अण्णांच्या आंदोलनात सरकारची फजीती!
परिस्थिती अंगाशी आल्यावर माणूस काय नाहीं करत? पण ती तशी अंगावर येईपर्यंत कांहींच न करणारा माणसाला काय म्हणावे? कदाचित् अशा व्यक्तींसाठीच "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी![१]" ही म्हण रूढ झाली असावी! एप्रिलच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केंद्र सरकारने ’रेटारेटी’त घालविलेले दिवस आणि १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्टच्या दरम्यान चांदण्यात बसून (घाईघाईने) वळलेल्या वाती हे या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे!
पण अशी "वाती वाटणारी" व्यक्ती जर देशाच्या कप्तानपदावर असेल तर त्या देशाचे काय होईल?
ही बाब मनात यायचे कारण म्हणजे अलीकडेच अण्णांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले व लोकांचे प्रचंड समर्थन लाभलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन. आधी अनेक आवाहने करूनही अनेक वर्षें बाशिंग बांधून सजलेला लोकपाल कांहीं केल्या "घोड्यावर" बसेना हे लक्षात आल्यावर अण्णांनी महात्माजींनी अनुसरलेला उपोषणाचा मार्ग अवलंबिला आणि "बिनदाताच्या" सरकारी लोकपालाऐवजी "जनलोकपाल" हे पर्यायी विधेयक म्हणून सरकारकडे अभ्यासासाठी दिले. तिकडे फारसे लक्ष दिले जात नाहीं व वाटाघाटीसाठी उत्साह नाहीं हे कळल्यावर त्यांच्या कर्तबगार चमूच्या सहाय्याने अण्णांनी आपले पहिले उपोषण दिल्लीच्या "जंतर-मंतर" येथे सुरू केले. त्याला समाजाच्या सर्व थरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सुटी असो वा आठवड्यातला कामाचा दिवस असो, जनतेचा असा लोटलेला महासागर मीडियानेही क्वचितच पाहिला असेल. त्यामुळे प्रभावित होऊन तेही अण्णांच्या समर्थनार्थ रणांगणात उतरले. ते पाहून सरकारच्या लक्षात आले कीं या "शत्रू"बाबत(?) आपण जरा गाफीलच राहिलो व शत्रूच्या मानाने आपली तयारीही कमी पडली! मग महायुद्धाच्या अंतिम विजयासाठी छोट्या-मोठ्या चकमकीत यशस्वी माघार घेणार्या कुशल सेनानीच्या अभिनिवेषात सरकारने अण्णांच्या चमूबरोबर वाटाघाटी करून प्रश्न सोडवायचे आश्वासन दिले व अण्णांनी उपोषण स्थगित केले.
अण्णांच्या मुद्द्यांवर त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणी करून त्यातले ग्राह्य वाटणारे मुद्दे विधेयकात सामील करून घेण्याचा विचार केला जाईल असे आश्वासन सरकारने दिले होते व त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जनतेने वाटही पाहिली.
अण्णांनी एप्रिलमधील उपोषण सोडल्यावर सरकारने नेमलेली समिती आणि अण्णांची समिती यांच्यात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी कांहीं बैठकी झाल्याही, पण माझ्यासारख्यांना तो एक उंदीरा-मांजराचा खेळच वाटला. या दरम्यान भूषण पिता-पुत्रांवर थोडी चिखलफेक करण्याचा प्रयत्नही झाला, पण कां कुणास ठाऊक, त्याला फारसे यश मिळालेले दिसले नाहीं. अण्णांच्या समितीने सरकारला माहीत नसलेले कुठलेही नवे कलम त्यांच्या जनलोकपाल विधेयकात घातलेले नव्हते. [म्हणजे ज्याचे आश्चर्य वाटावे असे एकही नवे, अज्ञात किंवा अपरिचित कलम त्यात नव्हते.] चर्चासत्रें सुरू झाली, टीव्हीवर बैठकीआधी गाड्यातून उतरून येणारी आणि बैठकीनंतर गाड्यांत चढून जाणारी बडी-बडी xx जनतेने पाहिली. सरकारच्या प्रतिनिधींच्या चेहर्यावरचे आक्रमक आणि तुच्छतेचे भाव आणि "जनलोकपाल"वाद्यांच्या चेहर्यावरचे उद्विग्न भाव पाहून वाटाघाटीत काय चालले होते याचा अंदाज येत होता व लक्षणे कांहीं बरी नाहींत हेही दिसत होते. शेवटी मोजक्याच दिवसात भ्रमाचा भोपळा फुटला आणि दोन्ही पक्षांनी "एकमत होऊ शकले नाहीं" असे जाहीर करून आपापल्या मार्गाने जायचे ठरविले. (सरकारी लोकपाल विधेयकाचे 'जोकपाल' असे पुनर्नामकरणही झाले). चर्चासत्रे संपल्यावर अण्णांनी १६ ऑगस्टला पुन्हा उपोषण करण्याचा आपला निर्णयही जाहीर करून टाकला.
