मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात?

जोयबोय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ंमराठी वर्तमान पत्रात सर्रासपणे हिन्दी शब्दांचा वापर संपादक करतात. मला समजत नाही की मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात? जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ? मराठी भाषेच्या ह्रासाला मराठी प्रसारमध्यमे मोठ्याप्रमानात ़जबाब्दार आहे असे वाटते. मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे

वाचने 8051 वाचनखूण प्रतिक्रिया 61

प्रचेतस 07/06/2012 - 10:27
मराठी वर्तमान पत्रात सर्रासपणे हिन्दी शब्दांचा वापर संपादक करतात. मला समजत नाही की मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात? जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ? मराठी भाषेच्या ह्रासाला मराठी प्रसारमध्यमे मोठ्याप्रमानात ़जबाब्दार आहे असे वाटते. मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे

In reply to by प्रचेतस

पियुशा 07/06/2012 - 10:54
मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे ओक्के लक्ष घातल्या गेले आहे ,तुम्ही पण थोडे लक्ष देउन धागा कुठॅ टाकायचा ? ते आधी एकदा तपासुन घेत चला ;) जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ? मला वाटते मराठी अन हींदी भाषेत बरच साधर्म्य आहे . आजची लोक फार्फार शहाणी आहेत ते मराठी पेपरात हींदी काय ईंग्लिश पण वाचु शकतात ;)

In reply to by पियुशा

यकु 07/06/2012 - 11:18
मला वाटते मराठी अन हींदी भाषेत बरच साधर्म्य आहे . आजची लोक फार्फार शहाणी आहेत ते मराठी पेपरात हींदी काय ईंग्लिश पण वाचु शकतात
नमस्कार! _____/\____!!! म्हणजे साष्‍टांग प्रणिपातच!

In reply to by जोयबोय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 07/06/2012 - 10:36
>>>> मराठी टंकलेखनात अजून जम बसला नाही काही हरकत नाही. फक्त चर्चा प्रस्ताव अशा ओळी- दोन ओळीचा असू नये असे वाटते. चर्चा प्रस्तावात प्रास्ताविकासह काही मुद्दे चर्चेसाठी चर्चा करणार्‍यांना ठेवले पाहिजे, म्हणजे चर्चा बरी होते. -दिलीप बिरुटे

In reply to by जोयबोय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 07/06/2012 - 10:47
>>>> खासगी नोकरीत आहे सर्व मुद्दे मांडायला वेळ नसतो. हाहा . :) सरकारी नोकरीत असणार्‍यांना मुद्दे मांडायला भरपूर वेळ असतो असं म्हणायचं की काय ? वेळ मिळेल तेव्हा दोन दोन ओळी म्हटल्या तरी सायंकाळपर्यंत बर्‍याच ओळी होतील आणि चर्चेत बरेच मुद्दे येतील. जोयबोय, काही दिवसापासून या दोन दोन ओळींच्या चर्चाप्रस्तावांनी वात आणलाय हो. संपादक कंटाळून गेले आहेत म्हणे असे धागे अप्रकाशित करुन करुन. :) -दिलीप बिरुटे

In reply to by जोयबोय

प्रदीप 07/06/2012 - 10:58
तुमच्या भावना समजल्या व त्यांच्याशी सहमतही आहे. संवयीने टंकलेखन नीट जमेल तेव्हा सध्या शुद्धलेखनाच्या चुका जाऊ देत. पण * वर्तमान पत्रात * मिपा करांनी ह्या टंकलेखनाच्या चुका नव्हेत. हा तुमच्यावरील हिंदीचा परिणाम (किंवा, हिंदाळलेल्या मराठीतून सांगायचे झाले तर, 'हिंदीचा प्रभाव' ) आहे. हिंदाळलेल्या मराठीविषयी लिहीलेल्या लेखात हे खटकण्यासारखे आहे.

चिरोटा 07/06/2012 - 10:43
आणि हिंदी शब्द वापरत असतील तर वापरू द्या की. ईतर भाषेतले शब्द मराठीत वापरले तर मराठी अधिक समृद्ध होईल असे आम्हाला विद्वान लोकांनी सांगितले आहे.

In reply to by चिरोटा

जोयबोय 07/06/2012 - 10:56
प्रतिशब्द नसेल तर इतर भाषेतील शब्द चालतील, त्याने भाषा समृद्ध (हा शब्द कसा टाइप केला ते कळवा) होते. ना की शब्द असूनही इतर भाषेतील शब्दांच्या कुबड्या घेउन!

In reply to by जोयबोय

विश्वनाथ मेहेंदळे 07/06/2012 - 15:43
प्रतिशब्द नसेल तर इतर भाषेतील शब्द चालतील, त्याने भाषा समृद्ध (हा शब्द कसा टाइप केला ते कळवा) होते. ना की शब्द असूनही इतर भाषेतील शब्दांच्या कुबड्या घेउन !
अधोरेखित वाक्यरचना काळजाला खूप म्हणजे खूपच भिडली. अवांतर :- तुम्ही मटा मध्ये काम करता का ?

गवि 07/06/2012 - 10:58
बहोत खूब, बहोत खूब.. हा लेख लिहून तुम्ही मराठीप्रेमींची खूपच मदत केली आहे. स्कूल्समधे मराठीत शिक्षा कमी होत चालली आहे हाही यामागे एक महत्त्वाचा घटक आहेच. तरीही हिंदीची बैसाखी घेऊन चालणं म्हणजे मराठीशी गद्दारीच आहे. एखादा मराठी ज्येष्ठ सांसद /मराठी सियासती हस्ती, महाराष्ट्रातून निर्वाचित एखादा प्रधानमंत्री वगैरेंनी पार्लमेंटमधे सख्त कायदेकानून करुन कधीनाकधी मराठीच्या दुश्मनांचा जालिम इलाज करावा अशी ख्वाईश आहे.. दे विल पे फॉर धिस इन भगवान का दरबार. त्याच्या दरबारी देर आहे अंधेर नाही..

In reply to by गवि

बाळ सप्रे 07/06/2012 - 11:27
मिपाकरांसाठी नवीन सेवा सुरु करा तुम्ही. "२ ओळीत भावना/मुद्दा सांगा. नवीन धाग्यासाठी शब्दांकन करुन मिळेल." खूप चालेल. :-)

In reply to by गवि

प्यारे१ 07/06/2012 - 11:54
आमा गविमियाँ, हमें हिंदी बोले तो आप उर्दू जुबाँ बोलने लगे! लाहौलविलाकुवत... हिंदी और उर्दू में जमीं आसमाँ का नै तो भी जमीं और पाँचवे माले का तो कम्मसकम फाँसला है मियाँ| गौर फर्माईयो|

In reply to by jaypal

५० फक्त 07/06/2012 - 13:14
मग काय. वासोटा किल्याचा धागा पहा, अर्थ समजुन घेणं फार चिल्लर गोष्ट आहे, पण अगदी धागाकर्त्यानं न काढलेल्या फोटोवर सर्वसमावेशक निरागस सौजन्यपुर्ण चर्चा झालेल्या आहेत.

