ह्या ठिकाणी टारझनने एका प्रतिसादाचे रसग्रहण करण्याचे आव्हान केल्याने मी माझा कधी नव्हे ते मिळालेला रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले.
सर्वप्रथम अन्वर चित्रपटावरून लेखकाला लंडनची आठवण येते म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला धन्यवाद. केवळ त्यामुळेच निनाद यांचा सुंदर प्रतिसाद आपणास वाचायला मिळाला.
लंडनला आमच्या बरोबर बरेच मित्र सवंगडी हे केवळ आर आर ह्यांच्या निर्णयामुळे नाईलाजाने दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी आले होतेअहाहा.. पहिल्याच वाक्यातून लेखकाने किती विविध गहन विषयांना स्पर्श केला आहे पहा. पहिल्याच ३ शब्दात लेखक आपण लंडनला असतो हे वाचकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतो. आर आर हे लेखकाचे कोणी मित्र आहेत कि नातलग हा suspense ह्याच वाक्यात लेखक निर्माण करतो. बाकी आर आर यांचा निर्णय वगैरे समजण्यास तुमचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाढा अभ्यास पाहिजे. परंतु एकदा का तुम्हास हे रहस्य उलगडले की मग तुम्हाला करून चुकते की एका व्यक्तीच्या निर्णयामुळे किती लोकांची आयुष्ये बदलून जाऊ शकतात. लेखकाचे मित्र सवंगडी नक्की शिक्षणासाठी परदेशात गेले होते की दोन वेळचे कोक /बर्गर / पिझ्झा खायला हा अजून एक suspense लेखक निर्माण करतो आणि तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो. किंबहुना लेखकाने मराठी भाषेला एक नवीन परदेशात हा एक context sensitive जोडशब्द बहाल केला आहे असे म्हणावेसे वाटते. (उदा. कोक /बर्गर / पिझ्झा खायला आणि/ अथवा/ व शिक्षणासाठी ह्या ऐवजी कोक /बर्गर / पिझ्झा खायला परदेशात शिक्षणासाठी).
.(त्यांच्या नर्तन मधुशाला थंड पडल्या होत्या .)पुढील वाक्यात ह्या लेखकाच्या प्रयोगशीलतेचा अजून एक नाविन्यपूर्ण आविष्कार दिसून येतो. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी देण्याच्या आपल्या इतके वर्षांच्या खुळचट प्रथेला छेद देऊन लेखक एक नवीन पायंडा पडण्याचा प्रयत्न करतो. पूर्णविराम वाक्याच्या पहिले देण्यामुळे वाचण्यास कुठून सुरुवात करायची हे कळते. तसेच त्या . चा bullets ऐवजी वापर करून लेखक आपले लेखन मुद्देसूद बनवण्यचे दुहेरी उद्दिष्ट सध्या करतो. आपण इतके दिवस कसे काय इतके कठीण प्रकारे लिहिलेले वाचत होतो हा विचार करून मलाच स्वत:ची शरम वाटली.
भारतात आल्यावर आता तेथे फक्त संगीताचे कार्यक्रम होतात .पण गाणाऱ्यांना नोटांची माळ व , इतर प्रकार सर्रास व्हायचे .आता लेखक भारतात आल्यावर तो कार्यक्रम करतो की तो भारतात आला म्हणून इंग्लंडात कार्यक्रम होतात ह्याचा शोध घेण्याचे काम लेखक वाचकांवर सोपवतो. लेखकाने नवीन जोडशब्द शोधल्याने की काय पण लेखक एक स्वल्पविराम व ह्या शब्दानंतर टाकून देतो.
माझ्या मित्रांच्या मालकीच्या अश्याच एका मधु शाळेत जाणे झाले .( येथे कॉफी ही बियर पेक्षा महाग असते म्हणून ती मागवली )अजून एक बहारदार वाक्य जे भरपूर गोष्टी सांगून जाते. लेखकाचा मित्र मधुशाला चालवतो. तिथे बियर बरोबर कॉफी सुद्धा विकतो. तीसुद्धा बियर पेक्षा महाग. लेखकाची ती खरेदी करण्याची ऐपत आहे.