इथूनच संघर्षाची ठिणगी पडली. एप्रिलच्या मध्यापासून मिळालेल्या चार महिन्यात हा प्रश्न कसा सोडवायचा यावर सरकारने एक वेळ फारसा विचार केला नेसेल, पण अण्णा पुन्हा उपोषणाला बसले तर त्या आंदोलनाला कसे सामोरे जायचे आणि ते कसे दडपून टाकायचे याचा विचार मात्र पक्का केलेला दिसला. अण्णांच्या चमूने सरकारकडे उपोषणासाठी योग्य जागा द्यावी यासाठी रीतसर परवानगी मागितली. "हा कायदा-सुरक्षितते"चा मामला असल्याने ती जबाबदारी राज्य सरकारची (याने कि दिल्ली पोलिसांची" आहे, त्याबद्दल केंद्र सरकार जबाबदार नाहीं असे सांगून चिदंबरम् यांनी आपल्या अंगावरचे "जबाबदारीचे शिंतोडे" [आंघोळीनंतर अंगावरचे पाणी झटकून टाकणार्या मांजराच्या थाटात] झटकून टाकले आणि कायदा-सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकार व दिल्ली पोलीस सारे निर्णय घेतील असे सांगून आपला पाय काढता घेतला[२]. दिल्लीला व केंद्रात काँग्रेसचेच राज्य असल्यामुळे आंतर-पक्षीय संघर्षही नव्हता (जो कदाचित् गुजरात, बिहार अशा ठिकाणी होऊ शकला असता!). मग हा लपंडाव का खेळला जातोय् याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. दोन उपोषणामधल्या काळात चिदंबरम् यांचा गंभीर चेहरा व त्यांचे व्याकरणशुद्ध "तर्खडकरी" इंग्रजी आणि कपिल सिब्बल यांचा बेरकी ("चालू") चेहेरा सारखा पाहून-पाहून कंटाळा येऊ लागला होता. दरम्यान अण्णांच्या चारित्र्यहननाचाही प्रयत्न झाला. काँग्रेस पक्षाच्या एका वाह्यात कार्ट्याने-माफ करा, एका सुपुत्राने-आपल्याहून सुमारे दीडपट वडीलधार्या असलेल्या अण्णांचा "तुम खुद सरसे पाँवतक भ्रष्टाचारमे लिपटे हो" असा एकेरी अपमानास्पद उल्लेखही केला. त्याला अण्णांनी समर्पक चपराकही मारली. सोबत "मी कित्ती-कित्ती-हुशार"छाप चेहरा ठेवून कपिल सिब्बल यांचे मुक्ताफळे उधळणे चालूच होते. त्यातच अंबिका सोनींचा सर्व भारतीय जनता जणू ५-७ वर्षांची मुले असल्याच्या थाटात अक्कल शिकविण्याचा केविलवाणा प्रयत्नही सर्वांनी पाहिला.
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर, रामलीला मैदान यासारख्या मोठ्या क्षेत्रफळाच्या जागांना नकार देऊन जयप्रकाश उद्यानासारखी छोट्या जागी अण्णांना उपोषणाला बसायची परवानगी दिली पण तिथेही ५००० पेक्षा जास्त लोक आणि पार्किंगच्या जागेत ५० पेक्षा जास्त मोटारी जमता कामा नयेत असल्या हास्यास्पद तीन अटी "बोलवत्या धन्या"च्या इशार्यानुसार घातल्या! एकूण निदर्शकांची संख्या, पार्किंगच्या जागेतल्या वाहनांची संख्या वगैरेसारख्या तीन बाबींवर समेट होणे शक्य नव्हते. उपोषणाला समर्थन देणार्यांच्या संख्येवर व त्यांच्या वाहनांवर अण्णांचा चमू कसे काय नियंत्रण करणार होता? ही कारवाई तर पोलिसांनीच करायला हवी. ती जबाबदारीही अण्णा चमूवर ढकलण्यात आली व त्याला अर्थातच अण्णांच्या चमूने विरोध केला व या अटी नाकारून अण्णांनी जयप्रकाश उद्यानात उपोषणाला बसायचा निर्णय जाहीर केला.
