Skip to main content

४ डि

लेखक किचेन
Published on गुरुवार, 12/04/2012
बन्कोकमधल्या 'ड्रीम वर्ल्ड ' नावाच्या मनोरंजक पार्कमध्ये असलेल्या सिनेमागृहाबाहेर ४ डी अशी पाटी बघितली.पोस्टरवर एक तरुण हातात मोठ्ठी बंदूक घेऊन आणि शास्त्रान्यांचे कपडे घालून जेम्स बोन्डच्या स्टाइल्मध्ये उभा होता.पोस्टरवरून चित्रपट लहान मुलांचा आहे अस वाटत होत.आता हा चौथा डी कशासाठी हि उत्सुकता आम्हाला होती पण थेटरात जायची मला जाम भीती वाटत होती.कारण बन्कोक.इथे कशाच्या आवरणातमध्ये काय निघेल हे सांगता येत नाही.आदल्या दिवशी अपचन झाल्याने आम्ही भारतीय जेवण कुठे मिळतंय का हे बघायला बाहेर पडलो.रीसेप्शानिस्त्कडून एक पत्ता मिळाला होता.तिथे साधारण पुण्याच्या तुलाशिबागेसारख होत.म्हण्जे कानातले , गळ्यातले,मेक अपच सामान इ. अशा आपल्याकडे मिळणाऱ्या गोष्टी तिथेही विकायला ठेवले होते.तिथे थोडे पुढे गेल्यावर ते गळ्यातले,कानातले आणि मेक अपचे सामान प्रत्यक्षात कसे दिसते हे दाखवणाऱ्या मोडेल उभ्या होत्या.आम्ही तिथून पळ काढला.त्यामुळे इथेही मला थेटरमध्ये जायला भीती वाटत होती.हिम्मत करून आत गेलो.बाहेरच आम्हाला ३ डी वाले गॉगल दिले. एक तरुण, खट्याळ शास्त्रज्ञ त्याच्या सिनियारच्या अमूल्य अशा संसोधनाची कशी वाट लावतो आणि संकट ओढवून घेतो, मग त्या संकटांचा त्याचा सिनियर कसा सामना करतो असे कथानक असलेला हा १५ मिनिटांचा चित्रपट. सिनियर शास्त्रज्ञाने एक असा स्प्रे केलेला असतो जो बोन्सायच्या झाडावर मारला कि त्याला लगेच फळ येते.ते फळ मोठे करण्यासाठी दुसरा स्प्रे त्यावर मारायचा.त्याच प्रात्यक्षिक जुनियर शास्त्राण्याला दाखवून सिनियर शास्त्रज्ञ थोड्या वेळासाठी बाहेर जातो.तोपर्यंत तरुण शास्त्रांज्ञ त्या स्प्रेचा उपयोग करून सफरचंद तयार करतो, ते मोठ करण्याच्या नादात तो स्प्रे सांडतो आणि प्रयोगशाळेतील कोळी,उंदीर,माश्या इत्यादी वर पडतो.आता हे सगळे महाकाय रूप घेतात.तरुण शास्त्रज्ञाची पळता भुई थोडी होते.हातात जे काही मिळेल त्याने हा तरुण त्यांना दूर फेकतो तेव्हा ते आपल्या अंगावर येतात अस वाटून मीही किती तरी वेळा माझी पर्स, हातातला नकाशा त्याने फेकलेल्या कोळी ,उंदीर आणि माशांवर उगारला होता.शेवटी सिनियर शास्त्रन्या येतो. ह्या सगळ्या किड्यांवर लहान होण्याचा स्प्रे मारतो आणि सर्वकाही सुरळीत होत. हा मला सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट.अगदी संस्मरणीय.कथानक वाचून विश्वास बसत नसेल न.कि अजूनही मी तेवढीच निरागस आहे अस वाटतंय?तसं काही नाहीये. कारण आहे ४ डी.ह्या चित्रपटामध्ये वापरलेलं हे तंत्रज्ञान जबर आहे.आमच्या खुर्च्यांच्या समोर एक नळी आणि पायापाशी एक नळी होती.जेव्हा तरुण शात्रज्ञ स्प्रे त्या फळावर शिंपडतो तेव्हा पाण्याचे फवारे समोरच्या नळीतून आपल्या तोंडावर पडतात.जेव्हा उंदीर मोठे होऊन पाळायला लागतात तेव्हा ३डि मुले ते आपल्या पायापाशी येतात हे जाणवतच, पण आपले दोन्ही पाय वर करून त्यांना हकालावायचा प्रयत्न करतो.कारण ह्या ४ डी मध्ये त्या सीनला पायाच्या इथे असलेल्या नळीतून जोरात हवा बाहेर सोडली जाते आणि ती नळी आपल्या पायांपाशी वेडी वाकडी फिरायला लागते. आणि आपल्याला पायापाशी उंदीर आलेत असा भास होतो.तो तरुण जेव्हा त्याच्या अंगावर आलेल्या किड्याला घाबरून खाली पडतो तेव्हा आपल्याही पाठीला धडक बसतो कारण खुर्ची हळूच थोडी पाठीमागे सरकते आणि परत जागेवर येते.सगळ्यात महत्वाच टायमिंग.प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला, योग्य पार्श्वसंगीतावर वापरली जाते. जेव्हा सिनेमागृहातून बाहेर पडलो तेव्हा फक्त १५ मिनिटाचा चित्रपट होता ह्यावर विश्वास बसत नव्हता.चित्रपटच तिकीट काढताना १५ मिनिटांच्या मानाने जास्त वाटत होत.पण ते २०० पटीने वसूल झाल होत. त्यानंतर पुण्यात आल्यावर हन्तेद ३ डी बघायला गेलो होतो.३ डी इफेक्ट शोधूनही सापडले नाहीत.सिनेमागृहातले सगळेच मूर्ख त्या थ्रिलर सिनेमाला कॉमेडी समजून जोरजोरात हसत होते. http://www.youtube.com/watch?v=I7Y08k4T5KQ
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 5650
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

