Skip to main content

भारतात क्रिकेट वर सट्टा अधिकृत झाला पाहिजे,

Published on बुधवार, 03/04/2013
आय पी एल च्या निमित्ताने आता सट्टेबाज सक्रिय झाल्याची बातमी वाचली , सट्टेबाज ,त्यांची कार्य पध्ध्ती पंचतारांकित वर्तुळात नेहमीच पहिली आहे. सट्टा हा परदेशात म्हणजे युके व जर्मनी मध्ये कायदेशीर आहे , त्याने सरकारला प्रचंड महसूल मिळतो. एरवी क्रिकेट च्या सामन्यावर भारत हजार ते दोन हजार कोटींचा सट्टा लागतो. हा अनधिकृत धंदा असल्याने ह्यातून सरकार ला कर मिळत नाही , व ह्यातून मिळणारे उत्पन्न हवाला मार्फत परदेशात जाते किंवा काळा पैसा म्हणून पडून राहतो. भारतात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा लाऊ शकतो , सध्याचे क्रिकेटर व त्यांना सतत स्पर्ध्धेत पळवणारे त्यांचे मालक पाहता ह्यांच्यावर लागणारा सट्टा थांबवणे जर सरकारला शक्य होत नसेल तर ह्या अनधिकृत व्यवसायाचे अधिकृत ,कायदेशीर रूपांतरण झाले तर बेटिंग करणारे जे अनेकांदा अंडर वल्ड शी संबंधीत असतात त्यांच्या कारवायांवर चाप बसेल. कारण त्यांच्या धंद्यात शब्दावर व्यवहार चालतो , ह्यामुळे फसवाफसवी काही प्रसंगी होते. ह्याउलट युके मध्ये मी लेडब्रोक सारख्या कंपनीच्या कार्यालयात सुरवातीला उत्सुकतेने गेलो होतो , तेथे घोडे , कुत्रे , ह्यांच्या शर्यती तसेस क्रिकेट सोबत ,फुट बॉल, ते बास्केट बॉल अश्या अनेक खेळांवर सट्ट्याचे भाव स्क्रीन वर दिसत होते , गंमत म्हणून भारत व इंग्लड च्या एकदिवशीय सामन्यात दोन पौंड इंग्लंड वर लावले, ह्याबाबत अधिकृत पावती त्यांनी मला दिली , शेजारच्या इंग्लिश पब मध्ये जाऊन सामना बघायला सुरवात केली , आता भारत जिंकला तरी सेलिब्रेशन व हरला तर पैसे मिळाले असते , असा दुहेरी हिशोभ होता. भारत त्यादिवशी अपेक्षेप्रमाणे जिंकला. एकदा भारतातून आलेल्या एका मोठ्या व्यावसायिकाने मला अफलातून कल्पना सांगितली , त्यांच्या मते भारतात त्याच्या सारख्या अनेक मित्रांना बेटिंग करायचे असते ,मात्र अनधिकृत रीत्या ते करण्यात खूपच धोका असतो ,म्हणून युके मध्ये माझे वास्तव्य असल्याने मी त्यांच्यासाठी त्यांच्या पैशाने येथे युके मध्ये अधिकृत रीत्या बेटिंग करायचे व त्याची पावती त्यांना मेल करायची , थोडक्यात हार जीत जशी होईल तसा पैसा त्यांना भारतात द्यायचा , ह्यात मला अडचण एवढीच होती की त्यांच्याकडून भारतातून पैसा माझ्याकडे हवाला मार्फत येणार व मी तो हवाला मार्फत परत त्यांना भारतात पाठवणार. ह्यात ते मला कमिशन देणार नव्हते तर महिन्याला अमुक हजार पौंड देणार होते, सदर प्रस्ताव देणारा भारतीय व्यापारी हा हिर्याचा व्यापारी होता. व हवाला सुद्धा करायचा. ह्यामुळे नम्रपणे त्यांचा प्रस्ताव मी नाकारला.. आमच्याकडे युकेस्थित अनेक भारतीय व्यावसायिक नियमित यायचे, त्यांचे आमचे चांगले संबंध होते. बहुतेक अनेकांचे हवाला व्यवहार भारतात व्हायचे , तेव्हा ह्या धंद्यात आम्हाला खेचण्याचे नेहमीच प्रलोभने दाखवण्यात यायची, आमचे काम म्हणजे खजिनदाराचे असणार होते. पौंड मध्ये पैसे घेणे किंवा रुपये परत देणे, ह्याचे एक महत्वाचे कारण असे होते की , भारतीय दुकाने ,उपहारगृह ह्यावर बॉबी लक्ष ठेवून असतात, हवाला व्यवहार तेथून करणे अवघड होते . पण ह्या प्रस्तावाला आम्ही कधीच बळी पडलो नाही, कारण मुंबई पासून असे धंदे करणारे ,त्यांची व्यावसायिक असुरक्षितता व पकडले गेल्यावर मोठ्या माशाने छोट्या माशाला बळीचा बकरा बनवणे असे सर्व प्रकार पहिले होते, परत मध्यम वर्गीय संस्कार, युके मध्ये समाधानी व चाकोरी बद्ध आयुष्य सोडून असे बेभरवशाचे आयुष्य जगायला मनाई करत होते. नैतिकता वैगरे मग मनात विचार यायचा आधी विचार आयुष्यात एखादी रिस्क घेतांना ती घेणे खरच गरजेचे आहे का. माझा एक दिल्लीचा मित्र होता , त्याचा दिल्लीत प्रचंड मोठा व्यवसाय होता, मात्र कोकेन च्या नशेने त्यांचे व्यवसायात मन रमत नव्हते, परिवारात बदनामी होत होती हॉटेल व्यवस्थापन केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला युके मध्ये पाठवले. दृष्टी आड सृष्टी असा बहुतेक त्यामागील विचार असावा , त्याचे नवाबी राहणे व श्रीमंती थाट गोर्यांच्या डोळ्यात भरण्यासारखा होता, त्यांचा पगारातून त्यांच्या युके मधील जीवनावश्यक गरजा भागयच्या, मात्र त्यांच्या अतिरिक्त मनोरंजनासाठी निधी त्यांच्या घरच्यांच्या कडून दर महिना दोन ते अडीच लाख हवाला तर्फे यायचा, व हे साहेब लंडन मधील साउथ हॉल मधील विविध दुकाने , उपहारगृह येथून काही हजार डॉलर घेऊन हा व्यवहार पूर्णत्वाला न्यायचे. साउथ हॉल मध्ये भारताच्या बाहेरील माझ्या मते सर्वात मोठे किराणा मालाचे दुकान कम मॉल होता. त्याच्या बरोबर जाऊन आम्ही मित्र महिन्याची खरेदी करायचो , त्याला नेहमी मी एक प्रश्न विचारायचो. तुझे घरचे दर महिना एकाच हवाला वाल्याकडून तुला पैसा देतात. मात्र तो घेण्यासाठी दरवेळी तुला वेगवेगळ्या दुकानात येथे साउथ हॉल मध्ये का यावे लागते , ह्यावर त्याने उत्तरे दिले होते की पोलिसांचे ह्या दुकानांच्या वर लक्ष असते. म्हणूनच त्यांच्या मार्फत पंचतारांकित हॉटेलात हा व्यवहार करण्याचा अफलातून प्रस्ताव आमच्याकडे आला होता. आम्ही नवीन मिलेनियम मध्ये मराठी मुलांची म्हणजे मुंबई ,पुणे , नाशिक मधील मुलांची पहीली बेच युके मध्ये पहिल्यांदा हॉटेल व्यवस्थापनाचे धडे गिरवून वर्क परमिट वर काम करत होतो , चार वर्षांच्या नंतर आपसूकच येथील सरकार अनलिमिटेड रेसिडेन्सी व पुढच्या वर्षी रेड पासपोर्ट साठी येथील सरकार कडे निवेदन करण्याची मुभा देत होते. ह्या साठी आमच्या कंपनीला आमच्या साठी आवेदन करावे लागत नव्हते, तेव्हा उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा, असा व्यावहारिक विचार आमच्या डोक्यात होता, भारतीय नामवंत अभिनेत्यांचे येथे अश्या युके स्थित व्यापाऱ्यांची साटेलोटे असायचे ,त्यात भारतीय ,पाकिस्तानी सगळेच आले. ह्यावर माझ्या मित्राचे स्पष्टीकरण तयार होते , भारत सरकार परदेशातून पैसा आला तर कुठून आला अश्या चौकश्या करत नाहीत , मात्र भारतातून माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी पैसा पाठवायचा असेल तर त्यावर रिझर्व बेंक चे अनेक नियम , निकष व अनावश्यक जाचक अटी लादतात, आता भारतातून परदेशात पैसा पाठवायचा तर ह्या पैशाचा स्त्रोत विचारणे त्याला जाचक वाटत होते , कारण ह्यांचा पडला व्यवसाय . भारतात होणारा सट्टा थांबवणे कधीच शक्य होणार नाही ,कारण येथील शेतकरी सुद्धा पावसावर आपल्या आयुष्याचा सट्टा लावतो ,नशिबावर हवाला ठेवत सट्टा अनेक शेत्रात सट्टा खेळणारे अनेक आहेत , आज परदेशातून आपल्या कडील क्रिकेट मध्ये प्रथम व्यावसायिकता व त्यातून पैसा आली, म्हणजे परकीय खेळाडू आणून खेळवणे , रात्रीचे क्रिकेट , चिअर गर्ल्स ह्या सार्याच परदेशी संकल्पना देशात रुजल्या. जागतीकरण, भारताची मोठी बाजारपेठ , खेळासाठी वेडे दर्शक त्यांच्या वेडेपणाचा आपली उत्पादने विकण्यासाठी खेळाचा व खेळाडूंचा वापर करण्याचा शहाणपणा करणाऱ्या देशी व विदेशी कंपन्या म्हटले की हे सर्व आले. युके मध्ये सट्टा अधिकृत आहे , त्याने त्याच्या देशाला महसूल मिळतो व त्यामुळे त्यांच्या क्रिकेट वर प्रतिकूल परिणाम सुद्धा झाला नाही आहे,उलटपक्षी तेथे जे अनधिकृत स्पॉट फिक्सिंग करणाऱ्यांच्या वर स्टिंग ऑपरेशन होते. , भारतात खेळावर सट्टा लावणे अधिकृत केले तर खेळाडूंच्या वर अधिक डोळसपणे लक्ष ठेवता येईल , पण असे करणे भारतात एवढे सोपे नाही , असा प्रस्ताव जरी भारतात आला तरी त्यावर राजकीय भांडवल करून प्रस्ताव बासनात बांधला जाईल ह्याची खात्री असल्याने असा प्रस्ताव बहुदा मांडला जात नाही. शेअर बाजारात परदेशातून आलेले देरेवेटीव ही संकल्पना रुजली. तो माझ्यामते एक सारखा जुगार आहे , राज्यातर्फे लॉटरी हा जुगार म्हणायचा. मात्र खेळात विशेतः क्रिकेट मध्ये सट्टा म्हटला की काळीज थरारते, कारण क्रिकेट हा मैदानी खेळ आहे , मात्र भारतात मैदाने कमी म्हणून आपण दर्शक भावनेचा खेळ म्हणून सुद्धा ह्याकडे पाहतो ,अश्याच प्रकारचे दर्शक जगभारत फुटबॉल साठी आहेत, आज जर्मनीत मी फुटबॉल वर अधिकृत सट्टा लागतांना पाहतो ,तरी ह्या खेळाची लोकप्रियता, व्यावसायिकतेवर मी परिणाम झालेला पहिला नाही आहे, म्हणूनच असे वाटते भारतात खेळावर सट्टा अधिकृत करण्यात काहीच हरकत नाही आहे , तुम्हाला काय वाटते ,
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 24829
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

