आय पी एल च्या निमित्ताने आता सट्टेबाज सक्रिय झाल्याची बातमी वाचली ,
सट्टेबाज ,त्यांची कार्य पध्ध्ती पंचतारांकित वर्तुळात नेहमीच पहिली आहे.
सट्टा हा परदेशात म्हणजे युके व जर्मनी मध्ये कायदेशीर आहे , त्याने सरकारला प्रचंड महसूल मिळतो.
एरवी क्रिकेट च्या सामन्यावर भारत हजार ते दोन हजार कोटींचा सट्टा लागतो.
हा अनधिकृत धंदा असल्याने ह्यातून सरकार ला कर मिळत नाही , व ह्यातून मिळणारे उत्पन्न हवाला मार्फत परदेशात जाते किंवा काळा पैसा म्हणून पडून राहतो.
भारतात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा लाऊ शकतो ,
सध्याचे क्रिकेटर व त्यांना सतत स्पर्ध्धेत पळवणारे त्यांचे मालक पाहता ह्यांच्यावर लागणारा सट्टा थांबवणे जर सरकारला शक्य होत नसेल तर ह्या अनधिकृत व्यवसायाचे अधिकृत ,कायदेशीर रूपांतरण झाले तर बेटिंग करणारे जे अनेकांदा अंडर वल्ड शी संबंधीत असतात त्यांच्या कारवायांवर चाप बसेल.
कारण त्यांच्या धंद्यात शब्दावर व्यवहार चालतो ,
ह्यामुळे फसवाफसवी काही प्रसंगी होते.
ह्याउलट युके मध्ये मी लेडब्रोक सारख्या कंपनीच्या कार्यालयात सुरवातीला उत्सुकतेने गेलो होतो , तेथे घोडे , कुत्रे , ह्यांच्या शर्यती तसेस क्रिकेट सोबत ,फुट बॉल, ते बास्केट बॉल अश्या अनेक खेळांवर सट्ट्याचे भाव स्क्रीन वर दिसत होते ,
गंमत म्हणून भारत व इंग्लड च्या एकदिवशीय सामन्यात दोन पौंड इंग्लंड वर लावले,
ह्याबाबत अधिकृत पावती त्यांनी मला दिली ,
शेजारच्या इंग्लिश पब मध्ये जाऊन सामना बघायला सुरवात केली ,
आता भारत जिंकला तरी सेलिब्रेशन व हरला तर पैसे मिळाले असते ,
असा दुहेरी हिशोभ होता.
भारत त्यादिवशी अपेक्षेप्रमाणे जिंकला.
एकदा भारतातून आलेल्या एका मोठ्या व्यावसायिकाने मला अफलातून कल्पना सांगितली , त्यांच्या मते भारतात त्याच्या सारख्या अनेक मित्रांना बेटिंग करायचे असते ,मात्र अनधिकृत रीत्या ते करण्यात खूपच धोका असतो ,म्हणून
युके मध्ये माझे वास्तव्य असल्याने मी त्यांच्यासाठी त्यांच्या पैशाने येथे युके मध्ये अधिकृत रीत्या बेटिंग करायचे व त्याची पावती त्यांना मेल करायची , थोडक्यात हार जीत जशी होईल तसा पैसा त्यांना भारतात द्यायचा ,
ह्यात मला अडचण एवढीच होती की त्यांच्याकडून भारतातून पैसा माझ्याकडे हवाला मार्फत येणार व मी तो हवाला मार्फत परत त्यांना भारतात पाठवणार. ह्यात ते मला कमिशन देणार नव्हते तर महिन्याला अमुक हजार पौंड देणार होते,
सदर प्रस्ताव देणारा भारतीय व्यापारी हा हिर्याचा व्यापारी होता. व हवाला सुद्धा करायचा. ह्यामुळे नम्रपणे त्यांचा प्रस्ताव मी नाकारला..
