चित्रचक्कर क्रमांक १ ते २३
लेखनप्रकार (Writing Type)
चित्रचक्कर क्रमांक १: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात बाप स्वत: परधर्माच्या स्त्रीबरोबर विवाह करतो परंतू कालांतराने जेव्हा त्याचा पुत्र स्वधर्माच्याच स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती केवळ खालच्या सामाजिक स्तरातील आहे म्हणून या प्रेमाला बाप विरोध करतो. हा प्रेमपट कोणता?
चित्रचक्कर क्रमांक २: ओळखा पाहू - एक अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट - यात लता मंगेशकरांनी एक गाणे मध्यंतरापुर्वी गायले आहे. तेच गाणे (म्हणजे धृवपद तेच आहे पण कडवी वेगवेगळी आहेत) चित्रपटाच्या शेवटच्या रिळात किशोरकुमारने गायले आहे. किशोरकुमारने गायलेले गाणे सोलो आहे. लता मंगेशकरांनी गायलेले गाणे देखील तसे सोलोच आहे पण फक्त एकच ओळ किशोर ने गायली आहे. पण हा किशोर (म्हणजे लताच्या गाण्यात फक्त एक ओळ गाणारा) गायक किशोरकुमार नाही. तर हा चित्रपट कोणता?
हिंट - या चित्रपटाच्या शीर्षकात चार शब्द आहेत. जर शीर्षकातील ह्या शब्दांना १, २, ३, ४ असे क्रमांक दिले तर हेच शब्द या चित्रपटाच्या शीर्षक गीतात १, ४, ३, २ या क्रमाने येतात.
चित्रचक्कर क्रमांक ३: ओळखा पाहू - एक अन्यायग्रस्त महिला - तिची दोन मुले - मोठेपणी एक पोलीस तर दुसरा स्मगलर होतो. एवढे वाचून लगेचच डोळ्यासमोर येतो तो दीवार (१९७५ सालचा). आता यात थोडा बदल करुन एक अन्यायग्रस्त महिला - तिची दोन मुले - मोठेपणी एक पोलीस तर दुसरा देखील पोलीस च होतो. एवढे वाचून डोळ्यासमोर कुठल्या हिन्दी चित्रपटाचे नाव येते?
चित्रचक्कर क्रमांक ४: ओळखा पाहू - ’बापके कंधे पर बेटेकी अर्थी’ हा संवाद ’शोले’ व्यतिरिक्त आणखी कुठल्या हिन्दी चित्रपटात आहे?
चित्रचक्कर क्रमांक ५: ओळखा पाहू - हिन्दी चित्रपट सृष्टीतील दोन ख्यातनाम अभिनेते. दोघांच्या वयात अवघे साडेचार वर्षांचे अंतर पण तरीही त्यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांमधून ज्या भुमिका केल्या त्यात त्यांच्या वयात बहुतेकदा एका पिढीचे (व एकदा तर दोन पिढ्यांचे) अंतर दाखविले गेले आहे. नायक वि. खलनायक असा त्यांचा अनेक चित्रपटात सामना झाला आहेच. पण ज्यात ते एकमेकांच्या विरोधात नाहीत अशा चित्रपटांमधून त्यांनी खाली दिल्याप्रमाणे विविध प्रकारची नाती रंगविली आहेत.
सासरा - जावई
मामा - भाचा
पिता - पुत्र
याशिवाय एका चित्रपटात तर त्यांनी आजोबा - नातवाच्या भूमिकाही केल्या आहेत.
त्यांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटांपैकी फक्त दोनच चित्रपटात ते दोघे साधारण एकाच वयाचे व एकमेकांचे जवळचे मित्र दाखविले आहेत. (त्यातही एका चित्रपटात पुढे एकजण दुसर्याच्या बहिणीच्या प्रेमात पडतो व लग्न करतो म्हणजे त्यांनी जिजा-साला असे नाते रंगविले आहेच). तसे ते प्रत्यक्षातही चांगले मित्र आहेत व त्यापैकी एकाने दिग्दर्शनाचा प्रयत्न करताच दुसर्याने त्यात नायकाची भूमिका केली होती.