निनाद - या लेखातले तुझे बिनधास्त अनुभवकथन आवडले. पण या प्रस्तावावर कोणता पर्याय निवडावा याबद्दल माझा पास.

"भारतात होणारा सट्टा थांबवणे कधीच शक्य होणार नाही ,कारण येथील शेतकरी सुद्धा पावसावर आपल्या आयुष्याचा सट्टा लावतो ,नशिबावर हवाला ठेवत सट्टा अनेक शेत्रात सट्टा खेळणारे अनेक आहेत " अचूक निरीक्षण आणि कारणमीमांसा. नशीब आणि प्रारब्ध हे भारतीयांच्या आचारविचारांतून कधी नाहीसे होतील!

जर तुम्ही अश्व शर्यतीना मान्यता देता लॉटरी ला मान्यता देता. खासदार आमदारांची सुद्धा खरेदी होते (बहुमत चाचणी च्या वेळेला) खेळाडूंचा लिलाव होतो मग सट्टा अधिकृत केला तर काय बिघडले. त्याच्यावर फार मोठी संपत्ती कराद्वारे उपलब्ध होईल. काही लोक असा आक्षेप घेतील कि मग वेश्याव्यवसाय ही अधिकृत करा. पण त्यात आणि सट्टा यात एक मोठा फरक आहे. वेश्याव्यवसाय हा स्त्री च्या मनाविरुद्ध आणि वेठीस धरून केलेला असतो. तत्वतः लॉटरी चालू शकते तर सट्टा का नाही? दुर्दैवाने आपण पुरोगामी नाही प्रतिगामी नाही अर्धवट आहोत. we are neither forward nor backward but just awkward

In reply to by सुबोध खरे

वेश्याव्यवसाय हा स्त्री च्या मनाविरुद्ध आणि वेठीस धरून केलेला असतो. नेहमीच असे होते असे नाही. ज्बरदस्ती हरेक वेळीच असते असे नाही. वृत्त वाहिन्यांवरून दिसणार्‍या माहितीवरून तर वाटते की पॉश्,चकचकित ठिकाणी पेज थ्री शैलीतही; राजीखुशीने हा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर भारतात चालतो. खरे खोटे अनुभवी लोकच जाणोत.

In reply to by मन१

ह्या अनुभवावर आधारीत लेख लिहिता येईल पण वयाच्या १९ व्या वर्षी इंटर्नशिप करतांना प्रथम पंचतारांकित विश्व दिसले , तेव्हा आमची अवस्था विश्व रूप अचानकपणे पाहिल्या मिळालेल्या यशोधे माते सारखी झाली. नीती ,अनीतीच्या संकल्पना ,संस्कार हे स्थळ व व्यक्ती सापेक्ष असल्याची जाणीव झाली. जर्मनीत सुद्धा वेश्या व्यवसाय हा कायदेशीर केला असला तरी तो संक्रमण अवस्थेतून जात आहे. असे मला वाटते. भारतात नैतिकता ,अनैतिकता ह्याबाबत प्रचंड मतांतर आहेत. तलाश मधील करीना चा डायलॉग सुन्न करून जातो , आम्ही अस्तित्वातच नाही आहोत , आमच्या असण्या नसण्याने कोणाला फरक पडतो. वेश्याव्यवसाय अधिकृत नाही ,तेव्हा एखादी वेश्या आपली कैफियत घेऊन समाजातील प्रस्थापित संस्थांकडे गेली तर तुमचा व्यवसाय काय ह्या पासून सुरुवात होते. अंतू बर्वा म्हणतो तसे छोट्या चोरीस तुरुंगवास , मोठी चोरी केली की राज्य सभेत तेच येथे सुद्धा लागू पडते. मधुर भांडारकर ने ट्रॅफिक सिग्नल व कॉर्पोरेट मधून समाजाच्या दोन्ही वर्गाचे बर्‍यापैकी वास्तविक चित्रण दाखवले आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

वेश्याव्यवसाय अधिकृत नाही
माझ्या माहितीप्रमाणे भारतात अधिकृत आहे (ठराविक ठिकाणीच), कहर म्हणजे अमेरिकेसारख्या ठिकाणी वैश्याव्यव्साय आणि ब्रोथेल दोन्ही पण अनधिकृत (वेगास आणि आसपासचा भाग सोडून) आहेत…!

In reply to by मालोजीराव

वेगास आणि आसपासचा भाग सोडून
वेगासमध्ये देखील अनाधिकृतच आहे. तिकडे फक्त 'एस्कॉर्ट सर्व्हिसेसला' परवानगी आहे, ज्यात सेक्सचा अंतर्भाव नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वेश्याव्यवसायाची क्रिकेटशी तुलना कळाली नाही ...

In reply to by प्रसाद गोडबोले

न समजण्यासारखे काय आहे ? 'तिकडे' गिर्‍हाईकं निवड करतात आणि इकडे बोर्ड 'निवड' करते. सो सिंपल.

लॉटरी अधिकृत आहे तर क्रिकेट्-सट्टा का नको? नैतिकतेची दुटप्पी धोरणं नसावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत! एखादी अनधिकृत गोष्ट बंद करू शकत नसू तर सरळ अधिकृत करून त्यावर कर तरी मिळवावा. मस्त अनुभवकथन रे निनाद.

In reply to by दादा कोंडके

याचं उत्तम उदाहरण आरटिओतुन गाडीला हवा असलेला नंबर मिळवणं, पुर्वी एजंट करायचे आता सरळ सरळ लिलाब होतो, बोली लावा नंबर घ्या. आरटिओचं ऑफिशयल उत्पन जाम वाढलंय ह्या धंद्यानं.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाकांशी बाडिस! - (नैतिक) सोकाजी

क्रिकेटवर सट्टा अधिकृत केला तर सध्या जे मॅचफिक्सिंग थोड्या प्रमाणात घडते तेच फिक्सिंग घाऊक प्रमाणावर सुरू होईल व खेळातली मजाच निघून जाईल. सामन्याचा निर्णय संघ व खेळाडूंवर अवलंबून न राहता, सट्टेबाज तो निर्णय ठरवतील. त्यामुळे भारतात क्रिकेट अथवा कोणत्याच खेळावर सट्टा अधिकृत करू नये.

तुम्ही हवाल्याने पैसे वैगरे पाठवाचात. मी पैसे पाठवायचो असे नाही म्हटले आहे गणपा भाऊ उलटपक्षी मी प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट लिहिले आहे, आता आमच्या एका श्रींमत मित्राला त्यांचे आईवडील पैसे पाठवायचे त्याला आम्ही काय करणार , सध्या आम्ही लंडन मध्ये राहत नाही व त्या मित्राचा आमचा अजिबात संबध नाही , त्याची लंडन मध्ये पुढे शोकांतिका झाली व त्याबद्दल लिहिणे अवांतर होईल , आणि आमच्या धंद्यात अश्या प्रकारची प्रलोभने आम्हाला नेहमीच मिळतात पण त्याबद्दल परत कधीतरी लिहू , श्री गुरुजी बेटिंग करणारे हा धंदा अनधिकृत असल्याने पुढे त्यांची हाव वाढल्याने खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढून मनासारखे क्रिकेट चे सामने धडकवून आणू लागले.थोडक्यात बेटिंग साठी सेटिंग मात्र हा धंदा अधिकृत केला तर ह्या अनधिकृत लोकांचा धंदा मंद होईल कारण सुरक्षित व कायदेशीर मार्ग उपलब्ध असतांना ह्या लोकांच्या नादी कोण लागेल , तुम्ही लॉटरी विकत घेतांना हा पैसा कुठून आणला असा प्रश्न विचारला जात नाही ,मात्र हा पैसा ते टिकत घेतले तर सरकारला कर मिळतो. तेव्हा लेडब्रोक सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या ज्यांना अनेक देशात अनेक खेळांमध्ये बेटिंग चालवायचा अनुभव आहे, तर खेळाडूंना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार नाही , आता युरोपात फुटबॉल वर मोठ्या प्रमाणात कायदेशीररीत्या बेटिंग होते, पण ह्या खेळाची लोकप्रियता व खेळा वरील विश्वास तसूभर ही कमी झाला नाही. खोटे वाटते तर छोटा डॉन ह्यांना विचार आता आपले छोटा डॉन नेहमीच युरोपात येतात. त्यांना आवडणाऱ्या फुटबॉल खेळा विषयी त्यांचे प्रेम ह्या खेळावर अधिकृतरीत्या बेटिंग होते हे माहिती असूनही ते ह्या खेळावर नितांत प्रेम करत , कालच त्यांचे आगाऊ माहिती अब आयेगा मझा, किंवा होऊन जाऊ द्या , वि आर ऑन अश्या सदरात मोडणारे विधान ह्या खेळासंबंधी वाचले , आमचे बायर्न म्युनशन जिंकले का हो

बरोअबर आहे निनाद तुमच म्हणनं. उगा कायद्याला धोबीपछाड घालुन माणस असले उद्योग करतात तिथे कायद्याने त्यांच्याकडुन कमवलेलं काय वाईट?

