अनावर (अद्ययावत)
लेखनप्रकार
एखाद्या धुंद सायंकाळी पश्चिमा केशराने माखलेली असताना
गुलमोहोर माणकासारख्या जर्द लाल फुलांनी डवरलेला, बहरलेला असताना,
तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा,
डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय.
एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे,
तळ्यातलं शुभ्र कमळ आपले ओठ उघडून,
पहील्यांदा आकाश चुंबत असेल तो क्षण तुझ्यासमवेत टिपायचाय.
जमलं तर कधी डोंगरमाथ्यावर,
रात्री लक्ष लक्ष तारका पहात जागरण करायचय.
अफाट आकाशगंगेत हरवून जायचय तुझ्या सोबत.
खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही.
एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही.
तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार
पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद
अन माझी स्थिती नेहमी
"अनंतहस्ते कमलावराने
देता किती घेशील दो कराने"
वाचने
5547
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
विडंबन करण्यासाठी उत्तम. (विडंबनासाठी माझी बौध्धिक पातळी नाही, नाहीतर मीच केले असते.) लोकहो, येउद्यात.
कविता "तुझे गीत गाण्यासाठी" आठवली.
अजुन येउ दे!
शेवटच्या दोन तीन ओळीत निसर्गाबद्दल काव्य आहे असे वाटते पण सुरवातील मात्र "ऐसा समा ना होता, कुछ भी यहा ना होता, मेरे हमराही गर तुम ना होते" तसे असेल तर हे पण कोंबडी आधी की अंडे प्रकार झाला. :-)
मुक्तक आवडले.
चांगलं लिहिलयं..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
आवडले.
यांचं बेमालूम मिश्रण.
अप्रतिम मुक्तक..!
तात्या.


दिसामाजी काहीतरी ते लिहावे....
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
In reply to दिसामाजी by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) =)) =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
उत्कृष्ट वर्णन...
हे कशाचे वर्णन आहे ओळखा पाहू...
तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार
पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद
अन माझी स्थिती नेहमी "घेता किती घेशील दो कराने"
अर्थात माझा लाडका डिजिटल एसएलआर क्यामेरा
अर्थात माझा लाडका डिजिटल एसएलआर क्यामेरा
छान.
जेव्हा क्यामेर्याला हातात धरून मी सूर्यास्ताचा फोटू काढला होता...
तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा,
डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय.


In reply to जेव्हा by भडकमकर मास्तर
आता शुचि=मास्तर असा गौप्यस्फोट होतोय की काय? ;)
In reply to आता by मनिष
ठ्यॉऽऽऽऽऽऽऽऽऽ
In reply to आता by मनिष
या प्रतिसादाला एक लाख टाळ्या!!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
In reply to आता by मनिष
हाणतेज्यायला !! एकदम धरुन फट्याक..
बाकी मास्तर काल काय जयपाल बरोबर २/२ घोट घ्यायला बसले होते का काय ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
In reply to आता by मनिष
=)) =)) =))
-Nile
आत्ता ओळी आठवल्या - "अनंतहस्ते कमलावराने
देता किती घेशील दो कराने"
त्या घात्ल्या आहेत.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
मस्त कविता गं शुचे !! आपल्याला डँम्म आवडेश :)
आवडली!!
:S
वेताळ
कविता अन मास्तरांचे फोटो दोन्ही छान.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही.
एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही.
तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार
पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद
Wow शुची,
तु खरच Eternal Romantic (मराठी ?? ) आहेस . तुझे सहज सुंदर मुक्तक खुप आवडले.
I just wish your soul-mate is just like you, Enjoying each moments of your companionship :-)
तुझ्यातली आई ही मला आवडते अन जीव ओवाळून टाकणारी प्रियसी , पत्नी देखिल !
Hopefully, तुझा नवरा देखिल तुझ्यासाठी तुझ्या सारखाच असावा :-)
नसेल, तर तु त्याला तुझ्या इतक्काच Romantic बनव ;-)
~ वाहीदा
उत्तम