हिन्दी चित्रपटातील हे दोन अभिनेते कोण?
(हिंट - दोघांच्या नावाची आद्याक्षरे सारखी आहेत. अजून एक हिंट - दोघांच्या आडनावाची आद्याक्षरे देखील सारखीच आहेत. )
चित्रचक्कर क्रमांक ६ - एकाच नावाने प्रदर्शित झालेले दोन हिंदी चित्रपट. यातील पहिल्या चित्रपटात नायिकेची भूमिका करणा-या अभिनेत्रीच्या मुलीने दुस-या पण त्याच नावाने प्रदर्शित झालेल्या चित्रपटात नायिकेची भूमिका केली आहे. दुस-या चित्रपटात काम करणा-या अभिनेत्रीची बहिण सध्या आघाडीची चित्रपटतारका आहे. एकाच नावाने प्रदर्शित झालेल्या या दोन चित्रपटांचं नाव काय?
चित्रचक्कर क्रमांक ७ - एकाच नावाने निरनिराळ्या दशकांत प्रदर्शित झालेले तीन चित्रपट. तीनही चित्रपट मल्टीस्टारर, रहस्यप्रधान. पहिल्या चित्रपटाती नायक गुप्तहेर संघटनेचा अधिकारी. दुस-या चित्रपटातील नायकावर षड्यंत्राचा आरोप येतो, तर तिस-या चित्रपटात नायकच खुद्द खलनायक. या तीन चित्रपटांचं एकच असलेलं नाव काय?
चित्रचक्कर क्रमांक ८ - एकाच नावाने निरनिराळ्या दशकांत प्रदर्शित झालेले दोन चित्रपट. यातील पहिल्या चित्रपटात नायकाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने दुस-या चित्रपटात चरित्र अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.
हिंट - दोन्ही चित्रपटांत त्या काळच्या आघाडीच्या (ज्यांना सौंदर्यवती म्हणता येईल अशा) अभिनेत्रींनी नायिकेची भूमिका साकारली. पहिल्या चित्रपटातील नायिकेची त्या चित्रपटात दुहेरी भूमिका होती.
चित्रचक्कर क्रमांक ९ - या चित्रपटातील नायक एका जोडप्याला भेटतो आणि त्या दोघांचे आयुष्यच बदलून टाकतो. त्याच्या मदतीने प्रथम त्या जोडप्यातील पती अमाप यश व प्रसिद्धी मिळवितो आणि नंतर पत्नी देखील नायकाच्याच मदतीने प्रसिद्धीच्या शिखरावर पोचते. दरम्यानच्या काळात ते जोडपे विभक्त होते तर नायक तुरूंगात जातो.
तुरूंगातुन सुटून आल्यावर नायक त्या जोडप्या हून ही अधिक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कीर्ती व प्रसिद्धी मिळवितो पण त्याची किंमत त्याला स्वत:च्या मृत्युने चुकवावी लागते. हा चित्रपट कोणता?
चित्रचक्कर क्रमांक १०: ओळखा पाहू - एकाच नावाचे चार चित्रपट
पहिल्यात दोन नायक एक नायिका असा त्रिकोण
दुसर्यात असा त्रिकोण नाही पण नायकाची पत्नी आणि नायिकेचा प्रियकर (होय प्रियकरच कारण त्यांचं लग्न झालेलं नसतं त्यामुळे नवरा म्हणता येत नाही) यांचा मृत्यू झालेला..
तिसर्यात पुन्हा त्रिकोण पण यात दोन नायिका आणि एक नायक
चौथ्यात पुन्हा त्रिकोण आणि यातही दोन नायिका आणि एक नायक
काय असेल या चारही हिन्दी चित्रपटांचं एकच शीर्षक?
चित्रचक्कर क्रमांक ११: ओळखा पाहू - तीन नायक, तीन नायिका आणि चित्रपटाच्या शीर्षकात एकाच अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द असा हिन्दी चित्रपट कोणता?