निनाद, तुमचं म्हणनं पटतं राव. पण, आम्ही लोक क्रिकेटला इतका भावनिक करुन ठेवलंय की त्याची काही लिमिट नाही. एकवेळेस आम्ही धावा होत नाही म्हणून अर्जून तेंडुलकरला क्रिकेट मधून निवृत्त हो म्हणू पण सचिनला नै म्हणू शकत कारण सच्या आमचा क्रिकेटचा देव आहे. (सॉरी हं सचिनप्रेमी मित्रहो) आमचं क्रिकेट प्रेम आहे हे असं आहे. महाराष्ट्र शासनाला खूप असा महसूल मद्यविक्रितून मिळतो म्हणे (विदा नाही. अंदाजपंचे) तसा क्रिकेटच्या सट्ट्यावर भरपूर महसूल शासनाला मिळाला असता असे मलाही वाटते. त्याचबरोबर सट्टेबाजांना, हौशी सट्टेबाजांना नफाही झाला असता. काही लोक श्रीमंत तर काही लोक कंगालही बनले असते. पण, सट्टा अधिकृत झाल्यावर क्रिकेटची मजा निघून जाईल. सचिनचे शतकावर शतकं होतील. भज्जीला विकेटा मिळायला लागतील, सोपे सोपे झेल सोडल्या जातील. सिंगल धावेच्या ऐवजी पळून चार चार धावा निघतील.कदाचित पळून सहा धावा काढायचा एखादा अपवादात्मक असा नियम बनेल. असं काय नी काय या अधिकृत सट्ट्यामुळे होईल असे वाटते. त्यामुळे सध्या वाटतो तसा, आणि भासतो तसा निर्भळ क्रिकेटचा आनंद राहू द्यावा. क्रिकेटचा सट्टा ही कल्पना, भारतात तरी कल्पनाच राहावी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यातून तो बामण असल्याने अजूनच कौतुक. असो... भारतात अधिकृत आणि अनाधिकृत ह्यांच्या व्याख्या जगापेक्षा वेगळ्या आहेत, हे लेखकाच्या निदर्शनास आणू इच्छीतो.

In reply to by प्रसाद गोडबोले

मिपावर असे जातीवाचक उल्लेख चालतात काय ?
ज्यांना अश्या शंका आहेत त्यांनी पुनर्लेखनाचा धागा वाचावा !

In reply to by धन्या

कॉलिंग क्लिंटन अर्थ शास्त्रीय दृष्टी कोनातून समाजातील, माझ्या मते मागे एकदा मिपावर ह्या संबंधी वाचले होते.

In reply to by धन्या

अगदी हाच प्रश्न लेख वाचतांना पडला होता. प्रतिसादांत उत्तर मिळेल या आशेने शेवटपर्यंत स्क्रॉल केले पण उत्तर मिळाले नाही. कुणीतरी सांगा हा हवाला प्रकार काय असतो? बाकी लेखातल्या भावना आणि व्यवहारी विचार पटला.

In reply to by स्मिता.

>>> हे हवाला व्यवहार काय प्रकरण आहे कुणी टायपेल का? >>> कुणीतरी सांगा हा हवाला प्रकार काय असतो? "हवाला" या शब्दाचा अर्थ "हमी"/"खात्री" असा आहे. या लेखातील "हवाला" म्हणजे एका देशातून दुसर्‍या देशात पैसे अनधिकृत मार्गाने पाठविणे. हा प्रकार काही प्रमाणात "मनी लॉन्डरिंग" सारखा आहे. परदेशातून भारतात पैसे पाठवायचे काही अधिकृत मार्ग आहेत. एखाद्या भारतीय बॅंकेमध्ये भारतात "एनआरआय"/"एनआरओ" बचत खाते उघडून त्या खात्यात त्याच बॅंकेच्या परदेशातल्या शाखेतून परकीय चलनात पैसे भरले की, त्याचे रूपांतर रूपयांत होऊन ते पैसे भारतातल्या खात्यातून काढता येतात. (उदा. मी स्टेट बँकेत भारतात एनआरआय खाते उघडून त्याच खात्यात स्टेट बँकेच्या न्यूयॉर्क येथील शाखेतून १००० डॉलर्स भरले तर, त्याचे अंदाजे ५५००० रूपये भारतातल्या एनआरआय खात्यात जमा होतील व भारतातील व्यत्की नेहमीची विथड्रॉल स्लिप किंवा चेक वापरून ते पैसे काढू शकतील.). हे पैसे भारतात ट्रान्सफर होताना बँक थोडे चार्जेस लावते. काही खाजगी कंपन्या (उदा. वेस्टर्न युनियन) थोडी फी घेऊन तुमचे परदेशातील परकीय चलनातले पैसे भारतात भारतीय रूपयात अधिकृतरित्या पाठवितात. या पद्धतीचे काही फायदे व तोटे आहेत. फायदे असे की, तुमचा व्यवहार हा अधिकृत, कायदेशीर व सुरक्षित असतो. तोटे असे की, या पद्धतीने पाठविलेल्या पैशांवर आयकर लागू शकतो व ट्रान्सफर चार्जेस पडू शकतात (काही खाजगी कंपन्या एकूण रकमेच्या ७.५% इतके चार्जेस लावतात. म्हणजे तुम्ही १००० डॉलर्स पाठविले तर भारतात तुम्हाला ९२५ डॉलर्सचे रूपये मिळतात). हे तोटे टाळण्याकरिता "हवाला" मार्गाने हे पैसे पाठविता येतात. याची सर्वसाधारण पद्धत अशी की, तुम्ही परदेशात "हवाला" करणार्‍या माणसाला भारतात जितके पैसे पाठवायचे आहेत ते सांगणे व भारतात ज्या व्यक्तीकडे हे पैसे रूपयात द्यायचे आहेत त्या व्यक्तीचा नावपत्ता देणे. "हवाला" करणार्‍या भारतातील व्यक्ती तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीला भारतात तेवढे रूपये रोख स्वरूपात घरपोच देतात (कोणतेही ट्रान्सफर चार्जेस न लावता) व तुम्ही भारतात फोन करून त्या व्यक्तीला पैसे मिळाले याची खात्री करून घेतली की तितके डॉलर्स त्या परदेशातील व्यक्तीला रोख द्यायचे. या पद्धतीत कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत व मिळालेल्या पैशांची कोठेही कागदोपत्री नोंद नसते व त्यामुळे आयकर देण्याचा प्रश्नच नसतो. यात तोटे असे की, मिळालेले अनधिकृत पैसे गुपचुप वापरण्याचे भारतातील व्यक्तींवर बंधन येते. तसेच "हवाला" व्यवहारात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती असू शकतात व हे प्रकरण बेकायदेशीर असल्याने पुढे कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. एकंदरीत "हवाला" प्रकरणात खूपच रिस्क असू शकते व पोलिस हवालावाल्यांच्या गुपचुप मागावर पण असतात. या प्रकारामुळे भारतातील कुटुंबीय धोक्यात व कायदेशीर अडचणीत येऊ शकतात. साधारणपणे इ.स. २०००-०१ पर्यंत भारतातील व्यक्तींना परदेशात जाताना खूपच कमी परकीय चलन मिळायचे (मी १९९१ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला गेलो तेव्हा मला अधिकृतरित्या फक्त २० डॉलर्स मिळाले होते. आता बरेच जास्त मिळतात असे ऐकून आहे.). रिझर्व्ह बँकेकडे परकीय चलनाची असलेली चणचण हे मुख्य कारण होते. त्यामुळे भारतातून वारंवार परदेशी जाणार्‍यांना (मुख्यत्वेकरून व्यावसियाकांना) काहीही करून जितके जास्त डॉलर्स मिळतील तितके हवे असायचे. "हवाला" वापरून ते काही प्रमाणात आपली डॉलर्सची गरज भागवत असत. डॉलर्सचा काळाबाजारही मोठ्या प्रमाणावर चालत असे. त्यामुळे "हवाला" उद्योग जोरात होता.१९९१ साली अमेरिकेतील भारतीय साप्ताहिकात ("इंडिया अ‍ॅब्रॉड", "न्यूज इंडिया टाईम्स" इ.) भारतात "हवाला"ने डॉलर्स पाठविण्याच्या जाहिराती असत. या उद्योगात विशेषतः गुजराती व पंजाबी मंडळी मोठ्या प्रमाणात होती. सध्या हा उद्योग बर्‍याच प्रमाणात कमी झाला असावा. ९/११ प्रकरणात पाकिस्तानच्या महंमद अट्टाला "हवाला"च्या माध्यमातून एक लाख डॉलर्स पाठविण्यात आल्याचे उघडकीला आल्यावर जगभरातल्या बॅकांनी "अ‍ॅण्टी मनी लॉण्डरिंगचे" कायदे करून "हवाला" उद्योगावर बर्‍याच प्रमाणात निर्बंध आणले आहेत. एकंदरीत "हवाला" हे प्रकरण बेकायदेशीर व धोक्याचे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुंबई - सुरत मधले काही व्यवहार तसेच हिर्‍याच्या व्यापारातले बरेच व्यवहार हवाला मार्फत होत असत, म्हणजे प्रत्यक्ष पैसे सुरत मध्ये आणि माल मुंबईत अदलाबदल, असं काहीसं.