मनिम्याऊ 07/06/2012 - 11:11
मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव जुन्या काळापासुनच आहे... इथे इक हिन्दी भाषेतील उतारा देते आहे माझे मत स्पष्ट करायला.. संस्कृत श्लोकों में फ़ारसी का “राजव्यवहार” दुनिया के किसी भी क्षेत्र की भाषा समुचित विकास नहीं कर सकती अगर उसमें नए शब्दों को अपनाने की प्रवृत्ति न हो। यही नहीं, भाषा का इस्तेमाल करनेवाले समाज में इतना वाचिक खिलंदड़ापन भी ज़रूरी है कि वह भाषिक किलोल करते हुए उपसर्गों, प्रत्ययों के जरिए नए नए शब्दों का निर्माण भी करता चले। ये प्रक्रियाएँ ही भाषा को उस मुकाम पर पहुँचाती हैं जहाँ उसकी विविधताओं और विशिष्टताओं को समझने के लिए उसे कोश में संजोने की ज़रुरत पड़ती है। दुनिया की विभिन्न विकसित भाषाओं में कोशों की परम्परा रही है। मराठी संस्कृति के प्रति शिवाजी का अनुराग जबर्दस्त था। समाज संस्कृति के विकास पर उनका विशेष ध्यान रहता था। भारत की आधुनिक भाषाओं में शिवाजी द्वारा रचित राजव्यवहार कोश को सबसे प्राचीन कहा जा सकता है जिसमें मराठी, फारसी और संस्कृत—तीनों भाषाओं की सहायता ली गई थी। करीब सत्रहवी सदी यानी 1670 के आसपास शिवाजी ने अपने मंत्री रघुनाथ नारायण जिनकी उपाधि पंडितराव थी, से इसका निर्माण कराया था। शिवाजी के समय तक मराठी में अरबी-फारसी का प्रचुरता से घालमेल हो चुका था और इसने तत्कालीन नागरी मराठी को प्रभावित किया था। ग्रामीण मराठी पर इसका असर अभी बाकी था। शिवाजी के राजकाज की भाषा हालाँकि मराठी थी, मगर उस पर फारसी का पर्याप्त प्रभाव था। पंडितराव ने क़रीब दोहजार वर्ष पहले संस्कृत के प्रसिद्ध अमरकोश की तर्ज पर अनुष्टुप छंदो में 384 छंदों के माध्यम से मराठी में समाये डेढ़ हजार यवनी संस्कृति अर्थात मुस्लिम परिवेश से जुड़े शब्दों की व्याख्या इसमें की थी। इस कोश का सबसे पहले प्रकाशन 1860 में काशीनाथ गंगाधऱ नामके सज्जन ने कराया था। राजव्यवहार कोश के छंद का एक नमूना इस प्रकार है- खल्बता इति यत्तत्तु खल्वोपलमिति स्मृतम्। शिकार्खाना पक्षिशाला, शिकारी मृगयुर्मतः।। संभारलेखकः कारखानवीसः प्रकीर्तितः। हवालदारस्त्र मुद्राधिकारी परिभाषितः।। संस्कृत के साथ फारसी शब्दों का अनूठा घटाटोप आपने पहले नहीं पढ़ा होगा। शिवाजी के चरित्र के महान पहलुओं में एक यह विशिष्ट राजव्यवहार भी है। सन्दर्भ : http://hi.girgit.chitthajagat.in/shabdavali.blogspot.com/2011/02/blog-post_27.html

jaypal 07/06/2012 - 11:14
धागा नेहमीच मनोरंजनात्मकरीत्या ज्ञानवर्धन करणारा असुन, समाज प्रबोधनाच अमुल्य काम करणारा असतो. अश्या वैचारिक लोकांची मिपास खुप गरज आहे. टुकार, भंकस आणि भंपक धाग्यांनी माझा जिव इथे प्रचंड कावला होता. आपल्या धाग्यानी माझी वैचारीक खाज शमेल अशी मला तुमच्या पेक्षाही जास्त व रास्त खात्री आहे. आपली खाजगी नोकरी सांभाळुन ज्या आत्मियतेने आपण इथे धागे गुंडाळत आहात हे पाहता लवकरच प्रभु मास्तर स्वतःहुन तुमच नाव "मिपारत्न" पुरस्कारासाठी मोठ्या आनंदाने सुचवतिल. त्यास मिपाकर देखिल एकमुखाने अनुमोदन देतिल तो सुदिन दुर नाही. अवांतर = १००% मराठी आत्मसात करावयाची असल्यास न्हा. णि. बोळे यांचे धागे + ब्लॉग वाचुन चिंतन करावे. आपला हितचिंतक जयपाल.

In reply to by जोयबोय

अशी कच खाउ नका. मराठी माणसाला ते शोभत नाही. नाडीवाले बाबा, बोळे काका यांसारख्या थोरामोठ्यांकडुन प्रेरणा व दिक्षा घ्या. कार्य कठिण आहे म्हणुनच ते करण्यात मजा आहे. प्रतिसादांची / प्रतिसाद कर्त्यांची तमा न बाळगता ( मराठीत त्याला फाट्यावर मारणे म्हणतात) धागे प्रसवावेत.

