Skip to main content

कॉन्ट्रॅक्ट (बहुतांशी खरी झालेली एक पद्यकथा)

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 16/05/2008 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
कॉन्ट्रॅक्ट चार दिवस सुट्टी होती म्हटले जरा मौज करावी बायकोला घेऊन सोबती थंड हवेची सहल करावी. थंड हवेची सहल करावी? बायको पण खूश झाली त्या खुशीत तिने दारूची पॅक करू दिली बाटली पॅक करू दिली बाटली मी पण लिमीट पाहिली जवळच्या दुकानातून तीन वाइनची क्रेट घेतली तीन वाइनची क्रेट घेऊन निघालो मी सहलीला स्वप्ने पाहत प्रवास झाला करू प्रिये सह लीला कसली प्रिये सह लीला! पाहा अगाध दैवाची लीला थांबवली बस अचानक डाकूंचा घाला पडलेला डाकूंचा घाला पडलेला मुसंड आत चढलेला घेतले सगळ्यांचे दागिने पैसा अडका गोळा केला. पैशाअडक्याचे एक सोडा तीन क्रेट पण घेतल्या नशा पळवून गेला न उघडता बाटल्या नशा पळवून टोळी झाली अदृश्य सकाळी उरली रिकामी पकिते रडणे अमुच्या भाळी आता रडत बसू नका जवळ आहे पोलीस नाका बस ड्रायव्हर बोलला एफायार लिवून टाका एफायार लिवून टाकायला बस चालली जोरात पण काय होते दैवात ब्रेक मारला जोरात ब्रेक मारला जोरात तेच डाकू समोर आले मुसंड मघाचेच सगळे दोघे आतमध्ये घुसले दोघे आतमध्ये घुसले गाठोडी खांद्यावर घेऊन आपला माल घ्या ओळखून चाललो आम्ही परतून चालले डाकू परतून? चालले माल लोटवून? अक्रीत कसे झाले? कलियुगात इतके सगळे वाल्मिकी कसे घडले? न राहवून शेवटी भीत भीतच विचारले भाई क्या गलती हुई? सारे धन वापस केले? सारे धन वापस केले? अबे सारे धन वापस केले, काही मिळाले नाही डाक्यात. फुकट आमचे श्रम झाले आजचा दिवस तोट्यात आजचा दिवस तोट्यात? भाई असे का बोलता, आजचा दिवस तोट्यात? भाई असे का बोलता, आमचा त्याग असा ठोकरून का टाकता? ठोकरून टाकण्यायोग्यच सगळे, खोटे दागिने किरकोळ पैसे ठोकरून टाकण्यायोग्यच सगळे, खोटे दागिने किरकोळ पैसे क्रेडिट कार्ड क्यां चाटने है? कॅन्सल करता प्लॅस्टिक जैसे आम्हा भले मिळो न काही कॉंन्ट्रॅक्ट पक्के ठाणेदाराशी एका दरोड्याचे कमिशन नगद हजार पंचाऐंशी लगान मिली जो भीक जैशी घाटेमे पडती लूट ऐशी घाटा घेण्यापेक्षा असा माल सारा वापस केला जावा सुखाने घरला एफायारचा त्रास वाचवला नाही एफायार नाही कमिशन तुम्ही खूश आम्हा न टेन्शन डाका दुसरा घालू जंक्शन ठाणेदारालाही पुरवू राशन प्रॉफीट थीअरी त्याची ऐकून म्हणालोमी थोडा चक्रावून भाई इतके बोललात म्हणून विचारतो मी साहस करून माल आमचा वापस केला भाई वाइनच्या बाटल्या नाही दिसल्या! तसा रागावून डाकू ओरडला अबे तू काय पागल झाला आठवड्यात दरोडा नाही झाला जर आठवड्यात दरोडा नाही झाला पाजावी लागते दारू ठाणेदाराला पाजावी लागते दारू ठाणेदाराला केलेच पाहिजे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट मला धन्यवाद द्या तुमच्या नशिबाला कोणी वेड्याने वाइन आणल्या नाहीतर चाट पडली असती माझ्या खिशाला दोन लाफा मारूनच सोडले असते तुम्हाला दोन लाफा मारण्याचे ऐकताच माझी सारी जान खल्लास बसमध्ये बसलो मुक्काट थोबाड सलामत तो क्रेट पचास थोबाड सलामत तो क्रेट पचास
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3468
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पैशाअडक्याचे एक सोडा तीन क्रेट पण घेतल्या नशा पळवून गेला न उघडता बाटल्या वा! कोणी वेड्याने वाइन आणल्या नाहीतर चाट पडली असती माझ्या खिशाला दोन लाफा मारूनच सोडले असते तुम्हाला हा हा हा! दारूमुळे वाचलात बरं अरूणराव! :) थोबाड सलामत तो क्रेट पचास थोबाड सलामत तो क्रेट पचास क्या बात है अरूणराव! एकदम सुपरडुपर हिट आणि हाऊसफुल्ल कविता.. :) आपला, (वाईनप्रेमी) तात्या.

मग होऊन जाउदे Three Cheers तात्या. तुम्ही तिथे घ्या आम्ही ईथे घेतो. एक आमच्या वाटची तुम्ही घ्या एक तुमच्या वाटची आम्ही घेतो. पी.एस. तीनच चीअर्स वर का थांबतात हे कंजूष अंग्रेज कोण जाणे!

In reply to by अरुण मनोहर

तुम्ही तिथे घ्या आम्ही ईथे घेतो. एक आमच्या वाटची तुम्ही घ्या एक तुमच्या वाटची आम्ही घेतो. ओक्के! Done..! :) Tatyaa.

तुमची शैली आवडते, नेहमी काहीना काही कथासुत्र असते.

थोबाड सलामत तो क्रेट पचास थोबाड सलामत तो क्रेट पचास हे मस्त

द. मा. मिरासदारांच्या "दरोडा" ह्या गोष्टीची आठवण झाली. त्यातही गावातले टोळक रात्री एस.टी. वर दरोडा घालायच ठरवतात, पण पुरेशी रक्कम गोळा न झाल्यने लुटलेला माल परत करतात, कारण त्यांचा पण पोलिसांशी आधिच करार झाला असतो. लुटलेली रक्कम त्या करारच्या रक्कमे पेक्षा बरिच कमी असते. :))

In reply to by गणपा

माहिती साठी आभार. मी द.मां.ची "दरोडा" वाचलेली नाही. कॉन्ट्रॅक्ट्चे कथा बीज मला एका मित्राकडून भारतात प्रत्यक्ष घडलेली गोष्ट म्हणून एका पार्टीत ऐकायला मिळाली होती. त्यात सोमरसात असलेल्या रसामुळे मी थोडी वाईन मिसळून मस्ती भरली.