✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Sun, 07/18/2010 - 23:29  ·  लेख
लेख
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते. साधारण दीड दोन महिन्यांपूर्वी प्राजुच्या 'फुलांची आर्जवे' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला हजर रहायचा योग आला होता. तेव्हाच या अल्बमचा प्रकाशन सोहळाही लवकरच होणार आहे असे कळले होते. तेव्हा पासून या कार्यक्रमाची वाट बघणे चालू होते. मध्यंतरी, प्राजुने हा सोहळा १८ जुलैला पुण्यात होणार आहे असे कळवले आणि बर्‍याच लोकांकडून 'या समारंभाला हजर राहू' अशा अर्थाचे निरोप मिळाले. या निमित्ताने प्राजुला प्रत्यक्षात भेटायची संधी मिळणार होती आणि आपल्या मैत्रिणीचे कौतुक करायला जातीने हजर रहायचेच असे तेव्हाच ठरवले. निरोप आले, निरोप दिले गेले. प्ल्यानिंग झाले आणि आम्ही १८ जुलैला सकाळी पत्रकार भवन, पुणे इथे जमलो. मी, अदिती, परा, पेठकर काका, राजे, चंद्रशेखर महामुनी, सोनाली घाटपांडे, प्रकाश घाटपांडे, मनिष, पुण्याचे पेशवे, दत्ता काळे, लिखाळ, शाल्मली, टार्‍या, राजेश घासकडवी, धम्या, अविनाश कुलकर्णी, श्रावण मोडक, मराठमोळा अशी दणदणीत उपस्थिती होती. प्राजु जातीने स्वागत करून गेली. कार्यक्रम बरोब्बर १० ला सुरू होणार असल्याने बरेच लोक १०.३० पर्यंत आले. त्यामुळे आमच्या सारख्या टैमवर आलेल्या लोकांना जिन्यात उभे राहून धिंगाणा करायला वाव मिळाला. आल्यागेल्या लोकांवर लक्ष ठेवत, आम्ही जिन्यात गर्दी करून उभे होतो. एक दोन पुणेरी आज्यांनी आमच्याकडे थोडा जळजळीत कटाक्ष टाकून आम्ही लोकांना अडचण करतो आहोत हे आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला खरा. पण काही अस्सल पुणे-३० लोकही आमच्यातच असल्याने ते कटाक्ष रामानंद सागरच्या रामायणातल्या बाणांप्रमाणे मोडून पडले. शिवाय प्राजुच्या नात्यातले लोक सोडले तर एकगठ्ठा अशी आमचीच व्होटब्यांक असल्यामुळे प्राजु पण आमच्या दंग्याकडे कानाडोळा करून होती. ;) कार्यक्रम १०.३० ला मात्र अगदी सुरूच झाला. कार्यक्रमाला बरेच ओळखीचे चेहरे दिसत होते. काही चेहरे टीव्ही आणि चित्रपटातून दिसणारे तर काही जालावर दिसणारे. बर्‍याच मराठी कार्यक्रमातून किंवा चित्रपटातून दिसणारे, प्रसिद्ध कलाकार श्रीरंग गोडबोले आणि नटरंग या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव हे या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची धुरा मंजुश्री गोखले यांनी सांभाळली. सुरूवातीला प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांचे दोन शब्द वगैरे झाले आणि कार्यक्रमाला खर्‍या अर्थाने सुरूवात झाली ती अल्बम मधल्या गाण्यांच्या आणि त्या गाण्यांवर केलेल्या सुंदर नृत्यांच्या सादरीकरणाने. पौलमी पेठे, अमृता काळे, मधुरा दातार, संगिता चितळे इत्यादी कलाकारांनी अल्बम मधली गाणी पेश केली. प्राजुनेही तिचे मनोगत व्यक्त केले. तिच्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण ती आमच्या सर्वांबरोबर वाटून घेत होती... अतिशय भावनाविवश झाली होती. काय बोलू आणि काय नको असे झाले होते तिला. सगळ्या आभारप्रदर्शानात तिने आपणा सगळ्या जालिय मित्रमंडळींचे खास आभार मानले. त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट (आम्हीच केलेला) सगळ्यात जास्त होता. ;) प्राजुचे पती आणि अल्बमचे निर्माते जगदीश पाहुण्यांचे स्वागत करताना. अमृता का़ळे संगिता चितळे पौलमी पेठे प्राजु आणि जालिय मैत्रिण शाल्मली नक्की किती मोठे व्हायचे त्याचे परिमाण सांगताना श्रावण मोडक आणि बाजूला आज्ञाधारक अभ्यासू लिखाळ भावोजी. लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड. आधुनिक भरतभेट किंवा शिवाजी-अफझलखान भेट. अवघडलेल्या अवस्थेतही जीवाच्या भितीमुळे बळंच कसं हसावं याचा वस्तुपाठ देताना परा शूर‍ आम्ही सरदार.... बाजीराव पेशवे (पहिले की दुसरे ते अजून नक्की कळले नाहीये. माणूस बेरकी आहे. कळू देत नाही.) हात जायबंदी करून घेताना प्राजु... पुणेरी इंगा बघितलेला राजेश घासकडवी पुणेरी इंगा दाखवणार्‍या परा बरोबर... आम्हाला काय ब्वॉ कोणी नेलं नाही कधीच समर्थ भोजनालयात, म्हणून मग आम्हीच गेलो आणि फोटो काढून हौस भागवली. मागे आमचे आधारस्तंभ (पहिले का दुसरे) बाजीराव ऊर्फ पुण्याचे पेशवे. कोपर्‍यात अर्धा मराठमोळा आणि मागे (काकूंना घाबरून) तोंड लपवत पेठकर काका. ऑटोग्राफ घ्यायच्या निमित्ताने पुढे पुढे करताना परा, मनिष, आदिती आणि आपल्याला हे असं का नाही सुचत या विचाराने व्यथित टार्‍या. एकंदरीत कार्यक्रम सुरेखच झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच भेटता आले बर्‍याच दिवसांनी. शिवाय या निमित्ताने काही जालिय भरतभेटी झाल्या, जुने मित्र परत भेटले. आपुलकीने चौकशी झाली, विचारपूस झाली. मजा आली. काही लोकांना जायची घाई असल्याने ते पळाले. आमच्या सारखे काही निरूद्योग लोक आता एकत्रच जेवू म्हणून एका हाटेलाकडे प्रयाण करते झाले. तिथेही दंगा झालाच भरपूर. विचारविनिमय. नंतर म्हणत होता टार्‍या की हेल्मेट सोडून देणार होता... एका फटक्यात काम तमाम. टार्‍या त्याच्या खेळण्याबरोबर. भाळी चंद्र असे धरिला... वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख विद्वज्जनांना अन्नदान केल्याचे पुण्य मोजताना पेठकर काका. संध्याकाळच्या बैठकीचे नियोजन करताना मंडळी. पेठकर काकांच्या आधाराने (कसाबसा) उभा असलेला राजे. ;) *** प्राजुच्या निमित्ताने असेच अजून बरेच प्रसंग आम्हाला उपभोगायला मिळो हीच इच्छा. कीप इट अप, प्राजु. :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19548 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