In reply to by jaypal

गवि 07/06/2012 - 11:41
अगदी... पण जयपाल, तुम्हाला असं म्हणायचंय ना? : असे नाउम्मीद होऊ नका. मराठी माणसाला ते शोभा देत नाही. नाडीवाले बाबा, बोळे काका यांसारख्या बुजुर्गांकडून प्रेरणा व दिक्षा घ्या. कार्य मुश्किल आहे म्हणूनच त्याला अंजाम देण्यात मजा आहे. प्रतिसादांची / प्रतिसाद कर्त्यांची पर्वा न करता धागे पैदा करावेत.. नम्र दुरुस्ती केली आहे. (जोयबोय हलके घेत असावेत अशी इच्छा.. ) ;)

परिकथेतील राजकुमार 07/06/2012 - 11:37
मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात?
मराठी माणसाला मराठी संस्थळावरती इंग्रजी नावाच्या कुबड्या लागतात म्हणून.

In reply to by जोयबोय

मोदक 07/06/2012 - 11:54
हे चालेल का..? उगाच काळ्जीकर्ते. (पळतो आता.. बिपीन्दा मागे लागतील ;-)) माझे ऐका नका इतके टेन्शन घेवू... गटणे होण्यापेक्षा बबडू व्हा.. ते नाहीच जमले तर गजा खोत व्हा पण गटणे नको. हलके घ्या. :-)

जोयबोय 07/06/2012 - 12:42
आहोऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ , मुळ मुद्दा बाजूला राहीला आणि वेगळ्या विषयावर काय चर्चा करत आहे

गणपा 07/06/2012 - 13:35
ह्म्म्म My मराठी v/s हिंदी चर्चा का? चालुद्या मंडळी. नव्या पिढीत भलताच जोर असल्याने ही मंडळी चर्चा (वेस्टर्नवरुन डायरेक्ट हार्बरवर उडी मारत का होईना ) तडीस नेतील यात शंका नाही. ;) जुन्या इंजीनांच आधीच धडाडुन झाल्याने त्यांची खात्री देता येत नाही. :) जुने धागे इछुकांनी स्वतः गुगलुन काढावे. आयते मिळणार नाही. ;)

विजुभाऊ 07/06/2012 - 15:38
याला भाजप कारणीभूत आहे "गर्वसे कहो...." ही घोषणा देताना गर्वाचे घर खाली....... भीमाचे गर्वहरण इत्यादी आठवले

विनायक प्रभू 07/06/2012 - 16:46
शोध पुर्ण झाला. आरे कुणी तरी ह्या रत्नाला सं पादनाचे शिकवा रे.

बॅटमॅन 07/06/2012 - 17:30
मराठीला हिंदीच्या कुबड्या लागत नसून हिंदाळलेल्या मराठी लोकांना स्वतःची भाषा येत नसल्याने त्या कुबड्या वापराव्या लागतात.

In reply to by सूड

संजय क्षीरसागर 07/06/2012 - 18:24
ते गोदरेजमधे आहेत म्हणजे बहुतेक गुरुवारची सुट्टी दिसतेय. आज मोफत टाईमपास काय करायचा? तर टाका इथे पोस्ट आणि मारा दोन-चार पिंका असा सूज्ञ विचार त्यांनी केलाय. आता ते बहुदा पुढच्या गुरुवारी प्रकट होतील

In reply to by संजय क्षीरसागर

नाना चेंगट 07/06/2012 - 18:28
>>>>>आता ते बहुदा पुढच्या गुरुवारी प्रकट होतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

जोयबोय 08/06/2012 - 10:18
Laughing out loud Laughing out loudLaughing out loudLaughing out loudLaughing out loudLaughing out loud

स्मिता. 08/06/2012 - 14:28
Banging my head Banging my head Banging my head Banging my head Banging my head Banging my head (@जोयबोय की जॉयबॉय, हलकेच घेणे)