In reply to by श्रीगुरुजी

हे तोटे टाळण्याकरिता "हवाला" मार्गाने हे पैसे पाठविता येतात. ही चुकीची व अपुरी माहिती आहे. ह्या कारणासाठी हवाला होत नाही. मी मनी २ इंडिया मार्फत काहीही कमिशन न देता पैसे भारतात पाठवतो मग मला हवाला शी काय गरज हवाला चा मुख्य हेतू काळा पैसा ज्याचा स्त्रोत तुम्ही दाखवू शकत नाही तो हवाला मार्फत पाठवला जातो. भारतातून परदेशात वर्षाला पैसे पाठविण्यास विशिष्ट रकमेचे बंधन असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या पैशांचा स्त्रोत तुम्हाला दाखवावा लागतो , भारतातून मुलाला शिक्षण साठी दर महिन्याला काही ठरावीक रक्कम भारतातून पालकांना पाठवायची झाले व पालक त्यांच्या खात्यातून वाईट मनी परदेशात भारतीय बेंक च्या मार्फत पाठवू शकतो , आता तुमच्या कडे दाबून काळा पैसे असेल व तो परदेशात पर्यटक , व्यापारी म्हणून जातांना न्यायाचा असेल तर हवाला चा वापर होऊ शकतो , भारतातून अनेक नवश्रीमंत परदेशात पर्यटक म्हणून येतात तेव्हा हवाला द्वारा रोख रक्कम जगाच्या कोणत्याही ठिकाणी एका फोन वर एका मिनिटात भारतातून मागवू शकतात.रोख पैसा खर्च केल्याने तो कुठे ,कश्यावर केला हे बायको सुद्धा शोधू शकत नाही , नाही तर क्रेडीटकार्डे व त्यांचे बिल भांडे फोडू शकते , पण त्याहून जास्त भयंकर प्रकार म्हणजे परदेशात आपले क्रेडीट कार्ड ज्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित वाटत नाही तेथे वापरायला देऊ नका हा माझा व्यावसायिक सल्ला आहे , कारण तुमच्या कार्डाचे बनावट क्लोन कार्ड बनवून त्याद्वारे परदेशात खरेदी केली जाते , ते कसे होते हे परत कधीतरी सांगेन कारण ह्या संबंधी सुद्धा कमिशन तत्त्वावर कार्ड घोटाळे करण्याचा प्रस्ताव घेऊन भारत ,पाक ,श्रीलंकन व नायजेरियन असे नागरिक घेऊन आमच्याकडे यायचे , जे आम्ही अर्थात नाकारायचो , परदेशात पंचतारांकित हॉटेलात नोकरी म्हणजे हजार प्रलोभने असतात. कारण जगातील सगळे दीड शहाणे येथे वास्तव्याला येतात.

In reply to by निनाद मुक्काम …

यासंबंधीचे एक उदाहरण यावरून आठवले. काही वर्षांपूर्वी अभिनेता शाहरुख खान यास त्याच्या अमेरिका दौर्‍याच्या वेळी नेवार्क विमानतळावर उतरल्यावर अमेरिकन अधिकार्‍यांद्वारा चौकशीसाठी काही तास थांबवून ठेवण्यात आले होते. अन त्यावळी भारतीय माध्यमांनी तो केवळ 'खान' असल्यानेच अशी अन्याय्य वागणूक मिळाल्याचा खूप गाजावाजा केला होता. त्या घटनेच्या काही दिवसांनंतर अमेरिकन माध्यमांत एक बातमी आली होती की शाहरूख खान चे अमेरिकेतील स्टेज शो जे लोक संयोजित करतात ते पाकिस्तानी अमेरिकन्स मनी लॉन्डरींगच्या प्रकरणांत अमेरिकन सुरक्षा संस्थांच्या रडारवर होते. अन त्यासंबंधातच शाहरुखला चौकशीसाठी थांबवण्यात आले होते. यात नेमके सत्य काय हे कळणे अवघड असले तरीही हे जर असे असेल तर भारत सरकारने डिप्लोमॅटिक मार्गांचा वापर करून शाहरूखला मिळालेल्या वागणूकीचा निषेध करणे अयोग्य होते.

In reply to by स्मिता.

स्मिता ह्यात एक माहिती कम सल्ला असा की एवन भारतात सुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला खात्रीलायक वाटणार नाही तेथे क्रेडीटकार्डे देऊन खरेदी टाळां. अर्थात खात्रीलायक ठिकाण म्हणजे नक्की काय ह्याबाबत बोलणे कठीण झाले आहे. कारण क्लोन कार्ड बनवून तुमच्या कार्डवर खरेदी करण्याचे प्रमाण भारतात सुद्धा प्रचंड प्रमाणात बोकाळले आहे. एक नक्की करू शकतो की आपले ऑन लाईन बिल तपासणे किंवा दिवसाला खरेदी ची लिमिट ठरवून घेणे. आम्ही येथे क्रेडीट कार्डला दिवसाचे ४०० पौंड अशी लिमिट बेंकेला सांगितली होती. ह्यांच्यावर खर्च झाला तर बेंक आम्हाला न विचारता कार्ड रद्द करू शकते. किंवा आम्हाला सूचित करू शकते , असे काहीसे पर्याय होते. सध्या आम्ही क्रेडीट कार्डे फक्त ऑन लाईन बुकिंग साठीच वापरतो.

In reply to by श्रीगुरुजी

माहीतीपुर्ण प्रतिसाद !! (फक्त एक अवांतर शंका : फॉरेन मधे कमावलेल्या पैशावर (फॉरेन मधे तॅक्स भरलेला असतानाही) ते पैसे भारतात आणल्यावर इथेही टॅक्स भरावा लागतो ?? )

In reply to by प्रसाद गोडबोले

>>> फक्त एक अवांतर शंका : फॉरेन मधे कमावलेल्या पैशावर (फॉरेन मधे तॅक्स भरलेला असतानाही) ते पैसे भारतात आणल्यावर इथेही टॅक्स भरावा लागतो ?? नाही. पण त्यासाठी तुम्ही परदेशात कमावलेल्या पैशांवर तिथे कर भरलेला आहे हे सिद्ध करावे लागेल (टॅक्स रिटर्न्स).

In reply to by श्रीगुरुजी

>>> फक्त एक अवांतर शंका : फॉरेन मधे कमावलेल्या पैशावर (फॉरेन मधे तॅक्स भरलेला असतानाही) ते पैसे भारतात आणल्यावर इथेही टॅक्स भरावा लागतो ?? अजून एक. जर तुम्ही परदेशात कोणत्याही भारतीय आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च या काळात) १८३ किंवा अधिक दिवस भारताबाहेर असाल तर त्या काळात परदेशात मिळविलेले उत्पन्न त्या आर्थिक वर्षात भारतात करमुक्त असते.

दुर्दैवाने आपण पुरोगामी नाही प्रतिगामी नाही अर्धवट आहोत. हे विधान कम विश्लेषण आपल्या भारतीय समाजाबद्दल चे आवडले. भारतात अधिकृत आणि अनाधिकृत ह्यांच्या व्याख्या जगापेक्षा वेगळ्या आहेत, हे लेखकाच्या निदर्शनास आणू इच्छीतो. अनधिकृत गोष्टी अधिकृतरीत्या होतांना पाहिल्या आहेत. पण बेटिंग कायद्याच्या कक्षेत आणले तर त्यावर प्रसार माध्यम व सरकार अधिक डोळसपणाने पाहतील. जेव्हा कधी क्रिकेट चा सामना एखादा संघ अवचितपणे जिंकताना व हरतांना पाहतो तेव्हा भारतात अनेक वेळी हे सामने सेट आहेत असा अविर्भाव लोकांचा असलेला पाहिला आहे , ह्याच कारणावरून शारजा येथील क्रिकेट चे सामने बंद पडले आहेत , ह्या अनधिकृत बेटिंग चा बादशाह दाउद पूर्वी दुबई व आता कराची येथून हे व्यवहार करतो , त्यांचे दर्शन आपण टेलिव्हीजन वरून कितीतरी वेळा केले आहे. http://images4.fanpop.com/image/photos/16700000/Dawood-Ibrahim-with-actor-Anil-Kapoor-mafia-the-world-of-crimes-16792333-381-295.jpg आंजा वरून साभार जेव्हा ८० च्या दशकात आपण सर्व शारजा मध्ये क्रिकेट चे सामने निर्भेळ आनंद घेत पाहायचो तेव्हा हा नराधम ते फिक्स करायचा.व अजूनही ह्याचा धंदा तेजीत आहेत. त्याला ह्या धंद्यातून अमाप पैसा मिळतो जो हवाला मार्फत पुढे भारताबाहेर जातो , ह्या पैशाचा काही हिस्सा भारत विरोधी कारवायांच्या साठी होऊ शकतो. मुंबई मधील व्यावसायिक दाउद ला प्रोटेक्शन मनी देतात ,तर दाउद लष्कर रे तय्याबाला प्रोटेक्शन मनी देतो. http://cache1.asset-cache.net/gc/90509276-dawood-ibrahim-the-mafia-leader-in-sharjah-gettyimages.jpg?v=1&c=IWSAsset&k=2&d=X7WJLa88Cweo9HktRLaNXjdM1HPH5txu27zF11eamLYVvdRsSgg9%2b3uz4D5bO0IBK0brF0TsW6qc4CRKRz7cVw%3d%3d आंजा वरून साभार ह्याला अजून किती काळ कमवू द्यायचे. भारतात बेटिंग प्रकरण उघडकीस आले व पूर्वीचे निर्भेळ क्रिकेट संपुष्टात आले असे वाटते. भारतीय व परदेशी क्रिकेटपटू ह्या जाळ्यात वेळोवेळी अडकतात. ह्यामुळे आता भारत दणकून हरला तरी लोकांना त्यांचे विशेष काही वाटत नाही. जसे माझ्या लहानपणी भारत पाकिस्तान च्या वेळी भारत हरला , जे त्यावेळी नेहमी हरायचे तेव्हा जेवढे वाईट वाटायचे तेवढे आता वाईट वाटत नाही ,

