मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा एकदा, "कानसेन कोण?"

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
नमस्कार! जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे, किंवा कधी कधी अंतरे, प्रश्नकर्त्यांनी पेश करायचे, आणि रसिकांमधील 'कानसेनां'नी प्रतिसादांत ते गाणं ओळखायचं, आणि कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे, अशा स्वरूपाची 'कानसेन कोण?' ही स्पर्धा गेल्या वर्षी सलग चार आठवडे चालली, आणि मिपाच्या वाचकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ३० ऑगस्ट २०१० रोजी सांगता झालेल्या २३ भागांच्या या स्पर्धेत १८८ जण विजेते ठरले. ही स्पर्धा सुरु होऊन आता वर्ष उलटलंय. मधल्या कालावधीत मिसळपावावर बरीच नवीन मंडळी येऊन दाखल झाली आहेत. तेंव्हा वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा 'कानसेन कोण?' ही मालिका सुरू करावी असा प्रभो, गणपा, चतुरंग, रेवती, मस्त कलंदर, मेघवेडा प्रभृतींचा विचार आहे. ही स्पर्धा-मालिका लवकरच सुरू होईल, आणि ती चालू ठेवण्यात मी जमेल तसा भाग घेईनच, पण गतवर्षीप्रमाणेच डॉ. प्रसाद दाढे, प्रदीप इत्यादि दर्दी मंडळींचाही सहभाग असेल अशी आशा आहे. तर व्हा तयार स्पर्धेत भाग घेण्यासाठी! **************** पुनःप्रत्ययासाठी या आधीच्या २०१० मधल्या स्पर्धांचे दुवे खाली एकत्र दिलेले आहेत: कानसेन २०१० भाग १: http://misalpav.com/node/13040 भाग २: http://misalpav.com/node/13072 भाग ३: http://misalpav.com/node/13075 भाग ४: http://misalpav.com/node/13089 भाग ५: http://misalpav.com/node/13097 भाग ६: http://misalpav.com/node/13120 भाग ७: http://misalpav.com/node/13024 भाग ८: http://misalpav.com/node/13031 भाग ९: http://misalpav.com/node/13136 भाग १०: http://misalpav.com/node/13137 भाग ११: http://misalpav.com/node/13139 भाग १२: http://misalpav.com/node/13141 भाग १३: http://misalpav.com/node/13148 भाग १४: http://misalpav.com/node/13155 भाग १५: http://misalpav.com/node/13163 भाग १६: http://misalpav.com/node/13164 भाग १७: http://misalpav.com/node/13178 भाग १८: http://misalpav.com/node/13182 भाग १९: http://misalpav.com/node/13184 भाग २०: http://misalpav.com/node/13215 भाग २१: http://misalpav.com/node/13217 भाग २२: http://misalpav.com/node/13230 भाग २३: http://www.misalpav.com/node/13451 - बहुगुणी

वाचने 3236 वाचनखूण प्रतिक्रिया 7

स्मिता. 07/08/2011 - 21:51
मागच्या वर्षी भाग घेवू शकले नव्हते. यावर्षी जमेल तसा सहभाग घेईन.