Skip to main content

भारतात क्रिकेट वर सट्टा अधिकृत झाला पाहिजे,

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी बुधवार, 03/04/2013 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
आय पी एल च्या निमित्ताने आता सट्टेबाज सक्रिय झाल्याची बातमी वाचली , सट्टेबाज ,त्यांची कार्य पध्ध्ती पंचतारांकित वर्तुळात नेहमीच पहिली आहे. सट्टा हा परदेशात म्हणजे युके व जर्मनी मध्ये कायदेशीर आहे , त्याने सरकारला प्रचंड महसूल मिळतो. एरवी क्रिकेट च्या सामन्यावर भारत हजार ते दोन हजार कोटींचा सट्टा लागतो. हा अनधिकृत धंदा असल्याने ह्यातून सरकार ला कर मिळत नाही , व ह्यातून मिळणारे उत्पन्न हवाला मार्फत परदेशात जाते किंवा काळा पैसा म्हणून पडून राहतो. भारतात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा लाऊ शकतो , सध्याचे क्रिकेटर व त्यांना सतत स्पर्ध्धेत पळवणारे त्यांचे मालक पाहता ह्यांच्यावर लागणारा सट्टा थांबवणे जर सरकारला शक्य होत नसेल तर ह्या अनधिकृत व्यवसायाचे अधिकृत ,कायदेशीर रूपांतरण झाले तर बेटिंग करणारे जे अनेकांदा अंडर वल्ड शी संबंधीत असतात त्यांच्या कारवायांवर चाप बसेल. कारण त्यांच्या धंद्यात शब्दावर व्यवहार चालतो , ह्यामुळे फसवाफसवी काही प्रसंगी होते. ह्याउलट युके मध्ये मी लेडब्रोक सारख्या कंपनीच्या कार्यालयात सुरवातीला उत्सुकतेने गेलो होतो , तेथे घोडे , कुत्रे , ह्यांच्या शर्यती तसेस क्रिकेट सोबत ,फुट बॉल, ते बास्केट बॉल अश्या अनेक खेळांवर सट्ट्याचे भाव स्क्रीन वर दिसत होते , गंमत म्हणून भारत व इंग्लड च्या एकदिवशीय सामन्यात दोन पौंड इंग्लंड वर लावले, ह्याबाबत अधिकृत पावती त्यांनी मला दिली , शेजारच्या इंग्लिश पब मध्ये जाऊन सामना बघायला सुरवात केली , आता भारत जिंकला तरी सेलिब्रेशन व हरला तर पैसे मिळाले असते , असा दुहेरी हिशोभ होता. भारत त्यादिवशी अपेक्षेप्रमाणे जिंकला. एकदा भारतातून आलेल्या एका मोठ्या व्यावसायिकाने मला अफलातून कल्पना सांगितली , त्यांच्या मते भारतात त्याच्या सारख्या अनेक मित्रांना बेटिंग करायचे असते ,मात्र अनधिकृत रीत्या ते करण्यात खूपच धोका असतो ,म्हणून युके मध्ये माझे वास्तव्य असल्याने मी त्यांच्यासाठी त्यांच्या पैशाने येथे युके मध्ये अधिकृत रीत्या बेटिंग करायचे व त्याची पावती त्यांना मेल करायची , थोडक्यात हार जीत जशी होईल तसा पैसा त्यांना भारतात द्यायचा , ह्यात मला अडचण एवढीच होती की त्यांच्याकडून भारतातून पैसा माझ्याकडे हवाला मार्फत येणार व मी तो हवाला मार्फत परत त्यांना भारतात पाठवणार. ह्यात ते मला कमिशन देणार नव्हते तर महिन्याला अमुक हजार पौंड देणार होते, सदर प्रस्ताव देणारा भारतीय व्यापारी हा हिर्याचा व्यापारी होता. व हवाला सुद्धा करायचा. ह्यामुळे नम्रपणे त्यांचा प्रस्ताव मी नाकारला.. आमच्याकडे युकेस्थित अनेक भारतीय व्यावसायिक नियमित यायचे, त्यांचे आमचे चांगले संबंध होते. बहुतेक अनेकांचे हवाला व्यवहार भारतात व्हायचे , तेव्हा ह्या धंद्यात आम्हाला खेचण्याचे नेहमीच प्रलोभने दाखवण्यात यायची, आमचे काम म्हणजे खजिनदाराचे असणार होते. पौंड मध्ये पैसे घेणे किंवा रुपये परत देणे, ह्याचे एक महत्वाचे कारण असे होते की , भारतीय दुकाने ,उपहारगृह ह्यावर बॉबी लक्ष ठेवून असतात, हवाला व्यवहार तेथून करणे अवघड होते . पण ह्या प्रस्तावाला आम्ही कधीच बळी पडलो नाही, कारण मुंबई पासून असे धंदे करणारे ,त्यांची व्यावसायिक असुरक्षितता व पकडले गेल्यावर मोठ्या माशाने छोट्या माशाला बळीचा बकरा बनवणे असे सर्व प्रकार पहिले होते, परत मध्यम वर्गीय संस्कार, युके मध्ये समाधानी व चाकोरी बद्ध आयुष्य सोडून असे बेभरवशाचे आयुष्य जगायला मनाई करत होते. नैतिकता वैगरे मग मनात विचार यायचा आधी विचार आयुष्यात एखादी रिस्क घेतांना ती घेणे खरच गरजेचे आहे का. माझा एक दिल्लीचा मित्र होता , त्याचा दिल्लीत प्रचंड मोठा व्यवसाय होता, मात्र कोकेन च्या नशेने त्यांचे व्यवसायात मन रमत नव्हते, परिवारात बदनामी होत होती हॉटेल व्यवस्थापन केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला युके मध्ये पाठवले. दृष्टी आड सृष्टी असा बहुतेक त्यामागील विचार असावा , त्याचे नवाबी राहणे व श्रीमंती थाट गोर्यांच्या डोळ्यात भरण्यासारखा होता, त्यांचा पगारातून त्यांच्या युके मधील जीवनावश्यक गरजा भागयच्या, मात्र त्यांच्या अतिरिक्त मनोरंजनासाठी निधी त्यांच्या घरच्यांच्या कडून दर महिना दोन ते अडीच लाख हवाला तर्फे यायचा, व हे साहेब लंडन मधील साउथ हॉल मधील विविध दुकाने , उपहारगृह येथून काही हजार डॉलर घेऊन हा व्यवहार पूर्णत्वाला न्यायचे. साउथ हॉल मध्ये भारताच्या बाहेरील माझ्या मते सर्वात मोठे किराणा मालाचे दुकान कम मॉल होता. त्याच्या बरोबर जाऊन आम्ही मित्र महिन्याची खरेदी करायचो , त्याला नेहमी मी एक प्रश्न विचारायचो. तुझे घरचे दर महिना एकाच हवाला वाल्याकडून तुला पैसा देतात. मात्र तो घेण्यासाठी दरवेळी तुला वेगवेगळ्या दुकानात येथे साउथ हॉल मध्ये का यावे लागते , ह्यावर त्याने उत्तरे दिले होते की पोलिसांचे ह्या दुकानांच्या वर लक्ष असते. म्हणूनच त्यांच्या मार्फत पंचतारांकित हॉटेलात हा व्यवहार करण्याचा अफलातून प्रस्ताव आमच्याकडे आला होता. आम्ही नवीन मिलेनियम मध्ये मराठी मुलांची म्हणजे मुंबई ,पुणे , नाशिक मधील मुलांची पहीली बेच युके मध्ये पहिल्यांदा हॉटेल व्यवस्थापनाचे धडे गिरवून वर्क परमिट वर काम करत होतो , चार वर्षांच्या नंतर आपसूकच येथील सरकार अनलिमिटेड रेसिडेन्सी व पुढच्या वर्षी रेड पासपोर्ट साठी येथील सरकार कडे निवेदन करण्याची मुभा देत होते. ह्या साठी आमच्या कंपनीला आमच्या साठी आवेदन करावे लागत नव्हते, तेव्हा उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा, असा व्यावहारिक विचार आमच्या डोक्यात होता, भारतीय नामवंत अभिनेत्यांचे येथे अश्या युके स्थित व्यापाऱ्यांची साटेलोटे असायचे ,त्यात भारतीय ,पाकिस्तानी सगळेच आले. ह्यावर माझ्या मित्राचे स्पष्टीकरण तयार होते , भारत सरकार परदेशातून पैसा आला तर कुठून आला अश्या चौकश्या करत नाहीत , मात्र भारतातून माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी पैसा पाठवायचा असेल तर त्यावर रिझर्व बेंक चे अनेक नियम , निकष व अनावश्यक जाचक अटी लादतात, आता भारतातून परदेशात पैसा पाठवायचा तर ह्या पैशाचा स्त्रोत विचारणे त्याला जाचक वाटत होते , कारण ह्यांचा पडला व्यवसाय . भारतात होणारा सट्टा थांबवणे कधीच शक्य होणार नाही ,कारण येथील शेतकरी सुद्धा पावसावर आपल्या आयुष्याचा सट्टा लावतो ,नशिबावर हवाला ठेवत सट्टा अनेक शेत्रात सट्टा खेळणारे अनेक आहेत , आज परदेशातून आपल्या कडील क्रिकेट मध्ये प्रथम व्यावसायिकता व त्यातून पैसा आली, म्हणजे परकीय खेळाडू आणून खेळवणे , रात्रीचे क्रिकेट , चिअर गर्ल्स ह्या सार्याच परदेशी संकल्पना देशात रुजल्या. जागतीकरण, भारताची मोठी बाजारपेठ , खेळासाठी वेडे दर्शक त्यांच्या वेडेपणाचा आपली उत्पादने विकण्यासाठी खेळाचा व खेळाडूंचा वापर करण्याचा शहाणपणा करणाऱ्या देशी व विदेशी कंपन्या म्हटले की हे सर्व आले. युके मध्ये सट्टा अधिकृत आहे , त्याने त्याच्या देशाला महसूल मिळतो व त्यामुळे त्यांच्या क्रिकेट वर प्रतिकूल परिणाम सुद्धा झाला नाही आहे,उलटपक्षी तेथे जे अनधिकृत स्पॉट फिक्सिंग करणाऱ्यांच्या वर स्टिंग ऑपरेशन होते. , भारतात खेळावर सट्टा लावणे अधिकृत केले तर खेळाडूंच्या वर अधिक डोळसपणे लक्ष ठेवता येईल , पण असे करणे भारतात एवढे सोपे नाही , असा प्रस्ताव जरी भारतात आला तरी त्यावर राजकीय भांडवल करून प्रस्ताव बासनात बांधला जाईल ह्याची खात्री असल्याने असा प्रस्ताव बहुदा मांडला जात नाही. शेअर बाजारात परदेशातून आलेले देरेवेटीव ही संकल्पना रुजली. तो माझ्यामते एक सारखा जुगार आहे , राज्यातर्फे लॉटरी हा जुगार म्हणायचा. मात्र खेळात विशेतः क्रिकेट मध्ये सट्टा म्हटला की काळीज थरारते, कारण क्रिकेट हा मैदानी खेळ आहे , मात्र भारतात मैदाने कमी म्हणून आपण दर्शक भावनेचा खेळ म्हणून सुद्धा ह्याकडे पाहतो ,अश्याच प्रकारचे दर्शक जगभारत फुटबॉल साठी आहेत, आज जर्मनीत मी फुटबॉल वर अधिकृत सट्टा लागतांना पाहतो ,तरी ह्या खेळाची लोकप्रियता, व्यावसायिकतेवर मी परिणाम झालेला पहिला नाही आहे, म्हणूनच असे वाटते भारतात खेळावर सट्टा अधिकृत करण्यात काहीच हरकत नाही आहे , तुम्हाला काय वाटते ,
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24889
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

