Skip to main content

सन २१९८ सालच्या दैनिकातिल एक लेख.

लेखक मानव
Published on मंगळवार, 10/04/2012
तर २१व्या शतकातिल काही मंडळींचा प्रमुख उद्योग लोकांच्या मुड्या मुरगळुन पैसा कमावणे होता.पैसा म्हणजे कागदावर छापलेली चित्रे. ही चित्रे जमवण्यासाठे हे आई वडिलांचा ही खुन करत.खुन म्हणजे काय तर एखादा माणसाची हालचाल कायमची बंद पाडणे.ही चित्रे जमविण्याचा शोक ९०च्या म्हाताऱ्यापासुन ते लहान मुलांपर्यंत सर्वांना होता. बर ही चित्रे जमवुन हे काय करित असे तुम्हाला वाटेल.तर आयुष्यभर कुत्र्यासारखे पळुन चित्रे जमवायची आणि बॅनर लावत बसायचे.बॅनर म्हणजे काय तर ज्यावर तमाम गुंड मंडळींचे फ़ोटो एकत्र करुन स्वतःच्याच पैशाने ठिकठिकाणच्या सार्वजनिक स्थळांवर लावायचे एक प्रकारचे फ़लक .यातुन आपण किती प्रसिद्ध आहोत हे लोकांना सांगण्याची धडपड. जे लोक प्रसिद्ध आहेत त्यांना असे करण्याची गरजच काय हा प्रश्न उभा राहतो पण त्यावेळच्या लोकांच्या मुर्खपणाचा कळस येथेच थांबत नाही. या लोकांना नगरसेवक,आमदार,खासदार होण्याच्या वेडाने पछाडलेले होते.काळ्या कारवायातुन जमवलेले पैसे घेऊन आरामात जगण्यापेक्षा यांना लोकांची तुंबलेली गटारे साफ़ करण्यात जास्त रस होता. नगरसेवक,आमदार,खासदार म्हणजे काय तर एक प्रकारचे लोकांचे सेवक.जे स्वतःला राजे समजत पण काम तुंबलेली गटारे साफ़ करण्याचे करत.आणि यातिल बहुतांश लोक आधिच असलेल्या पैशामधे आणखी भर घालण्याचा प्रयत्न करत.बर हे पैसे घेऊन ते सुखाने जगत म्हणावे तर तसेही नसे.हे पैसे खर्च करण्याएवढाही वेळ ते शिल्लक ठेवत नसत.मग ह्या पैशांचा विनियोग त्यांचे पुत्र,जामात,आणि नातेवाईक करत.म्हणजे कमाये कोइ और खाये कोइ . देवाने फ़ुकट दिलेल्या पाऊस,फ़ुले,फ़ळे यासांरख्या गोष्टिंकडे यांचे वर्षातुन एकदा लक्ष जात असे.यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्यावर.बर तिथेही गेल्यावर हे सभ्य पणे वागत. सभ्य म्हणजे काय तर जी जी गोष्ट कराविशी वाटेल ती न करणे म्हणजे सभ्य.असे बरेच सभ्य लोक कोणी पहात नाही असे बघुन बरीच असभ्य कामे करत.आणि लहान मुलांवर हे करु नको,ते करु नको म्हणुन ओरडायला मोकळे होत.मग यांची लहान मुले मोठी झाल्यावर आणि हे म्हातारे झाल्यावर याचे उट्टे काढत. मोठी माणसे मुलांना शाळा नामक तुरुंगात पाठवत आणि पुढे मुले मोठ्या माणसांना वृद्धाश्रम नामक तुरुंगात पाठवत.असा ह पाठशिवनिचा खेळ बरेच वर्ष चालु राहि. तर त्या काळातिल लोक मराठी भाषा म्हणुन ईंग्रजाळलेले मराठी बोलत,आता तुम्ही म्हणाल मराठी म्हणजे काय तर मरायला टेकलेली भाषा म्हणजे मराठी. या भाषेचे नेते स्वतःच्या मुलांना कॉंवेण्टमधे घालुन मराठी बोलायचा आग्रह धरत,आणि दुसरे नेते ६ महिने परदेशात काढुन इकडे मराठीचा वाघ म्हणवुन घेत. या भाषेतील लेखक म्हणजे के विनोदी प्रकार होता हे लोक दुनियाभरातिल ईंग्रजी पुस्तके वाचुन त्यात मराठी माणसांची नावे घालुन स्वतःच्या नावावर पुस्तके खपवत आणि स्वतःला साहित्यिक म्हणवुन घेत,या सहित्यिक लोकांना बद्धकोष्टाचा त्रास असे.यांना वाते शुद्ध मराठी फ़क्त सदाशिव पेठेतच जन्माला येवुन लयास पावते.वैदर्भिय मंडळिंचा या लोकांवर भयंकर राग.ते साहित्यातही आरक्षणाची मागणी करत. वैदर्भिय म्हणजे काय तर अती उष्णतेचा प्रदेश.हे लोक कायम गरम असत कदाचित हवामानाचा परिणाम असावा पण वडापाव पासुन ते विदर्भापर्यंत सर्व गोष्टी यांना स्वतंत्र हव्या असत.त्यांचाही बरोबरच होत म्हणा कारण पुणे आणि मुंबईच्या लोकांना जग म्हणजे फ़क्त पुणे आणि मंबईच वाटे. पुणेकर नावाचा एक अतिशय गंमतीशिर प्रकार होता.या लोकांना दिड शहाणे म्हणत हे लोक काम काहीच करत नसत पण वेगवेगळ्या गोष्टींवर मते मांडण्यात हे लोक पटाइत होते.मग अगदी वालाची भाजी कशी करावी येथ पासुन ते अमेरेकिचे आर्थिक धोरण कसे असावे येथपर्यंत तोंडाला फ़ेस येईपर्यंत बोलत.एकमेकांना विशेषण लावुन हे आपल्याच लोकांचा प्रचार सर्वत्र करत.म्हणजे असे की मी तुझा प्रचार करतो,तु माझा कर.यांचा हा कावा बरीच शतकं चालु होता.इतर महाराष्ट्रातिल लोकांना हा कावा कधीच लक्षात आला नाही.उर्वरित महाराष्ट्रातिल मंडळी यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम करत. आता मुंबईकर म्हणजे काय तर दिवसभर विविध प्रदेशातिल लोकांबरोबर हिंदी,ईंग्रजी,मराठी,तेलुगु,झुलु,सिंहली भाषेत बोलुन घरी येऊन मराठी अस्मितेवर बोलणारी मंडळी.हे लोक गणपती,दसरा मेळावा आणि दहीहंडी या सनांला गटागटाने बाहेर पडत आणि आम्ही अजुन संपलो नसल्याचे जाहिर करत.या लोकांना कायम मुंबई आपल्या हातातुन जाते काय या भितीने पछाडलेले असे.या भितीचा फ़ायदा घेऊन बऱ्याच लोकांनी आपापल्या घरांवर मजले चढवले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6244
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