चित्रचक्कर क्रमांक १२: ओळखा पाहू - या अभिनेत्रीने वेगवेगळ्या चित्रपटांमधून हिन्दी चित्रपटसृष्टीतील तीन अभिनेत्यांच्या (जे की वास्तव जीवनात एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत) नायिकेचे काम केले आहे. त्याशिवाय यापैकी सर्वात मोठ्या भावाच्या तीन पुत्रांपैकी पहिल्या दोघांचीही नायिका ती बनली आहे.
ही अभिनेत्री कोण? हे चित्रपट कोणते?
चित्रचक्कर क्रमांक १३: ओळखा पाहू - चित्रपटाचा नायक कलेची साधना करण्याबाबत अजिबात मेहनती नाही, सदाचारी नाही (थोडक्यात अनेक स्त्रियांशी त्याचे संबंध आहेत) याउलट सहनायक (जो पुढे परिस्थितीवश खलनायक ही बनतो) कलेचा साधक असून अतिशय मेहनती आहे, स्त्रियांच्या बाबतीत त्याचे पाऊल चुकूनही घसरत नाही.
इतकं असूनही कलेतलं यश आणि नायिका हे दोन्ही नायकाच्या पदरात पडतं असा हा हिन्दी चित्रपट कोणता?
चित्रचक्कर क्रमांक १४: ओळखा पाहू - अतिशय गाजलेल्या व प्रचंड प्रमाणात व्यावसायिक यश मिळविणार्या या चित्रपटात खलनायक एकदा नायकाच्या वडिलांना व्यवसायात फसवितो त्यानंतर माफी मागतो. माफी मागताना त्याच्या कडेवर त्याची धाकटी मुलगी असते आणि सोबत मोठी मुलगी उभी असते. खलनायक तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिची शपथ घेत नायकाच्या वडिलांना पुन्हा फसविणार नाही अशी ग्वाही देतो आणि पुन्हा त्यांच्या व्यवसायात सामील होतो. लवकरच आपण घेतलेली आपल्या मुलीची शपथ खोटी ठरवत तो परत एकदा नायकाच्या वडिलांना फसवून त्यांचा व्यवसाय हडप करतो. ही फसवणूक जास्तच मोठी असते आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत नायकाचे वडील आणि त्याची धाकटी बहीण यांचा अंत होतो तर त्याची आई मानसिक रीत्या खचून जाते.
कालांतराने नायक खलनायकाचा सूड उगवितो त्यावेळी खलनायकाने त्याच्या ज्या मोठ्या मुलीची खोटी शपथ घेतलेली असते तिचा खून करतो.
हा हिन्दी चित्रपट कोणता?
चित्रचक्कर क्रमांक १५: ओळखा पाहू - एक अतिशय वेगळ्या प्रकारचा भूतपट. अतिशय स्वच्छ, सभ्य आणि शालीन. कुठेही अश्लील, ओंगळवाणी दृश्य नाहीत, उलट ही एका अर्थी अत्यूच्च दर्जाची प्रेमकथाच आहे. एका घरात राहणारं कुटुंब परक्या जगातील लोकांना घाबरतंय असं जाणवतं. चित्रपटाच्या शेवटी आपल्याला कळतं की (म्हणजे प्रेक्षकांपैकी सगळ्यांनाच हे कळतं असं नाही. अनेकांना चित्रपटाचा शेवट समजावून सांगावा लागतो. त्यामुळेच चित्रपट एका आठवड्यात चित्रपटगृहातून गायब झाला. असो.) घाबरणारं ते कुटुंबच भूत असून ते ज्यांना घाबरतं तीच जिवंत माणसं आहेत.
चित्रचक्कर क्रमांक १६: ओळखा पाहू - नायिका आणि नायकाचा मित्र नायकाला फसवतात. पुढे तो अपघातात मृत्यू पावल्याचं त्यांना कळल्याने निर्धास्तपणे एकत्र येतात. पण तो जिवंतच असतो आणि कालांतराने नायिकेच्या व आपल्या मित्राच्या समोर येतो. या कथेवर बनलेले हे दोन चित्रपट. दोन्ही चित्रपटात वेगवेगळ्या काळातील अभिनय सम्राटांनी नायकाचे काम केले पण खलनायकाची भूमिका एकाच अभिनेत्याने केलेले हे दोन्ही चित्रपट तुम्हाला ओळखता येतील काय?
