Skip to main content

दहीहंडीचा आधुनिक अवतार

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 10/08/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज दहीहंडीच्या दिवशी मुंबईत हंडीचा आधुनिक अवतार पाहायला मिळाला. पारंपारिक हंडी ही रस्त्याच्या दोन बाजुंना परस्परासमोर उभ्या असलेल्या इमारती वा खांब यांच्यावर दोरखंडाने बांधुन उंच टांगलेली असते. मात्र यंदा प्रथमच मुंबईत बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या उंच क्रेनचा वापर मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हंडी टांगण्यासाठी केलेला पाहिला. क्रेनच्या टोकाला लटकलेली हंडी, वर सोनेरी छत्र व ध्वज, पताका यांची सजावट या कल्पकतेला मनोमन दाद द्यावीशी वाटली. मला फोटो टिपायला जमले नाही, पण माझ्या मागोमाग आलेल्या माझ्या साहेबांनी त्यांच्या ब्लॅकबेरीवर ही हंडी टिपली आणि मला धाडली. साहेब असावा तर असा :) handi
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2805
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

ह्यात एक मेख दिसतीये, शेवटचा गोविंदा जवळ आला की, क्रेन आणखी वर घ्यायची!

In reply to by टवाळ कार्टा

हंडी फोडणार्‍याला काही भरपुर पैसे, भेटवस्तु वगैरे मिळतं का ? लोकं अगदी जीवाची पर्वा करत नाहीत म्हणुन विचारलं. दुखापतीसाठी विमा वगैरे काढलेला असतो का?

चांग्लाय 'साहेब'. तरीच म्हटलं, इत्की घड्याळं कशी झेंड्यांवर... बाकी छान टांगलंय ते ;) असो!

आता क्रेन हंडी, मग टॉवर हंडी, पॅराशूट हंडी, हेलिकॉप्टर हंडी, सॅटेलाईट हंडी, ...... साहेबाची बीअम्ड्ब्लू बी लई भारी.

दहिहंडी..... धांगडधिंगा करायला भारताला अजून एक सार्वजनीक कार्यक्रम मिळाला.

समोर नाचायला राखी सावंत आणि नंतर हंडी फोडायलाही. संस्कृती संस्कृती काय म्हणतात ती हीच असावी बहुतेक..