लाह्या, फुटाणे आणि तडमताशे जमवा रे!!! लै भारी खेळ सुरु होणारे ;-) हे लेखात दिसलं नाही म्हणून माझी भर. 'कोसला' ची आठवण झाली. डॉनरॉव कुठेत.. आणि काही लोक तर जगात कुठेही असले तरी अंतर्जालावर येऊन गटागटाने बसत. मग ते चर्चा करीत. चर्चा करीत म्हणजे नेमके काय करीत असे म्हणाल तर, चर्चा म्हणजे एखाद्या गोष्‍टीबद्दल आपल्याला काय वाटते ते सांगणे आणि मग दुसर्‍यांनी ते वाटणे कसे चूक आहे हे सांगणे. त्यांना वाटे असे सतत केल्याने मराठीच्या उद्धाराला हातभार लागेल. काही लोक अंतर्जालावर लेख लिहित. लेख म्हणजे काय तर आपल्याला वाट्टेल त्या गोष्‍टीबद्दल शब्दासमोर शब्द ठेऊन लिहिणे! मग हे लेख वाचून लोकांचे समाधान होई किंवा त्यांना वाईट वाटे. या लोकांना कधी समाधान वाटे, तर कधी वाईट वाटे तर कधी हे सुन्न होत तर कधी रडत तर कधी उलट्या करीत. एकूणच या लोकांचे काही बरे चालले नसावे. आता याला काय आधार असे म्हणाल तर सध्‍या त्यावर संशोधन सुरु असून निष्कर्ष काढण्यात येत आहेत.