चर्चेतली बरीच उदाहरणे वाचून जरा गोंधळ उडतोय की नेमके कशा कशाला सट्टा, जुगार म्हणावे? कुठलीही कृती करताना अनपेक्षित लाभ / तोटा (आर्थिकही) होऊ शकतो याचा अर्थ असा घ्यावा का आपण सदासर्वकाळ कळत नकळतपणे जुगारच खेळत असतो?

सट्टा व्हायलाच हवा क्रिकेटवर ....

सट्टेबाज़ी कायदेशीर झाल्यास खरोखर पद्धतशिर व कायदेशिररीत्या लोक आपला हा छद जोपासू शकतील.

सट्टेबाजी कायदेशीर करणे म्हणजे कोणीही येउन सरकारी परवाने घेऊन दुकान थाटणे असा होत नाही ते म्हणजे सरकारी देशी दारूचे दुकान किंवा पेट्रोल पंप सारखा प्रकार नसेल , किंबहुना तो भारतात कायदेशीर करण्यासाठी अगदी परदेशाची नक्कल करण्याची गरज नाही. भारताने स्वतःच्या सोयीने अनेक बदल किंवा नियम ह्या कायद्यात करू करावे. ज्या आंतर्राष्ट्रीय कंपन्यांना ह्या व्यवसायात अनेक वर्ष होऊन अनेक देशात त्यांचा व्यापार आहे. ज्यांचा कारभार पारदर्शक असून रेकॉर्ड क्लिअर आहे अश्या कंपन्यांना भारतात हा धंदा करू द्यावा जर पूर्णतः परकीय गुंतवणूक नको असेल तर त्यांना अर्धा वाटा भारतीय कंपन्यांना गुंतवणूक करू द्यावी अश्या धर्तीवर व्यवहार झाले व त्याच सोबत बेटिंग प्रकरणातील दोषी खेळाडूंना कडक शिक्षा किंबहुना तुरुंगवासाची शिक्षा कायद्यात हवी असे वाटते. बेटिंग करणारे खेळाडू स्वतःच्या कंपनीला मग ती बी सी सी आय असो किंवा आय पी एल फसवत असतो. तेव्हा फसवणुकीचा गुन्हा ,आर्थिक घोटाळे सारखा कडक गुन्ह्याचे प्रावधान कायद्यात केले तर समस्या निर्माण होणार नाही. युरोपात बहुतांशी लोक ऑन लाईन घरबसल्या सट्टा लावतात. त्यांना ह्या कंपनीच्या दुकानात सुद्धा जायची गरज वाटत नाही.

कै च्या कै ! सट्टा कशावरही अगदी कशावरही लागतो. जे जास्त व्होलाटाईल(मराठी?) असतं त्यावर सट्टा लागतो. उदा. शेअर बाजार. प्रमाण फक्त कमी जास्त असतं. उद्या म्हणाल वेश्याव्यवसाय कायदेशीर करा, मॅरोवाना कायदेशीर करा, लोडेड बंदुका जवळ घेउन फिरणं कायदेशीर करा. एखाद्या देशात, भागात एखादी गोष्ट चालते ती सगळीकडे चालतेच असं नाही.