आमच्याकडे युकेस्थित अनेक भारतीय व्यावसायिक नियमित यायचे, त्यांचे आमचे चांगले संबंध होते.
बहुतेक अनेकांचे हवाला व्यवहार भारतात व्हायचे ,
तेव्हा ह्या धंद्यात आम्हाला खेचण्याचे नेहमीच प्रलोभने दाखवण्यात यायची,
आमचे काम म्हणजे खजिनदाराचे असणार होते.
पौंड मध्ये पैसे घेणे किंवा रुपये परत देणे,
ह्याचे एक महत्वाचे कारण असे होते की ,
भारतीय दुकाने ,उपहारगृह ह्यावर बॉबी लक्ष ठेवून असतात, हवाला व्यवहार तेथून करणे अवघड होते
.
पण ह्या प्रस्तावाला आम्ही कधीच बळी पडलो नाही,
कारण मुंबई पासून असे धंदे करणारे ,त्यांची व्यावसायिक असुरक्षितता व पकडले गेल्यावर मोठ्या माशाने छोट्या माशाला बळीचा बकरा बनवणे असे सर्व प्रकार पहिले होते, परत मध्यम वर्गीय संस्कार, युके मध्ये समाधानी व चाकोरी बद्ध आयुष्य सोडून असे बेभरवशाचे आयुष्य जगायला मनाई करत होते. नैतिकता वैगरे मग मनात विचार यायचा आधी विचार आयुष्यात एखादी रिस्क घेतांना ती घेणे खरच गरजेचे आहे का.
माझा एक दिल्लीचा मित्र होता , त्याचा दिल्लीत प्रचंड मोठा व्यवसाय होता, मात्र कोकेन च्या नशेने त्यांचे व्यवसायात मन रमत नव्हते, परिवारात बदनामी होत होती
हॉटेल व्यवस्थापन केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला युके मध्ये पाठवले. दृष्टी आड सृष्टी असा बहुतेक त्यामागील विचार असावा , त्याचे नवाबी राहणे व श्रीमंती थाट गोर्यांच्या डोळ्यात भरण्यासारखा होता, त्यांचा पगारातून त्यांच्या युके मधील जीवनावश्यक गरजा भागयच्या, मात्र त्यांच्या अतिरिक्त मनोरंजनासाठी निधी त्यांच्या घरच्यांच्या कडून दर महिना दोन ते अडीच लाख हवाला तर्फे यायचा, व हे साहेब लंडन मधील साउथ हॉल मधील विविध दुकाने , उपहारगृह येथून काही हजार डॉलर घेऊन हा व्यवहार पूर्णत्वाला न्यायचे.
साउथ हॉल मध्ये भारताच्या बाहेरील माझ्या मते सर्वात मोठे किराणा मालाचे दुकान कम मॉल होता. त्याच्या बरोबर जाऊन आम्ही मित्र महिन्याची खरेदी करायचो ,
त्याला नेहमी मी एक प्रश्न विचारायचो.
तुझे घरचे दर महिना एकाच हवाला वाल्याकडून तुला पैसा देतात. मात्र तो घेण्यासाठी दरवेळी तुला वेगवेगळ्या दुकानात येथे साउथ हॉल मध्ये का यावे लागते , ह्यावर त्याने उत्तरे दिले होते की पोलिसांचे ह्या दुकानांच्या वर लक्ष असते. म्हणूनच त्यांच्या मार्फत पंचतारांकित हॉटेलात हा व्यवहार करण्याचा अफलातून प्रस्ताव आमच्याकडे आला होता.
आम्ही नवीन मिलेनियम मध्ये मराठी मुलांची म्हणजे मुंबई ,पुणे , नाशिक मधील मुलांची पहीली बेच युके मध्ये पहिल्यांदा हॉटेल व्यवस्थापनाचे धडे गिरवून वर्क परमिट वर काम करत होतो , चार वर्षांच्या नंतर आपसूकच येथील सरकार अनलिमिटेड रेसिडेन्सी व पुढच्या वर्षी रेड पासपोर्ट साठी येथील सरकार कडे निवेदन करण्याची मुभा देत होते.