चित्रचक्कर क्रमांक १७: ओळखा पाहू - चित्रपटाचा नायक आणि सहनायक एकमेकांच्या विरोधी स्वभावाचे. नायक आपल्या कामाशी अतिशय एकनिष्ठ, निर्व्यसनी, पैशापेक्षा तत्वांना अधिक मोल देणारा असा तर सहनायक निपुण असूनही कामात लक्ष न देणारा, सदा व्यसनात बुडालेला, साधारण मध्यंतरापर्यंत हे असंच चित्र. मध्यंतरात एक खलनायक अवतरतो. खरं तर त्याला पाहुणा खलनायकच म्हणायला हवं कारण तो जेमतेम दहा मिनीटेच चित्रपटात हजेरी लावून जातो. पण या दहा मिनीटात ही तो आपला प्रभाव पाडतोच कारण त्यानंतर नायक अमुलाग्र बदलतो. पैशाच्या पाठीमागे लागतो तत्वांना कवडीचीही किंमत देत नाही. इकडे सहनायक मात्र सुधारतो.
अर्थात चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात हा सुधारलेला सहनायक, बिघडलेल्या नायकाचे डोळे उघडतो आणि मग शेवटी नायकही पुन्हा सद्वर्तनी होतो.
हा हिन्दी चित्रपट कोणता?
चित्रचक्कर क्रमांक १८: ओळखा पाहू - चित्रपटाचा नायक प्रचंड प्रमाणात पझेसिव्ह. आपल्या एखाद्या गोष्टीवर इतरांनी हक्क दाखवावा हे त्याला अजिबात मान्य होत नाही. याच स्वभावामुळे बालपणी आपल्या आवडत्या बाहुलीला मित्राने हात लावला म्हणून मित्राशी मारामारी करणारा व परिणामी त्याच्या मृत्यूला कारणीभूत होणारा हा नायक पुढे तरूणपणी आपली नायिका आपल्या पासून दुरावतेय आणि आपल्या मित्राला (हा दुसरा - तरूणपणीचा मित्र, बालपणीचा मित्र त्याचवेळी मेला) जाऊन मिळतेय असे वाटून पुन्हा एकदा हिंस्त्र होतो. पण यावेळी हा मित्र मरत नाही तर नायकच पाण्याच्या प्रवाहात सापडून बेपत्ता होतो.
काही काळानंतर पुन्हा येतो पण आता त्याच्या मनाचा संशय धुवून निघालेला असतो (बहुधा पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम). नायिकेकडे आणि आपल्या मित्राकडे स्वच्छ नजरेने पाहू लागतो आणि शेवट गोSSSड होतो.
हा हिन्दी चित्रपट कोणता?
चित्रचक्कर क्रमांक १९: ओळखा पाहू - अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट. दोन नायक व दोन नायिका असल्या तरी चित्रपटात एक प्रेमत्रिकोण आहेच. चित्रपटात हिंसा अगदी हातभर म्हणजे दोन्ही नायिका वेगवेगळ्या प्रसंगात एका पात्राच्या थोबाडीत ठेऊन देतात एवढीच...तरीही चित्रपट दणक्यात चालला.
सगळी गाणी सुपरहिट आणि मुख्य म्हणजे चित्रपटाच्या शीर्षकात जो शब्द वापरला आहे तो प्रत्येक गाण्यात देखील (म्हणजे धृवपदात जमला नाही तर निदान एखाद्या कडव्यात तरी) वापरला गेला आहेच.
चित्रचक्कर क्रमांक २०: ओळखा पाहू - अतिशय गाजलेला हिन्दी चित्रपट. ज्यात नायक व नायिका दोघे खोटे बोलतात. असे असले तरी दोघांच्या खोटे बोलण्यात काही महत्वाचे फरक आहेत.