एखाद्या देशात, भागात एखादी गोष्ट चालते ती सगळीकडे चालतेच असं नाही. आपल्या निरीक्षणाच्या प्रति मला कुतूहल वजा आदर आहे. माझ्या मते आय पिल एल स्पर्धा , तिचे बाजारीकरण ,खेळाडूंचा लिलाव , त्यांच्या नंतर पार्ट्या त्यात बॉलीवूड चा तडका , विदेशी चीअरगर्ल्सचा झंझावात ह्या सर्व परदेशी संकल्पना भारतीयांनी डोक्यावर घेतल्या, असे मी इतके दिवस उगाच समजत होतो. फक्त खेळासंबंधी म्हटले तर आता खेळ बाजूला राहून धंदा झाला आहे, खेळाडूंची व खेळ पाहणाऱ्या खेळाडूंची मनोवृत्ती पार व्यवसायिक झाली आहे , विश्वचषक जिंकल्यावर तो दिवाळी साजरी करतो. ८ कसोटी सलग हारून आता प्रेक्षक शिमगा साजरा करत नाही , त्याच्याकडे मनोरंजनाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, वाढते बाजारीकरण कोणीही थांबवू शकत नाही, जे अनधिकृत करून दहशतवाद्यांच्या कारवायांना बळ देते तेच अधिकृत करून देशाच्या अर्थ व्यवस्थेत भर टाकण्यात काय गैर आहे,

In reply to by निनाद मुक्काम …

जर हा पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेत आला तर उत्तमच. कदाचित ह्याच कारणांमुळे राजकारणी कधी क्रिकेटवरचे बेटिंग ऑफिशिअल करणार नाहीत.

In reply to by अमोल खरे

अमोल खरे. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातला. अनधिकृत बेटिंग करणारे लाखो रुपयांचे बेटिंग एका व्यक्तीकडून घेतात. त्यात ते हा सारा व्यवहार हवाला मार्फत करतात. हा पैसा सर्वस्वी काळा असतो. आणि ह्या हजार करोडोंच्या व्यवसायात बॉलीवूड ,राजकारणी , व समाजातील अनेक श्रीमंत व लब्धप्रतिष्ठित व्यक्ती सामील असतात. व ह्या सर्व व्यवहारात क्रिकेटर लोकांना लुभावण्यासाठी महिलांचा वापर केला जातो. भारतात तरन्नुम बारबालेचे उदाहरण प्रसिद्ध आहे. मात्र हे बेटिंग अधिकृत झाले. तर ह्यात ज्या आंतर्राष्ट्रीय कंपन्या भारतात येतील. त्यांना अनधिकृत बेटिंग वाले प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात ते सरकारी यंत्रणेवर दबाव आणतील. इंग्लंड मध्ये अश्याच रीतीने पाकिस्तानी ओरिजिन सट्टेबाजांना स्टिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. अनधिकृत बेटिंग चे स्वरूप बेभरवशाचे असते. ह्यात तुम्ही जिंकला तर कितीतरी वेळा जिंकलेला पैसा जास्त असेल व सट्टेबाज वजनदार असेल तर तुमचे जिंकलेले पैसे तो देईलच ह्यांची खात्री नसते. मागे कराची च्या अलिशान पंचतारांकित हॉटेलात कराची मधील श्रीमंत वजनदार स्मगलर ह्याने दाउद सोबत बेट लावली होती. ती तो जिंकला व दाउद ला त्याला करोडो रुपये देणे भाग होते. मात्र बंदुकीच्या धाकावर दाउद त्याला धमकावून निघून गेला. अशी बातमी एम क्यू एम चा कट्टर समर्थक असलेला, मुळचा कराचीचा असलेला आमच्या लंडन मधील केब कंपनीच्या मालकाने सांगितली होती, त्यांच्या कंपनीकडे आमच्या हॉटेल ला केब सेवा पुरवण्याचा करारनामा होता. दाउद ला तो नेहमीच शिव्या घालायचा, कारण कानामागून आला , तिखट झाला ह्या न्यायाने सध्या कराची मध्ये दाउद ने सर्व शेत्रात आपली हुकुमुत गाजवायला सुरवात केली आहे. जुन्या पिढीचा असल्याने तो केब ड्रायवर तुमच्या दाउद ने संपूर्ण क्रिकेट विश्व बेटिंग ने पोखरून खेळाचा सत्यानाश केला असे आम्हाला वारंवार सुनवायचा., तो जेव्हा पोटतिडकीने दादुद ला शिव्या द्यायचा व तुमचा दाउद म्हणजे भारतातील एक गुन्हेगार ह्या अर्थी बोलायचा तेव्हा मला मनात गुदगुल्या व्हायच्या, ९२ चा मुंबई बॉंब हल्याच्या निमित्ताने ही घाण आय एस आय ने कराची मध्ये आणली, आता तिची दुर्गंधी संपूर्ण पाकिस्तान भर पसरली आहे , आता आय एस आय त्यांच्यावर व तो त्यांच्यावर अवलंबून आहे. दाउद व त्यांचे पाकिस्तान मधील वास्तव्य व बेटिंग चा व इतर व्यवसाय ह्या निमित्ताने जेव्हा जेव्हा मी आंजा वर वाचायचो तेव्हा त्या केब ड्रायवर ला डिवचून दाउद चा विषय काढायचो , व त्याच्याकडून अनेक सुरस व कथा कानावर पडायच्या, त्यावर लिखाण परत कधीतरी.

In reply to by निनाद मुक्काम …

त्यावर लिखाण परत कधीतरी.
असं प्रोमिस खुप वेळा दिलं आहे तुम्ही पण तुमच्या सुरस अनुभवावर काही लिहितच नाही तुम्ही. तुमच्याकडुन अनेक सुरस, अद्भुत, चमत्कारीक सत्यकथा ऐकण्यास उत्सुक असलेला.....

कधी कधी भारतात दारु पिणे बेकायदेसीर आहे. एकदा आठ मित्र जवळच्या ठिकाणी गेलो .तेथे दारु प्यालो.अर्धी बाटलई सिल्लक होती.त्या ठिकाणी एका पोलिसाने येऊन दमदाटी करून आमचे कडून पाच हजार रुपये घेतले कारण काय तर आमच्या आठ लोका पैकी चारच लोकांकडे दारु पिण्याचे लायसन्स होते.असा रीतीने भारतात कोणतीही गोष्ट वैध किंवा अवैध् नाही.आपली वेळ ! ती वैध किंवा अवैध असते.

In reply to by विलास अध्यापक

अर्धी बाटलई सिल्लक होती.त्या ठिकाणी एका पोलिसाने येऊन दमदाटी करून आमचे कडून पाच हजार रुपये घेतले
फोडायची ना तीच अर्धी बाटली डोक्यात..

बेटिंग अधिकृत न नसल्याचा फायदा डी कंपनी करून घेत आहे. ह्याचे वाईट वाटते. ह्याच साठी भारतात बेटिंग अधिकृत झाले पाहिजे हे माझे मत होते.