सहाजीकच सरकारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या व त्या भागात १४४ कलम लागू केले गेले. त्यानुसार पोलीसांनी अण्णांना ते जिथे उतरले होते त्या सदनिकेबाहेर पडताच अटक केली आणि त्यांना तिहार कारागृहात नेण्यात आले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावासात असलेले कलमाडी, राजा, काणीमोळी व त्यांचे हस्तक/सहकारी सध्या इथेच सरकारी पाहुणचार उपभोगत आहेत. त्यांच्या चरणधुळीने पवित्र झालेल्या या पुण्यभूमीवर त्याच भ्रष्टाचाराशी लढणार्या संताला नेणे ही तर अनौचित्याची परमावधी झाली. कदाचित् या कारागृहातील "पुण्यपुरुषां"कडून अण्णांचे हृदयपरिवर्तन करून त्यांनाही भ्रष्टाचाराच्या "धंद्याला" लावता येईल असा उदात्त विचार सरकारच्या मनात होता कीं काय ते न कळे! खरे तर कलमाडी-राजा यांच्यापेक्षा "पोचलेल्या" गुरुश्रींना आणि गुरुमातांना अद्याप कारगृहात डांबायचे बाकी आहे. [ही श्रेष्ठ मंडळी एकदा तिहारमध्ये वस्तीला आली कीं तिथे भ्रष्टाचार या विषयावर "डॉक्टरेट" मिळण्याचीही सोय होईल असे कानावर आले आहे.]
असो. अण्णांना अटक झाल्याचे कळताच सार्या देशातल्या जनतेत एक अनोखे चैतन्य सळसळले. दिल्ली व दिल्लीच्या परिसरातील हजारो लोकांनी तिहार कारागृहाला वेढा घातला. बास्तिय्य (Bastille) तुरुंगातून बाहेर पडलेली "अद्भुत शक्ती" जशी फ्रेंच क्रांतीला कारणीभूत झाली तसाच काहींसा पराक्रम तिहार कारागृह तर करणार नाहीं ना अशा शंकेची पालही माझ्या मनात चुकचुकली. लोकांनी कारागृहाबाहेर बसून देशभक्तीपर गाणी आणि भजने गायला सुरुवात केली. घोषणा चालू होत्या व तिरंगा फडकत होता. हा प्रकार पाहून पोलीसांची कांहींशी तारांबळ उडाली असावी. चिदंबरम् व सिबल यांचे कायदा आणि सुरक्षिततेचे तुणतुणे वाजत असतानाच अचानक जणू जादूची कांडी फिरली आणि एकाएकी कायदा-सुरक्षिततेला असलेला धोका नाहींसा झाला. एकादे ग्रहण कांहीं वेळानंतर आपोआप सुटते ना? अगदी तस्सेच झाले! पोलिसांनी अण्णांना मुक्त केले व कुठेही उपोषणाला बसायला परवानगी दिली.
अण्णांना सोडण्याच्या निर्णयात चिदंबरम् यांचा वाटा होता कां? छे, छे! कांहीं तरीच काय? तो तर दिल्ली पोलीसांचा निर्णय होता ना? चिदंबरम् घाबरले होते कां? छे, छे! मुळीच नाहीं. मग अचानक कायदा-सुरक्षिततेच्या मुद्द्याचे काय झाले? "ते दिल्ली पोलिसांना विचारा!" हाहाहा!!
पण आता अण्णांनी कारागृह सोडायला नकार देऊन पोलीसांची पंचाईतच करून टाकली. त्यांनी उपोषणासाठी मोठ्या जागेची मागणी केली. शेवटी अवाढव्य "रामलीला मैदान" निश्चित झाले. पण त्याला सफाईची जरूर होती. ती संपूर्ण झाल्यावर अण्णा अखेरीस तिसर्या दिवशी कारागृहाबाहेर पडले व तुरुंगाच्या अधिकार्यांना जणू त्यांचीच सुटका झाल्याचा आनंद झाला.