ह्या साठी आमच्या कंपनीला आमच्या साठी आवेदन करावे लागत नव्हते, तेव्हा उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा, असा व्यावहारिक विचार आमच्या डोक्यात होता,
भारतीय नामवंत अभिनेत्यांचे येथे अश्या युके स्थित व्यापाऱ्यांची साटेलोटे असायचे ,त्यात भारतीय ,पाकिस्तानी सगळेच आले. ह्यावर माझ्या मित्राचे स्पष्टीकरण तयार होते ,
भारत सरकार परदेशातून पैसा आला तर कुठून आला अश्या चौकश्या करत नाहीत , मात्र भारतातून माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी पैसा पाठवायचा असेल तर त्यावर रिझर्व बेंक चे अनेक नियम , निकष व अनावश्यक जाचक अटी लादतात,
आता भारतातून परदेशात पैसा पाठवायचा तर ह्या पैशाचा स्त्रोत विचारणे त्याला जाचक वाटत होते , कारण ह्यांचा पडला व्यवसाय .
भारतात होणारा सट्टा थांबवणे कधीच शक्य होणार नाही ,कारण येथील शेतकरी सुद्धा पावसावर आपल्या आयुष्याचा सट्टा लावतो ,नशिबावर हवाला ठेवत सट्टा अनेक शेत्रात सट्टा खेळणारे अनेक आहेत ,
आज परदेशातून आपल्या कडील क्रिकेट मध्ये प्रथम व्यावसायिकता व त्यातून पैसा आली, म्हणजे परकीय खेळाडू आणून खेळवणे , रात्रीचे क्रिकेट , चिअर गर्ल्स ह्या सार्याच परदेशी संकल्पना देशात रुजल्या.
जागतीकरण, भारताची मोठी बाजारपेठ , खेळासाठी वेडे दर्शक त्यांच्या वेडेपणाचा आपली उत्पादने विकण्यासाठी खेळाचा व खेळाडूंचा वापर करण्याचा शहाणपणा करणाऱ्या देशी व विदेशी कंपन्या म्हटले की हे सर्व आले.
युके मध्ये सट्टा अधिकृत आहे , त्याने त्याच्या देशाला महसूल मिळतो व त्यामुळे त्यांच्या क्रिकेट वर प्रतिकूल परिणाम सुद्धा झाला नाही आहे,उलटपक्षी तेथे जे अनधिकृत स्पॉट फिक्सिंग करणाऱ्यांच्या वर स्टिंग ऑपरेशन होते.
, भारतात खेळावर सट्टा लावणे अधिकृत केले तर खेळाडूंच्या वर अधिक डोळसपणे लक्ष ठेवता येईल ,
पण असे करणे भारतात एवढे सोपे नाही ,
असा प्रस्ताव जरी भारतात आला तरी त्यावर राजकीय भांडवल करून प्रस्ताव बासनात बांधला जाईल ह्याची खात्री असल्याने असा प्रस्ताव बहुदा मांडला जात नाही.
शेअर बाजारात परदेशातून आलेले देरेवेटीव ही संकल्पना रुजली. तो माझ्यामते एक सारखा जुगार आहे , राज्यातर्फे लॉटरी हा जुगार म्हणायचा.
मात्र खेळात विशेतः क्रिकेट मध्ये सट्टा म्हटला की काळीज थरारते,
कारण क्रिकेट हा मैदानी खेळ आहे , मात्र भारतात मैदाने कमी म्हणून आपण दर्शक भावनेचा खेळ म्हणून सुद्धा ह्याकडे पाहतो ,अश्याच प्रकारचे दर्शक जगभारत फुटबॉल साठी आहेत, आज जर्मनीत मी फुटबॉल वर अधिकृत सट्टा लागतांना पाहतो ,तरी ह्या खेळाची लोकप्रियता, व्यावसायिकतेवर मी परिणाम झालेला पहिला नाही आहे,
म्हणूनच असे वाटते भारतात खेळावर सट्टा अधिकृत करण्यात काहीच हरकत नाही आहे ,
तुम्हाला काय वाटते ,
याद्या
24828
प्रतिक्रिया
126
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनुभवकथन आवडले.
