✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तारूण्य

श
शुचि यांनी
Fri, 10/22/2010 - 22:22  ·  लेख
लेख
तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्‍याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो. प्रत्येक सौंदर्यास्वाद अनुभवावासा वाटतो. जीवन हेच एक थ्रिल असतं. दिवसाचे २४ तास कमी पडत असतात. मोठा बहारीचा कालखंड असतो हा. हाच तो मोहक रस्ता ज्यावरून एकदा आणि एकदाच तुम्ही चालणार असता. प्रत्येकालाच परमेश्वर आरोग्य, सुंदर सकारात्मक विचार, स्वप्न, आशा यांची पुंजी तारूण्यात देतो. आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6778 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

छान मुक्तक. आवडलं. >>या

धमाल मुलगा
Fri, 10/22/2010 - 22:25 नवीन
छान मुक्तक. आवडलं. :) >>या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं. अगदी अगदी!
  • Log in or register to post comments

जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.

इंटरनेटस्नेही
Fri, 10/22/2010 - 22:26 नवीन
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना. (तरुण) इंट्या.
  • Log in or register to post comments

जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.

इंटरनेटस्नेही
Fri, 10/22/2010 - 22:26 नवीन
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना. (तरुण) इंट्या.
  • Log in or register to post comments

छानच लिहिलय! अगं, पण मला तो

रेवती
Fri, 10/22/2010 - 22:29 नवीन
छानच लिहिलय! अगं, पण मला तो प्रभो 'आज्जी' म्हणतो तर मुसू 'बाई' म्हणतात! तारुण्य लगेच संपलं असं वाटायला लागतं.
  • Log in or register to post comments

रेवती

पैसा
Fri, 10/22/2010 - 22:33 नवीन
पण तुला तसं वाटत नाही ना? मग झालं तर! तू त्याना 'काका' म्हणून बदला घे! हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

त्यांना काका म्हटलं असतं गं!

रेवती
Fri, 10/22/2010 - 22:42 नवीन
त्यांना काका म्हटलं असतं गं! पण आता उशीर झाला. मी उद्या काशीयत्रेला चाललिये.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

येताना ४ काळे गंडे आणी

प्रभो
Fri, 10/22/2010 - 23:13 नवीन
येताना ४ काळे गंडे आणी गंगेच्या पाण्याचे २ गडू घेऊन या...देव्हार्‍यात ठेवायला आमच्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आणखी काही

पैसा
Fri, 10/22/2010 - 23:17 नवीन
नको का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मी उद्या काशीयत्रेला चाललिये

सुहास..
Tue, 10/26/2010 - 00:11 नवीन
मी उद्या काशीयत्रेला चाललिये >>. अहो रेवती काकु , ऊद्या का ? आज का नाही ? एखादे काम झटदिशी करावे माणसाने (ईथे माणसानेचा अर्थ मानव-प्राण्याने असा आहे, पाशवी असा नाही !!) कल करे सो आज कर आक करे सो अभी ...वगैरै,वगैरै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मी पण

पैसा
Fri, 10/22/2010 - 22:46 नवीन
येते तुझ्याबरोबर! प्रभ्याने बघ घाबरून खव बंद करून ठेवल्येय.
  • Log in or register to post comments

काय वेळ आलीय कॉलेजातल्या

प्रभो
Fri, 10/22/2010 - 23:12 नवीन
काय वेळ आलीय कॉलेजातल्या शिक्षकांना अभ्यास करा म्हणून सांगायची.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

>>अफाट उत्साह, अमाप शक्ती,

स्वानन्द
Fri, 10/22/2010 - 22:46 नवीन
>>अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण यातलं ते संप्रेरक वगैरे सोडलं तर बाकी सालं काहीच खरं वाटत नाही माझ्या बाबतीत. कसं होणार आमचं!
  • Log in or register to post comments

छान मुक्तक.

शिल्पा ब
Fri, 10/22/2010 - 22:46 नवीन
छान मुक्तक.
  • Log in or register to post comments

रु

मिसळभोक्ता
Fri, 10/22/2010 - 22:48 नवीन
तारुण्य मध्ये रु र्‍हस्व असतो.
  • Log in or register to post comments

त्याचं तारू

प्रियाली
Fri, 10/22/2010 - 22:49 नवीन
तारुण्याचं तारू भरकटलं असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

त

मिसळभोक्ता
Fri, 10/22/2010 - 22:53 नवीन
तारुण्याचं तारू तारू एकच. ते तारुण्यात भरकटलं असेल. (तरीच!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

'दिर्घायुष्यात' र्‍हस्व कुठले

Nile
Fri, 10/22/2010 - 23:17 नवीन
'दिर्घायुष्यात' र्‍हस्व कुठले स्फुटायला? ;-) -चि. निळ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

'दिर्घायुष्यात' र्‍हस्व कुठले

Nile
Fri, 10/22/2010 - 23:17 नवीन
'दिर्घायुष्यात' र्‍हस्व कुठले स्फुटायला? ;-) -चि. निळ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

तारुण्य मध्ये रु र्‍हस्व

सुहास..
Tue, 10/26/2010 - 00:15 नवीन
तारुण्य मध्ये रु र्‍हस्व असतो. >>> चुकुन तारुण्यच्या एवजी तारुण्यामधे वाचल ना !! लई हसलो !! डोळ्यांना अजुनही योग्य ते दिसतय की, तुम्हाला आणी मलाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

किति मस्त दिवस आहेत हे.. ...