In reply to by यकु

हे लेखात दिसलं नाही म्हणून माझी भर. 'कोसला' ची आठवण झाली.
+१, हेच म्हणतो. अशाच प्रकारचे संवाद कोसलामध्ये पांडोबा आणि (बहुतेक) सुर्शा हे दोघेजण बोलत असतात. आता तुम्ही म्हणाल की कोसला म्हणजे काय ? तर त्याचे उत्तर असे की भालचंद्र नेमाडे नावाच्या सद्गृहस्थाने ७०-८० च्य दशकात कधीतरी ही कादंबरी लिहली. 'कोसलावर कोसलाइतकेच लिहता येईल' असे खुद्द भाईकाका ह्या पुस्तकाचे कौतुक करताना सांगुन गेले. आता तुम्ही म्हणाल की हे भाईकाका कोण ? तर भाईकाका म्हणजे आत्तापर्यंतचे बहुतेक सर्वाधिक लोकप्रिय असे मराठीतले लेखक. खुद्द मिसळपाव.कॉम हे त्यांच्या आशिर्वादाने सुरु झाले अशी ह्या संस्थळाचे संस्थापक तात्यासाहेब ह्यांची श्रद्धा आहे. हां, तर आपण बोलत होतो नेमाड्यांबद्दल. ह्याच नेमाड्यांनी पुढे 'हिंदु-जगण्याची एक समृद्ध अडगळ' नावाचा भलामोठ्ठा ग्रंथ लिहुन अनेकांची झोप हराम केली. आता त्यांनी हा ग्रंथ का लिहला ह्याबद्दल संशोधन चालु आहे पण तो ग्रंथ एकंदरीत महान आहे असे मानतात व चर्चा संपवतात. आता ह्या वाक्यानंतर मी माझा प्रतिसाद आवरता घेतो कारण सध्या माझा अंमळ लेखनसंन्यास चालु आहे. आता तुम्ही विचारतात की लेखनसंन्यास म्हणजे काय व तो कसा घेतात. तर त्यावर 'संशोधन चालु आहे' असे उत्तर देता येईल. लेखनसंन्यासाची चेष्टाची केली जाते परंतु ती का केली जाते हे कळायला मार्ग नाही, संशोधन चालु आहे असे उत्तर देता येईल. - डॉन्या सांगवीकर

>>>>यांना वाते शुद्ध मराठी फ़क्त सदाशिव पेठेतच जन्माला येवुन लयास पावते. एवढं एक वाक्य तरी शुद्ध लिहायचं होत कि ओ.. बाकी चूका सवडीने काढतो असेही म्हणू शकत नाही, रात्र जाईल सगळी.

In reply to by गणामास्तर

"बाकी चूका सवडीने " मुलांनो याला म्हणतात लोका सांगे... :) ह. घ्या ( किंवा घेऊ नका इथे कोणाला फरक पडतोय)

