराची मोठ्ठी सहल दरवर्षी काढायची, आणि तीही जवळच्या उद्यानात नव्हे तर कोंकणातून निघून एकाच ट्रिपेत अजंठा वेरुळ, पुणे, सिंहगड, कोल्हापूर तत्सम ठिकाणे कव्हर करणारी. मुक्काम शाळांमधे किंवा कार्यालयांमधे.
रात्री करमणुकीचा कार्यक्रम.. त्यातले ते मुलींचे डान्स.. "जिमी जिमी.. आ जा .. आजा.."
वाह.. वाह..
"प्रासंगिक करार"च्या बसमधून ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका, पुढच्या गाडीला मागे टाका..
"हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाहीत केस.. कापेग?"
"पाच सहा सात आठ.. अमुक हायस्कूलची कॉलर ताठ"
असे कायच्या काय ओरडत दिवसदिवस प्रवास.. ती खरी मुशाफिरी.
असो.. विषय स्वच्छतेचा आणि आम्ही भरकटलो... :)
माझ्या लहानपणी गल्ली
In reply to शाळेच्या सहलीसोबत पालक by गवि
माझ्या लहानपणी गल्ली क्रिकेटात गटारात मारलेले ओले बॉल हाताने बाहेर काढून मातीत घासून "स्वच्छ" करण्याचे आणि पुन्हा बॉलिंग टाकण्याचे दिवस आठवत असतानाही..अगदी अगदी.. त्या गोट्या तर मेल्या माती अन घाणीतच खेळल्या जायच्या..
अन मग तेच हात घेऊन घरी यायचे,
हातपाय धुवायचो की नाही आता आठवत नाही,
धुतलेच तरी साबण लावायचो की नाही हे तर मुळीच आठवत नाही,
आणि लावलाच तरी किती चोळायचो देवासच ठाऊक,
नाहीतर आजची पोरे, "ए बंण्टी तेरा साबून स्लो है क्या' करत चोळून चोळून स्वच्छ होतात..
अंड्या, एक गंमत सांगू का ,
In reply to माझ्या लहानपणी गल्ली by साळसकर
अंड्या, एक गंमत सांगू का , अश्शीच ...?
माझे आजोबा "नाना" हे पान म्हणजे विडा , कुटून खायचे, दातांमुळे ! तर अनेक वेळा आम्हाला [अगदी ५-६ वर्षांचा मी असेन तेव्हा] मोह व्हायचा.
तर... कित्येक वेळा , त्यांनी त्यांच्या तोंडातलं सुद्धा भरवलंय, आता बोला !
माझ्या मनातलं अगदी चपखलपणे
In reply to शाळेच्या सहलीसोबत पालक by गवि
माझ्या मनातलं अगदी चपखलपणे कागदावर उतरवलंत गवि.
माताय हा गवि दरवेळी नेमकं
माताय हा गवि दरवेळी नेमकं मनातलं लिहितो. :)
तस्मात प्रतिसाद जास्त भावला.
+१
In reply to माताय हा गवि दरवेळी नेमकं by गणपा
+१
याबरोबर गविंकडं सगळ्याला आपलंसं करुन घेण्याची कला नि पवित्र करुन घेण्याची दृष्टी आहे. त्यामुळं सारं कसं चान चान होऊन जातं. ;)
त्यामुळं सारं कसं चान चान
In reply to +१ by प्यारे१
मेल्या खवचटा.... :)
ह्यावेळी तो शिरा बिरा नाही
In reply to त्यामुळं सारं कसं चान चान by गवि
ह्यावेळी तो शिरा बिरा नाही आला? ;)
हो हो.. राहिलंच..
In reply to ह्यावेळी तो शिरा बिरा नाही by प्यारे१
हो हो.. राहिलंच..
शिरा पडो मेल्या तुझ्या तोंडात..
एक दुरुस्ती: वशाडमेलो राहिलं
In reply to हो हो.. राहिलंच.. by गवि
एक दुरुस्ती: वशाडमेलो राहिलं का? ;)
हॅ हॅ हॅ
In reply to हो हो.. राहिलंच.. by गवि
शिरा पडो मेल्या तुझ्या तोंडात..
बरं झालं शिरा लिहीलं ते!!! कारण मुळ मजकूरात शी/शू आले आहे. चुकूनही त्याचा उल्लेख नको.
प्यारे१ मात्र भाग्यवान हॉ !
