Skip to main content

परा आणि धमु

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 08/01/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
'रामदासांचा अर्थबोध' या धाग्यात लिहिलं होतं - "पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत." अशी आणि ही या दोन शब्दांतील अंतर दूर झाले आहे. ;) 'सामना'च्या 'फुलोरा'मध्ये आज मिपाचे दोन वीर झळकले आहेत. परिकथेतील राजकुमार - प्रसाद ताम्हणकर. धमाल मुलगा - कैवल्य देशमुख. पराने लिहिलंय ते दहावी-बारावीची तयारी या विषयावर वेबविश्वात काय चालतं याविषयी, तर धमुने लिहिलं आहे दुबईच्या 'गोल्ड सूक'विषयी. फुलोरावर क्लिक करा. दोघांचेही लेख वाचा. दोघांचेही अभिनंदन. 'पूनम'वर कधी भेटायचं रे?

वाचने 16961
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

दोघांचेही अभिनंदन आणि धन्यवाद. माझा पुतण्या ९ विला आहे आणि आता त्याची म्हणजे त्याच्या आईवडीलांची पुर्वतयारी चालु झाली आहे. तुमचे मोलाचे मार्गदशन मी त्यांना मेल केले आहे. धन्स.