तिहारहून रामलीला मैदानाला जाताना अण्णा आधी "राजघाटा"वर गेले. ते पोलीसांच्या गराड्यात पुढे चालले होते तर त्यांच्यामागून अथांग जनसागर चालला होता. म. गांधींच्या समाधीवर त्यांनी फुले वाहिली व त्यांच्या स्मृतीला वंदन केले. तेवढ्यात अचानक पाऊस पाऊस सुरू झाला आणि दोन दिवस उपोषण केलेल्या अण्णांनी पावसात भिजणे टाळण्यासाठी पळायला सुरुवात करून सगळ्यांनाच थक्क केले. त्यांच्या संरक्षणार्थ तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्यांचीही त्यांच्यामागे धावता-धावता पुरेवाट झाली!
शेवटी ते रामलीला मैदानावर संध्याकाळी पोहोचेपर्यंत उपाषणाचा तिसरा दिवस संपत आला होता.
अण्णांच्या उपोषणाची सुरुवात १६ ऑगस्ट २०११ रोजी तिहारच्या कारागृहात सुरू झाली. अण्णा रामलीला मैदानात आले २० ऑगस्ट २०११ ला. पाठोपाठ शनिवार-रविवार होते. गर्दीचा तर कहर होता. पण सरकारला आशा होती कीं जसा आठवडा सुरू होईल शनिवार-रविवार संपल्यावर गर्दी ओसरेल, पण गर्दीत कांहींही फरक पडला नाहीं. रामलीला मैदानावर जनसागर ओसंडून चालला होता. १६ ऑगस्टपासून दिल्लीतच नव्हे तर मुंबई, कलकत्ता, चेन्नई, बंगळूरू, पुणे, लखनऊ, अशा सर्व भारतभर निदर्शक समर्थनार्थ उतरले. गेल्या १२० वर्षात मुंबईच्या डबेवाल्यांनी कधीही "बंद" पाळला नव्हता, पण अण्णांच्या समर्थनार्थ त्यांनी एक दिवस डबा-सेवा बंद करून एक नवा इतिहास घडवला. यावेळी केवळ भारतातच नव्हे तर सर्व जगभरच्या भारतीयांना त्यात भाग घावासा वाटावा इतके चैतन्य आणण्यात अण्णांना आणि अण्णांच्या चमूला यश मिळाले होते. जकार्तातही आम्ही खारीचा वाटा उचलायचा निर्णय घेतला व जवळ-जवळ ४०० सह्या गोळा करून त्या भारताच्या राजदूताकडे पोचविल्या.
सरकारची झोप उडायला सुरुवात झाली. पण सरकारचा संघनायक कुठल्याशा अपरिचित/अघोषित आजाराने पीडित असल्याने परदेशी होता व उपनायक मॅचच्या मैदानावर येण्याऐवजी पुण्या-बिण्यात शेतकर्यांचे अश्रू पुसायला गेला होता. मग निर्णय कोण घेणार?
दिल्लीत तासातासाल "एक-घर-पुढे-मग-एक-घर-मागे" असा सारीपाटाचा डाव रंगला होता. चर्चेसाठी भेटीला जाणारे केजरीवाल, भूषण वगैरे लोक वैतागले होते. शेवटी २६ तारखेला अमीर खान व मुन्नाभाई-फेम राजकुमार हिराणीसुद्धा रामलीला मैदानावर येऊन पोचले. ओम पुरींचा व किरण बेदींचा संयम सुटला. ओम पुरींनी सरकारला "आडे हाथ" घेतले तर किरण बेदींनी इकडे-एक-तर-तिकडे-दुसरेच बोलणार्या दुतोंडी खासादारांची नक्कल ओढणीचा वापर करून व सार्या जनसमुदायाला पोट दुखेपर्यंत हसवून केली व त्यांना बेनकाब केले. अण्णांचा निश्चय तर अढळ होता व तो निश्चय ते वेळोवेळी जाहीरही करत होते.
पण शेवटी अण्णांच्या न्यूनतम तीन मागण्यांना केंद्रसरकारने मान्यता दिली व अण्णांच्या जयजयकारात त्यांच्या उपोषणाची सांगता झाली. अण्णांच्या चमूतर्फे समारोपाच्या भाषणात केजरीवाल यांनी मोठ्या मनाने कित्येक "खलनायकांचे"सुद्धा आभार मानले. पण त्यांनी सांगेपर्यंत जमलेल्या जनसमुदायासाठी कित्येक सेवाभावी संस्थांनी आणि कांहीं दानशूर व्यक्तींनी "लंगर" आणि अन्नछत्रें उघडून विनामूल्य भोजन दिले हे मलाच काय कित्येकांना माहीत नव्हते.
अलीकडे असे ऐकले कीं खासादारांनी ओम पुरी व किरण बेदींच्यावर हक्कभंगाचा ठराव आणला आहे व त्यातून दोघांना १५ दिवस कैद होऊ शकेल. आता म्हणे केजरीवाल यांच्यावर नोकरीच्या शर्ती तोडल्याबद्दल दंड म्हणून ७ लाख रु. भरण्याबद्दल नोटीस जारी करण्यात आली आहे.
सरकारला अजूनही अक्कल आलेली दिसत नाहीं. झाले तेवढे हसू पुरे झाले नाहीं म्हणून हे काय नवीन थेर सुरू केले आहेत कुणास ठाऊक?
[१] या म्हणीला अनेक विकल्प आहेत, पण लहानपणापासून याच स्वरूपात मी ती एकलेली आहे)
[२] हे बेंडही काल राळेगणसिद्धीच्या आपल्या भाषणात अण्णांनी फोडले. "आम्हाला 'वरून' हुकूम येत होते तशा आम्ही कारवाया करत होतो" असे पोलीसांच्या उच्च अधिकार्याने त्यांना सांगितल्याचे अण्णांनी जाहीरपणे सांगितले.
वाचने
11647
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्री. सुधीर काळे,
धाडसी प्रतिसाद
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
+१
In reply to धाडसी प्रतिसाद by आळश्यांचा राजा
+१ का ओ + १००,
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
पोस्ट डुप्लिकेट झाल्याने एक उडविली!
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
जनलोकपाल विधेयक दु:खांचा अंत आणि सुखांची बरसात नाही हे खरे!
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
काळे साहेब
In reply to जनलोकपाल विधेयक दु:खांचा अंत आणि सुखांची बरसात नाही हे खरे! by सुधीर काळे
कदाचित त्या अॅक्ट्समध्ये त्रुटी असतील
In reply to काळे साहेब by आळश्यांचा राजा
धन्यवाद
In reply to जनलोकपाल विधेयक दु:खांचा अंत आणि सुखांची बरसात नाही हे खरे! by सुधीर काळे
अशी परिस्थिती आहे काय?
In reply to धन्यवाद by श्रावण मोडक
अपुरेपणा
In reply to अशी परिस्थिती आहे काय? by सुधीर काळे
जातीभेद, वर्णभेद, वगैरे
In reply to जनलोकपाल विधेयक दु:खांचा अंत आणि सुखांची बरसात नाही हे खरे! by सुधीर काळे
ओ
In reply to जातीभेद, वर्णभेद, वगैरे by रामदास
शरद पवारांच्या पेक्षा देशमुख जरा जास्त स्वच्छ?
In reply to जातीभेद, वर्णभेद, वगैरे by रामदास
देशमुख नव्हे हो
In reply to शरद पवारांच्या पेक्षा देशमुख जरा जास्त स्वच्छ? by सुधीर काळे
प्रतिक्रिया आवडली
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
काळेसाहेबांचा मुद्दा आपल्याला
In reply to श्री. सुधीर काळे, by श्रावण मोडक
श्रामो, आरा, परा
मी अण्णांचा आंधळा भक्त नाही
In reply to श्रामो, आरा, परा by चिंतामणी
पराशी प्रचंड सहमत, ' उग्र
In reply to मी अण्णांचा आंधळा भक्त नाही by परिकथेतील राजकुमार
लोकपाल विधेयक मान्य झाले तरी
मला वाटते या सर्व प्रश्नांची
गेले चार महिने आपण साला
मी इथे अल्पमतात आहे असे दिसते
>>>> मी इथे अल्पमतात आहे असे
In reply to मी इथे अल्पमतात आहे असे दिसते by सुधीर काळे
असंच काहीतरी लिहायला आले होते
In reply to >>>> मी इथे अल्पमतात आहे असे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे आकडे खरे आहेत काय
सारांश
In reply to हे आकडे खरे आहेत काय by रामदास
अगदि अगदि अगदि हेच आणि हेच,
In reply to सारांश by श्रावण मोडक
असहमत ईथे कुठलं वाक्य बरोबर
In reply to हे आकडे खरे आहेत काय by रामदास
अच्छा
In reply to असहमत ईथे कुठलं वाक्य बरोबर by चेतन
ओक्के
In reply to अच्छा by श्रावण मोडक
हाहाहा
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
श्रामोंशी सहमत
धाडसाबद्दल धन्यवाद.