In reply to हो हो.. राहिलंच.. by गवि
प्यारे१ मात्र भाग्यवान हॉ ! डायरेक शिरा (तीच ती रवा, साखर वगैर वापरून केलेली पाकृ) तोंडात ! +P.
बाकी ते दुसरे शिरा घरावर पडण्याचं प्रकर्ण लय डेंजर बर्का +D
आता धागाच असा आहे की काहीही
In reply to प्यारे१ मात्र भाग्यवान हॉ ! by डॉ सुहास म्हात्रे
आता धागाच असा आहे की काहीही गेलं तोंडात तरी तोंड कसनुसं व्हायचं.
एखादा बोबडकांदा असता तर अवघड झालं असतं. असो. ;)
धाग्याला धरुन एक पाणचट पी जे.
एका मुलीला दोन प्रश्न विचारले >
काय गं मुली नाव काय तुझं? नि चाललीस कुठं एवढ्या लगबगीनं?
तिनं एकच उत्तर दिलं.
.
.
.
.
.
शीला.
(No subject)
In reply to आता धागाच असा आहे की काहीही by प्यारे१
चित्र उपलब्ध नाही
सुशीला पण असु शकते
In reply to आता धागाच असा आहे की काहीही by प्यारे१
सुशीला पण असु शकते ;)
आम्चं हे
एक होतं
प्रासंगिक कराराच्या गाडीसाठी
हे म्हणजे ड्रायव्हरला उचकवाय्चे काम
"गाडी कशी चालते....चोरावर मोर.....चालविता गाडी सक्पाळ ड्रायव्हर थोर"....
त्या ड्रायव्हरचे नाव अजुनही आठवतेय. सकपाळ डायवर म्हुन.
अशाच एका नवमहापालिकेचे किस्से
अशाच एका नवमहापालिकेचे किस्से सध्या ऐकत आहे.
या मातेच्या सुपुत्राला ती दररोज बिसलरीच्या पाण्याने आंघोळ घालते. पुत्राचं वय आताशी आठ महिने. :-|
हाईट झाली....
In reply to अशाच एका नवमहापालिकेचे किस्से by इनिगोय
हाईट झाली....
"असं काय एनिगोय, तुला काही hygiene विषयी concern आहे की नाही ?"
हेहेहे !
चुकीचं वाटत नाही.
In reply to अशाच एका नवमहापालिकेचे किस्से by इनिगोय
चुकीचं वाटत नाही.
कॉर्पोरेशन मध्ये न आलेल्या तसंच पाणी न मिळणार्या भागांमध्ये ग्रामपंचायतींच्या पाण्याचा अथवा बोअर च्या पाण्याचा पुरवठा होतो. टँकरने आलेलं पाणी हे जनरली जास्त क्षारयुक्त असतं.
लहान मुलाची त्वचा नाजूक असल्यानं त्याला ह्या क्षारयुक्त पाण्याची अॅलर्जी होऊ शकते.
अॅलर्जीचा धोका टाळण्यासाठी हे असले प्रकार करणं भाग आहे.
इन फॅक्ट लहान बालकांसाठी ते जास्त आवश्यक आहे.
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर वगैरे वर विश्वास असलेला प्यारे.
लहान बाळाला जपावं हे ठीकच.
In reply to चुकीचं वाटत नाही. by प्यारे१
लहान बाळाला जपावं हे ठीकच. मात्र अति सांभाळण्याने त्याची प्रतिकारशक्ती वाढणार नाही, उलट ते अधिकच कमकुवत होत जाईल. मुलाला नैसर्गिक स्वरुपातलं पाणी, हवा, माती यांच्यापासून संपूर्णपणे दूर ठेवण्याने त्याचं शरीर वातावरणातल्या जीवाणूंचा सामना करायला शिकणार नाही. आणि हा सल्ला बालरोगतज्ज्ञांकडून ऐकलेला आहे.
दुसरं म्हणजे, मी उदाहरण दिलं त्या बाईंकडे तुम्ही म्हणता तसं बोअरचं किंवा टँकरचं पाणी येत नाही. (हे मी आधी नोंदवलं नव्हतं..) त्या बिसलरीचा वापर करतात तो केवळ हायजिनच्या अतिरेकी अट्टहासातून. तसंही दररोज वीस लिटर बिसलरी केवळ आंघोळीसाठी.. लहान बाळ म्हणजे त्याच्या इतर स्वच्छतेच्या गरजांसाठी दहा वीस लिटर आणखी.. त्याचं अन्न शिजवण्यासाठी वेगळं. घरच्यांना "शुचिर्भूत" करण्यासाठी आणखी तर्हेतर्हेचे उपाय.. कितपत प्रॅक्टिकल वाटतं?