In reply to by निनाद मुक्काम …

>>>> भारतात बेटिंग प्रकरण उघडकीस आले व पूर्वीचे निर्भेळ क्रिकेट संपुष्टात आले असे वाटते. अंहं. अजूनही माझ्यासारखे निरागस क्रिकेट रसिक असल्यामुळे निर्भेळ क्रिकेटचा आनंद मी आणि तमाम क्रिकेटरसिक आजही घेतो.फिक्सर क्रिकेटपटूंचे उद्योग हा विषय मेंदूत येतच नाही. देहभान हरपून लहानपणी क्रिकेट जसे बघत बसायचो तसे आजही. आयपीएलचा एखादा सामना ठाण्यात (ठाणे) असला तर एक थेट सामना पाहण्यासाठी क्रिकेटवेडा रसिक म्हणून आम्ही तिथे आहोतच. -दिलीप बिरुटे

In reply to by निनाद मुक्काम …

जेव्हा ८० च्या दशकात आपण सर्व शारजा मध्ये क्रिकेट चे सामने निर्भेळ आनंद घेत पाहायचो तेव्हा हा नराधम ते फिक्स करायचा.व अजूनही ह्याचा धंदा तेजीत आहेत.
इअत सहमत. आपण बघितलेल्या मॅच फिक्स होत्या हे कळल्यावर क्रिकेटवरचा जीवच उडाला राव. आवड म्हणून त्यानंतर क्रिकेट खेळतो पण तेंव्हापासून एक मॅच बघितली नाही. त्यामुळे उगाच बुडाला मुंग्या येइपर्यंत टिवीला चिकटून न बसल्यामुळे असंख्य तास वाचलेत आणि स्वतः खेळल्यामुळे क्रिकेटचा आनंद तर घेता येतोच. जन्नत मधला इमरान हाश्मी म्हणतो, 'क्रिकेटर्स और तवाय्यफ* मे जादा फर्क नही होता. दोनोकी जवानी खतम, कहानी खतम.और एक्स क्रिकेटर्स का क्या हाल है ये तो आपको पता है. जिन्हे थोडा बहोत बोलना आता है, वो किसी न्युज चॅनल पे बकबक कर के निकल जाते है और जिन्हे हसना आता है वो लाफ्टर शोज पे बिना वजह हसते जा रहे है' :)) *ते नंतर बदलून 'फिल्मस्टार्स' केलं.

चांगला मुद्दा.. आयपीएल कडे व्यावाहारिक दृष्टीने पाहाता येतेय मग बेटींग अधिकृत करण्यात काय वावगे? खेळाडूंच्या दृष्टीने काय फरक पडतो (किंवा काही फरक पडू शकेल का?) ह्यावर विचार करायला हवा. घोड्यांवरचे बेटींग घोड्यांना कळत नसावे त्यामुळे हरल्यास सुद्धा आपल्याला जास्त खुराक मिळेल हे त्याच्या गावी नसावे, पण हे खर्या खुर्‍या जिवंत आणि मुख्यतः लाभार्थी (बेनिफिशियरी) खेळाडूंना अधिकृतरीत्या कसे पचवता येणार? म्हणजे मी इथे मर मर उन्हात मरतोय आणि 'तो' तिथे एसीत बसून सट्टा करुन अधिकृत पैसा कमवतो, ही भावना पचवणे कठीण वाटते. कोंबडा झुंजवणार्‍या मजा येईल, कोंबड्याला? :) पण एकंदर महसूलाचा विचार करताना चोरी अधिकॄत केली ती चोरी न राहिल्याने सरकारला महसूल मिळत असेल तर चांगलेच अर्थात खेळाचे/ खेळाडूंचे नुकसान न होता.

In reply to by उपास

उपास राव बेटिंग करून सध्या अनधिकृत मार्गाने हजारो करोडो रुपये कमवले जातात ह्याची आपल्यापेक्षा खेळाडूंना कल्पना आहे. एवढेच कशाला आपले क्रिकेट बोर्ड व हे आय पी एल चे मालक खोर्‍याने कमवतात. राज्याचा कर चुकवून. त्यामानाने खेळाडूंना कमी मिळते. पण कामगार व मालक ह्यांच्यात श्रमाचे काम कामगार व फायदा एसी मध्ये बसून मालक खाणार हे जगात सर्वत्र सर्वच शेत्रात होते. आताच्या खेळाडूंना सुख एवढेच आहे की पूर्वीच्या महान फलंदाजांना मिळणाऱ्या पैश्या पेक्ष्या आताच्या नवीन पोरांना आंतरराष्ट्रीय पदार्पण न करता करोडो काही दिवसांच्या खेळासाठी मिळतात. तेव्हा बेटिंग कायदेशीर झाले तर खेळाडूंना त्याचा फरक एवढा पडणार नाही. पूर्वी आपले अनेक महान फलंदाज इंग्लंड मध्ये कौंटी खेळायचे तेव्हा देखील तेथे बेटिंग अधिकृत होते. पण भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. सचिन , गांगुली किंवा जहीर ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. सध्याच्या व्यावसायिक दुनियेत आपले काम आपण चोख केले नाही तर दुसरा आपली जागा घेण्यास सज्ज आहे ह्यांची प्रत्येक खेळाडूला खात्री आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

खरय! पण दुसर्‍या बाजूने विचार करता, ज्यांचे हजारो रुपये अधिकृतपणे गुंतले आहेत ते तो पैसा अधिकृतरीत्या वाढवण्यासाठी अनधिकृत मार्ग चोखंदळू शकतिल काय? म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडूस जखमी/ गायब/ मॅनेज करणे वगैरे! (घोड्यांच्या आणि गाड्यांच्या शर्यतीत असं होतच) अर्थात ते तर अत्ताही होऊ शकते पण व्हाईट मनी आल्यानंतर काळ्याचा पांढरा करायला काहीही करु शकतात लोक असं वाटतं. पण एकूणात आयडीया वाईट नाहीच. मिपावरची चर्चा पुढे नेऊन खरच सरकारडे हे प्रस्तावित करता येईल का? इंद्रराज पवार हल्ली दिसत नाहीत इथे? पण त्यातून नवीन रोल्स मिळतील क्रीकेटला (अधिकृत सट्टॅबाज वगैरे) ;) एखादा आय आय एम चा हर्ष भोगले क्रीकेट विश्लेषक बनला तसा :)

मग अमर सिंग , प्रमोद महाजन, गिडवाणी यासारख्या राजनैतिक दलालाना पण लॉबाइयिंग करायला मुक्त वाव मिळेल. अमेरिका मध्ये लॉबाइयिंग पण लीगल आहे

In reply to by पिंपातला उंदीर

मग अमर सिंग , प्रमोद महाजन, गिडवाणी यासारख्या राजनैतिक दलालाना पण लॉबाइयिंग करायला मुक्त वाव मिळेल. अमेरिका मध्ये लॉबाइयिंग पण लीगल आहे पूर्वी भारतात मुक्त बाजारपेठ नव्हती ,आता आहे , भांडवलशाही वाईट समाजवाद गोड , गरिबीत सुख मानून नैतिकता जोपासणे म्हणजे नैतिकता म्हणजे ह्या ह्या गोष्टी अश्या लहानपणापासून डोक्यात बिंबल्या मग उर्वरित आयुष्य त्याचं विचारधारेत घालवायचे. आता परकीय भांडवलशाही भारतात आली ,रुजली. तीच्या सोबत तिची परकीय अपत्य चंगळवाद व लॉबिंग सुद्धा आले. चंगळवाद येथील मध्यमवर्ग उपभोगत असल्याने त्याबद्दल त्याला रोष नाही. पण लॉबिंग हे श्रींमत उद्योगपती करतात तेव्हा मध्यमवर्गीयांच्या मधील राजकपूर चे साम्यवादी छापाचे सिनेमे पाहून गरीब नैतिकतेला धरून चालणारा व श्रीमंत म्हणजे लबाड ,ढोंगी , मतलबी असे जुने डोक्यात मुरलेले विचार अचानक वर येतात , कारण अजून अधून मधून काही विचार जंत प्रसारमाध्यमातून मध्यमवर्गीयांना नैतिकतेचे बोधान्मृत पाजत असतो. म्हणूनच लॉबिंग म्हणजे काय ते अमेरिकेत का कायदेशीर आहे , त्यामागील त्यांची भूमिका काय आहे व सध्या भारतात अमेरिके प्रमाणे अनेक भारतीय कंपन्या बहुराष्ट्रीय होत आहेत. अनेक परदेशी गुंतवणूक व कंपन्या भारतात येत आहेत. तेव्हा लॉबिंग ची भारतात वास्तविकरीत्या कितपत गरज आहे , ह्यावर साधक बाधक चर्चा न करता आपण टीका करतो. कायदेशीर गोष्ट नव्हती म्हणून अमरसिंह चे फावले , कायद्यांच्या कक्षात त्याच्या नजरेखालून लॉबिंग झाले व जसे अमेरिकेत कोणी किती रुपये लॉबिंग साठी खर्च केले हे सांगणे बंधनकारक असते. त्यामुळे आपल्या सरकारने तेथे लॉबिंग केले , एवढेच नव्हे आता भारतात राजकीय पक्षाला निधी कुठून मिळतो , त्यांनी निवडणुकीत किती खर्च केला हे भारतीय जनता तपशीलात मागत नाही. अनेक गोष्टी त्या समजून ,उमजून असतात. तेव्हा लॉबिंग कायदेशीर झाले तर ह्या देशातील बर्याच अर्धपोटी , दुष्काळग्रस्त व बारा महिने ,२४ तास सदानकदा कोणत्या ना कोणत्या तरी नैसर्गिक ,मानवनिर्मित आपत्तीने ग्रस्त भारतीय जनतेला ह्याचे काहीही सोयरसुतक नसावे. आदर्श घोटाळा होऊनही , नांदेड मध्ये स्थानिक पातळीवर सत्ता राखली जाते. तेथील स्थानिक जनतेला लातूर व नांदेड हा प्रांतिक ही प्रांतिक अस्मिता महत्त्वाची वाटते. तमिळनाडू ला भाषिक अस्मिता राष्ट्रीय परराष्ट्र धोरणाच्या हून मह्त्त्वाची वाटते. त्या देशात लॉबिंग कायदेशीर झाले म्हणून काहीही फरक पडत नाही. ते झाले नाही तरी राजकीय पक्ष ज्या मार्गाने निधी उभारतात त्याच मार्गाने उभारणार एवढे नक्की आहे , वर उल्लेख केलेले दोन नेते राजकारणात सक्रिय नाही म्हणून काही अनधिकृत लॉबिंग थांबले नाही , आणि नाही थांबले घोटाळे ,

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद - हा प्रतिसाद फारच मुद्देसूद आहे. जे दोन दुवे दिले तेही खासंच. एक सुधारणा- कन्हैयालाल गिडवाणी यांचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला आहे.