तर मुलांनो २००० सालातल्या ज्या काही अजब कल्पना आपल्याला उत्खननाद्वारे हाताशी लागल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे "देश"आणि "देशभक्ती".देश म्हणजे काय तर पृथ्वीच्या नकाशावर कल्पनेने आखलेली रेषा,आणि अलिकडचा भाग माझा आणि पलिकडचा भाग तुझा अशी परस्पर केलेली जमिनीची वाटनी.मग अशी वाटनी केल्यावर दोन्ही बाजुच्या लोकांनी एकमेकांन दुश्मन समजुन दिसेल तिथे एकमेकांना झोडपायचे असा होता. मुलांनो,यासाठी ते शस्त्रात्र वापरत ज्याची परिणीती आज आपण फ़टेहाल,आणि भुकेकंगाल आहोत कारन जमिनीत काही उगवतच नाही.शेजारच्या देशांनी एकमेकांशी सौहार्दपुर्ण संबंध ठेवले तर ते महाभयंकर पाप असे.ज्याचा हिशोब कयामतच्या दिवशी द्यावा लागेल अशी समजुत होती.या दुश्मनीसाठी ते कोट्यावधी रुपये खर्चत आणि दर दोन चार वर्षांनी चार निष्पर्ण डोंगरांसाठी अब्जावधी कागदी रुपये आणि हजारो माणसांचा मृत्यु घडवत. आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर आपला देश कसा प्रगतीपथावर आणि शक्तीशाली आहे हे दाखवण्यासाठी. बरे यांचा मुर्खपणा येथेच संपत नसे,यांची देशभक्ती फ़क्त लाकडाने गोळा मारायच्या स्पर्धेवेळी जागृत होत असे.इतर वेळी हे आपापल्या परीने देश नामक जमिनीला लुटत असत.

२१९८ सालचे ते दैनिक ही नक्कीच पुण्याचेच असणार आणि लिहणाराहि शक्यतो पुण्याचाच असेल्, मस्तच असेच आणखी लिहीत रहा. बाकी धोतराची प्रतिक्रिया ...जबरा.....

लै मजेशीर! >>यांची देशभक्ती फ़क्त लाकडाने गोळा मारायच्या स्पर्धेवेळी जागृत होत असे असली वाक्यं फार आवडली.

आता तुम्ही म्हणाल प्राध्यापक म्हणजे काय? तर मगापासुन मी बडबड करतोय आणि तुम्ही एकमेकांची पाठ खाजवत आहात आणि तिकडे दुर्लक्ष करुन मी नेटाने माझे ज्ञानसंवर्धनाचे जे कार्य चालवले आहे,अशी कार्य करणारी मंडळी म्हणजे प्राध्यापक.इतरवेळी ही मंडळी एकमेकांचे पाय खेचण्यात मश्गुल असत.

उदाहरणार्थ सगळे लोक मानव असत. सगळे लोक, लोक असतानाच मानव पण असत हे कसे? तर हे असेच आहे. हे लोक आणि मानव असताना प्राध्‍यापक सुद्धा असत, आता हें कसें? तर हेही असेच वरीलप्रमाणे ;-) तर हे मानव उदाहरणार्थ विद्वेषपूर्ण भाषण करीत आणि उदाहरणार्थ लेख पण तसेच लिहित. मग त्यानंतर एकमेकांची डोकी फोडीत.