लै मिस

विजुभाऊ
Mon, 07/19/2010 - 14:06 नवीन
लै मिस केले राव. राजे आणि बिपीनशी फोनवर बोलणे झाले आणि कळाले की आपण नक्की कायकाय मिस केले.....:( अंथरूण पाहून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० पसरण्यापेक्षा अंथरूण घेतानाच नीट पाहून घ्यावे Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद बिका आणि अदिती

गणपा
Mon, 07/19/2010 - 14:17 नवीन
वाह मस्तच झालेला दिसतोय कार्यक्रम कम कट्टा. त्या निमित्ताने आम्हाला आचे बरेच जालिय मित्रांच परत दर्षन झालं. >>लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड. नीट पहा हो बिकाजी आम्हाला तुमचीच जान खतरे में दिसतेय ;)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

ब्रिटिश टिंग्या
Mon, 07/19/2010 - 17:47 नवीन
अभिनंदन प्राजु! - टिंग्या
  • Log in or register to post comments

मस्त रे

रेवती
Mon, 07/19/2010 - 17:59 नवीन
मस्त रे बिका! छान लिहिलास वृत्तांत! आम्हाला तिथे हजर न राहताही कार्यक्रमाचा आनंद मिळाला (थोडा!;)). सगळ्या मिपा जमावाचे फोटू पाहून आनंद झाला. प्राजु परत आली की आम्हाला तिच्याकडूनही कार्यक्रमाच्या आठवणी ऐकायला मिळतील. रेवती
  • Log in or register to post comments

मस्त वर्णन

प्रभो
Mon, 07/19/2010 - 18:58 नवीन
मस्त वर्णन बिकाशेठ...... प्राजुतै चे अभिनंदन.... तिच्यकडून आल्यावर पार्टी घेऊच... ;)
  • Log in or register to post comments

मस्त...वर्णन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/19/2010 - 19:21 नवीन
बिका, कार्यक्रमाचा वृत्तांत मस्त डकवलाय. धन्यु.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अभिनंदन