तुलाशिबाग??? पुण्यात राहून पुण्यातल्या तुळशीबागेचा असा अपमान?? छ्या छ्या छ्या!! आणि हे हन्तेद काय आहे??

पुण्यात सुद्धा विमान नगर येथील फिनिक्स मार्केट सिटी मध्ये असे थेटर सुरु होतंय लवकरच. ते तर ६डी आहे असे सुद्धा ऐकलय.

In reply to by कुंदन

मला सुद्धा कळले नव्हते ६ डी म्हणजे नेमके काय ते. मी जाहिरात पहिली होती एके ठिकाणी.. हा घ्या दुवा http://phoenixmarketcitypune.com/entertainment.html

अगदि मजा आली असेल नं ,सगळं कसं खस्स्स्स्स्कन, वस्स्स्सकन, भस्स्सकन, फस्स्सकन अंगावर येत असेल... :-)

लैच भारी हाय हा अनुभव ४डी शिनुमाचा...! :-) अवांतर- एक स्प्रे पाहिजे,किबोर्ड मोठ्ठा करायला- (हे झाले साधे ;-) ) आणी दुसरा वाचकाला लिवलेले सुद्द दिसायला- (हे थ्रि-डी ;-) ) अरे,बाप रे...! हे मला मारायला कोण आले,छडी घेऊन?किच्चुतै..? पळा पळा पळा... ( हे कदाचित ४डी असावे... ;-) )

पुण्यातल्याच काही जुन्या 'जाणत्या' करणा-या थिएटरात हा आणि असे बरेच ४ डि - ५ डि अनुभव फार पुर्वीपासुन येतात असे ऐकुन आहे.