१००% सहमत. त्यातच काल श्रीशांत, चंडीला , चव्हाण ला अटक केल्याची बातमी पाहिली सकाळीच. डीटेल्स अजून समजले नाहीत

श्रीशांत आणि संभाव्य खेळाडूंवर झालेले आरोप मला वाटतं तसे सिद्ध होणार नाहीत. कारण कोडवर्ड फसलेले दिसतात त्याच बरोबर एका षटकात १४ धावा देईल म्हणाला असे म्हटले तरी ते काय गोलंदाजाच्या हातात असते काय ? चेंडू किती फटकावयचा टाकला तरी चेंडूला प्लेस करायचा की त्यावर मोठा फटका मारायचा हे फलंदाजावर अवलंबून आहे त्यामुळे मला नाही वाटत की श्री शांत आणि अन्य गोलंदाजावर केलेले आरोप सिद्ध होतील. बूकीशी संबंध ठेवणे वगैरे आणि तसे कायदेशीर काय कार्यवाही होईल ते होईल असे वाटते. मला श्रीशांतचे बद्दल पाहतांना वाईट वाटले. दोन कोटी त्याला फ्रेंचाइजकडून मिळालेले असतांना पाच पंचवीस लाखासाठी करियरची बर्बादी करुन घेतली. पण, मोह कधी कोणला आवरला आहे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२ कोटीचे काय घेऊन बसलात! ही बातमी बघा! एका ओव्हरला ६० लाख रुपये म्हणे. आणि पब्लिक बसलय इथे मुंबई की पुणे भांडत. http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/ipl/news/Rs-60-lakh-f…

In reply to by पैसा

एकाच ओव्हरसाठी ही भानगड केली ना. सर्व ओव्हरसाठी नाही. (त्यामुळे म्याचमधे इंट्रेष्ट आहे ना शिल्लक) :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी १९६६ पासून क्रिकेट पहातो आहे. जाणून आहे. क्रिकेट या खेळाबद्द्ल भयानक गैरसमज सगळीकडे आहेत. त्यातील एक मोठा गैरसमज म्हणजे फिक्सिंग. या खेळात ११ अधिक २ बरोबर तेरा खेळाडू अधिक तीन अम्पायर्स, क्रिकेटचे नियम, वार्‍याची दिशा, खेळपट्टीचा कठीण पणा, नासधूस, हवेतील आर्द्रता, खेळपटीवरील गवताचे प्रमाण, प्रत्येक चेंडूफेकीची दिशा, टप्पा, गति, फिरक ई अनेक गोष्टी मिळून एक धाव, दोन धावा, तीन, धावा, चौका, पंचकार, षटकार, वाईडबॉल, नोबॉल, झेलबाद, पायचित, बोल्ड, ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड , हिटविकेट,रनाउट ईई परिणाम प्रत्यक्षात दिसत असतात. अर्थातच क्रिकेटची ही व्यामिश्रता व अनिश्चितताच सट्टा खेळण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ (?) आहे.कोणाही बुकीला जर परफेक्ट मॅनेज्ड सट्टा निर्णय घडवून आणायचा असेल तर इतक्या गोष्टीना विकत घ्यावे लागेल. तेंव्हा माध्यमे , क्रीडासमीक्षक, माजी क्रिकेटर कितीही बोंबलले तरी मला तरी match fixing ही संकल्पनाच मान्य नाही. अरे हो वरील शक्यतात खेळाडूला आयत्यावेळी र्‍ह्दयविकाराचा झटका येऊन त्याला चेंडू दोरापलिकडे जायच्या आत अडवण्याची किंवा मुद्दमहोऊन तो दोरापलिकडे ढकलण्याची संधी न मिळणे हे ईशवरी संकेताचचे लफडे राहिलेच की सांगायचे !!

In reply to by चौकटराजा

वार्‍याची दिशा, खेळपट्टीचा कठीण पणा, नासधूस, हवेतील आर्द्रता, खेळपटीवरील गवताचे प्रमाण, प्रत्येक चेंडूफेकीची दिशा, टप्पा, गति, फिरक
ह्या सर्वाचे गणित करूनच फलंदाजाला धावा घेणे सोपे जावे असे बॉल टाकले जातात. शिवाय पोलीसांनी जवळ जवळ १ तासाचे संभाषण ध्वनीमुद्रित केले आहे, तसेच व्हिडिओ रेकॉर्डींगही केले आहे. ते तर नाकारता येणार नाही. श्री. संझगिरींसारखे ज्येष्ठ समिक्षकही 'फिक्सिंग' चा उद्योग चालतो ह्याच्याशी सहमत आहेत. प्रिती झींटा, सिद्धू ह्यांनी 'संसदेत भ्रष्टाचार चालतो तर क्रिकेट मध्ये झाल्यावर लगेच पोलीस केस आणि शिक्षा करणे अन्याय्य आहे' असे सुचित केले आहेत. म्हणजेच क्रिकेट मध्ये 'फिक्सींग' होते आहे ह्याला तेही नकळत दूजोराच देत आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

ह्या सर्वाचे गणित करूनच फलंदाजाला धावा घेणे सोपे जावे असे बॉल टाकले जातात. पेठकर काका, फिल्डर नावाचे अकरा खेळाडू धाव रोखण्यासाठी असतात ना क्रिकेटमधे?? श्री. संझगिरींसारखे ज्येष्ठ समिक्षकही 'फिक्सिंग' चा उद्योग चालतो ह्याच्याशी सहमत आहेत. याबाबत आपण नवजोत सिद्धू व रवि शास्त्री यांचा संदर्भ दिला असतात तर एकवेळ मान्य. द्वारकानाथ संझगिरी , सुनंदन लेले या बोलक्या पोपटांविषयी काय बोलणार असे अशोक मल्होत्रा वगैरे भरपूर पोपट आपल्या देशात आहेत. बाकी प्रिती झिटा व नवजोत यांच्या म्हणण्यात चूक काय ? पोलिसांच्या प्रायओरिटीज , डान्स बार, वेश्या व्यवसाय,बनावट सीडी, जुगार, या असतात कारण सहसा राजकारणी या बाजूला येत नाहीत. बांधकाम, हॉटल व्यवसाय ही त्यांची खास कुरणे आहेत. व हे पोलिसाना चांगलेच माहीत असते.