अनुभवकथन आवडले.
प्रारब्ध इ.
१०० % मान्य
वेश्याव्यवसाय हा स्त्री च्या मनाविरुद्ध आणि वेठीस धरून केलेला अस
In reply to १०० % मान्य by सुबोध खरे
ह्या अनुभवावर आधारीत लेख
In reply to वेश्याव्यवसाय हा स्त्री च्या मनाविरुद्ध आणि वेठीस धरून केलेला अस by मन१
वेश्याव्यवसाय अधिकृत नाही
In reply to ह्या अनुभवावर आधारीत लेख by निनाद मुक्काम …
नो नो नो !
In reply to वेश्याव्यवसाय अधिकृत नाही by मालोजीराव
तुलना
In reply to नो नो नो ! by परिकथेतील राजकुमार
ऑ ?
In reply to तुलना by प्रसाद गोडबोले
च्यामारी पण वेगास मध्ये
In reply to नो नो नो ! by परिकथेतील राजकुमार
घोर अज्ञान !
In reply to च्यामारी पण वेगास मध्ये by मालोजीराव
तेला स्थानिक जणता
In reply to घोर अज्ञान ! by धन्या
सहमत.
+१
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
याचं उत्तम उदाहरण आरटिओतुन
In reply to +१ by दादा कोंडके
+१
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
क्रिकेटवर सट्टा अधिकृत केला
खुले आम कबुल करताय की तुम्ही
तुम्ही हवाल्याने पैसे वैगरे
आपन बी बैल-गाडा शेर्यतीला
बैल गाडा? कुठे गाडतात बैलं?
In reply to आपन बी बैल-गाडा शेर्यतीला by मालोजीराव
बैल गाडा? कुठे गाडतात बैलं?
In reply to बैल गाडा? कुठे गाडतात बैलं? by स्पंदना
नक्की काय ?
In reply to बैल गाडा? कुठे गाडतात बैलं? by मालोजीराव
बरोअबर आहे निनाद तुमच म्हणनं.
प्रामाणिक
क्रिकेटचा आनंद निघून जाईल.
सहमत !
In reply to क्रिकेटचा आनंद निघून जाईल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जातीवाचक उल्लेख
In reply to सहमत ! by परिकथेतील राजकुमार
मिपावर असे जातीवाचक उल्लेख
In reply to जातीवाचक उल्लेख by प्रसाद गोडबोले
सीकेपी आहे ना तो?
In reply to सहमत ! by परिकथेतील राजकुमार
सचिन?? सारस्वत आहे...
In reply to सीकेपी आहे ना तो? by प्यारे१
हे हवाला व्यवहार काय प्रकरण
कॉलिंग क्लिंटन
In reply to हे हवाला व्यवहार काय प्रकरण by धन्या
अगदी असेच
In reply to हे हवाला व्यवहार काय प्रकरण by धन्या
>>> हे हवाला व्यवहार काय
In reply to अगदी असेच by स्मिता.
उत्तम प्रतिसाद..
In reply to >>> हे हवाला व्यवहार काय by श्रीगुरुजी
हे तोटे टाळण्याकरिता "हवाला"
In reply to >>> हे हवाला व्यवहार काय by श्रीगुरुजी
या माहितीकरिता धन्यवाद
In reply to हे तोटे टाळण्याकरिता "हवाला" by निनाद मुक्काम …
धन्यवाद
In reply to हे तोटे टाळण्याकरिता "हवाला" by निनाद मुक्काम …
स्मिता
In reply to धन्यवाद by स्मिता.
सुंदर
In reply to >>> हे हवाला व्यवहार काय by श्रीगुरुजी
>>> फक्त एक अवांतर शंका :
In reply to सुंदर by प्रसाद गोडबोले
>>> फक्त एक अवांतर शंका :
In reply to >>> फक्त एक अवांतर शंका : by श्रीगुरुजी
दुर्दैवाने आपण पुरोगामी नाही
नै बाबा निर्भळ क्रिडा रसिक आहेत...
In reply to दुर्दैवाने आपण पुरोगामी नाही by निनाद मुक्काम …
+१
In reply to दुर्दैवाने आपण पुरोगामी नाही by निनाद मुक्काम …
हरकत नसावी..
उपास राव
In reply to हरकत नसावी.. by उपास
येस्स..
In reply to उपास राव by निनाद मुक्काम …
मग अमर सिंग , प्रमोद महाजन,
मग अमर सिंग , प्रमोद महाजन,
In reply to मग अमर सिंग , प्रमोद महाजन, by पिंपातला उंदीर
हा प्रतिसाद आवडला
In reply to मग अमर सिंग , प्रमोद महाजन, by निनाद मुक्काम …
प्रमोद महाजन
In reply to हा प्रतिसाद आवडला by श्रीरंग_जोशी
स्पष्टीकरण
In reply to प्रमोद महाजन by तुषार काळभोर
सध्या अमरसिंहांची तब्बेत कशी
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
>>> सध्या अमरसिंहांची तब्बेत
In reply to सध्या अमरसिंहांची तब्बेत कशी by प्यारे१
श्रीरंग राव
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
जरा अवांतर आहे, पण...
काय कन्फ्युजन आहे राव
परदेशातून सोनं आणायला बंदी
??
In reply to परदेशातून सोनं आणायला बंदी by ३_१४ विक्षिप्त अदिती
क्रिकेट नि वेश्या व्यवसाय
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
http://www.misalpav.com
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
तुम्ही बावरी बाय चे पुस्तक
In reply to ?? by पुण्याचे वटवाघूळ
क्रिकेटमधले बेटिंग कायद्याने मान्य करावे
+१
In reply to क्रिकेटमधले बेटिंग कायद्याने मान्य करावे by क्लिंटन
हा हा...
In reply to क्रिकेटमधले बेटिंग कायद्याने मान्य करावे by क्लिंटन
त्यात हाइट म्हणजे, आपल्याकडे
In reply to हा हा... by दादा कोंडके
हम्म...
In reply to त्यात हाइट म्हणजे, आपल्याकडे by विश्वनाथ मेहेंदळे
सट्टा / जुगार व्याख्या
मान्य
सट्टेबाज़ी कायदेशीर......
सट्टेबाजी कायदेशीर करणे
कै च्या कै !
एखाद्या देशात, भागात एखादी
+१००
In reply to एखाद्या देशात, भागात एखादी by निनाद मुक्काम …
अमोल खरे.
In reply to +१०० by अमोल खरे
त्यावर लिखाण परत कधीतरी.
In reply to अमोल खरे. by निनाद मुक्काम …
कधी कधी भारतात दारु पिणे
अर्धी बाटलई सिल्लक होती.त्या
In reply to कधी कधी भारतात दारु पिणे by विलास अध्यापक
सार्वजनिक ठीकाणी दारु पिणे
In reply to कधी कधी भारतात दारु पिणे by विलास अध्यापक
बेटिंग अधिकृत न नसल्याचा
१००% सहमत.
वाईट
२ कोटीचे काय घेऊन बसलात!
In reply to वाईट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो... वेगवेगळ्या गोलंदाजासाठी वेगवेगळे रुपये.
In reply to २ कोटीचे काय घेऊन बसलात! by पैसा
क्रिकेट आणि सट्टा... ?
In reply to वाईट by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to क्रिकेट आणि सट्टा... ? by चौकटराजा
अनेक पुरावे आहेत.
In reply to क्रिकेट आणि सट्टा... ? by चौकटराजा