'उप्स, आय श्रंक द ऑडीयन्स' असे काहीसे नाव असलेला एक धमालपट डिस्ने लॅन्ड मध्ये पाहिल्याची आठवण ताजी झाली. ह्यात सिनेमातील सर्व पात्रे अचानक मोठी होउन आपण (पक्षी: प्रेक्षक) एकदम लहान झाल्याचा भास आणि ४D च्या करामतींने मस्त करमणूक होते ह्यात. उदा. कुत्रा शिंकल्यावर अचानक पाण्याचे थेंब आपल्या अंगावर येतात वगैरे. असो, >> त्यानंतर पुण्यात आल्यावर हन्तेद ३ डी बघायला गेलो होतो.३ डी इफेक्ट शोधूनही सापडले नाहीत.सिनेमागृहातले सगळेच मूर्ख त्या थ्रिलर सिनेमाला कॉमेडी समजून जोरजोरात हसत होते. >> ह्याचा अर्थ मला समजावून सांगणार्‍याला एक कॉकटेल माझ्याकडून ;) - (४D ची मजा अनुभवलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

@ सोत्री त्यानंतर पुण्यात आल्यावर हन्तेद ३ डी बघायला गेलो होतो.३ डी इफेक्ट शोधूनही सापडले नाहीत.सिनेमागृहातले सगळेच मूर्ख त्या थ्रिलर सिनेमाला कॉमेडी समजून जोरजोरात हसत होते. ओ सोत्री किचेन तै विक्रम भटच्या Haunted 3D या कॉमेडीपटाबद्द्ल बोलत आहेत ;) ( कुठलं कॉकटेल देणार म्हणे आता? ) ;)

ह्या त्यात काय इशेष.. बदलापुरातल्या वैशालीत पंधरा रुपयात खर्या खुर्या उंदीर घुशी पायाखालून पळवतात शिवाय.. दारूच्या उरलेल्या बाटल्या पायाने उडवल्यावर त्यातल्या उरलेल्या दारूने पाय वेग्रे ओले होतातच बाकी आपले शुद्ध लेखन पाहून मन प्रसन्न झाले धन्यवाद

In reply to by मोदक

@यावेळी तुझे डोळे पाणावले नाहीत हे पाहून माझे डोळे पाणावले..! >>> काय क्याच घेतलाय भेंडी

In reply to by मोदक

ठाकुर्लीचा पाणीप्रश्न सुटला तसा आता चिंचवडचा(नसलेला) पाणीप्रश्न सुटणार तर.

In reply to by स्पा

>>बदलापुरातल्या वैशालीत पंधरा रुपयात खर्या खुर्या उंदीर घुशी पायाखालून पळवतात हे आले लगेच नावं ठेवायला. पटत नाही तर बघू नये बदलापूरात पिक्चर !! कोणी थर्माकोलची पालखी धाडत नाही तुम्हाला या आणि आमच्या बदलापूरात पिक्चर बघा म्हणून. काय तो टिचभरशा ठाकुर्लीचा तोरा.

In reply to by सूड

बदलापुर हे भविष्यातलं पुणं होउ पाहात आहे असं वाटतंय, २०५२ साली बदलापुर कुरियर्स नावाचा संघ असेल आयपिएल मध्ये

In reply to by स्पा

@ मन्या फेणे - हे भारी. अवांतरः पेशव्यांनी बांधून काढलेल्या कूपनलिका बदलापूर पर्यंत होत्या म्हणायच्या. (ह.घे. हे. वे. सां. न. ल.) च्यायला चुकीच्या जागी आला प्रतिसाद

बन्कोकला जौन आला का तुम्ही ? चान चान. आता कसे आहेत बन्कोकवासीय ?

अनुभव छान लिहिला आहे पण वरळीच्या अ‍ॅट्रिया मॉलमधे हे असं थिएटर अनेक वर्षांपासून आहे. किमान पाच वर्षांपूर्वीपासून मी तिथे जात आलो आहे. मुलुंडच्या हायपराईटमधेही त्यांचा लोगो पाहिला. तिथेही बहुधा आहे निघालेलं पूर्वीच. तस्मात भारतात हे नवीन नाही इतकाच लिमिटेड पॉईंट मांडू इच्छितो.

शास्त्रान्यांचे, शास्त्राण्याला , शास्त्रांज्ञ , शास्त्रन्या, शास्त्रज्ञ हा शब्द संस्कृतात चालवून त्याची सर्व रुपे दाखवल्याबद्दल धन्यवाद.