उदाहरणार्थ त्याकाळी मालिका नामक एक प्रकार असे.... आता मालिका म्हणजे काय, तर एखाद्या कुटुंबातील काही दुष्ट वगैरे स्त्रिया एखाद्या साध्या सरळ सुंदर पतिव्रता वगैरे तरूणीचा नाना प्रकारे छळ करीत, त्याची गोष्ट. या तरूण स्त्रीचा नवरा दुसर्‍या बायांच्या नादी लागलेला असे.... आता 'पतिव्रता' म्हणजे काय, तर यावर संशोधन चालू आहे. .... ही गोष्ट 'टीव्ही' नामक यंत्रावर उदाहरणार्थ वर्षानुवर्षे रोज दाखवत. दुष्ट स्त्रिया नेमक्या कोणत्या, हे कळावे म्हणून त्यांना नागीण वा तत्सम वेड्यावाकड्या आकारचे कुंकू लावीत, तसेच वारंवार प्रत्येकाचा चेहरा तीन ते पाच वेळा 'झुम्म्म्म्म... असा ध्वनी करत दाखवीत. ..... आता यातील 'कुटुंब' म्हणजे काय, तर स्त्री व पुरुष 'लग्न' म्हणून काहीतरी करीत, त्यानंतर ते दोघे एका घरात रहात व त्यांना उदाहरणार्थ मुले वगैरे होत, तीही उदाहरणार्थ त्याच घरात रहात, एवढेच नव्हे, तर त्या पुरुषाचे आई-वडीलही उदाहरणार्थ हुबेहुब त्याच घरात रहात, हे सर्व मिळून जे होई, त्यास 'कुटुंब' असे म्हणत. 'लग्न' म्हणजे काय, तर यावर संशोधन चालू आहे. त्याकाळी 'क्रिकेट' नावाचा आणखी एक प्रकार लोक या 'टीव्ही' यंत्रावर बघत. आता 'क्रिकेट' म्हणजे काय, तर दहा बारा तरूण पुरुष एकीकडे तर उदाहरणार्थ दुसरे दहा बारा तरूण पुरुष दुसरीकडे असे असत, यास 'टीम' असे म्हणत. एका टीम मधील दोघे दोन फळ्या हातात धरून समोरासमोर उभे रहात. विरुद्ध टीम मधील एकजण वेगात पळत येऊन त्या फळीवर चेंडू नामक एक गोल पदार्थ नेमका टाकण्याचा प्रयत्न करी. त्याचा हा प्रयत्न चुकु नये म्हणून फळीवाला ती फळी इकडे तिकडे हुबेहुब फिरवून चेंडु नेमका फळीवर आपटेल, असे करी. फळी व चेंडूच्या गतिमुळे तो चेंडू लांब फेकला जाई. तो नेमका झेलण्याचा प्रयत्न करीत, पण तो हुकल्यास चेंडू हुडकून आणण्यात बराच वेळ जाई, सबब दोन्ही फळीवाले टाईमपास म्हणून फळ्या हातात धरून इकडून तिकडे धावत, त्या 'धावा' मोजल्या जात.... फळीवाले जास्त थकू नयेत, म्हणून अमूक इतका लांब चेंडू गेला, तर चार अथवा सहा वेळा धावणे झाले, असे मानत. फळीवाल्यामागे एक तिकाटणे असे, त्यावर चेंडू आदळला, तर त्या फळीवाल्यास विश्रांती मिळे. शंभर वेळा धावाधाव झाल्यास त्यास शतक असे म्हणत. ....अशी शतके करणार्‍या तरुणांस आम्ही अमुक कंपनीचे साबण, दाढीचे ब्लेड, वा चड्डी वगैरे वापरतो, म्हणून अशी शतके काढू शकतो, असे सांगण्याचे ठेके मिळत, त्यात त्यांना महामूर पैसा मिळे.... हा 'क्रिकेट' प्रकार स्त्रिया का करत नसत, यावर संशोधन चालू आहे, हे क्रिकेट व मालिका यातील एक साम्य असे, की क्रिकेट मधील तरूणांप्रमाणेच मालिकेतील स्त्रियांना देखिल आम्ही अमूक साबण, शांपू, तेल वा चोळी वगैरे उदाहरणार्थ वापरतो, असे सांगण्याचे ठेके मिळत (व त्याबद्दल महामूर पैका मिळे), म्हणून स्त्रिया चेंडू -फळीचे दगदगीच्या फंदात पडत नसाव्यात, असा कयास आहे. त्याकाळी काही लोक 'उपोषण' म्हणून एक प्रकार करीत. उपोषण म्हणजे काय, तर भरपूर जेवण- खाण झाल्यावर काही काळ स्वस्थपणे बसून रहाणे, आणि ते आपण अमूक एका मागणीसाठी करत आहोत, असा जोरात प्रचार करणे. हे उपोषण हजारो लोकांचे समक्ष करण्यार्‍यास 'हजारे' असे म्हणत. उदाहणार्थ अप्पा हजारे, अण्णा हजारे, तात्या हजारे, वगैरे. लाखो लोकांसमोर उपोषण करणार्‍यास 'लाखे' म्हणत किंवा कसे, यावर संशोधन चालू आहे.....

