४ डि
लेखनप्रकार (Writing Type)
बन्कोकमधल्या 'ड्रीम वर्ल्ड ' नावाच्या मनोरंजक पार्कमध्ये असलेल्या सिनेमागृहाबाहेर ४ डी अशी पाटी बघितली.पोस्टरवर एक तरुण हातात मोठ्ठी बंदूक घेऊन आणि शास्त्रान्यांचे कपडे घालून जेम्स बोन्डच्या स्टाइल्मध्ये उभा होता.पोस्टरवरून चित्रपट लहान मुलांचा आहे अस वाटत होत.आता हा चौथा डी कशासाठी हि उत्सुकता आम्हाला होती पण थेटरात जायची मला जाम भीती वाटत होती.कारण बन्कोक.इथे कशाच्या आवरणातमध्ये काय निघेल हे सांगता येत नाही.आदल्या दिवशी अपचन झाल्याने आम्ही भारतीय जेवण कुठे मिळतंय का हे बघायला बाहेर पडलो.रीसेप्शानिस्त्कडून एक पत्ता मिळाला होता.तिथे साधारण पुण्याच्या तुलाशिबागेसारख होत.म्हण्जे कानातले , गळ्यातले,मेक अपच सामान इ. अशा आपल्याकडे मिळणाऱ्या गोष्टी तिथेही विकायला ठेवले होते.तिथे थोडे पुढे गेल्यावर ते गळ्यातले,कानातले आणि मेक अपचे सामान प्रत्यक्षात कसे दिसते हे दाखवणाऱ्या मोडेल उभ्या होत्या.आम्ही तिथून पळ काढला.त्यामुळे इथेही मला थेटरमध्ये जायला भीती वाटत होती.हिम्मत करून आत गेलो.बाहेरच आम्हाला ३ डी वाले गॉगल दिले.
एक तरुण, खट्याळ शास्त्रज्ञ त्याच्या सिनियारच्या अमूल्य अशा संसोधनाची कशी वाट लावतो आणि संकट ओढवून घेतो, मग त्या संकटांचा त्याचा सिनियर कसा सामना करतो असे कथानक असलेला हा १५ मिनिटांचा चित्रपट.
सिनियर शास्त्रज्ञाने एक असा स्प्रे केलेला असतो जो बोन्सायच्या झाडावर मारला कि त्याला लगेच फळ येते.ते फळ मोठे करण्यासाठी दुसरा स्प्रे त्यावर मारायचा.त्याच प्रात्यक्षिक जुनियर शास्त्राण्याला दाखवून सिनियर शास्त्रज्ञ थोड्या वेळासाठी बाहेर जातो.तोपर्यंत तरुण शास्त्रांज्ञ त्या स्प्रेचा उपयोग करून सफरचंद तयार करतो, ते मोठ करण्याच्या नादात तो स्प्रे सांडतो आणि प्रयोगशाळेतील कोळी,उंदीर,माश्या इत्यादी वर पडतो.आता हे सगळे महाकाय रूप घेतात.तरुण शास्त्रज्ञाची पळता भुई थोडी होते.हातात जे काही मिळेल त्याने हा तरुण त्यांना दूर फेकतो तेव्हा ते आपल्या अंगावर येतात अस वाटून मीही किती तरी वेळा माझी पर्स, हातातला नकाशा त्याने फेकलेल्या कोळी ,उंदीर आणि माशांवर उगारला होता.शेवटी सिनियर शास्त्रन्या येतो. ह्या सगळ्या किड्यांवर लहान होण्याचा स्प्रे मारतो आणि सर्वकाही सुरळीत होत.
हा मला सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट.अगदी संस्मरणीय.कथानक वाचून विश्वास बसत नसेल न.कि अजूनही मी तेवढीच निरागस आहे अस वाटतंय?तसं काही नाहीये.
कारण आहे ४ डी.ह्या चित्रपटामध्ये वापरलेलं हे तंत्रज्ञान जबर आहे.आमच्या खुर्च्यांच्या समोर एक नळी आणि पायापाशी एक नळी होती.जेव्हा तरुण शात्रज्ञ स्प्रे त्या फळावर शिंपडतो तेव्हा पाण्याचे फवारे समोरच्या नळीतून आपल्या तोंडावर पडतात.जेव्हा उंदीर मोठे होऊन पाळायला लागतात तेव्हा ३डि मुले ते आपल्या पायापाशी येतात हे जाणवतच, पण आपले दोन्ही पाय वर करून त्यांना हकालावायचा प्रयत्न करतो.कारण ह्या ४ डी मध्ये त्या सीनला पायाच्या इथे असलेल्या नळीतून जोरात हवा बाहेर सोडली जाते आणि ती नळी आपल्या पायांपाशी वेडी वाकडी फिरायला लागते. आणि आपल्याला पायापाशी उंदीर आलेत असा भास होतो.तो तरुण जेव्हा त्याच्या अंगावर आलेल्या किड्याला घाबरून खाली पडतो तेव्हा आपल्याही पाठीला धडक बसतो कारण खुर्ची हळूच थोडी पाठीमागे सरकते आणि परत जागेवर येते.सगळ्यात महत्वाच टायमिंग.प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला, योग्य पार्श्वसंगीतावर वापरली जाते.
जेव्हा सिनेमागृहातून बाहेर पडलो तेव्हा फक्त १५ मिनिटाचा चित्रपट होता ह्यावर विश्वास बसत नव्हता.चित्रपटच तिकीट काढताना १५ मिनिटांच्या मानाने जास्त वाटत होत.पण ते २०० पटीने वसूल झाल होत.
त्यानंतर पुण्यात आल्यावर हन्तेद ३ डी बघायला गेलो होतो.३ डी इफेक्ट शोधूनही सापडले नाहीत.सिनेमागृहातले सगळेच मूर्ख त्या थ्रिलर सिनेमाला कॉमेडी समजून जोरजोरात हसत होते.
http://www.youtube.com/watch?v=I7Y08k4T5KQ
प्रतिक्रिया
तुलाशिबाग??? पुण्यात राहून
लै भारी. हैद्राबादेत एक ४डी
अश्याच अनुभवा बद्दल परवा
पुण्यात सुद्धा विमान नगर
६डी आहे असे सुद्धा
मला सुद्धा कळले नव्हते ६ डी
अगदि मजा आली असेल नं ,सगळं
लैच भारी हाय हा अनुभव ४डी
चुचुतैची आठवण आली.
पुण्यातल्याच काही जुन्या
आवरा.
'उप्स, आय श्रंक द ऑडीयन्स'
@ सोत्री त्यानंतर पुण्यात
आल्या वर्गशिक्षिका
ह्या त्यात काय इशेष.
यावेळी तुझे डोळे पाणावले नाहीत हे पाहून माझे डोळे पाणावले..!
@यावेळी तुझे डोळे पाणावले
ठाकुर्लीचा पाणीप्रश्न सुटला
>>बदलापुरातल्या वैशालीत पंधरा
बदलापुर हे भविष्यातलं पुणं
=)) मिरच्या झोम्बिंग चोरा रे
बरोबर, तुमच्याकडे तोरा
हा हा हा
अभ्यास वाढवा, तुमचा
अरे हो की
वा वा
अनुभव छान लिहिला आहे पण
शास्त्रान्यांचे,