हे सगळं खरंच आहे, पण XXX
In reply to लहान बाळाला जपावं हे ठीकच. by इनिगोय
हे सगळं खरंच आहे, पण XXX धुतल्यावर हात पाण्यानं [क्षारयुक्त असलं तरीही] न धूता sanitizer नी धुणे म्हणजे काय म्हणायचं! आणी ते हाताला लागेस्तोवर XXX दाबून ठेवायची !
उलटी होवू नये म्हणून घेतल्येल्या गोळ्या- म्हणजे शरीराने व्यवस्था लावल्येल्या मार्गापेक्षा ती "होवूच नये" म्हणून औषधरूपी रसायनं शरीरात सोडायची - हे प्रीवेन्शन ?
ह्याचे प्रत्यक्ष स्वरूपात तर परिणाम आहेतच, शिवाय आपण तब्येतीच्या बाबतीत कमालीचे अती आग्रही होवून बसतो, जणू काही निसर्गात काही व्यवस्था नावाची चीजच नाही.
आमचीही भर
In reply to अशाच एका नवमहापालिकेचे किस्से by इनिगोय
एका अमेरिकास्थित महापालिकेने तिच्या मुलासाठी बिसलेरीचे पाणी उकळून गार करुन ठेवायला सांगितले होते. आणि हे तिला तिच्या
डॉक्टरने सांगितले होते म्हणे!
हामेरिकेत मिळते?
In reply to आमचीही भर by तिमा
बिसलेरी आम्रविका खंडात मिळते?
असेल, असेल....
भारतभेटीला गेल्यावर ते पाणी
In reply to हामेरिकेत मिळते? by तुषार काळभोर
भारतभेटीला गेल्यावर ते पाणी वापरा, पण उकळून गार केलेले असे म्हणायचे असावे त्यांना.
"आमच्याकडे बिसलरीची पाणीपुरी
In reply to अशाच एका नवमहापालिकेचे किस्से by इनिगोय
"आमच्याकडे बिसलरीची पाणीपुरी मिळेल" हे वाचलं होतं. पण बिसलरीने आंघोळ हा प्रकार भारीये बुवा!
त्यावरून आठवलं: पुण्यातल्या एका प्रसिद्ध दारू-दुकानदाराची सुकन्या आमच्या कॉलेजात होती. एका सुप्रभाती तिच्या घरी गेलो होतो. ही बया आंघोळीला गेली होती. तिच्या आईने चहापाणी वगैरे केलं. थोड्या वेळाने ती परतली आणि बियरचा प्रचंड, उग्र, आंबटढसाण दर्प आला. ही बाथरूममध्ये चोरून पिते की काय! तिला काही पुस्तकं वगैरे द्यायची होती ती दिली आणि निघालो. तासा-दोन तासांनी ती परत कॉलेजमध्ये भेटली. काही दर्प वगैरे नाही, उलट सुवास! तिला विचारल्यावर तिने खुलासा केला. एक्स्पायरी डेट संपलेली बियर (म्हणजे बहुदा जास्त फर्मेंट झालेली असावी) केसांकरता उत्तम कंडिशनर असते म्हणे! पण भयंकर वास मारते म्हणून ती बियरने केस धुवायची आणि मग शाम्पू लावायची. :)
दिल्लीत आणि नोईडात सगळ्या
In reply to "आमच्याकडे बिसलरीची पाणीपुरी by आदूबाळ
दिल्लीत आणि नोईडात सगळ्या मॉल मध्ये बिसलेरीचीच पाणीपुरी मिळते. ( (म्हणजे मी गेलो होतो त्या त्या)
बिसलेरीचे पाणी
बिसलेरीचे पाणी मुलाचा पार्श्व भाग धुण्यासाठी वापरणारी NRI ( अमेरिकेतून सुट्टीसाठी आलेली) आई मी स्वतः हिरानंदानी रुग्णालयात काम करीत असताना २००८ साली पाहिली आहे.
डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त
डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त पैसे खिशात आले की बिस्लरीने ** धुणे सुरू होते असे आमचे मत आहे.
तसेही पूर्वी दुधाने आंघोळ वगैरे करणार्या सुंदर्या होत्या असे ऐकून आहोत.
पण आजकाल टीव्हीवर जाहिराती पाहून पाहून यांच्या अकलेला किटाणूंचं किटण चढलेलं असतं. सो 'सॅनिटायझर'. आता त्यातले आयसोप्रॉपिल अल्कोहोल किती विषारी असते हे कोण सांगणार यांना? ते समजलं तर मग 'हर्बल' सॅनिटायझर्स.. निरुपयोगी वस्तू ५ पट किमतीला विकत घेणे म्हणजे स्वच्छता नव्हे, हे डोक्यातल्या अकलेपेक्षा खिशात पैसा जास्त, याचेच लक्षण, हे यांना कोण सांगणार? :(
सॅनिटायझर'
In reply to डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त by आनंदी गोपाळ
BMJ (ब्रिटीश मेडिकल जर्नल) मध्ये स्वच्छ पणे लिहिलेले होते कि हात धुण्यासाठी कोणताही साबण तितकाच उपयुक्त आहे त्यात जंतुनाशक असण्याची मुळीच गरज नाही. मूळ हात धुणे यात जंतू धुतले जाणे हा हेतू आहे जंतू मारणे हा नाही. तेंव्हा हा सगळा "जंतू" "किटाणू " लाइफ बॉय, डेटोल हा भडीमार केवळ थोतांड आहे. त्यात हेही म्हटले होते कि जर साबण नसेल तर भरपूर पाण्याने हात धुवा परिणाम तेवढाच मिळेल.
लिंक मिळाली कि देतोच
लिंक
In reply to सॅनिटायझर' by सुबोध खरे
https://health.howstuffworks.com/skin-care/cleansing/myths/question692…
खूपच thanks तुला, सुबोध !
In reply to लिंक by सुबोध खरे
खूपच thanks तुला, सुबोध !
खूपच thanks तुला, सुबोध !
In reply to लिंक by सुबोध खरे
खूपच thanks तुला, सुबोध !
मनापासून आभार मानता आहात हे चांगलंच आहे...
In reply to खूपच thanks तुला, सुबोध ! by १००मित्र
फक्त..
In reply to मनापासून आभार मानता आहात हे चांगलंच आहे... by बहुगुणी
फक्त इथले ज्येष्ठ, जाणते सदस्य डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी केलेला उल्लेख खटकला, कदाचित आपण इथे नवीन असल्याने हे झालं असेल, पण (आपण एका बालकाचे पालक असल्याचा उल्लेख वर आलाय ते खरं असेल तर) डॉक्टरसाहेब आपल्यापेक्षा वयाने बरेच वडील असावेत असं वाटतं. असो, लेखातलं निरीक्षण वास्तविक असेल तर माझ्या माहितीत भरच पडली.
डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी
In reply to फक्त.. by बहुगुणी
डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी केलेला उल्लेख खटकला,
हेच म्हणायला आले होते.
गैरसमज नसावा
In reply to डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी by रेवती
गैरसमज नसावा
सौमित्र, माझा पहिलीपासून(लंगोटी यार) चा शाळेतील मित्र आहे. तेंव्हा त्याने मला अहो म्हटले तर ते कानाला चांगले वाटणार नाही. आणि तुम्ही म्हणता तेवढा मी ज्येष्ठ नाही.
उगा
In reply to गैरसमज नसावा by सुबोध खरे
उगा म्हातारे केले तुम्हाला ..
चला, जुना मित्र सापडल्याचा
In reply to गैरसमज नसावा by सुबोध खरे
चला, जुना मित्र सापडल्याचा (सु) बोध झाला.
बहुगुणी, रेवती प्रभृतींचे आभार,
मिपा चे तर सदैव....!
रेवती, तुमची पोस्ट वाचायच्या
In reply to डॉ. सुबोध खरे यांचा एकवचनी by रेवती
रेवती, तुमची पोस्ट वाचायच्या आधी कळलं, की , सुबोध नी उत्तर दिलंय.
पण तुम्ही हे सांगितल्याबद्दल- निक्षून - अनेक धन्यवाद.
अगदी खरंय, बहुगुणी. चूक झालीच
In reply to फक्त.. by बहुगुणी
अगदी खरंय, बहुगुणी. चूक झालीच.
डॉक्टरसाहेब, माझा एक डॉक्टर मित्र आहे, ह्याच नावाचा .
चुकून बोलता, बोलता, सॉरी, लिहिता-लिहिता तोल कधी गेला कळलंच नाही.
अर्थात हे माझ्या कृतीचं अजिबात जस्टिफिकेशन नाही.