In reply to by चित्रगुप्त

त्याकाळी पूर्वीची चातुर्वर्णाधिष्टित जातिव्यवस्था लोप पावून नवीन द्विवर्णीय जातिव्यवस्था रूढ झालेली होती. 'सेलेब्रिटी' नामक जाति उच्च, तर 'प्रेक्षक' नामक जाति कनिष्ठ मानली जात असे. या कनिष्ठ जातीतून उच्च जातीत प्रवेश मिळावा, म्हणून लोक नाना खटपटी लटपटी करीत. जे पालक स्वतः असे करण्यास असमर्थ ठरत, ते आपल्या मुलांची तरी 'सेलेब्रिटी' जातीत वर्णी लागावी, याचा ध्यास घेत. ....या 'सेलेब्रिटी' जातीत उदाहरणार्थ गवय्ये, बजवय्ये, नाच्ये, नकलच्ये, चित्रकार, लेखक, क्रिकेटमधील शतकवीर, उपोषण्ये, सिनेमातील नट, नायक-नायकिणी, मालिकांमधील लोक, राजकारणी, मोठ्मोठे चोर, डाकू, व्यापारी, वगैरे असत, शिवाय शिकाऊ गवय्ये, नाच्ये यांचे परिक्षक म्हणून स्वतःस नेमून घेणारे महागुरु, मान्यवर, वगैरेही असत. त्याकाळी 'पेज थ्री' नावाचा काहीएक प्रकार असे, त्यात आपली वर्णी लागावी म्हणून हे 'सेलेब्रिटी' जातीतील लोक महामूर पैका खर्च करीत.... शिवाय या सेलेब्रिटी जातीपैकी त्यातल्या त्यात श्रेष्ठ कोण, हे ठरविण्यासाठी शर्यती घेत, आणि ज्याला जास्तित जास्त 'एसेमेस' मिळतील, तो श्रेष्ठ, असे ठरवीत. हे एसेमेस कनिष्ठ वर्णीय पाठवीत. आता हे एसेमेस म्हणजे काय, याचे उदाहरणार्थ संशोधन चालू आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्ता, आज तुझ्या कल्पनेला महापूर आल्याचे वाचून वरील बाबत काही संशोधन 2198मधे चालू आहे किंवा काय यावर प्रकाश टाकावा.

In reply to by शशिकांत ओक

तुमची शंका बरोबर आहे. मी देखील वाचताना, लोकांच्या मुड्या मुरगळुन या वाक्यात, मुड्या च्या ऐवजी नाड्या असं वाचलं!

२१९८ मध्ये दैनिक असेल हा 'मानवी' शोध लावल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा! ;-)

पुणेकर नावाचा एक अतिशय गंमतीशिर प्रकार होता.या लोकांना दिड शहाणे म्हणत
उदाहरणार्थ ज ब ह री. इथेही पुण्याचे साडेतीन शहाणे आहेत. :D :D :D

पुणेकर नावाचा एक अतिशय गंमतीशिर प्रकार होता.या लोकांना दिड शहाणे म्हणत हे लोक काम काहीच करत नसत पण वेगवेगळ्या गोष्टींवर मते मांडण्यात हे लोक पटाइत होते. मस्तच. आपणही पुणेकर आहात काय?

वादग्रस्त विधाने करून ट्यार्पी खेचण्याचा क्षीण प्रयत्न. त्यापेक्षा काही सकस लेखन करुन गर्दी जमवली असती तर आवडले असते. अर्थात गर्दी संगीत सभेला देखील होते आणि डोंबार्‍याच्या खेळाला देखील. आपण कोण व्हायचे ते आपण ठरवायचे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वादग्रस्त विधाने करून ट्यार्पी खेचण्याचा क्षीण प्रयत्न. त्यापेक्षा काही सकस लेखन करुन गर्दी जमवली असती तर आवडले असते.
सहमत. सदर प्रतिसादाबाबतही असेच म्हणतो, वर गर्दी जमवल्याची काही उदाहरणे आहेत.
अर्थात गर्दी संगीत सभेला देखील होते आणि डोंबार्‍याच्या खेळाला देखील. आपण कोण व्हायचे ते आपण ठरवायचे.
खरे आहे, १००% सहमत. परंतु संगीतसभेच्या गर्दीत आपण कधी दिसला नाहीत हे आग्रहाने नमुद करतो ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

परंतु संगीतसभेच्या गर्दीत आपण कधी दिसला नाहीत हे आग्रहाने नमुद करतो
माफ करा, पण तुमची अभिजात संगीताची व्याख्या आमच्याशी जुळायलाच हवी असे नाही. आम्ही सुंदरा उस्मानाबादकर, लिला औरंगाबादकर, सुगंधा सातारकर ह्यांच्या कलाकारीला आणि अदाकारीला देखील संगीत मानतो. तुम्ही उगाच अभिजाततेचा आव आणून कुठले कुठले महोत्सव 'अटेंड' करत असता तेंव्हा आम्ही नगर रोड, आर्यन थेटर, चौफुला अशा ठिकाणी संगीतात स्वतःला बेधुंद भिजवून घेत असतो.

उदाहरणार्थ त्या काळात लेखक म्हणुन एक भयंकर जमात होती.ही बिरुदावली दुसऱ्याला मिळु नये म्हणुन हे लेखकु सतत कार्यरत असत आणि फ़ावल्या वेळात लिहित असत.लिहणे म्हणजे काय तर कागदावर रेघोट्या मारणे आणि लेखकु वगैरे जमात मारेल त्या रेघोट्याच बरोबर आणि इतरांच्या चुक असे हे स्वतःच ठरवत.यातील बरेच लेखकु सदाशीवपेठ नामक मांसाहारी ठीकाणी रहात.आणि इतर ठीकाणी फ़क्त लोक रहातात असा यांचा समज असे.यातील बहुतांश लोक रिकामेच असत म्हणुन यांच्या बसण्याची सोय व्हावी म्हणुन यांनी "साप" नावाची जागा बांधुन ठेवली असे कळते.या साप मधे हे लेखकु इतरांना डसत असत. तर सदर लेखकु हे दिवसभर इतरांची टिंगलटवाळी करण्यात वेळ घालवत असत आणि बोलताना मात्र मी लीखाणात कसा व्यस्त आहे हे सांगत.पण बरेचसे लोक हे लेखकु गेले की घरात उदाहरणार्थ गोमुत्र शिंपडुन घेत.

In reply to by मानव

म्हणजे तुम्ही २१९८ पर्यंत जीवंत राहून लोकांना छळणार आहात म्हणा की. पण तोवर तुमचे हे लिखाण वाचून वाचून किती लोकं (खरेतर पशु-पक्षी देखील) तग धरतील हा एक प्रश्नच आहे. बहूदा तुम्ही आणि सप्त चिरंजीव येवढेच उरलेले असाल.

अभिरुची बघूनच खेळ चालू आहे ;)

In reply to by कपिलमुनी

प्रणाम मुनीवर __/\__ या बसा. काय घेणार ? बाहेर फार ऊन आहे (हे मिलिंद इंगळे ह्यांच्या टोन मधे) दोन कटिंग बिअर मागवू काय ?

"माफी ?? , पुणेकरांच्या धोतराला हात घातलाय राव तुम्ही , आता भोगा आपल्या कर्माची फळे " ++१... खरच कठीण आहे राव आता, बळंच हात घातला पुणेकर आणि सदाशिव पेठेला... आता पोळणारच..

छे हो! पुणे (कर) आता पूर्वीसारखे राहिले नाही(त). आजकाल कुणीही काही बोलावे आणि पुणेकरांनी ते मुकाट ऐकून घ्यावे हे पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली :( इंदुरकर (यक्कू)