In reply to by तुषार काळभोर

निनादच्या वाक्यावरून अमरसिंह व गिडवाणी हे दोघे सध्या राजकारणात सक्रीय नाहीयेत असा त्याचा रोख असावा असे वाटले. गिडवाणी यांच्या मृत्यूची बातमी कदाचित वाचली नसावी म्हणून तसे वाक्य त्याने लिहिले असेल असा माझा समज झाला होता.

In reply to by प्यारे१

>>> सध्या अमरसिंहांची तब्बेत कशी आहे? खटल्याची तारिख आली किंवा अटकेत जायची वेळ आली की अमरसिंहची तब्येत एकदम क्रिटिकल होऊन तो रूग्णालयात जाऊन पडतो किंवा त्याला उपचारासाठी परदेशात जावे लागते कारण भारतात त्याच्या आजारांवर उपचारांची सोय नाही. इतरवेळी तो ठणठणीत असतो.

स्पॉट फिक्सिंग ठीक आहे, पण आख्खीच्या आख्खी क्रिकेट मॅच फिक्स होऊ शकते याच्यावर माझा विश्वास बसत नाही बुवा. त्यामुळे 'रिझल्ट बेटिंग'ला परवानगी असावी असं मला तरी वाटतं.

एक मत असं कि कुठल्याही प्रकारचा सट्टा कायदेशीर धंदा होऊ नये. टाटा, बिर्ला, अंबाणी वगैरे मंडळी पायाभूत सुवीधा, अन्न पुरवठा, उर्जाक्षेत्रात तयार व्हावी, सट्टा किंग म्हणुन नाहि... कारण ते अर्थव्यवस्थेच्या आरोग्याला अत्यंत घातक आहे. (सट्टा चालवुन कोणि टाटा-बीर्ला बनेल काय हा मुद्दा निराळा... माझ्या मते बनु शकतो) पण त्याच बरोबर हे ही खरं कि काळा धंदा म्हणुन जे काहि आहे त्याला आवरणे जवळपास अशक्य, शिवाय त्याचा सरकारला काहि फायदा देखील नाहि, किंबहुना शत्रु तेच उपाय करुन आपल्याला अपाय करताहेत :( मग मर्यादीत क्षेत्रात जुगार अधिकृत करावा काय? प्रश्न असा कि आज घोड्यांची रेस, उद्या क्रिकेट, परवा आणखी काहि... हे लोण दिवसेंदीवस अनेक क्षेत्रात पसरत जाईल... मग क्रिकेटवर सट्टा न लागता सट्ट्याकरता क्रिकेट खेळले जाईल... हे जास्त घातक ठरेल काय... अर्धवटराव

परदेशातून सोनं आणायला बंदी होती (किंवा फार कमी सोनं अधिकृतपणे आणता येत होतं) तेव्हा सोन्याची तस्करी होत असे. अशी हास्यास्पद मर्यादा हटवल्यावर करउत्पन्न वाढलं. इंग्लंडात असतात ठार खेड्यात रहाण्याचा तोटा म्हणजे इच्छा झाल्यावर लगेच बेटींग करता आलं नाही. माझीही फार इच्छा होती, एकंदर त्या दुकानात जाऊन बेटींगचा अनुभव घेण्याची. ५-१० पौंडांनी माझंही काही गेलं नसतं. लॉटर्‍यांमधे क्रिकेट किंवा फुटबॉलसारखी गंमतही नसते. तसंही एका बॉलपाठी १२ लोकं धावत बसण्यातल्या गंमतीपेक्षा या बारा-तेरा लोकांपाठी खुळे होणारे हजारो लोकं पहायला मला जास्त मजा वाटते. ---- धर्माच्या नावावर चालणारा वेश्याव्यवसाय (देवदासी, जोगते, वारीच्या वेळेस त्या गावांमधे वाढणारा व्यवसाय) आणि इतर ठिकाणी चालणारा व्यवसाय हे थांबवू शकत नसू तर निदान त्या स्त्रियांच्या आरोग्याची, भल्याची काळजी करावी. भारत-पाकिस्तानात बेटींग कायदाबाह्य असूनही, जग एवढं जोडलेलं असल्यामुळे, खेळाडूंनी पैसे घेतलेच. ते तर कितीही प्रयत्न केला तरी थांबवता येणार नाहीये. हॅन्सी क्रॉनिएचा जीवही गेला. मग निदान सामान्य भारतीयांना त्यातलाही आनंद मिळू देत. क्रिकेटमधे खेळाडूंची काळजी घेतली जाते, तेवढा पैसा त्यांना मिळतो, तर त्यांच्यावर बेटींग करण्यात मला तरी काहीही अनैतिक दिसत नाही. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या स्त्रियांकडे तर पैसाही नाही आणि कायद्याचंही पाठबळ नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांनाच!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धर्माच्या नावावर चालणारा वेश्याव्यवसाय (देवदासी, जोगते, वारीच्या वेळेस त्या गावांमधे वाढणारा व्यवसाय) आणि इतर ठिकाणी चालणारा व्यवसाय हे थांबवू शकत नसू तर निदान त्या स्त्रियांच्या आरोग्याची, भल्याची काळजी करावी. भारत-पाकिस्तानात बेटींग कायदाबाह्य असूनही, जग एवढं जोडलेलं असल्यामुळे, खेळाडूंनी पैसे घेतलेच. ते तर कितीही प्रयत्न केला तरी थांबवता येणार नाहीये. हॅन्सी क्रॉनिएचा जीवही गेला. मग निदान सामान्य भारतीयांना त्यातलाही आनंद मिळू देत. क्रिकेटमधे खेळाडूंची काळजी घेतली जाते, तेवढा पैसा त्यांना मिळतो, तर त्यांच्यावर बेटींग करण्यात मला तरी काहीही अनैतिक दिसत नाही. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या स्त्रियांकडे तर पैसाही नाही आणि कायद्याचंही पाठबळ नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांनाच!
या परिच्छेदाचा मूळ चर्चाविषयाशी नक्की संबंध काय?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

क्रिकेट नि वेश्या व्यवसाय यांची वर केली गेलेली तुलना आणि त्यामुळे अपरिहार्यपणे खेळाडू नि वेश्या व त्या स्तरात असलेले सर्व घटक याबाबत बोलत आहेत त्या! कावीळ झाल्यावरच जग रंगीत दिसावं लागतं असं थोडीच्च आहे? :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

http://www.misalpav.com/comment/474434#comment-474434

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तुम्ही बावरी बाय चे पुस्तक वाचलेले दिसत नाही.... नाहीतर असा प्रश्न तुम्हाला पडलाच नसता ;-)

क्रिकेटमधले बेटिंग कायद्याने मान्य केले पाहिजे याची कारणे: १. सामान्यत: कमोडिटी मार्केट (किंवा कोणत्याही आर्थिक मार्केटमध्ये) मध्ये कमोडिटीच्या वरखाली होत असलेल्या किंमतींपासून स्वत:चे संरक्षण करणारे (हेजर्स), किंमती वरखाली जातील या व्ह्यूमधून आपल्याला फायदेशीर होईल अशी पोझिशन घेणारे (स्पेक्युलेटर्स) आणि फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमधील किंमतीत जर मिसप्राईसिंग असेल तर त्यातून आपल्याला फायदेशीर होईल अशी पोझिशन घेणारे (आर्बिट्रेजर्स) असे तीन प्रकारचे लोक/संस्था असतात.उदाहरणार्थ तांबे ही कमोडिटी घेऊ.तांब्याच्या किंमती वाढल्या तर तांबे आपल्या उद्योगात वापरणा़ऱ्या उद्योगांचे नुकसान होईल.म्हणून अशा प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने तांब्याच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये पोझिशन घेणारे हेजर्स असतात.भविष्यात तांबे महाग व्हायची शक्यता आहे तर कॉन्ट्रॅक्टमध्ये लॉन्ग पोझिशन घेणारे (किंवा स्वस्त व्हायची शक्यता असेल तर शॉर्ट पोझिशन घेणारे) स्पेक्युलेटर्स असतात. भारतातल्या कमोडिटी मार्केटची परिस्थिती अशी आहे की बहुतांश वेळा दोन्ही बाजूंना स्पेक्युलेटर्सचाच खेळ चालू असतो आणि ज्यांना हेजिंग करायची गरज आहे असे लोक त्यापासून दूर असतात. म्हणजे ज्यांना तांबे दिसायला लाल की निळे हे माहित नसेल, तांब्याशी ज्यांचा काहीही संबंध नसेल तरी असे लोक चार पैसे कमवायला अशी "स्पेक्युलेटिव्ह" पोझिशन घेऊ शकतात. हा सट्टा नाहीतर काय आहे? जर कमोडिटी मार्केटमध्ये हे चालत असेल तर क्रिकेटने काय घोडे मारले आहे? २. एकदा क्रिकेट सामन्यांमध्ये निकाल सट्टेबाजांनी कसे फिक्स केलेले असतात आणि हे क्रिकेटपटू कठपुतलीच्या बाहुल्यांप्रमाणे कसे पळतात आणि त्यांचे दोरे ओढणारा वर कोणीतरी असतो हे जगजाहिर झाले तर क्रिकेट या व्यसनातून लोक बाहेर पडतील आणि देशाचे बहुमूल्य मानव-तास वाचतील :)

In reply to by क्लिंटन

एखाद्या गोष्टीचे कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त अ‍ॅनालिसिस करणे हे क्लिंटनला बरोबर जमते. निनादचा हा लेख नेहेमीप्रमाणेच मस्त. त्या लंडनमधल्या मित्राची शोकांतिका कशी झाली हे पण येऊद्या. कारण जनरली असल्या श्रीमंत बाळांची इतकी मग्रुरी असते की त्यांना जनरली फ्रस्टेशन वगैरे काही येत नाही असा माझा समज होता. असो. तुम्ही स्वतःला आजपर्यंत ह्या सर्व सट्टेबाजांपासुन कटाक्षाने दुर ठेवले आहे ते वाचुन आनंद झाला. असेच लेख आणखी येऊद्यात.