१. प्रथम नायिका नायकाच्या संबंधित इतरांशी खोटे बोलते, पण ती नायकाशी खोटे बोलत नाही.
२. नंतर नायक नायिकेशी स्वत:शी संबंधित खोटे बोलतो.
३. याशिवाय नायिका नायकाविषयी इतरांकडे खोटे बोलल्याचे नायकाला कळते पण नायक जे नायिकेशी खोटे बोलतो ते तिला कधीच कळत नाही. चित्रपटाच्या शेवटी देखील नाही.
चित्रचक्कर क्रमांक २१: ओळखा पाहू - हट्टी, दुराग्रही आणि विक्षिप्त स्वभावाचे नायक एकमेकांना भेटतात, एकमेकांशी चांगलाच संघर्ष करतात आणि शेवटी त्यांना कळून चुकते की आपण दोघेही एकाच प्रतीचे ’चक्रम’ आहोत म्हणून मग ते शेवटी संघर्ष सोडून एकत्र येतात तेव्हा त्यांना आणखी एक सत्य कळते त्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी आहे आणि तो दिवस तोच असतो ज्या एका दिवसाचाच घटनाक्रम संपूर्ण चित्रपटात दाखविला आहे. हा हिन्दी चित्रपट कोणता?
चित्रचक्कर क्र. २२ - ह्या सिनेमात एक प्रथितयश कलाकार होता.
सिनेमात ४ मुख्य खलनायक आहेत. नायकाच्या बहिणीचं फसवून लग्न लावून दिलं जातं आणि मग बलात्कार आणि खून. सरळमार्गी नायक एक एक करून सगळ्या खलनायकांचा काटा काढतो!
चित्रचक्कर क्रमांक २३: म्हैसूर ते मुंबई पर्यंतचा बंगळुरू मार्गे एक अपूर्ण प्रवास. ज्या प्रवासा दरम्यान प्रेक्षकांना पुर्वसूत्र (Flash Back) तंत्राने कळते की चित्रपटाच्या एका नायिकेचा आधीच मृत्यू झालाय आणि नंतर चित्रपट संपता संपता चित्रपटाची दुसरी नायिका ही मरण पावते. नायक त्या दोघींचे चेहरे डोळ्यासमोर आणून जेमतेम दोन टिपं त्या दोघींसाठी गाळतो आणि पुन्हा आपला प्रवास मुंबईच्या दिशेने चालु करतो. इथे चित्रपट संपतो.. ओळखू शकाल काय?
यातील वीस चित्रचक्कर मी रचले असून, चित्रचक्कर क्रमांक ७ व ८ कांचन कराई यांनी तर चित्रचक्कर क्रमांक २२ विद्याधर भिसे यांनी रचले आहेत.
प्रतिक्रिया
१६ - दो अन्जाने आणि दास्तान
बरोबर
१९ - दिल तो पागल है
चूक
२० - गझनी
बरोबर
फोडलंस.......
२ - अगर तुम ना होते?
खिन्न
मी नव्याने अजून तरी काहीच लिहीत नाहीये
आतापर्यंतचे निकालः १. मुघल -
अभिनंदन
खालील चित्रचक्कर ची उत्तरे
२ = हरे रामा हरे क्रिष्णा
अगदी बरोबर
मस्त रे चेतन
२२ - खट्टा मीठा
चूक
चित्रचक्कर क्रमांक ९ -
यावरून एक जुना परकीय विनोद आठवला
चित्रचक्कर क्रमांक ४
२२
किशोर साहु नव्हेत
२३
१) मुघल-ए-आझम ७) आंखे १०)
१९) धडकन - एकदम बरोबर
अरे मी आधी खालची उत्तरे न
अर्रे कोणीतरी नविन कोडी घाला
उर्वरित उत्तरे?
मी एक अॅड करतो. असा एक
प्रेमग्रंथ..
एकदम बरोबर
हमारा दिल आपके पास है - अनिल
उत्तरे (सर्वच चित्रचक्करची)
Pagination