तारूण्य
तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो. प्रत्येक सौंदर्यास्वाद अनुभवावासा वाटतो. जीवन हेच एक थ्रिल असतं. दिवसाचे २४ तास कमी पडत असतात. मोठा बहारीचा कालखंड असतो हा. हाच तो मोहक रस्ता ज्यावरून एकदा आणि एकदाच तुम्ही चालणार असता. प्रत्येकालाच परमेश्वर आरोग्य, सुंदर सकारात्मक विचार, स्वप्न, आशा यांची पुंजी तारूण्यात देतो.
आता एवढं सांगून फार उपदेश देत नाही पण एवढच सांगते या पुंजीचे संवर्धन, जोपासना, तिची वाढ तुम्ही करणार की विल्हेवाट लावणार हे तुमच्या त्या काळातील प्रत्येक कृतीवर अवलंबून असतं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान मुक्तक. आवडलं. >>या
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
जबरदस्त! प्रभावी शब्द रचना.
छानच लिहिलय! अगं, पण मला तो
रेवती
त्यांना काका म्हटलं असतं गं!
येताना ४ काळे गंडे आणी
आणखी काही
मी उद्या काशीयत्रेला चाललिये
मी पण
काय वेळ आलीय कॉलेजातल्या
>>अफाट उत्साह, अमाप शक्ती,
छान मुक्तक.
रु
त्याचं तारू
त
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले
'दिर्घायुष्यात' र्हस्व कुठले
तारुण्य मध्ये रु र्हस्व
किति मस्त दिवस आहेत हे.. ...
धन्यवाद ...
माझ्या कॉन्व्हेंटमधल्या मैत्रिणीचा ड्वायलाक् आठवला
ह्यावयातही तुमची मेमरी मात्र
असेच म्हणतो
>>आता एवढं सांगून फार उपदेश
छान!
छान लिहिलय
जे जे काही चांगले ते ते या
चांगले प्रकटन !!
शुचिताई.. तुमचे वय किती ?
ए हॅट
ठीक आहे.. त्यांना दुसर्या प्रकारे विचारतो..
हे चालेल!
प्रस्थापितांनी पुन्हा एकदा
प्लस वन
बघा ना तारुण्य चे पार
उत्साह ! संप्रेरके(
ह्म्म ! पाचवीतला लेख