In reply to by क्लिंटन

२. एकदा क्रिकेट सामन्यांमध्ये निकाल सट्टेबाजांनी कसे फिक्स केलेले असतात आणि हे क्रिकेटपटू कठपुतलीच्या बाहुल्यांप्रमाणे कसे पळतात आणि त्यांचे दोरे ओढणारा वर कोणीतरी असतो हे जगजाहिर झाले तर क्रिकेट या व्यसनातून लोक बाहेर पडतील आणि देशाचे बहुमूल्य मानव-तास वाचतील :)
सहमत. त्यात हाइट म्हणजे, आपल्याकडे प्रत्येकजण क्रिकेट बघत असतोच आणि त्याला आवडत असेलच असं गृहित धरतात. माझी क्रिकेटची आवड आजुबाजूचांना माहित आहे, पण कुणी सुरवातीला 'आइसब्रेकर' म्हणून डायरेक क्रिकेट विषयी बोलायला चालू केलं की आश्चर्य वाटतं. कालची म्याच आपण अमुक रनांनी किंवा तमुक विकेटींनी जिंकली म्हणलं की मी पहिली ब्याटींग कुणाची होती म्हणून साळसुद चेहरा करून विचारतो. ;)

In reply to by दादा कोंडके

त्यात हाइट म्हणजे, आपल्याकडे प्रत्येकजण क्रिकेट बघत असतोच आणि त्याला आवडत असेलच असं गृहित धरतात.
त्यात हाइट काहीही नाही. सगळ्या जगात हेच चालते. अमेरिकेत सुपरबॉल च्या दुसर्या दिवशी सगळ्या मिटींग्सची पहिली १५ मिनिटे ती चर्चा होते म्हणून आणि केवळ म्हणून सुपरबॉल बघणारी व्यक्ती पाहण्यात आहे. आणि हे खेळापुरते मर्यादित असे असे वाटत नाही.
मी पहिली ब्याटींग कुणाची होती म्हणून साळसुद चेहरा करून विचारतो
मी काल म्याच होत?? कुणाची ?? असा एकदम खरा प्रश्न विचारतो. कारण मला खरेच निम्म्या वेळेस माहित नसते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

त्यात हाइट काहीही नाही. सगळ्या जगात हेच चालते. अमेरिकेत सुपरबॉल च्या दुसर्या दिवशी सगळ्या मिटींग्सची पहिली १५ मिनिटे ती चर्चा होते म्हणून आणि केवळ म्हणून सुपरबॉल बघणारी व्यक्ती पाहण्यात आहे. आणि हे खेळापुरते मर्यादित असे असे वाटत नाही.
असेल. माझं मत हे मला आलेल्या वैयक्तीक अनुभवामुळे आहे. अगदी आयपिएलच्या देखील कालच्या म्याचवरून हमरी-तुमरीवर येउन चर्चा करणार्‍यांना देशातल्या इतर घडामोडींविषयी काहिही माहिती अथवा सोयरंसुतक नसतं मग तो बॉम्बस्फोट, अर्थसंकल्प, निवडणुका किंवा अपघात असेल. विकसीत देशातल्या लोकांना असली थेरं शोभतात तरी. ;)
मी काल म्याच होत?? कुणाची ?? असा एकदम खरा प्रश्न विचारतो. कारण मला खरेच निम्म्या वेळेस माहित नसते.
एक उदाहरण दिलं.

चर्चेतली बरीच उदाहरणे वाचून जरा गोंधळ उडतोय की नेमके कशा कशाला सट्टा, जुगार म्हणावे? कुठलीही कृती करताना अनपेक्षित लाभ / तोटा (आर्थिकही) होऊ शकतो याचा अर्थ असा घ्यावा का आपण सदासर्वकाळ कळत नकळतपणे जुगारच खेळत असतो?

सट्टा व्हायलाच हवा क्रिकेटवर ....

सट्टेबाज़ी कायदेशीर झाल्यास खरोखर पद्धतशिर व कायदेशिररीत्या लोक आपला हा छद जोपासू शकतील.

सट्टेबाजी कायदेशीर करणे म्हणजे कोणीही येउन सरकारी परवाने घेऊन दुकान थाटणे असा होत नाही ते म्हणजे सरकारी देशी दारूचे दुकान किंवा पेट्रोल पंप सारखा प्रकार नसेल , किंबहुना तो भारतात कायदेशीर करण्यासाठी अगदी परदेशाची नक्कल करण्याची गरज नाही. भारताने स्वतःच्या सोयीने अनेक बदल किंवा नियम ह्या कायद्यात करू करावे. ज्या आंतर्राष्ट्रीय कंपन्यांना ह्या व्यवसायात अनेक वर्ष होऊन अनेक देशात त्यांचा व्यापार आहे. ज्यांचा कारभार पारदर्शक असून रेकॉर्ड क्लिअर आहे अश्या कंपन्यांना भारतात हा धंदा करू द्यावा जर पूर्णतः परकीय गुंतवणूक नको असेल तर त्यांना अर्धा वाटा भारतीय कंपन्यांना गुंतवणूक करू द्यावी अश्या धर्तीवर व्यवहार झाले व त्याच सोबत बेटिंग प्रकरणातील दोषी खेळाडूंना कडक शिक्षा किंबहुना तुरुंगवासाची शिक्षा कायद्यात हवी असे वाटते. बेटिंग करणारे खेळाडू स्वतःच्या कंपनीला मग ती बी सी सी आय असो किंवा आय पी एल फसवत असतो. तेव्हा फसवणुकीचा गुन्हा ,आर्थिक घोटाळे सारखा कडक गुन्ह्याचे प्रावधान कायद्यात केले तर समस्या निर्माण होणार नाही. युरोपात बहुतांशी लोक ऑन लाईन घरबसल्या सट्टा लावतात. त्यांना ह्या कंपनीच्या दुकानात सुद्धा जायची गरज वाटत नाही.

कै च्या कै ! सट्टा कशावरही अगदी कशावरही लागतो. जे जास्त व्होलाटाईल(मराठी?) असतं त्यावर सट्टा लागतो. उदा. शेअर बाजार. प्रमाण फक्त कमी जास्त असतं. उद्या म्हणाल वेश्याव्यवसाय कायदेशीर करा, मॅरोवाना कायदेशीर करा, लोडेड बंदुका जवळ घेउन फिरणं कायदेशीर करा. एखाद्या देशात, भागात एखादी गोष्ट चालते ती सगळीकडे चालतेच असं नाही.

एखाद्या देशात, भागात एखादी गोष्ट चालते ती सगळीकडे चालतेच असं नाही. आपल्या निरीक्षणाच्या प्रति मला कुतूहल वजा आदर आहे. माझ्या मते आय पिल एल स्पर्धा , तिचे बाजारीकरण ,खेळाडूंचा लिलाव , त्यांच्या नंतर पार्ट्या त्यात बॉलीवूड चा तडका , विदेशी चीअरगर्ल्सचा झंझावात ह्या सर्व परदेशी संकल्पना भारतीयांनी डोक्यावर घेतल्या, असे मी इतके दिवस उगाच समजत होतो. फक्त खेळासंबंधी म्हटले तर आता खेळ बाजूला राहून धंदा झाला आहे, खेळाडूंची व खेळ पाहणाऱ्या खेळाडूंची मनोवृत्ती पार व्यवसायिक झाली आहे , विश्वचषक जिंकल्यावर तो दिवाळी साजरी करतो. ८ कसोटी सलग हारून आता प्रेक्षक शिमगा साजरा करत नाही , त्याच्याकडे मनोरंजनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, वाढते बाजारीकरण कोणीही थांबवू शकत नाही, जे अनधिकृत करून दहशतवाद्यांच्या कारवायांना बळ देते तेच अधिकृत करून देशाच्या अर्थ व्यवस्थेत भर टाकण्यात काय गैर आहे,

In reply to by निनाद मुक्काम …

जर हा पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेत आला तर उत्तमच. कदाचित ह्याच कारणांमुळे राजकारणी कधी क्रिकेटवरचे बेटिंग ऑफिशिअल करणार नाहीत.

