एखाद्या धुंद सायंकाळी पश्चिमा केशराने माखलेली असताना
गुलमोहोर माणकासारख्या जर्द लाल फुलांनी डवरलेला, बहरलेला असताना,
तुझा हात हातात घेऊन तो तेजाचा गोळा,
डोंगररांगांखाली बुडताना पहायचाय.
एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे,
तळ्यातलं शुभ्र कमळ आपले ओठ उघडून,
पहील्यांदा आकाश चुंबत असेल तो क्षण तुझ्यासमवेत टिपायचाय.
जमलं तर कधी डोंगरमाथ्यावर,
रात्री लक्ष लक्ष तारका पहात जागरण करायचय.
अफाट आकाशगंगेत हरवून जायचय तुझ्या सोबत.
खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही.
एवढ्याशा कुडीत तुझ्याबद्दलचं प्रेम, भावना मावतच नाही.
तू दिसतोस, भासतोस सगुण , साकार
पण जाणवतोस निराकार, अथांग, अमर्याद
अन माझी स्थिती नेहमी
"अनंतहस्ते कमलावराने
देता किती घेशील दो कराने"
वाचने
5555
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
मंगेश पाडगावकरांची
छान
चांगलं
आवडले.
प्रीती व भक्ती
अप्रतिम
दिसामाजी
*****************************
In reply to दिसामाजी by परिकथेतील राजकुमार
उत्कृष्ट
छान.
जेव्हा
आता
In reply to जेव्हा by भडकमकर मास्तर
ठ्यॉऽऽऽऽऽ
In reply to आता by मनिष
एक लाख
In reply to आता by मनिष
हाणतेज्या
In reply to आता by मनिष
-Nile
In reply to आता by मनिष
आत्ता ओळी
मस्त कविता
आवडली!!
.....
कविता अन
थोडासा रुमानी हो जाए !