मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(( आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला)) जा मना तू दिल्या गावी तू सुखी रहा

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जा दिल्या घरी तू सुखी रहाच्या चालीवर..... मुळा मुठा या डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. वटवट ही तुझी आठवता बाळा तरूणपण आले खाता चिकन मसाला आठवले पराठे सारे, गहिवरले आत्मेऽऽऽ कढ कढीचे तुला सांगती जा... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... दारात उभी राहिली तुझी बुलेट दुचाकी ती. बघ डोळे मित्रांचेऽऽऽ तुझ्याच जाण्यावरती.. पुस रे डोळे या फडक्याने लपव ही गाडी गाडी येथे तू मला ठेऊनी जाऽऽऽऽऽ..... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... साहेब तू रे आयटी हमालांचा मानाचा हसतील ती पंजाबी, बंगाली जाटेऽऽऽऽऽ. बघू नकोस मागे मागे वेड्या बघ पुढे ऽ नकोस विसरू परी खादाडीला जा...ऽऽऽऽ. मुळा मुठा डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा...ऽऽऽऽऽ. जयंत कुलकर्णी....

वाचने 9584 वाचनखूण प्रतिक्रिया 44

मोदक Fri, 04/06/2012 - 10:23
:-D सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखीव... बूच मारू नये. याचा अर्थ काय हे खवत विचारावे. :-)

इरसाल Fri, 04/06/2012 - 10:26
छान लिहिलेय काका. मोदका दरवेळेस बाटली अशी उघडी का बरे ठेवुन जातोस ?

In reply to by पैसा

मी-सौरभ Fri, 04/06/2012 - 13:41
पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! पैसा काकू झिंदाबाद!! आता तुम्ही खूष का? ;)

जयंत कुलकर्णी Fri, 04/06/2012 - 14:06
घोळ मिटेपर्यंत हा प्रेतिसाद स्थगित ठेवलेला आहे. घोळ : बुलेटचे मालक आणि दिल्लीला चाललेले हे एकच नाहीत असे काहींचे म्हणणे आहे..........

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रचेतस Fri, 04/06/2012 - 15:00
हो. बुलेटचे मालक मनराव आहेत आणि दिल्लीवाले मन१ आहेत. फुकट विकेट उडाली विचार्‍या मनोबाची. :)

In reply to by मनराव

५० फक्त Fri, 04/06/2012 - 15:44
मग आता कविचे शब्द सत्य ठरवण्यासाठी तुला दिल्ली जावं लागेल किंवा मन१ ला बुलेट घ्यावी लागेल, बघा काय ते ठरवा तुम्हि. बाकी, काका कविता मस्तच, लढाया, युद्धनीत्या, प्रेतं वगैरे मधुन बाहेर पडल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by ५० फक्त

जयंत कुलकर्णी Fri, 04/06/2012 - 15:59
मन १ लवकरच बुलेट घेतील हा आमचा त्यांना खास आशिर्वाद ! तसेच या घोळामुळे हे विडंबन सपशेल आपटले आहे असे जाहीर करतो...........अरेरे ! गोंधळात गोंधळ झाला की राव ! असो दोघांचीही आता क्षमा मागावी लागणार, नाहीतर एकावरच भागले असते.............

In reply to by जयंत कुलकर्णी

मोदक Fri, 04/06/2012 - 20:28
>>>तसेच या घोळामुळे हे विडंबन सपशेल आपटले आहे असे जाहीर करतो.. फक्त इतक्या क्षुल्लक कारणाने विडंबन आपटले असे समजू नका हो... मनोबा.. काढ रे अजून एक धागा.. आणखी थोडा चान्स दे बघू.. ;-)

In reply to by जयंत कुलकर्णी

मी-सौरभ Sat, 04/07/2012 - 00:50
'मन१' ३/४ पँट घालून बुलेट वर कॅडबी खात दिल्लीला निघालाय अन मागे बसून चौरा काका फुग्यात हवा भरतायत असे चित्र डोळ्यासमोर येऊन अंमळ मौज वाटली ;)

In reply to by जयंत कुलकर्णी

सूड Sat, 04/07/2012 - 05:56
बुलेट नाही मग हे थोडं मोडिफाय केलेलं जमतंय का बघा बरं !! दारात तुझी थांबली दुचाकी गाडी बघ मित्र थांबले सगळे सारुनिया काडी मिट तोंड रे या सदर्‍याने काढू देत खोडी भीक नको रे तयां घालू तू जाऽऽऽ जा मनोबा दिल्लीमधी तू सुखी रहा...

मन१ Sun, 04/08/2012 - 12:05
पण काकांचा शब्द खाली पडता उपयोगी नाही. शक्य तितक्या लवकर वरील धाग्यात उल्लेख केलेली बुलेट आमच्याकडे पोचती करा म्हणाव मनराव ह्यांना. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अन्या दातार Sun, 04/08/2012 - 22:59
हेल्मेट का नाही? आरसी बुक दाखवा. पीयुसी दाखवा. लायसन्स आहे का? बाकी सगळं असलं तरी हेल्मेट नाही म्हणून २००/- दंड भराच. पावती फाडू की..... (पुढे बोलायची गरज आहे? सूज्ञ आहात तुम्ही)