In reply to by अमोल खरे

अमोल खरे. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातला. अनधिकृत बेटिंग करणारे लाखो रुपयांचे बेटिंग एका व्यक्तीकडून घेतात. त्यात ते हा सारा व्यवहार हवाला मार्फत करतात. हा पैसा सर्वस्वी काळा असतो. आणि ह्या हजार करोडोंच्या व्यवसायात बॉलीवूड ,राजकारणी , व समाजातील अनेक श्रीमंत व लब्धप्रतिष्ठित व्यक्ती सामील असतात. व ह्या सर्व व्यवहारात क्रिकेटर लोकांना लुभावण्यासाठी महिलांचा वापर केला जातो. भारतात तरन्नुम बारबालेचे उदाहरण प्रसिद्ध आहे. मात्र हे बेटिंग अधिकृत झाले. तर ह्यात ज्या आंतर्राष्ट्रीय कंपन्या भारतात येतील. त्यांना अनधिकृत बेटिंग वाले प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात ते सरकारी यंत्रणेवर दबाव आणतील. इंग्लंड मध्ये अश्याच रीतीने पाकिस्तानी ओरिजिन सट्टेबाजांना स्टिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. अनधिकृत बेटिंग चे स्वरूप बेभरवशाचे असते. ह्यात तुम्ही जिंकला तर कितीतरी वेळा जिंकलेला पैसा जास्त असेल व सट्टेबाज वजनदार असेल तर तुमचे जिंकलेले पैसे तो देईलच ह्यांची खात्री नसते. मागे कराची च्या अलिशान पंचतारांकित हॉटेलात कराची मधील श्रीमंत वजनदार स्मगलर ह्याने दाउद सोबत बेट लावली होती. ती तो जिंकला व दाउद ला त्याला करोडो रुपये देणे भाग होते. मात्र बंदुकीच्या धाकावर दाउद त्याला धमकावून निघून गेला. अशी बातमी एम क्यू एम चा कट्टर समर्थक असलेला, मुळचा कराचीचा असलेला आमच्या लंडन मधील केब कंपनीच्या मालकाने सांगितली होती, त्यांच्या कंपनीकडे आमच्या हॉटेल ला केब सेवा पुरवण्याचा करारनामा होता. दाउद ला तो नेहमीच शिव्या घालायचा, कारण कानामागून आला , तिखट झाला ह्या न्यायाने सध्या कराची मध्ये दाउद ने सर्व शेत्रात आपली हुकुमुत गाजवायला सुरवात केली आहे. जुन्या पिढीचा असल्याने तो केब ड्रायवर तुमच्या दाउद ने संपूर्ण क्रिकेट विश्व बेटिंग ने पोखरून खेळाचा सत्यानाश केला असे आम्हाला वारंवार सुनवायचा., तो जेव्हा पोटतिडकीने दादुद ला शिव्या द्यायचा व तुमचा दाउद म्हणजे भारतातील एक गुन्हेगार ह्या अर्थी बोलायचा तेव्हा मला मनात गुदगुल्या व्हायच्या, ९२ चा मुंबई बॉंब हल्याच्या निमित्ताने ही घाण आय एस आय ने कराची मध्ये आणली, आता तिची दुर्गंधी संपूर्ण पाकिस्तान भर पसरली आहे , आता आय एस आय त्यांच्यावर व तो त्यांच्यावर अवलंबून आहे. दाउद व त्यांचे पाकिस्तान मधील वास्तव्य व बेटिंग चा व इतर व्यवसाय ह्या निमित्ताने जेव्हा जेव्हा मी आंजा वर वाचायचो तेव्हा त्या केब ड्रायवर ला डिवचून दाउद चा विषय काढायचो , व त्याच्याकडून अनेक सुरस व कथा कानावर पडायच्या, त्यावर लिखाण परत कधीतरी.

In reply to by निनाद मुक्काम …

त्यावर लिखाण परत कधीतरी.
असं प्रोमिस खुप वेळा दिलं आहे तुम्ही पण तुमच्या सुरस अनुभवावर काही लिहितच नाही तुम्ही. तुमच्याकडुन अनेक सुरस, अद्भुत, चमत्कारीक सत्यकथा ऐकण्यास उत्सुक असलेला.....

कधी कधी भारतात दारु पिणे बेकायदेसीर आहे. एकदा आठ मित्र जवळच्या ठिकाणी गेलो .तेथे दारु प्यालो.अर्धी बाटलई सिल्लक होती.त्या ठिकाणी एका पोलिसाने येऊन दमदाटी करून आमचे कडून पाच हजार रुपये घेतले कारण काय तर आमच्या आठ लोका पैकी चारच लोकांकडे दारु पिण्याचे लायसन्स होते.असा रीतीने भारतात कोणतीही गोष्ट वैध किंवा अवैध् नाही.आपली वेळ ! ती वैध किंवा अवैध असते.

In reply to by विलास अध्यापक

अर्धी बाटलई सिल्लक होती.त्या ठिकाणी एका पोलिसाने येऊन दमदाटी करून आमचे कडून पाच हजार रुपये घेतले
फोडायची ना तीच अर्धी बाटली डोक्यात..

बेटिंग अधिकृत न नसल्याचा फायदा डी कंपनी करून घेत आहे. ह्याचे वाईट वाटते. ह्याच साठी भारतात बेटिंग अधिकृत झाले पाहिजे हे माझे मत होते.

१००% सहमत. त्यातच काल श्रीशांत, चंडीला , चव्हाण ला अटक केल्याची बातमी पाहिली सकाळीच. डीटेल्स अजून समजले नाहीत

श्रीशांत आणि संभाव्य खेळाडूंवर झालेले आरोप मला वाटतं तसे सिद्ध होणार नाहीत. कारण कोडवर्ड फसलेले दिसतात त्याच बरोबर एका षटकात १४ धावा देईल म्हणाला असे म्हटले तरी ते काय गोलंदाजाच्या हातात असते काय ? चेंडू किती फटकावयचा टाकला तरी चेंडूला प्लेस करायचा की त्यावर मोठा फटका मारायचा हे फलंदाजावर अवलंबून आहे त्यामुळे मला नाही वाटत की श्री शांत आणि अन्य गोलंदाजावर केलेले आरोप सिद्ध होतील. बूकीशी संबंध ठेवणे वगैरे आणि तसे कायदेशीर काय कार्यवाही होईल ते होईल असे वाटते. मला श्रीशांतचे बद्दल पाहतांना वाईट वाटले. दोन कोटी त्याला फ्रेंचाइजकडून मिळालेले असतांना पाच पंचवीस लाखासाठी करियरची बर्बादी करुन घेतली. पण, मोह कधी कोणला आवरला आहे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२ कोटीचे काय घेऊन बसलात! ही बातमी बघा! एका ओव्हरला ६० लाख रुपये म्हणे. आणि पब्लिक बसलय इथे मुंबई की पुणे भांडत. http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/ipl/news/Rs-60-lakh-for-one-over-life-ban-likely-for-Sreesanth/articleshow/20088224.cms

In reply to by पैसा

एकाच ओव्हरसाठी ही भानगड केली ना. सर्व ओव्हरसाठी नाही. (त्यामुळे म्याचमधे इंट्रेष्ट आहे ना शिल्लक) :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी १९६६ पासून क्रिकेट पहातो आहे. जाणून आहे. क्रिकेट या खेळाबद्द्ल भयानक गैरसमज सगळीकडे आहेत. त्यातील एक मोठा गैरसमज म्हणजे फिक्सिंग. या खेळात ११ अधिक २ बरोबर तेरा खेळाडू अधिक तीन अम्पायर्स, क्रिकेटचे नियम, वार्‍याची दिशा, खेळपट्टीचा कठीण पणा, नासधूस, हवेतील आर्द्रता, खेळपटीवरील गवताचे प्रमाण, प्रत्येक चेंडूफेकीची दिशा, टप्पा, गति, फिरक ई अनेक गोष्टी मिळून एक धाव, दोन धावा, तीन, धावा, चौका, पंचकार, षटकार, वाईडबॉल, नोबॉल, झेलबाद, पायचित, बोल्ड, ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड , हिटविकेट,रनाउट ईई परिणाम प्रत्यक्षात दिसत असतात. अर्थातच क्रिकेटची ही व्यामिश्रता व अनिश्चितताच सट्टा खेळण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ (?) आहे.कोणाही बुकीला जर परफेक्ट मॅनेज्ड सट्टा निर्णय घडवून आणायचा असेल तर इतक्या गोष्टीना विकत घ्यावे लागेल. तेंव्हा माध्यमे , क्रीडासमीक्षक, माजी क्रिकेटर कितीही बोंबलले तरी मला तरी match fixing ही संकल्पनाच मान्य नाही. अरे हो वरील शक्यतात खेळाडूला आयत्यावेळी र्‍ह्दयविकाराचा झटका येऊन त्याला चेंडू दोरापलिकडे जायच्या आत अडवण्याची किंवा मुद्दमहोऊन तो दोरापलिकडे ढकलण्याची संधी न मिळणे हे ईशवरी संकेताचचे लफडे राहिलेच की सांगायचे !!

In reply to by चौकटराजा

वार्‍याची दिशा, खेळपट्टीचा कठीण पणा, नासधूस, हवेतील आर्द्रता, खेळपटीवरील गवताचे प्रमाण, प्रत्येक चेंडूफेकीची दिशा, टप्पा, गति, फिरक
ह्या सर्वाचे गणित करूनच फलंदाजाला धावा घेणे सोपे जावे असे बॉल टाकले जातात. शिवाय पोलीसांनी जवळ जवळ १ तासाचे संभाषण ध्वनीमुद्रित केले आहे, तसेच व्हिडिओ रेकॉर्डींगही केले आहे. ते तर नाकारता येणार नाही. श्री. संझगिरींसारखे ज्येष्ठ समिक्षकही 'फिक्सिंग' चा उद्योग चालतो ह्याच्याशी सहमत आहेत. प्रिती झींटा, सिद्धू ह्यांनी 'संसदेत भ्रष्टाचार चालतो तर क्रिकेट मध्ये झाल्यावर लगेच पोलीस केस आणि शिक्षा करणे अन्याय्य आहे' असे सुचित केले आहेत. म्हणजेच क्रिकेट मध्ये 'फिक्सींग' होते आहे ह्याला तेही नकळत दूजोराच देत आहेत.