काही नवजात गायिका भसाड्या आवाजात गाणी गायल्यावर लगेच फुले उधळण्यात आली.लेखकाबद्दल अजून माहिती देणारे आणि वाचकाला विचार करण्यास भाग पाडणारे वाक्य. लेखकाला गायिका नवजात आहेत हे बघताच कळले. वाक्यातून त्या गायिकांनी गाणी गायली की त्या नवजात आहेत म्हणून लेखकानेच गायली हे कळण्यास मार्ग नाही. परंतु भसाड्या आवाजात गाणे म्हटल्यास लगेच फुले उधळण्यात येतात हे महत्वाचे.
मग तो आला . हिरोसारखा दिसणारा एक तरुण तो आल्यावर एकदम सन्नाटा ( तो मैफिलीची सुरवात ह्या गाण्याने करतो हे सर्वाना ठाऊक )आहाहाहा .. काय वातावरण निर्मिती केली आहे पहा. ३-४ शब्दांची छोटी छोटी वाक्ये.
आणी त्याने'' मौला मेरे मौला .... तेरी''................. . त्यांचे गाणे ,ती सादर करण्याची पद्धत व त्याचा जीव ओतून गाणे सादर करणे .. ( ह्या गाण्याला २० हजार तरी सहज .....) आमच्या मित्राने धंद्यांचे गणित सांगितले .अजून एक नवीन पायंडा. " " च्या ऐवजी ( ) वापरणे.
दिवसा हा इसम अनेक ठिकाणी बॉलीवूड मध्ये वर्णी लागावी म्हणून पायपीट करतो . व रात्री येथे पहाटे पर्यत गातो .( आणी हा नियमित रियाझ सुद्धा करतो असे कळले )येथे लेखकाने . चा वापर separator सारखा केला आहे. पुर्णविरामाचे इतके विविध उपयोग आजपर्यंत उमगले नव्हते.
मी त्याची स्वाक्षरी घेतली . '' एक दिन तुम जरूर बडे स्टार बनोगे ,फिर तुम्हे फुरसत कहा होगी '' माझ्याकडे पाहून तो हसला . अजूनही त्यांचे स्वर कानात गुंजतात .लेखकाच्या दूरदृष्टीला आणि गुणग्राहक्तेला सलाम. मेंढ्राला मांस असतं की मेंढरु म्हंणजेच मांस ? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जेवढे बकरे खाल तेवढे अधिकंच आपण मांसाहारी होत जातो . ( ह्याचा अर्थ सांगणार्यास मला मिळालेलं बक्षिस फॉरवर्ड ). (स्वाक्षरी सौजन्य टारझन)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
23201
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
Whats the problem man ?
In reply to +१ by छोटा डॉन
सहजरावांच्या पहिल्या
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
मृत्युंजय यांच्याशी बहुतांश
In reply to काय लहान मुलांसारखे भांडता by मृत्युन्जय
+१
रणांगण... चालु द्या...
चालु द्या :)
.अरे द्येवा........ --
वाईड बॉल
सर्वप्रथम एका चुकीबद्दल जाहीर
तुमचा खुलासा पटला.एक
In reply to सर्वप्रथम एका चुकीबद्दल जाहीर by लंबूटांग
नावडतीचे मीठ अळणी अशातला हा
<<<खूप त्रासलेला माणूस साध्या
In reply to नावडतीचे मीठ अळणी अशातला हा by पक्या
आमचं नाव ? ते ही डायरेक्ट :)
In reply to <<<खूप त्रासलेला माणूस साध्या by शिल्पा ब
तुम्ही फक्त कंपूबाज लोकांना व
In reply to <<<खूप त्रासलेला माणूस साध्या by शिल्पा ब
काय म्हणता!! मी फक्त कंपुबाज
In reply to तुम्ही फक्त कंपूबाज लोकांना व by निनाद मुक्काम …
यापुढे फालतू प्रतिसाद, भांडणे
मी वेगळी प्रतिक्रिया देतिये.
टारझन ह्यांनी खुलासा दिला मी
हा धागा वाचनमात्र केला जात