पर्नल नेने मराठे
Fri, 10/22/2010 - 23:10 नवीन
किति मस्त दिवस आहेत हे.. ... :) म्हातारी झाले तर कशी दिसेन, कुठे असेन, मिपावर येता येइल का (डो़ळ्यांना दिसेल का?) , न हजार भुन्गे सोडलेस ग शुची माझ्या डोक्यात. :(
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...

पंख
Sat, 10/23/2010 - 11:44 नवीन
तुम्ही अजूनही तरूण आहात हे कळले .. (स्वगत : बायका एकही चान्स सोडत नाही बॉ )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला

मुक्तसुनीत
Fri, 10/22/2010 - 23:14 नवीन
माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला. "कसे दिवस गेले काही समजलंच नाही नं !" - चिरतरुण मुसु.
  • Log in or register to post comments

ह्यावयातही तुमची मेमरी मात्र

Nile
Fri, 10/22/2010 - 23:18 नवीन
ह्यावयातही तुमची मेमरी मात्र एकदम बेस्ट आहे हो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

असेच म्हणतो

बेसनलाडू
Sat, 10/23/2010 - 00:10 नवीन
(सहमत)बेसनलाडू या लेखावरून हे आठवले. (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

>>आता एवढं सांगून फार उपदेश

रन्गराव
Fri, 10/22/2010 - 23:17 नवीन
>>आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं. शेवट्च वाक्य वाचल आणि ईंजिनीयरींगची वाया गेलीली चार वर्ष आठवली! गिल्ट (ईंग्रजीत कदाचित अपराधिकता असावा) जाणवणे फार वाईट. :(
  • Log in or register to post comments

छान!

उपास
Sat, 10/23/2010 - 00:52 नवीन
मुक्तक आवडलं.. हलकेच घ्या, वरचे प्रतिसाद वाचून गंमत वाटली पण.. कुणाला भूतकाळ आठवून गिल्ट आली तर कुणाला भविष्यात कशी दिसेन, काय होईल ह्याची चिंता.. :-) बोरकर म्हणतात तसं. . उत्स्वी जीवन जगायचं... बस्स! जगी घाण अन चिखलची सारा कुणी म्हणो हे किती शहाणा पदोपदी मज कमळ घालते मृदगंधाचा नवा उखाणा !! अवांतरः तारुण्यासाठी हल्ली विशेषतः नवकवितांमध्ये तरुणाई हा शब्द वापरला जातो, अंगावर पाल पडल्यासारखं वाटत :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलय

Dhananjay Borgaonkar
Sat, 10/23/2010 - 10:08 नवीन
छान लिहिलय :)
  • Log in or register to post comments

जे जे काही चांगले ते ते या

विसोबा खेचर
Sat, 10/23/2010 - 10:37 नवीन
जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते.
असहमत.. खूप काही वाईटदेखील वाट्याला येतं.. दुर्दैवाचे दशावतारही अनुभवायला लागतात हा स्वानुभव.. बाकी प्रकटन छान.. तात्या.
  • Log in or register to post comments

चांगले प्रकटन !!

अवलिया
Sat, 10/23/2010 - 11:16 नवीन
चांगले प्रकटन !!
  • Log in or register to post comments

शुचिताई.. तुमचे वय किती ?

पंख
Sat, 10/23/2010 - 11:46 नवीन
शुचिताई.. तुमचे वय किती ?
  • Log in or register to post comments

ए हॅट

पैसा
Sat, 10/23/2010 - 11:47 नवीन
बायकाना असले असांसदीय प्रश्न विचारतात काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख

ठीक आहे.. त्यांना दुसर्‍या प्रकारे विचारतो..

पंख
Sat, 10/23/2010 - 12:18 नवीन
शुचिताई, तुमच्या 'ह्यांचे' वय किती ? किंवा.. शुचिताई, तुमची मुलं किती वर्षांची हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे चालेल!

पैसा
Sat, 10/23/2010 - 12:24 नवीन
उत्तर देणं न देणं शुचि च्या हातात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख

प्रस्थापितांनी पुन्हा एकदा

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/23/2010 - 12:32 नवीन
प्रस्थापितांनी पुन्हा एकदा अतुलनीय लेखनाची अवांतराने लावलेली वाट पाहून एक मिपाकर म्हणुन शरम वाटली. प्रस्थापितांनी नवोदितांना गावकुसाबाहेर ढकलण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत हे चिंताजनक आहे.
  • Log in or register to post comments

प्लस वन

ज्ञानेश...
Mon, 10/25/2010 - 18:46 नवीन
पर्‍याने गंमतीत लिहिले असले, तरी हे खरे आहे. (प्रस्थापित, नवोदित, अतुलनीय वगैरे वगळून वाचावे.) लेख काय, प्रतिसाद काय ! असो. मुक्तचिंतन आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बघा ना तारुण्य चे पार

परिकथेतील राजकुमार
Mon, 10/25/2010 - 18:46 नवीन
बघा ना :( तारुण्य चे पार कारुण्य करुन टाकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...

उत्साह ! संप्रेरके(

स्पंदना
Mon, 10/25/2010 - 10:31 नवीन
उत्साह ! संप्रेरके( हार्मोन्स?) सगळ खर शुची पण या नव तारुण्याला अनुभव नसल्यान कधी कधी फार अडचणी यउभ्या रहातात. तरुण मन मानत नाही अन तरीही ससेहोलपट सोसावे लागते. बाकी लिहिलय अगदी गोड !!
  • Log in or register to post comments

ह्म्म ! पाचवीतला लेख

लिखाळ
Tue, 10/26/2010 - 00:06 नवीन
ह्म्म ! पाचवीतला लेख 'संप्रेरके' या शब्दाने दहावीमध्ये गेला. >>प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो<< हे वाक्य वाचून डोळे पाणावले :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा