तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो. प्रत्येक सौंदर्यास्वाद अनुभवावासा वाटतो. जीवन हेच एक थ्रिल असतं. दिवसाचे २४ तास कमी पडत असतात. मोठा बहारीचा कालखंड असतो हा. हाच तो मोहक रस्ता ज्यावरून एकदा आणि एकदाच तुम्ही चालणार असता. प्रत्येकालाच परमेश्वर आरोग्य, सुंदर सकारात्मक विचार, स्वप्न, आशा यांची पुंजी तारूण्यात देतो.
आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
तारूण्य
वाचने
6895
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान मुक्तक. आवडलं. >>या
छान मुक्तक.
आवडलं. :)
>>या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
अगदी अगदी!
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
(तरुण) इंट्या.
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
(तरुण) इंट्या.
छानच लिहिलय! अगं, पण मला तो
छानच लिहिलय!
अगं, पण मला तो प्रभो 'आज्जी' म्हणतो तर मुसू 'बाई' म्हणतात!
तारुण्य लगेच संपलं असं वाटायला लागतं.
रेवती
In reply to छानच लिहिलय! अगं, पण मला तो by रेवती
पण तुला तसं वाटत नाही ना? मग झालं तर! तू त्याना 'काका' म्हणून बदला घे! हाकानाका!
त्यांना काका म्हटलं असतं गं!
In reply to रेवती by पैसा
त्यांना काका म्हटलं असतं गं! पण आता उशीर झाला.
मी उद्या काशीयत्रेला चाललिये.;)
येताना ४ काळे गंडे आणी
In reply to त्यांना काका म्हटलं असतं गं! by रेवती
येताना ४ काळे गंडे आणी गंगेच्या पाण्याचे २ गडू घेऊन या...देव्हार्यात ठेवायला आमच्या..
आणखी काही
In reply to येताना ४ काळे गंडे आणी by प्रभो
नको का?
मी उद्या काशीयत्रेला चाललिये
In reply to त्यांना काका म्हटलं असतं गं! by रेवती
मी उद्या काशीयत्रेला चाललिये >>.
अहो रेवती काकु , ऊद्या का ? आज का नाही ? एखादे काम झटदिशी करावे माणसाने (ईथे माणसानेचा अर्थ मानव-प्राण्याने असा आहे, पाशवी असा नाही !!)
कल करे सो आज कर
आक करे सो अभी ...वगैरै,वगैरै
मी पण
येते तुझ्याबरोबर! प्रभ्याने बघ घाबरून खव बंद करून ठेवल्येय.
काय वेळ आलीय कॉलेजातल्या
In reply to मी पण by पैसा
काय वेळ आलीय कॉलेजातल्या शिक्षकांना अभ्यास करा म्हणून सांगायची.. ;)
>>अफाट उत्साह, अमाप शक्ती,
>>अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण
यातलं ते संप्रेरक वगैरे सोडलं तर बाकी सालं काहीच खरं वाटत नाही माझ्या बाबतीत. कसं होणार आमचं!
छान मुक्तक.
छान मुक्तक.
रु
तारुण्य मध्ये रु र्हस्व असतो.
त्याचं तारू
In reply to रु by मिसळभोक्ता
तारुण्याचं तारू भरकटलं असेल. ;)
त
In reply to त्याचं तारू by प्रियाली
तारुण्याचं तारू
तारू एकच. ते तारुण्यात भरकटलं असेल.
(तरीच!)
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले
In reply to त by मिसळभोक्ता
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले स्फुटायला? ;-)
-चि. निळ्या.
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले
In reply to त by मिसळभोक्ता
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले स्फुटायला? ;-)
-चि. निळ्या.
तारुण्य मध्ये रु र्हस्व
In reply to रु by मिसळभोक्ता
तारुण्य मध्ये रु र्हस्व असतो. >>>
चुकुन तारुण्यच्या एवजी तारुण्यामधे वाचल ना !! लई हसलो !!
डोळ्यांना अजुनही योग्य ते दिसतय की, तुम्हाला आणी मलाही !!
किति मस्त दिवस आहेत हे.. ...
किति मस्त दिवस आहेत हे.. ... :)
म्हातारी झाले तर कशी दिसेन, कुठे असेन, मिपावर येता येइल का (डो़ळ्यांना दिसेल का?) , न हजार भुन्गे सोडलेस ग शुची माझ्या डोक्यात. :(
धन्यवाद ...