In reply to by चौकटराजा

फिल्डर नावाचे अकरा खेळाडू धाव रोखण्यासाठी असतात ना क्रिकेटमधे??
ते सर्व एकाच ठिकाणी, फलंदाज मारेल त्या दिशेलाच, नसतात. गोलंदाचाचे काम आहे फलंदाजाला धावा घेण्यास कठीण जाईल अशी गोलंदाजी करणे. फलंदाजासमोर दोन (मुख्य) आव्हानं असतात. एक गोलंदाजाच्या अत्यंत कठीण चेंडूला सामोरे जाणे आणि क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून पलीकडे ४ किंवा ६ धावांसाठी चेंडू सीमेपार घालवणे. आता सोपा आणि मारण्यायोग्य चेंडू गोलंदाजाने टाकला आणि फलंदाजाने षटकार मारला तर तुम्ही म्हणता ते ११ खेळाडू काय करणार? आकाशातून थेट सीमेपार जाणर्‍या चेंडूला कसे अडविणार? ११ खेळाडू क्षेत्र रक्षण करीत असतानाही दोन क्षेत्ररक्षकांमधील रिकामी जागा चौकारासाठी सुयोग्य असते. फक्त तसा चेंडू पडला पाहिजे. हेच काम गोलंदाज करतो. क्षेत्ररक्षकाची पोहोच मानवी शरीराच्या आवाक्या बाहेर कशी असणार? फलंदाजांची समस्या कमी करून जास्तीत जास्त धावा मिळविण्यासाठी त्याला मदत होईल असा 'योग्य' चेंडू टाकण्यासाठीच गोलंदाजांना 'फिक्स' करण्यात आल्याचे आरोप आहेत. क्षेत्ररक्षकांनीही कित्येक साधे सोपे झेल सोडल्याच्या घटना घडतातच. टिव्हीवर सामने पाहताना मुद्दाम 'सोडलेला' आणि 'सुटलेला' झेल वेगळा कसे ओळखणार? ह्याचाच फायदा क्षेत्ररक्षकही घेतात. गोलंदाजाचा चुकून 'नो बॉल' पडणे आणि गोलंदाजीच्या रेषेच्या एक फूट पुढे पाय पडून (कि पाडून) 'नो बॉल' पडणे ह्यात फरक आहेच. ह्या पूर्वी अझरउद्दीन, अजय जडेजा वगैरे सारखे खेळाडू घरी बसले आहेत. असे इतरही खेळाडू आहेत, असतील. त्यामुळे हे तथाकथित 'फिक्सींग' ह्या आधी सीद्धही झालेले आहे.
आपण नवजोत सिद्धू व रवि शास्त्री यांचा संदर्भ दिला असतात तर एकवेळ मान्य.
मला वाटतं, ते ह्या क्षेत्रातीलच दिग्गज असल्याने, अजूनही त्यांचे ह्या क्षेत्राशी आर्थिक संबंध जोडलेले असल्याने आणि व्यावसायिक 'नितीमत्ता' (आपल्या सहव्यावसायिकाला 'उघडे' न पाडण्याची) त्यांच्या आड येत असावी.
बाकी प्रिती झिटा व नवजोत यांच्या म्हणण्यात चूक काय ?
'संसदेत मंत्री भ्रष्ट आहेत म्हणून इतर क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करा' असे सुचविणे ही ती चुक. माझा मुद्दा, त्यांचे काय चुकले? हा नसून ह्या क्षेत्रातील भ्रष्टाचाराला त्यांनी अप्रत्यक्ष दिलेला 'दुजोरा' हा आहे.

In reply to by चौकटराजा

>>> फिल्डर नावाचे अकरा खेळाडू धाव रोखण्यासाठी असतात ना क्रिकेटमधे?? ते सर्व एकाच ठिकाणी नसतात. तसेच नियमांनुसार पहिल्या ६ षटकांत कमीत कमी ९ क्षेत्ररक्षक हे फलंदाजाच्या जवळ (फलंदाजापासून ३० यार्डांच्या परिघामध्ये) व जास्तीत जास्त २ खेळाडू लांब ठेवता येतात. उर्वरीत षटकांसाठी सुद्धा कमीत कमी ६ क्षेत्ररक्षक हे फलंदाजाच्या जवळ (फलंदाजापासून ३० यार्डांच्या परिघामध्ये) व जास्तीत जास्त ५ खेळाडू लांब ठेवता येतात. अजून एका नियमानुसार, गोलंदाज व यष्टीरक्षक सोडून उरलेल्या ९ पैकी एका बाजूला (ऑफ किंवा लेग ला) जास्तीत जास्त ५ क्षेत्ररक्षक ठेवता येतात. अशा परिस्थितीत ज्या बाजूला फक्त ४ क्षेत्ररक्षक आहेत अशा अर्धवर्तुळात फटका मारल्यास धावा मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे ११ खेळाडू क्षेत्ररक्षण करत असले तरी एका अर्धवर्तुळात फक्त ४-५ क्षेत्ररक्षक असू शकतात.

In reply to by चौकटराजा

चौरा, तुमचं हे विधान फक्त मॅच फिक्सिंग संदर्भात ते ही काही प्रमाणात लागू होतं. स्पॉट फिक्सिंगला ह्यातील कुठल्याही कारणाचा फारसा फरक पडत नाही. आणि मॅच फिक्सिंगच्या संदर्भात एखादा महत्वाचा फॉर्मात असलेला फलंदाज मॅनेज केला/ कर्णधार मॅनेज केला (तो बॉलिंग कुणाला द्यायची/ फिल्डिंग कशी ठेवायची हे ठरवतो)/ अंपायर मॅनेज केला तर सामन्याच्या निकालावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वाढते. बेटिंग त्याच्यावरच घेतलं जाऊ शकतो. कुठलाही बुकी शंभर टक्के यशस्वी होत नाही पण त्याची जिंकण्याची शक्यता तो किमान ५०% हून अधिक ठेवून असतो (धंद्यात टिकण्यासाठी).

In reply to by उपास

आमचे मत match fixing साठीच आहे. स्पॉट फिक्सिंग झाले तर मला चालेल क्रिकेट रसिक म्हणून. कायद्याचे काम कायद्याने करावे. मात्र माझे हे विधान आयपीएल सारख्या लिलावाने खेळाडू विकले जातात त्य प्रकारच्या क्रिकेटसाठी आहे. जिथे देशाची अस्मिता , प्रतिनिधित्व हे विषय येतात तिथे कसल्याही फिक्सिंग मधे भाग घेंण्याची जबर शिक्षा खेळाडूना झाली पाहिजे. बाकी कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट्साठी जुगार बाहेरच्यानी खेळायला काय हरकत आहे ? हरकत एकच म्हणजे अशा जुगाराला कायद्याची रीतसर मान्यता हवी.

In reply to by उपास

क्रिकेट मधे " देव" सचिन नसतानाही व असून नसल्यासारखा असतानाही आपण सामने जिकले आहेत.एखादा खेळाडू फोर्मात आहे हा आपला एक परिणामी निष्कर्ष असतो.गेम चा फॉर्मॅटच असा आहे की त्यात जाहीर खान ही शतक करू शकतो. आता फिल्डिंग बाबत म्हणाल तर चार साठी इंडियस्लीप दोन गली हा व्यूह वेस हॉल साठी असतो. बी एस चंद्र्शेखर लेग ट्रेप हे पाचवी शिकलेल्या मुलालाही समजते तर टीम व्यवस्थापनाला हे समजणार नाही असे आपल्याला वाटते काय ? म्हणूनच् म्हणतो स्पॉट फिक्सिंग शक्य आहे ! त्याचा बेटींग साठी उपयोग होणे ही शक्य आहे.त्यामुळे सामन्याचा रंग पालटू शकतोच असे नाही. शेवटचा चेंडू असेल तर परफेक्ट मॅनेजिंग निकालाच्या दृष्टीने शक्य आहे.

In reply to by चौकटराजा

तेंव्हा माध्यमे , क्रीडासमीक्षक, माजी क्रिकेटर कितीही बोंबलले तरी मला तरी match fixing ही संकल्पनाच मान्य नाही. अहो साहेब, क्रोनियेचा जीव गेला त्यापायी. तुम्हाला मान्य नसेल पण त्यामुळे सत्य थोडीच बदलतंय ?

In reply to by शिल्पा ब

बेटिंग केले म्हणून अनेक पाकिस्तानी खेळाडूंवर त्यांच्या बोर्डाकडून आजीवन बंदी घालण्यात आली, ह्या संबंधी त्या खेळाडूंची निवेदन प्रसिद्ध आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

हे निवेदन वगैरे ठीक आहे. पण मग पुढे काय झालं ? की सी बी आय ला सुद्धा मॅनेज करण्यात आलं ? अझरूद्दीन तर निर्दोष सुटला म्हणे !