जी गर्दी रामलीला मैदानावर लोटली होती ती silent majority आहे...
In reply to धाडसाबद्दल धन्यवाद. by राही
अण्णा.. अण्णा रिलोडेड !!
!!! स ह म त !!!
In reply to अण्णा.. अण्णा रिलोडेड !! by अर्धवटराव
एक मुद्दा राहिलाच !!
हा धागा उघडण्याचं चीज झालं.
In reply to एक मुद्दा राहिलाच !! by अर्धवटराव
मी मिपावर जरी अल्पमतात असलो तरी जनतेचे मत बरेचसे माझ्या बाजूने?
नीलसेन अहवाल
In reply to मी मिपावर जरी अल्पमतात असलो तरी जनतेचे मत बरेचसे माझ्या बाजूने? by सुधीर काळे
काही निरीक्षणे
In reply to मी मिपावर जरी अल्पमतात असलो तरी जनतेचे मत बरेचसे माझ्या बाजूने? by सुधीर काळे
तुम्ही म्हणताहात ते (दुर्दैवाने) खरे आहे. काय करणार?
In reply to काही निरीक्षणे by सुनील
अण्णा
In reply to मी मिपावर जरी अल्पमतात असलो तरी जनतेचे मत बरेचसे माझ्या बाजूने? by सुधीर काळे
विस्तृत व विवेचणपुर्ण आहे
काही बुध्दीभेद करणार्या
फजिती
एक प्रश्न...
In reply to फजिती by नितिन थत्ते
दोष
In reply to एक प्रश्न... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>याच दृष्टीने केजरीवाल
In reply to दोष by श्रावण मोडक
अंतिम
In reply to >>याच दृष्टीने केजरीवाल by अन्या दातार
प्रतिसाद वाचत असताना
In reply to अंतिम by श्रावण मोडक
सहमत
In reply to प्रतिसाद वाचत असताना by मराठी_माणूस
जनजोकपाल?
In reply to दोष by श्रावण मोडक
राहुलने म्हणे समोसे वाटले निदर्शकांना.....!
In reply to फजिती by नितिन थत्ते
पाठिंब्याचे प्रमाण
In reply to राहुलने म्हणे समोसे वाटले निदर्शकांना.....! by सुधीर काळे
राहुलने सामोसे वाटले एवढेच लक्षात राहिले!
In reply to पाठिंब्याचे प्रमाण by नितिन थत्ते
विचार
स्वातंत्र्य पुर्व काळात ज्या
In reply to विचार by नितिन थत्ते
>>स्वातंत्र्य पुर्व काळात
In reply to स्वातंत्र्य पुर्व काळात ज्या by मराठी_माणूस
तेंव्हाचे नेते काही एका
In reply to >>स्वातंत्र्य पुर्व काळात by नितिन थत्ते
"लाख दुखोंकी एक दवा (नहीं है फिरभी) क्यूँ न आजमाये, काहे घबराये?
खरंच मिपावर येवढी धोरणी आणि
मस्त प्रतिसाद
In reply to खरंच मिपावर येवढी धोरणी आणि by परिकथेतील राजकुमार
लेखा ऐवजी चर्चा आवडली !!
+१
In reply to लेखा ऐवजी चर्चा आवडली !! by अजातशत्रु
कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणे म्हणजे पुनरुक्ती होईल
In reply to +१ by स्मिता.
+१ टु अजातशत्रु, नक्की मॅच
एक अवांतर प्रश्न - दिल्लीत
In reply to +१ टु अजातशत्रु, नक्की मॅच by ५० फक्त
माझे अण्णांना समर्थन आहे.
इतिहासाच्या अभ्यासकांना विनंती
आमच्या गावाकडे
In reply to इतिहासाच्या अभ्यासकांना विनंती by सुधीर काळे
प्रतिसाद मला कळला नाहीं
In reply to आमच्या गावाकडे by Nile
जाउ द्या हो !!
In reply to प्रतिसाद मला कळला नाहीं by सुधीर काळे
मिपा वरील "वयस्क" लोक