तर २१व्या शतकातिल काही मंडळींचा प्रमुख उद्योग लोकांच्या मुड्या मुरगळुन पैसा कमावणे होता.पैसा म्हणजे कागदावर छापलेली चित्रे. ही चित्रे जमवण्यासाठे हे आई वडिलांचा ही खुन करत.खुन म्हणजे काय तर एखादा माणसाची हालचाल कायमची बंद पाडणे.ही चित्रे जमविण्याचा शोक ९०च्या म्हाताऱ्यापासुन ते लहान मुलांपर्यंत सर्वांना होता.
बर ही चित्रे जमवुन हे काय करित असे तुम्हाला वाटेल.तर आयुष्यभर कुत्र्यासारखे पळुन चित्रे जमवायची आणि बॅनर लावत बसायचे.बॅनर म्हणजे काय तर ज्यावर तमाम गुंड मंडळींचे फ़ोटो एकत्र करुन स्वतःच्याच पैशाने ठिकठिकाणच्या सार्वजनिक स्थळांवर लावायचे एक प्रकारचे फ़लक .यातुन आपण किती प्रसिद्ध आहोत हे लोकांना सांगण्याची धडपड.
जे लोक प्रसिद्ध आहेत त्यांना असे करण्याची गरजच काय हा प्रश्न उभा राहतो पण त्यावेळच्या लोकांच्या मुर्खपणाचा कळस येथेच थांबत नाही.
या लोकांना नगरसेवक,आमदार,खासदार होण्याच्या वेडाने पछाडलेले होते.काळ्या कारवायातुन जमवलेले पैसे घेऊन आरामात जगण्यापेक्षा यांना लोकांची तुंबलेली गटारे साफ़ करण्यात जास्त रस होता.
नगरसेवक,आमदार,खासदार म्हणजे काय तर एक प्रकारचे लोकांचे सेवक.जे स्वतःला राजे समजत पण काम तुंबलेली गटारे साफ़ करण्याचे करत.आणि यातिल बहुतांश लोक आधिच असलेल्या पैशामधे आणखी भर घालण्याचा प्रयत्न करत.बर हे पैसे घेऊन ते सुखाने जगत म्हणावे तर तसेही नसे.हे पैसे खर्च करण्याएवढाही वेळ ते शिल्लक ठेवत नसत.मग ह्या पैशांचा विनियोग त्यांचे पुत्र,जामात,आणि नातेवाईक करत.म्हणजे कमाये कोइ और खाये कोइ .
देवाने फ़ुकट दिलेल्या पाऊस,फ़ुले,फ़ळे यासांरख्या गोष्टिंकडे यांचे वर्षातुन एकदा लक्ष जात असे.यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्यावर.बर तिथेही गेल्यावर हे सभ्य पणे वागत.
सभ्य म्हणजे काय तर जी जी गोष्ट कराविशी वाटेल ती न करणे म्हणजे सभ्य.असे बरेच सभ्य लोक कोणी पहात नाही असे बघुन बरीच असभ्य कामे करत.आणि लहान मुलांवर हे करु नको,ते करु नको म्हणुन ओरडायला मोकळे होत.मग यांची लहान मुले मोठी झाल्यावर आणि हे म्हातारे झाल्यावर याचे उट्टे काढत.
मोठी माणसे मुलांना शाळा नामक तुरुंगात पाठवत आणि पुढे मुले मोठ्या माणसांना वृद्धाश्रम नामक तुरुंगात पाठवत.असा ह पाठशिवनिचा खेळ बरेच वर्ष चालु राहि.
तर त्या काळातिल लोक मराठी भाषा म्हणुन ईंग्रजाळलेले मराठी बोलत,आता तुम्ही म्हणाल मराठी म्हणजे काय तर मरायला टेकलेली भाषा म्हणजे मराठी.
या भाषेचे नेते स्वतःच्या मुलांना कॉंवेण्टमधे घालुन मराठी बोलायचा आग्रह धरत,आणि दुसरे नेते ६ महिने परदेशात काढुन इकडे मराठीचा वाघ म्हणवुन घेत.
या भाषेतील लेखक म्हणजे के विनोदी प्रकार होता हे लोक दुनियाभरातिल ईंग्रजी पुस्तके वाचुन त्यात मराठी माणसांची नावे घालुन स्वतःच्या नावावर पुस्तके खपवत आणि स्वतःला साहित्यिक म्हणवुन घेत,या सहित्यिक लोकांना बद्धकोष्टाचा त्रास असे.यांना वाते शुद्ध मराठी फ़क्त सदाशिव पेठेतच जन्माला येवुन लयास पावते.वैदर्भिय मंडळिंचा या लोकांवर भयंकर राग.ते साहित्यातही आरक्षणाची मागणी करत.
वैदर्भिय म्हणजे काय तर अती उष्णतेचा प्रदेश.हे लोक कायम गरम असत कदाचित हवामानाचा परिणाम असावा पण वडापाव पासुन ते विदर्भापर्यंत सर्व गोष्टी यांना स्वतंत्र हव्या असत.त्यांचाही बरोबरच होत म्हणा कारण पुणे आणि मुंबईच्या लोकांना जग म्हणजे फ़क्त पुणे आणि मंबईच वाटे.