In reply to किति मस्त दिवस आहेत हे.. ... by पर्नल नेने मराठे
तुम्ही अजूनही तरूण आहात हे कळले ..
(स्वगत : बायका एकही चान्स सोडत नाही बॉ )
माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला
माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला.
"कसे दिवस गेले काही समजलंच नाही नं !"
- चिरतरुण मुसु.
ह्यावयातही तुमची मेमरी मात्र
In reply to माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला by मुक्तसुनीत
ह्यावयातही तुमची मेमरी मात्र एकदम बेस्ट आहे हो! ;-)
असेच म्हणतो
In reply to ह्यावयातही तुमची मेमरी मात्र by Nile
(सहमत)बेसनलाडू
या लेखावरून हे आठवले.
(स्मरणशील)बेसनलाडू
>>आता एवढं सांगून फार उपदेश
>>आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
शेवट्च वाक्य वाचल आणि ईंजिनीयरींगची वाया गेलीली चार वर्ष आठवली! गिल्ट (ईंग्रजीत कदाचित अपराधिकता असावा) जाणवणे फार वाईट. :(
छान!
मुक्तक आवडलं..
हलकेच घ्या, वरचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली पण.. कुणाला भूतकाळ आठवून गिल्ट आली तर कुणाला भविष्यात कशी दिसेन, काय होईल ह्याची चिंता.. :-)
बोरकर म्हणतात तसं. . उत्स्वी जीवन जगायचं... बस्स!
जगी घाण अन चिखलची सारा
कुणी म्हणो हे किती शहाणा
पदोपदी मज कमळ घालते
मृदगंधाचा नवा उखाणा !!
अवांतरः तारुण्यासाठी हल्ली विशेषतः नवकवितांमध्ये तरुणाई हा शब्द वापरला जातो, अंगावर पाल पडल्यासारखं वाटत :)
छान लिहिलय
छान लिहिलय :)
जे जे काही चांगले ते ते या
असहमत..
खूप काही वाईटदेखील वाट्याला येतं.. दुर्दैवाचे दशावतारही अनुभवायला लागतात हा स्वानुभव..
बाकी प्रकटन छान..
तात्या.
चांगले प्रकटन !!
चांगले प्रकटन !!
शुचिताई.. तुमचे वय किती ?
शुचिताई.. तुमचे वय किती ?
ए हॅट
In reply to शुचिताई.. तुमचे वय किती ? by पंख
बायकाना असले असांसदीय प्रश्न विचारतात काय? ;)
ठीक आहे.. त्यांना दुसर्या प्रकारे विचारतो..
In reply to ए हॅट by पैसा
शुचिताई, तुमच्या 'ह्यांचे' वय किती ?
किंवा..
शुचिताई, तुमची मुलं किती वर्षांची हो ?
हे चालेल!
In reply to ठीक आहे.. त्यांना दुसर्या प्रकारे विचारतो.. by पंख
उत्तर देणं न देणं शुचि च्या हातात!
प्रस्थापितांनी पुन्हा एकदा
प्रस्थापितांनी पुन्हा एकदा अतुलनीय लेखनाची अवांतराने लावलेली वाट पाहून एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.
प्रस्थापितांनी नवोदितांना गावकुसाबाहेर ढकलण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे चिंताजनक आहे.
प्लस वन
In reply to प्रस्थापितांनी पुन्हा एकदा by परिकथेतील राजकुमार
पर्याने गंमतीत लिहिले असले, तरी हे खरे आहे. (प्रस्थापित, नवोदित, अतुलनीय वगैरे वगळून वाचावे.)
लेख काय, प्रतिसाद काय !
असो.
मुक्तचिंतन आवडले.
बघा ना तारुण्य चे पार
In reply to प्लस वन by ज्ञानेश...
बघा ना :(
तारुण्य चे पार कारुण्य करुन टाकले आहे.
उत्साह ! संप्रेरके(
उत्साह ! संप्रेरके( हार्मोन्स?) सगळ खर शुची पण या नव तारुण्याला अनुभव नसल्यान कधी कधी फार अडचणी यउभ्या रहातात. तरुण मन मानत नाही अन तरीही ससेहोलपट सोसावे लागते.
बाकी लिहिलय अगदी गोड !!
ह्म्म ! पाचवीतला लेख
ह्म्म !
पाचवीतला लेख 'संप्रेरके' या शब्दाने दहावीमध्ये गेला.
>>प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो
हे वाक्य वाचून डोळे पाणावले :)