In reply to by चौकटराजा

ह्यावेळी ३ खेळाडूंनी आपापले अपराध मान्य केले आहेत. व त्यांच्या विरुद्ध पुरावे होते म्हणूनच अटक झाली. अझर व जडेजा ने आपापले अपराध कबूल केले नव्हते माझ्या माहितीप्रमाणे प्रसार माध्यमे बोकाळली नव्हती आजच्या सारखी जेथे संजय दत्त तुरुंगात जातो तेथे नवशिक्या खेळाडूंची काय कथा आणि क्रोनिए ला आपले प्राण गमवावे लागले त्यावेळी व जडेजा , अझर व मोंगिया , शर्मा ह्यांची कारकिर्द संपली ती कायमची आता थरूर ह्यांनी संत ह्यांना पाठिंबा देणारे वक्तव्य केले होते. त्यांच्यात त्यांना भविष्यातील अजून एक खासदार दिसत असावा.

बुकीने पैश्याबरोबर पोरी पण पुरवल्या होत्या.फ्रंचाईजीने फक्त पैशे दिले होते. श्रीशांतचा बाप पण काहीबाही बरळत आहे.धोनी आणि हरभजनचा कट आहे हा असा सनसनाटी आरोप त्याने केला आहे.मुळात हरभजनला टिम इंडियात येण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागत आहेत मग तो कशाला श्रीशांतच्या आडवा येईल.श्रीशांत ला त्याचेवरचे आरोप मान्य आहेत,ही त्याला आयुष्यातील सर्वात मोठी चुक वाटत आहे.

In reply to by वेताळ

संजू बाबाच्या तुरुंगवारी मुळे त्याचे खंदे समर्थक महेश भट्ट निराश उद्विग्न झाले होते. मात्र स्पॉट फिक्सिंग त्याचा मास्टर माइंड परदेशात ,श्री शांत ची अटक , बुकींनी पोरी पुरवणे त्याच्या वडिलांनी धोनी व हरभजन ने मिळून श्री शांत वर कट रचून त्याला अडकवले असल्याचा आरोप ह्या बातम्या वाचून भट्ट साहेबांना हायसे वाटले जन्नत ३ ची स्क्रिप्ट आयतीच हातात आली आहे.

आय्.पी.एल = काळा पैसा + भारत्+पाकिस्तान्+दुबई+ड्रग्ज+उच्च वेश्याव्यवसाय +थोडेसे क्रिकेट असे माझे पुर्वीपासूनचे मत आहे.

फिक्सिंगची चूक मान्य करत अंकित चव्हाण ढसाढसा रडला चव्हाण बाळ चुकून क्रिकेट मध्ये आले. त्यापेक्षा राजकारणात असता तर चोर तो चोर वर शिरजोर असा आदर्श त्याच्यापुढे असता. नशीब एकेकाचे

In reply to by निनाद मुक्काम …

अर्धी बाटलई सिल्लक होती.त्या ठिकाणी एका पोलिसाने येऊन दमदाटी करून आमचे कडून पाच हजार रुपये घेतले
आता जाईल ना, काँग्रेस मध्ये. त्या साठीचे क्वालिफिकेशन तर सिद्ध केले त्याने.

अधिकृत सट्टा अनधिकृत सट्ट्यापेक्षा चांगला हे कळतय पण मुळात 'स्पॉट फिक्सिंग' (मॅच फिक्सिंग नव्हे) हे कसं थांबवता येणार. उदा. मी माझ्या तिसर्‍या षटकात एक नोबॉल टाकेन आणि त्यावर फ्री हीट मिळून धावा मिळायला मदत होईल असं गोलंदाजाने ठरवलं आणि बुकीजना सिग्नल दिला तर ते पुढच्या षटकात होणार्‍या धावा यावर सहज सट्टा खेळू शकतील. थोडक्यात स्पॉट फिक्सिंग थांबवणे अशक्य दिसते. याचा उलट परिणाम म्हणजे उदा. एखाद्या गोलंदाजाकडून चुकून नो बॉल पडला/ कॅच सुटला तरी त्याच्याकडे फिक्सिंगच्या चश्म्यातूनच पाहिले जाणार! तस्मात क्रिकेट या खेळाचेच नुकसान.. सट्टा अधिकृत असो वा नसो..

संपूर्ण सामना फिक्स करणे अशक्य नाही. १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेतला पाकिस्तान वि. बांगलादेश हा संपूर्ण सामना फिक्स केलेला होता. बांगलाने प्रथम फलंदाजी करून २३८ धावा केल्यावर पाकिस्तान सर्वबाद १३० असा सामना हरले. या सामन्यापूर्वी खेळलेल्या सर्व ५ सामन्यात पाकिस्तान जिंकलेले होते व ते प्रथम क्रमांकाने उपांत्य फेरीत पोहोचले होते. या सामन्याच्या निकालामुळे त्यांच्या प्रथम स्थानावर अजिबात फरक पडणार नव्हता. त्यामुळे ठरवून पाकडे सामना हरले. नंतर अशी बातमी होती की अक्रम, सलीम मलिक इ. ५-६ खेळाडूंनी बांगलावर जोरदार बेटिंग केले होते व त्यासाठी ते ठरवून सामना हरले. हरल्यानंतर सुद्धा प्रथम स्थान अबाधित राहिले व बांगला जिंकल्यामुळे बेटिंगमध्ये जोरदार पैसे मिळाले अशी विन-विन परिस्थिती घडवून आणली होती.

हरकत नाही. तसाही आता चांगल्या खेळावर विश्वास मात्र रहाणार नाही. (एक महिन्या पूर्वीच म्याच फिक्सिंग ची शंका आली होती. तसे म्हणाल्यावर मुलाने ( वय दहा ) 'ते काय असते?' असे विचारले. त्याला सांगितल्यावर आश्चर्य वाटले होते. आता त्याला ही हा प्रकार बघून वैताग आलाय.) एकूण लोकांचे क्रिकेटाकर्षण कमी झाल्यास कोट्यावधी मनुष्य तास उपलब्ध होतील. ( पण त्याचं काय करायचं हा पण प्रश्न आहेच!)

एकूण लोकांचे क्रिकेटाकर्षण कमी झाल्यास कोट्यावधी मनुष्य तास उपलब्ध होतील. ( पण त्याचं काय करायचं हा पण प्रश्न आहेच!) - हे महत्वाचं विचारलंत. सगळे सरकारी डाटाबेस संगणकावरुन उतरवुन कागदोपत्री करावे लागतील.

सामना फिक्सिंगचे अजून एक उदाहरण आठवलं. हा सामना फिक्स होता हा निष्कर्ष मी केवळ परिस्थितिजन्य घटनांवरून काढलेला आहे. २०१२ च्या आयपीएल मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. चेन्नई सुपर किंग्जमध्ये प्लेऑफ फेरीत सामना झाला होता. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार होता व हरणारा संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार होता.२०१२ मध्ये दिल्लीचा संघ जबरदस्त फॉर्मात होता. सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, महिला जयवर्धने इ. फलंदाज जबरदस्त फॉर्मात होते व गोलंदाजीत मॉर्ने मॉर्केल १५ सामन्यात २५ बळी घेऊन मस्तकावर 'जांभळी टोपी' मिरवित होता. सामना सुरू व्हायच्या संघ जाहीर झाल्यावर पहिला जबरदस्त धक्का बसला. सर्वाधिक बळी घेणार्‍या मॉर्केलला या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याच्याऐवजी आंद्रे रसेलला आत आणले होते. आम्हाला एक अष्टपैलू खेळाडू हवा असल्याने मॉर्केलऐवजी रसेलला घेतले असा पोकळ युक्तिवाद सेहवागने केला, पण तो कोणालाच पटला नाही. मॉर्केलला काढणे हा मूर्खपणा आहे असे सर्व समीक्षकांनी मत व्यक्त केले. तसेच संघातल्या अजून एका खेळाडूला बाहेर ठेवून आजतगायत एकही सामना न खेळलेल्या एका १९ वर्षीय फिरकी गोलंदाजाला संघात घेण्यात आले. नंतर नाणेफेक होउन सेहवागने नाणेफेक जिंकल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सेहवागने क्षेत्ररक्षण घेतले. याही निर्णयावर सर्व समीक्षकांनी सडकून टीका केली. नंतर सामना सुरू झाल्यावर पहिले षटक चक्क आपल्या आयुष्यातला पहिला सामना खेळणार्‍या १९ वर्षांच्या नवोदित फिरकी गोलंदाजाला दिले. या गोलंदाजाच्या पहिल्याच षटकात मुरली विजयने २ षटकार, १ चौकार मारत १९ धावा घेतल्या. एवढे मारूनसुद्धा त्याच गोलंदाजाला अजून एक षटक देण्यात आले. मॉर्केलला काढून गोलंदाजी लंगडी केली होती व या नवोदिताला घेऊन दिल्लीने गोलंदाजी अपंग करून टाकली. क्षेत्ररक्षणातही सेहवागने एक सोपा झेल सोडून संशयाला जागा करून दिली. चेन्नईने तब्बल १९० पेक्षा जास्त धावा केल्यावर दिल्लीची फलंदाजी सुरू झाली आणि आश्चर्य म्हणजे सेहवाग सलामीला आलाच नाही. तो नंतर खालच्या क्रमांकावर खेळला. शेवटी दिल्ली संघ सामना हरला व चेन्नईला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. या सर्व घटनांवरून हा सामना दिल्लीने ठरवून चेन्नईला बहाल केला असे माझे मत झाले होते. काही वृत्तपत्रातून देखील यावर चर्चा झाली होती. या सामन्यापूर्वीच्या घटना रंगतदार आहेत. प्लेऑफपूर्वी चेन्नईचा संघ संकटात सापडला होता. इतर ४-५ संघ त्यांच्या पुढे होते व चेन्नईचे सर्व सामने संपले होते. इतर ६ संघांचे आपापसातले एकूण ३ सामने शिल्लक होते. या तीनही सामन्यांचे निकाल जर चेन्नईला अनुकूल लागले असते तरच चेन्नई ४ थ्या क्रमांकाने प्लेऑफ मध्ये आले असते. असे होण्याची प्रॉबॅबिलिटी खूपच कमी असते. अश्वशर्यतीत जॅकपॉट लागण्याची जेवढी शक्यता आहे, साधारणपणे तेवढीच शक्यता असे होण्याची आहे. आश्चर्य म्हणजे या तीनही सामन्यांचे निकाल चेन्नईला पाहिजे होते तसेच लागले. असे निकाल लागणे हा योगायोग वाटत नाही. आणि नंतर दिल्ली-चेन्नई या प्लेऑफमधील सामना दिल्लीने चेन्नईला जिंकून दिला असे स्पष्ट दिसत आहे. या सर्व गोष्टी पुराव्याशिवाय सिद्ध करणे अवघड आहे. किंबहुना अशा गोष्टींचे पुरावे असणे हे पण अशक्य आहे. कालपासून चेन्नई सुपर किंग संघाच्या मालकाचे (बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या श्रीनिवासनचा जावई) फिक्सिंग प्रकरणात जोडले जात आहे. त्यामुळे मागील वर्षी झालेल्या या सामन्यांचे निकाल चेन्नईच्या संघाविषयीचा संशय अधिकच वाढवितात.

In reply to by श्रीगुरुजी

+१ पण श्रीनिवासनपर्यंत प्रकरण आले म्हणजे आता संपले म्हणायला पाहीजे कारण चौकशी अजुन पुढे रेटली तर आता कोणाचे नाव येईल हे सर्वांनाच माहीतेय. ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

२००९ चा अपवाद वगळता चेन्नईचा संघ दरवर्षी अंतिम फेरीत कसा पोहोचतो हे एक गूढच आहे. विशेषत: २०१२ मध्ये प्लेऑफमध्ये सुद्धा येण्याची खूपच कमी शक्यता असताना व सर्व सामने खेळून संपलेले असताना हा संघ अंतिम फेरीपर्यंत कसा पोहोचला याची चौकशी होणे आवश्यक आहे.

माझ्या लेखातून जे मत मी व्यक्त केले आहे , त्याला दुरोजा देणाऱ्या प्रतिक्रिया आता समाजातील विविध मान्यवर व्यक्तींच्या कडून व्यक्त झाल्या. युरोपात बेटिंगला मान्यता देण्यात आली आहे, म्हणूनच तर फुटबॉलच्या कुठल्याही स्पर्धेत असे प्रकार होताना दिसत नाही. आपल्याकडे बेटिंगला बंदी असल्याने क्रिकेटमध्ये अशा गोष्टी चोरून होताना दिसातात. असे भ्रष्टाचार टाळण्यासाठी बेटिंग कायदेशीर करायला हवे. आघाडीचे खेळाडू स्पॉट फिक्सिंगसारख्या प्रकारात असल्याचे समोर येते हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मात्र, यामुळे खेळाला नावे ठेवू नका. खेळ हा कुठल्याही खेळाडूपेक्षा मोठा आहे '. - बायचुंग भुतिया (भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार) सरकारला करापोटी उत्पन्न तरी मिळेल! ' बेटिंग छुप्या पद्धतीने होत असल्याने सरकारला या व्यवहारातून करही मिळत नाही. बेंटिंगप्रकरणी अनेकांना कठोर शिक्षा होऊनही हे प्रकार सुरू आहेत. आता स्पॉट फिक्सिंगसारखे प्रकारही होऊ लागले आहेत. तेव्हा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी बेटिंगला कायदेशीर मान्यता देण्याचा विचार व्हावा '. - इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इडस्ट्रीज गैरप्रकार थांबतील! ' भ्रष्टाचार, स्पॉट फिक्सिंग सारखे प्रकार टाळायचे असतील, तर क्रिकेट बेटिंगला कायदेशीर मान्यता द्यायला हवी. अमेरिकेत पूर्वी बीअरला मान्यता नव्हती, त्यामुळे माफियांमार्फत छुप्या बीअर विक्रीचा बेकायदा धंदा फोफावला. बीअरला मान्यता मिळाली आणि माफियांचे प्रस्थ नाहीसे झाले. भारतातही क्रिकेट बेटिंगला मान्यता मिळाल्यास स्पॉट फिक्सिंगसारखे प्रकार थांबतील. ' - जेफ्री बॉयकॉट (माजी इंग्लंड कर्णधार)

भारतात क्रिकेटवरील सट्टा कायदेशिर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ३ लाख कोटींची उलाढाल असणार्‍या ह्या धंद्यातून सरकारला २० कोटी कर मिळेल असे म्हंटले आहे. हा अगदी अत्यल्प कर आहे असे मला वाटते. कमीतकमी ३५% रक्कम (अंदाजे १ लाख कोटी) कर सरकारात भरला गेला पाहिजे. असे माझे मत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका तुम्ही म्हणता तेवढा नाही पण २० कोटी पेक्ष्या जास्त कर नक्कीच मिळाला पाहिजे. माझा लेख कोणा बारामतीकाराने वाचून साहेबांना दाखवलेला दिसतोय. आपलीच लाल... मुक्काम पोस्ट

In reply to by निनाद मुक्काम …

काका तुम्ही म्हणता तेवढा नाही पण ....
सामान्यांना, उत्पन्नाच्या किती टक्के आयकर भरावा लागतो? त्याच्या जवळपास असावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

सामान्यांना, उत्पन्नाच्या किती टक्के आयकर भरावा लागतो? त्याच्या जवळपास असावा.
नको. सामान्य नोकरदार असोत, व्यावसायिक वा उद्योगपती, त्यांचे उत्पन्न काम करून कमावलेले असते. त्यावर जेवढा कर असतो, तेवढा बेटींगच्या उत्पन्नावर लावणे हे इतरांवर अन्यायकारक वाटते. बेटींगच्या उत्पन्नवरचा कर हा त्यापेक्षा जास्तच असावा. ३०-४०% योग्य वाटतो. (५०% असायलाही हरकत नसावी).