पुणेकर नावाचा एक अतिशय गंमतीशिर प्रकार होता.या लोकांना दिड शहाणे म्हणत हे लोक काम काहीच करत नसत पण वेगवेगळ्या गोष्टींवर मते मांडण्यात हे लोक पटाइत होते.मग अगदी वालाची भाजी कशी करावी येथ पासुन ते अमेरेकिचे आर्थिक धोरण कसे असावे येथपर्यंत तोंडाला फ़ेस येईपर्यंत बोलत.एकमेकांना विशेषण लावुन हे आपल्याच लोकांचा प्रचार सर्वत्र करत.म्हणजे असे की मी तुझा प्रचार करतो,तु माझा कर.यांचा हा कावा बरीच शतकं चालु होता.इतर महाराष्ट्रातिल लोकांना हा कावा कधीच लक्षात आला नाही.उर्वरित महाराष्ट्रातिल मंडळी यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम करत.
आता मुंबईकर म्हणजे काय तर दिवसभर विविध प्रदेशातिल लोकांबरोबर हिंदी,ईंग्रजी,मराठी,तेलुगु,झुलु,सिंहली भाषेत बोलुन घरी येऊन मराठी अस्मितेवर बोलणारी मंडळी.हे लोक गणपती,दसरा मेळावा आणि दहीहंडी या सनांला गटागटाने बाहेर पडत आणि आम्ही अजुन संपलो नसल्याचे जाहिर करत.या लोकांना कायम मुंबई आपल्या हातातुन जाते काय या भितीने पछाडलेले असे.या भितीचा फ़ायदा घेऊन बऱ्याच लोकांनी आपापल्या घरांवर मजले चढवले.
याद्या
6244
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाह्या, फुटाणे आणि तडमताशे
होय की ...
In reply to लाह्या, फुटाणे आणि तडमताशे by यकु
ऊदाहर्णार्थ !
In reply to होय की ... by छोटा डॉन
लेखनसंन्यास
In reply to होय की ... by छोटा डॉन
मि तसा इकडचा जुना सदस्य आहे
माफी ?? , पुणेकरांच्या
In reply to मि तसा इकडचा जुना सदस्य आहे by मानव
हाहाहा!
>>>>यांना वाते शुद्ध मराठी
"बाकी चूका सवडीने "लोका
In reply to >>>>यांना वाते शुद्ध मराठी by गणामास्तर
तर मुलांनो २००० सालातल्या
२१९८ सालचे ते दैनिक ही नक्कीच
हाहाहा!
आता तुम्ही म्हणाल प्राध्यापक
अग्ग्ग्गं शालजोडीतुन म्हणतात
In reply to आता तुम्ही म्हणाल प्राध्यापक by मानव
उदाहरणार्थ सगळे लोक मानव असत.
@ ஜஜ۩۩ यक्कू क्रूरसिंह ۩۩ஜஜ
ही ही ही मजा आली वाचून
लेखन सगळेच आवडले.पण सभ्यतेची
मराठी राहिल का तो पर्यन्त
तर मुलांनो मराठी राहिल का तो
उदाहरणार्थ त्याकाळी मालिका नामक एक प्रकार असे....
अबाबाबाब!!!! खपलोय
In reply to उदाहरणार्थ त्याकाळी मालिका नामक एक प्रकार असे.... by चित्रगुप्त
उदाहरणार्थ जबरी
In reply to उदाहरणार्थ त्याकाळी मालिका नामक एक प्रकार असे.... by चित्रगुप्त
प्रतिसाद उदाहरणार्थ अतिशय
In reply to उदाहरणार्थ त्याकाळी मालिका नामक एक प्रकार असे.... by चित्रगुप्त
त्याकाळी उदाहरणार्थ नवीन जातिव्यवस्था रूढ झालेली होती
In reply to उदाहरणार्थ त्याकाळी मालिका नामक एक प्रकार असे.... by चित्रगुप्त
चड्डीची
In reply to उदाहरणार्थ त्याकाळी मालिका नामक एक प्रकार असे.... by चित्रगुप्त
ओकसाहेब
In reply to चड्डीची by शशिकांत ओक
त्याकाळी मानव किती कृर होते
दैनिक!
दैनिक आयपॅड १९८ असेलहो
In reply to दैनिक! by Nile
उदाहरणार्थ विनोदी वगैरे
पुणेकर नावाचा एक अतिशय
उदाहरणार्थ प्रतिसाद जबरी
पुणेकर नावाचा एक अतिशय
यान्व्व्व्व्व्व्व्व
सहमत ...
In reply to यान्व्व्व्व्व्व्व्व by परिकथेतील राजकुमार
सहमती बद्दल धन्यवाद.
In reply to सहमत ... by छोटा डॉन
उदाहरणार्थ त्या काळात लेखक
बाप रे !
In reply to उदाहरणार्थ त्या काळात लेखक by मानव
गर्दीची
आले आले...
In reply to गर्दीची by कपिलमुनी
बळंच हात घातला धोतराला....
छे हो! पुणे (कर) आता