तरी पुन्हा एकदा, माफ करावे.
बाय द वे, आपण डोक्टरसाहेब, मुलुंड पूर्व चे तर नाहीत ना ?
जे ब्बात.
In reply to डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त by आनंदी गोपाळ
>>डोक्यातल्या अकलेपेक्षा जास्त पैसे खिशात आले की बिस्लरीने ** धुणे सुरू होते असे आमचे मत आहे.
-- मामु... बोलेतो... तु सच्चीमे डॉक्टर है रे.
अर्धवटराव
सुदैवानं माझ्या पाहण्यात असे
सुदैवानं माझ्या पाहण्यात असे कोणी आले नाहीत पण असतीलच. निरिक्षणशक्ती कमी पडली असावी. ;)
आठवड्यातून एकदाच।
आमाला बा एव्हडे हायजिनिक राहणे जमत नाय। आम्ही आपले आठवड्याच्या शेवटी घेतो ते सेनेटायझर पाणी टाकून पोटातुन… :)
छान.
छान.
शाळेच्या सहलीबरोबर पालक आम्हीबी पहिल्यांदाच ऐकून राह्यलो. बाकी, बीसलरीनं आंघोळ, बिसलीनं अमुक अमुक ध्वायच्या पद्धती, वगैरे हे सर्व माहितीपूर्ण आहे. अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
आय्ला मिपाने दो बिछडे दोस्तो
आय्ला मिपाने दो बिछडे दोस्तो को मिला दिया वगैरे असे काही आहे की काय हे. सहीच,,
लष्कराच्या भाकर्या
In reply to आय्ला मिपाने दो बिछडे दोस्तो by मृत्युन्जय
अहो मीच अठराव्या वर्षी लष्कराच्या भाकर्या भाजायला घराच्या बाहेर पडलो त्यामुळे भटक्या आणि विमुक्त जमातीत राहून २३ वर्षांनी मुंबईत परत आलो. त्यामुळे असे बरेच शाळा कॉलेज मधील मित्र कुठे ना कुठे भेटतात.
उलट्या होऊ नयेत म्हणून गोळ्या
उलट्या होऊ नयेत म्हणून गोळ्या घेण्यामधे खरंच काय वाईट आहे?
माझं सगळं लहानपण असं काढलंय माझ्या बिचाऱ्या आईबाबांनी. सर्व बसप्रवास. प्रवासाचा एक दिवस असा आठवत नाही की मी बॊक बॊक करून कपडे खराब केले नाहीत, मुलीला उलटी होतेय बस थांबवा असा पुकारा माझ्यासाठी करावा लागला नाही.
आधी ती पोटात ढवळण सुरू होते. दुनिया हास्यविनोद करत असते आणि आपले तोंड बिघडलेले. जाम चिडचिड. मग उबळ आल्यावर हातात असेल तर प्लॆस्टिकच्या पिशवीत ओकायचे आणि पुढच्या वेळेला बस थांबेतो ओकरे तोंड तसेच, ती पिशवी हातात असे बसून रहायचे.
तो भीषण वास. सगळेजण आपल्याकडे बघणार. कुणी काही म्हणलं नाही तरी विनाकारण आपल्याला गिल्टी वाटणार...
शी भीषण.
जेव्हा पहिल्यांदा ती एवोमिन घ्यायला परवानगी मिळाली आणि शाळेच्या ट्रिपला मी ती घेतली. ती ट्रिप अविस्मरणीय होती माझ्यासाठी. पहिल्यांदाच न ढवळता, बसमधे मैत्रिणींबरोबर दंगामस्ती खिदळाखिदळी करत प्रवास केला होता.
काय सुटका झाल्यासारखे झाले होते. :)
उलट्या होऊ नयेत म्हणून गोळ्या
उलट्या होऊ नयेत म्हणून अशा वेळी गोळ्या घेण्यात काहीच चूक नाही. खरंतर वैद्यक शास्त्राचा मूळ हेतू हा सर्वसामान्य माणसाचे आयुष्य कष्ट रहित आणि सुकर करणे हेच आहे. मी कित्येकदा तरुण मुलीना पाळीच्या वेळेस अतिशय त्रास सोसताना पाहतो कारण उगाच औषधे घ्यायची नाहीत हा पालकांचा दुराग्रह असतो.थोडासा त्रास सहन करणे इतपत ठीक आहे पण अंथरुणाला खिळवून ठेवणे आणि गोळ्या न घेणे यात काय साध्य होते कोण जाणे ?