आनंदयात्री
Mon, 07/19/2010 - 19:30 नवीन
अभिनंदन प्राजु !! आणि कार्यक्रमाला हजेरी न लावता आल्याबद्दल माफी सुद्धा मागतो. बिका वृत्तांताला नाव फार छान दिलेस, यानिमित्ताने तु काहीतरी लिहलस तरी !
  • Log in or register to post comments

क्या बात

टिउ
Mon, 07/19/2010 - 19:33 नवीन
क्या बात है! सोहळा मस्तच झाला असणार...दंगा पण सॉलीड झालाय, फोटोवरनं कळतंय... अभिनंदन प्राजुतै! :)
  • Log in or register to post comments

या निमित्ताने

jaypal
Mon, 07/19/2010 - 19:40 नवीन
सर्वात आधी प्राजू आणि जगदिश यांचे आभिनंदन.. =D> =D> =D> बिका सुंदर वृतांत आणि सही बोलके फोटो. नयेऊन लै (जणांना) मिस केल राव. असो. "वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख" यां माझ्या कडुन सप्रेम भेट Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

वा ! छान

लिखाळ
Mon, 07/19/2010 - 19:41 नवीन
वा ! छान वृत्तांत, छान फोटो (मी ज्यात आहे ते अजूनच छान :) ) प्राजुचे पुन्हा अभिनंदन!! -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
  • Log in or register to post comments

प्राजुतै

ब्रिटिश
Mon, 07/19/2010 - 21:12 नवीन
प्राजुतै मनापास्न आभिनंदन. याला जमल आसता त मोट्या मोट्या लोकांना भेटाला मिल्ला आसत. मिथुन काशिनाथ भोईर
  • Log in or register to post comments

झक्कास

क्रान्ति
Mon, 07/19/2010 - 23:17 नवीन
वृत्तांत बिपिनदा. फोटूचे टायटल्स तर लैच भारी! या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोर मिपाकर मंडळींचं [फोटूत का होईना!] दर्शन घडलं. =D> अदिती, क्लिप्सबद्दल धन्स. :) प्राजु, पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. =D> क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

स्वाती२
Mon, 07/19/2010 - 23:21 नवीन
अभिनंदन प्राजु! छान वृत्तांत बिपिनदा. अदिती क्लिप्स बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्राजुचे

भडकमकर मास्तर
Mon, 07/19/2010 - 23:51 नवीन
प्राजुचे अभिनन्दन आणि एकदम मस्त वृत्तान्त.... फोटो झभरडस्ट आहेत... विशेषतः टार्‍या आणि परा ... अगदी फोटोशॉप वापरल्यासारखं वाटतंय....
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अंतु बर्वा
Tue, 07/20/2010 - 01:31 नवीन
अभिनंदन प्राजु..!!
  • Log in or register to post comments

सर्वांचे

प्राजु
Tue, 07/20/2010 - 10:43 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. आपण सर्वजण उपस्थित राहिलात.. त्यामुळे कार्यक्रमाला चांगली रंगत आली. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments

सुरेख वृत्तांत!

पिवळा डांबिस
Tue, 07/20/2010 - 11:06 नवीन
सर्व संबंधितांचे अभिनंदन!!! फोटोही झकास उतरले आहेत!!! या आनंददायी प्रसंगाच्या निमित्ताने श्री. टारझन यांचं डिसमिसल रद्द करता येणार नाही का? जर समारंभाला आणि मिपावरच्या फोटोसाठी त्यांची उपस्थिती चालते तर मेंबरशिप दिल्यानेच असा काय विशेष अनर्थ होणार आहे? या सर्व गोड समारंभ वर्णनांत तेव्हढाच एक मिठाचा खडा असल्यागत लागत होतं.... चुका सगळ्यांकडून कधी ना कधी होतात... त्या सांभाळून घेतो तो खरा ज्ञाता!!!! बघा, जरा विचार करा.... आपला, पिडां
  • Log in or register to post comments

कार्यक्रम उच्च

संदीप चित्रे
Wed, 07/21/2010 - 01:55 नवीन
आणि दंगाही उच्च झालेला दिसतोय. आता प्राजु इथे आली की लवकरच सीडी हातात पडेल आणि गाणी ऐकता येतील :)
  • Log in or register to post comments

सुरेख वर्णन

शहराजाद
Wed, 07/21/2010 - 05:14 नवीन
सुरेख वर्णन व छायाचित्रं.
  • Log in or register to post comments

प्राजुताई

आमोद शिंदे
Wed, 07/21/2010 - 06:09 नवीन
प्राजुताईंचे जोरदार अभिनंदन. सीडी आणि पुस्तके कुठे मिळतिल?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा