हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता.
एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले. मी आदेशाप्रमाणे तो अहवाल घेऊन आलो त्यात शुक्राणू नाहीत असा निर्वाळा होता. अर्थात याची पार्श्वभूमी मला माहित होती. ती अशी
वरील अधिकारी हा आपली नसबंदी ३ महिन्यांपूर्वी करून गेला होता. परंतु त्याची पत्नी गरोदर आहे असा तिचा मुत्र तपासणी अहवाल सांगत होता.नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात. आपले जाट भाई सैनिक अशी कोणतीही काळजी घेत नसत आणि बायका गरोदर झाल्या तर त्यांना मारहाण करून 'साफ सफाई" करण्यासाठी येत असत.पण हा सुशिक्षित अधिकारी होता आणि त्या अधिकार्याने अशी सर्व काळजी घेतली होती पण तरीही त्याची पत्नी गर्भार आहे हे पाहून तो तिला रुग्णालयात घेऊन आला होता.
आता हा अहवाल पाहून मुखर्जी सर( विभागप्रमुख) पण जरा चक्रावलेच. त्यांनी त्या स्त्रीला भेट देण्याच्या अगोदर स्त्रीरोग विभागातील आम्हा सर्व डॉक्टरना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले कि मी आता जे करणार आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तुम्ही ते करावे कि नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही पण मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे करीत आहे.त्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी कदाचित चुकीचे काम करणार आहे.पण मी हे पूर्ण सदभावमूलक मनोवृत्तीने (BONAFIDE INTENTION) करीत आहे तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही तुम्हाला पटेल तसे करा.
यानंतर आम्ही अधिकार्यांच्या कौटुंबिक वार्ड राउंड ला गेलो तेंव्हा त्या स्त्री च्या कक्षात जाऊन तिला असे सांगितले कि "बेटी तू जे काही करते आहेस ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तू ते करावेस कि नाही हे सांगण्याचा माझा अधिकार नाही पण वयाच्या अनुभवाने मला असे वाटते कि तू जे करीत आहेस ते बरोबर नाही. आता तुझ्या यजमानांचा अहवाल शुक्राणू नाहीत असे दाखवीत आहे त्यावर काय करायचे आहे. ती काहीच बोलली नाही.त्यांनी असे सुचवले कि आत्ता तर गर्भपात करणे आवश्यक आहे.तो आपण करू त्याबरोबर तुझे गर्भनलिका बंद करण्याची शस्त्रक्रिया पण करू आणि या स्थितीत तू म्हणत असशील तर मी तुझ्या यजमानांना काहीच सांगत नाही.तुझे कौटुंबिक जीवन सुरळीत होण्याचा मला हा एकच उपाय दिसतो आहे यावर तिने होकार दिला.
यावर तिच्या नवऱ्याला असे कधी कधी होते त्याला सांगितले कि नसबंदी ची शस्त्रक्रिया कधीकधी फेल जाते(नीट होत नाही)आणि म्हणून एकाच बेशुद्धीकरणात आपण गर्भपात आणि नलीकाबंदी ची शस्त्रक्रिया करून टाकू. हे सांगून तिचा गर्भपात आणि गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केली.
आजही हि गोष्ट मला वारंवार आठवते कारण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करताना एखादा रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात (stage) असलेला आढळतो. कर्करोगाच्या विभागात काम करीत असताना घेतलेल्या अनुभवातून माहित असते कि या रुग्णाचा रोग शस्त्रक्रियेच्या पलीकडे गेला आहे आणि याचे काही दिवस किंवा महिने शिल्लक आहेत. अशा रुग्णाला अहवाल सांगण्याची पाळी येते तेंव्हा मी अनेकदा असे सांगितले आहे कि तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही औषधाने उपाय होऊ शकतो.(हे करताना मी अनेकदा तोंड फिरवून डोळे पुसले आहेत)
शब्द हे फसवे असतात, हे बोलणे खोटे आहे हे मला पूर्ण माहित असते पण दुसरे काय करता येईल हे मला अजून तरी समजलेले नाही. रुग्णाला सत्य सांगितले कि आपले शेवटचे काही दिवस बाकी आहेत तर त्याला धक्का बसतो त्याचे शेवटचे दिवस कष्टात जातात.(अज्ञानात आनंद असतो).कर्करोगाच्या विभागात असे शेवटच्या टप्प्यातील अनेक रुग्णांनी मला विचारलेले आहे कि साहेब आम्ही या रुग्णालयातून घरी जाऊ शकू का? मी उत्साहात त्यांना नक्कीच म्हणून उत्तर हि दिले आहे.त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मला हात वर करून धन्यवाद दिले आहेत. पण पहिल्यांदा जेंव्हा हा प्रश्न आला तेंव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि आपण रोज या रुग्णालयात यतो पण आपण येथून कधीच जिवंत बाहेर पडणार नाही हा विचार किती भयानक आहे
माणूस म्हणून आपण किती तोकडे आहोत हि जाणीव वारंवार टोचत राहते.
माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. मी त्याला म्हटले कि मी सांगत नाही पण त्यांना ते समजून चुकेल.कालपर्यंत ते काही बोलत असताना तुम्ही पूर्ण लक्ष देत होतात असे नाही पण आज नंतर तू किंवा तुझी बहिण त्यांनी पाणी मागितले तर धावून धावून कराल.हे न कळण्या इतके ते मूढ नाहीत.
हि मानवी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किमत कळते जेंव्हा ती आपल्याकडे नसते किंवा ती नाहीशी/ गहाळ झाली.
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात (सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका )
याद्या
52977
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
प्रतिक्रिया
भावस्पर्शी लेखन.
अच्छा असं होय.. शीर्षक वाचून
+१
In reply to अच्छा असं होय.. शीर्षक वाचून by पिलीयन रायडर
+२
In reply to +१ by मन१
हम्म.... खरंय.
कटु सत्य बोलू नये हे मात्र
फारसं पटलं नाही.. डॉक्टरांनी
काही लपवू नये
In reply to फारसं पटलं नाही.. डॉक्टरांनी by ऋषिकेश
काही लपवू नये (पुढे )
In reply to काही लपवू नये by सुबोध खरे
अजूनही नाहि पटले
In reply to काही लपवू नये (पुढे ) by सुबोध खरे
बेकायदेशीर
In reply to अजूनही नाहि पटले by ऋषिकेश
बाकी प्रतिसाद त्याच पठडीतला
In reply to बेकायदेशीर by सुबोध खरे
सुबोधसाहेब, "सत्यं ब्रूयात"चा
आजचा भस्मासुर गाडला, पण तो उद्या उपटला तर?
In reply to सुबोधसाहेब, "सत्यं ब्रूयात"चा by आदूबाळ
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!
पेचप्रसंग
वेगळाच अनुभव. तारतम्य बाळगावे
किमान शब्द
In reply to वेगळाच अनुभव. तारतम्य बाळगावे by अप्पा जोगळेकर
या उलट...
वेगळे संदर्भ
In reply to या उलट... by विकास
पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली
In reply to वेगळे संदर्भ by पिवळा डांबिस
ज्याच्या जीवाचा हा प्रश्न आहे
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by कवितानागेश
मग तर तो डॉक्टर धुळीला मिळणार!!
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by कवितानागेश
आणि आपली हेल्थ ही इथे खाजगी
In reply to मग तर तो डॉक्टर धुळीला मिळणार!! by पिवळा डांबिस
+/-
In reply to आणि आपली हेल्थ ही इथे खाजगी by बंडा मामा
हम्म. वेळ पाहून निर्णय घ्यावे
नाहि पटलं
सामान्य माणसांच्या आयुष्यात
सुंदर प्रतिसाद.
In reply to सामान्य माणसांच्या आयुष्यात by निनाद मुक्काम …
लिहित राहाव.
मला वाटते की सांगावे की न
डॉक्टरांना नेमके किती समजलेले असते?
मला स्वानुभवावरुन असं वाटतं
कालपरवा पर्यंत डॉक्टरांना
In reply to मला स्वानुभवावरुन असं वाटतं by कवितानागेश
सेकंड ओपिनियन
In reply to कालपरवा पर्यंत डॉक्टरांना by निनाद मुक्काम …
+१
In reply to मला स्वानुभवावरुन असं वाटतं by कवितानागेश
पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली
खरे काका,
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by सुबोध खरे
+१
In reply to खरे काका, by पिलीयन रायडर
आपल्या व्यवसायाशी काडीमात्र
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by सुबोध खरे
दारू पुराण
In reply to आपल्या व्यवसायाशी काडीमात्र by निनाद मुक्काम …
१००% मान्य..
In reply to दारू पुराण by सुबोध खरे
१००% मान्य..
In reply to १००% मान्य.. by चिगो
उगाच दारूला पावित्र्य
In reply to दारू पुराण by सुबोध खरे
नक्की जजमेन्टल कोण?
In reply to पेशंटला जर पूर्ण कल्पना दिली by सुबोध खरे
तुमचे लेख आवडतात.
शब्दांचं संपादन झालं. ठीकच.
In reply to तुमचे लेख आवडतात. by शिल्पा ब
मतांचं संपादन जेव्हा होईल >>
In reply to शब्दांचं संपादन झालं. ठीकच. by प्यारे१
आवडलं..
उपास
शीर्षक..
पटले नाही
खरे काका , तुम्ही काही आडनावाला जागला नाहीत
In reply to पटले नाही by प्रसाद गोडबोले
सॉरी सॉरी
In reply to खरे काका , तुम्ही काही आडनावाला जागला नाहीत by सुबोध खरे
हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ
In reply to पटले नाही by प्रसाद गोडबोले
माऊताय, तुमचं म्हणणं बरोबर
In reply to हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ by कवितानागेश
ओके
In reply to हा प्रतिसाद आणि वरचा आदूबाळ by कवितानागेश
छोट्याश्या चुकीसाठी
In reply to ओके by प्रसाद गोडबोले
गिरीजा
In reply to छोट्याश्या चुकीसाठी by प्रसाद गोडबोले
"ब्रू " हा धातूच नको
हि बाजू आणि ती बाजू.
अख्ख्या धाग्यावर ज्या काही
कृपया सदस्यांनी कुठल्याही
माझा या विषयावर या धाग्यावरचा
In reply to कृपया सदस्यांनी कुठल्याही by संपादक मंडळ
माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले
.
In reply to माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले by निनाद मुक्काम …
दादा,
In reply to . by दादा कोंडके
आव्हान?
In reply to माझे ज्यांच्याशी आधी वाद झाले by निनाद मुक्काम …
त्या अधिकार्यापासून,
चान
चूक अथवा बरोबर
माफ करा पण भारंभार चाचण्या
In reply to चूक अथवा बरोबर by सुबोध खरे
असा धन्वंतरी...
In reply to चूक अथवा बरोबर by सुबोध खरे
अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा
In reply to चूक अथवा बरोबर by सुबोध खरे
व्यावसायिक मत का वैयक्तिक.
In reply to अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा by निनाद मुक्काम …
अगदी खरं आहे. विमा कंपन्या
In reply to व्यावसायिक मत का वैयक्तिक. by सुबोध खरे
माझी ऐकीव माहिती
In reply to अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा by निनाद मुक्काम …
विमा
In reply to अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय हा by निनाद मुक्काम …
भारंभार चाचण्याआणि पेशंटला लुबाडणे मान्य
भारंभार चाचण्याआणि पेशंटला लुबाडणे मान्य
चायला....गरोदर असणे हा रोग
होय
हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच
In reply to होय by सुबोध खरे
अनेक जाणकार ,माननीय
In reply to हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच by यशोधरा
प्रतिसाद
In reply to हा नक्की एका डॉ ने लिहिलेलाच by यशोधरा
आपणास नक्की काय खटकले ते कळले
In reply to प्रतिसाद by सुबोध खरे
विमे, हल्लीच ना हो तुम्ही
In reply to आपणास नक्की काय खटकले ते कळले by विश्वनाथ मेहेंदळे
काय यशोधरा ताई, मी फक्त
In reply to विमे, हल्लीच ना हो तुम्ही by यशोधरा
असे झाले काय! बरं बरं. मला
In reply to काय यशोधरा ताई, मी फक्त by विश्वनाथ मेहेंदळे
डॉ. तुमचा मुद्दा समजतो आहे,
In reply to प्रतिसाद by सुबोध खरे