आयपीएल मुळे काही चांगले खेळाडू मनातून उतरले आहेत. आता अशी खात्री पटत चालली आहे की चेन्नई सुपर किंग्जचे काही सामने नक्कीच फिक्सिंग करून जिंकले होते. गेल्या वर्षी प्लेऑफ पूर्वीचे काही सामने व चेन्नई सुपर किंग्जचा प्लेऑफ मधील दिल्लीविरूद्धचा सामना नक्कीच फिक्स करून जिंकला होता. आपला संघ गडबड करून जिंकतो आहे याची धोनीला थोडी तरी कल्पना असणारच. त्यामुळे धोनी मनातून उतरायला लागला आहे. आयपीएलच्या सामन्यात गंभीर व कोहली अनेकदा शिवीगाळ करताना आढळले. गंभीर तर चक्क एकदा द्रविडसारख्या सभ्य खेळाडूला शिवीगाळ करत होता. आयपीएलमधील पैशांच्या मोहापायी वरिष्ठ खेळाडूंना शिवीगाळ करेपर्यंत यांची मजल गेली आहे. गंभीर आणि कोहली हे देखील आता मनातून उतरले आहेत. एकंदरीत क्रिकेट हा खेळ नासवून टाकणारे आयपीएल बंद व्हावे हीच इच्छा आहे.

धोनी ला कल्पना असली तरी त्याने काय करणे अपेक्षित होते , त्याला विकत घेतले होते. काही हजार करोड गुंतलेल्या ह्या स्पर्धेत धोनी ने तोंड उघडले असते तर तोच तोंडावर आपटला असता. अझर ,जडेजा बेटिंग करत होते तेव्हा त्यांचे सहकारी मांजरेकर व तेंडूलकर ह्यांना सुद्धा ह्या प्रकारची पुसट कल्पना असणारच, पंचतारांकित हॉटेलात वावर व वास्तव्य असलेल्या अनेक खेळाडूना संशयास्पद , असभ्य वर्तणूक करतांना पहिले आहे. तेव्हा त्यांच्या समवेत खेळणाऱ्या खेळाडूना ह्यांची कल्पना असली तरी सिस्टीम विरुद्ध लढायला व लढून जिंकायला ते काही बॉलीवूड सिनेमांचे हिरो नाही व आयुष्य हे काही सिनेमा नाही जेथे शेवटी सत्याचा विजय होऊन शेवट गोड होतो. आपल्या समोर चाललेला अनाचार उघड्या डोळ्याने पाहून गप्प बसणे धोनी , सौरभ , सचिन , द्रविड सारख्या खेळाडूंच्या हाती असते.

>>> अझर ,जडेजा बेटिंग करत होते तेव्हा त्यांचे सहकारी मांजरेकर व तेंडूलकर ह्यांना सुद्धा ह्या प्रकारची पुसट कल्पना असणारच, ४-५ दिवसांपूर्वी एक लेख वाचला. त्याची लिंक मिळाल्यास देतो. त्या लेखात लिहिल्यानुसार १९९८-२००० या काळात काही खेळाडू फिक्सिंग करत आहेत असा सचिनला संशय आला होता. कदाचित त्याची खात्री देखील झाली होती. त्यामुळे त्याने तत्कालीन निवडसमितीशी गुप्तपणे बोलून त्या ४-५ खेळाडूंची परत कधीही संघात निवड होणार नाही अशी व्यवस्था केली. त्या खेळाडूंची नावे लेखात दिलेली नव्हती. पण त्या लेखात असे म्हटले होते की ते ४-५ खेळाडू संघात नंतर कधीही निवडले गेले नव्हते. सचिनने अशा प्रकारे फिक्सिंगला आळा घालायचा प्रयत्न केला होता. धोनीला कदाचित असे करता आले असते.

In reply to by श्रीगुरुजी

जडेजा व अझर , हे मोठे मासे शेवटपर्यंत संघात होते. सचिन ला त्यांच्याबद्दल माहिती असली असती तरी तो त्यांचे काहीही वाकडे करू शकला नसता , किंवा वाकडे करू शकला नाही हे सत्य आहे. धोनी काय म्हणून अपवाद ठरावा त्याचा मालक मुळात चोर आहे.

क्रिकेटवर सट्टा अधिकृत करणे अयोग्य ठरेल. अश्वशर्यतींवरील सट्टा व क्रिकेटवरील सट्टा याची तुलना अप्रस्तुत आहे. अश्वशर्यतीत समाजाचा अत्यल्प वर्ग सहभागी होतो. बहुसंख्य भारतीयांना अश्वशर्यत कशी होते, त्यावर बेटिंग कसे केले जाते, त्यात फायदा व नुकसान कसे होते या व अशा बहुसंख्य गोष्टींची कल्पना नाही. (मिपावर सर्वेक्षण करून किती मिपाकरांना अश्वशर्यतीविषयी चांगली माहिती आहे व कितीजणांना क्रिकेटविषयी चांगली माहिती आहे याची आकडेवारी मिळविली तर अश्वशर्यतीविषयीच्या अज्ञानाची कल्पना येईल.). माझ्या समजूतीप्रमाणे अश्वशर्यतीवरील बेटिंग हे मैदानात जाऊन करावे लागते. ते ऑनलाईन करता येत नाही. एकंदरीत खूपच कमी जण अश्वशर्यतीवर बेटिंग करत असल्याने बेटिंगची रक्कमही कमी असणार. याउलट क्रिकेटवरील बेटिंग आत्मघातकी ठरेल. कोणीही घरी बसून आंतरजालाद्वारे क्रिकेटवर पैसे लावू शकेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रिकेटवर पैसे लागतील. बहुसंख्य जनतेला क्रिकेटची थोडीफार माहिती असतेच. आपल्या ज्ञानामुळे अनेक जण बेटिंग करायला प्रवृत्त होतील. एखाद्या संघावर जर भरपूर पैसे लागले तर आपोआप सामना फिक्स करण्याचे प्रमाण वाढेल. यातून क्रिकेटचे जबरदस्त नुकसान होईल. अश्वशर्यतीत समाजाचा एक अत्यंत लहान गट गुंतलेला असतो. त्यामुळे अश्वशर्यतीतिल बेटिंगचा समाजावर अत्यल्प परिणाम होतो. क्रिकेटमध्ये बेटिंग सुरू झाले तर त्यात पैसे लावणार्‍यांची संख्या अमर्याद असेल. चांगला खेळ बघण्याऐवजी आपण पैसे लावलेला संघच जिंकावा अशी वृत्ती निर्माण होऊन खेळाचा आनंद मिळणार नाही. शेवटी प्रत्येक सामन्यात फिक्सिंग सुरू होऊन त्यात गुन्हेगारी, माफिया टोळ्या घुसून संपूर्ण खेळाची वाट लावतील.