Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on गुरुवार, 07/01/2010 - 00:54
एखाद्या धुंद सायंकाळी पश्चिमा केशराने माखलेली असताना गुलमोहोर माणकासारख्या जर्द लाल फुलांनी डवरलेला, बहरलेला असताना, तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा, डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय. एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे, तळ्यातलं शुभ्र कमळ आपले ओठ उघडून, पहील्यांदा आकाश चुंबत असेल तो क्षण तुझ्यासमवेत टिपायचाय. जमलं तर कधी डोंगरमाथ्यावर, रात्री लक्ष लक्ष तारका पहात जागरण करायचय. अफाट आकाशगंगेत हरवून जायचय तुझ्या सोबत. खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही. एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही. तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद अन माझी स्थिती नेहमी "अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने"
  • Log in or register to post comments
  • 5533 views

प्रतिक्रिया

Submitted by उपाशी बोका on गुरुवार, 07/01/2010 - 01:35

Permalink

उत्तम

विडंबन करण्यासाठी उत्तम. (विडंबनासाठी माझी बौध्धिक पातळी नाही, नाहीतर मीच केले असते.) लोकहो, येउद्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 07/01/2010 - 08:11

Permalink

मंगेश पाडगावकरांची

कविता "तुझे गीत गाण्यासाठी" आठवली.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 07/01/2010 - 08:17

Permalink

छान

अजुन येउ दे! शेवटच्या दोन तीन ओळीत निसर्गाबद्दल काव्य आहे असे वाटते पण सुरवातील मात्र "ऐसा समा ना होता, कुछ भी यहा ना होता, मेरे हमराही गर तुम ना होते" तसे असेल तर हे पण कोंबडी आधी की अंडे प्रकार झाला. :-) मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 07/01/2010 - 09:17

Permalink

चांगलं

चांगलं लिहिलयं.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 07/01/2010 - 09:22

Permalink

आवडले.

आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 07/01/2010 - 09:24

Permalink

प्रीती व भक्ती

यांचं बेमालूम मिश्रण.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 07/01/2010 - 10:37

Permalink

अप्रतिम

अप्रतिम मुक्तक..! तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/01/2010 - 10:42

Permalink

दिसामाजी

दिसामाजी काहीतरी ते लिहावे.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 07/01/2010 - 10:50

In reply to दिसामाजी by परिकथेतील राजकुमार

Permalink

*****************************

=)) =)) =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 07/01/2010 - 15:02

Permalink

उत्कृष्ट

उत्कृष्ट वर्णन... हे कशाचे वर्णन आहे ओळखा पाहू... तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद अन माझी स्थिती नेहमी "घेता किती घेशील दो कराने" Image removed. अर्थात माझा लाडका डिजिटल एसएलआर क्यामेरा
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 07/01/2010 - 15:02

Permalink

छान.

छान.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 07/01/2010 - 15:05

Permalink

जेव्हा

जेव्हा क्यामेर्‍याला हातात धरून मी सूर्यास्ताचा फोटू काढला होता... तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा, डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 07/01/2010 - 15:14

In reply to जेव्हा by भडकमकर मास्तर

Permalink

आता

आता शुचि=मास्तर असा गौप्यस्फोट होतोय की काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 07/01/2010 - 15:20

In reply to आता by मनिष

Permalink

ठ्यॉऽऽऽऽऽ

ठ्यॉऽऽऽऽऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 07/01/2010 - 17:16

In reply to आता by मनिष

Permalink

एक लाख

या प्रतिसादाला एक लाख टाळ्या!!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/01/2010 - 18:03

In reply to आता by मनिष

Permalink

हाणतेज्या

हाणतेज्यायला !! एकदम धरुन फट्याक.. बाकी मास्तर काल काय जयपाल बरोबर २/२ घोट घ्यायला बसले होते का काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 07/02/2010 - 09:31

In reply to आता by मनिष

Permalink

-Nile

=)) =)) =)) -Nile
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on गुरुवार, 07/01/2010 - 18:55

Permalink

आत्ता ओळी

आत्ता ओळी आठवल्या - "अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने" त्या घात्ल्या आहेत. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 07/01/2010 - 19:00

Permalink

मस्त कविता

मस्त कविता गं शुचे !! आपल्याला डँम्म आवडेश :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/01/2010 - 19:07

Permalink

आवडली!!

आवडली!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 07/01/2010 - 19:10

Permalink

.....

:S वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 07/01/2010 - 22:26

Permalink

कविता अन

कविता अन मास्तरांचे फोटो दोन्ही छान. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on गुरुवार, 07/01/2010 - 23:19

Permalink

थोडासा रुमानी हो जाए !

खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही. एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही. तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद Wow शुची, तु खरच Eternal Romantic (मराठी ?? ) आहेस . तुझे सहज सुंदर मुक्तक खुप आवडले. I just wish your soul-mate is just like you, Enjoying each moments of your companionship :-) तुझ्यातली आई ही मला आवडते अन जीव ओवाळून टाकणारी प्रियसी , पत्नी देखिल ! Hopefully, तुझा नवरा देखिल तुझ्यासाठी तुझ्या सारखाच असावा :-) नसेल, तर तु त्याला तुझ्या इतक्काच Romantic बनव ;-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com