Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 01/28/2010 - 16:36
  • Log in or register to post comments
  • 14190 views

प्रतिक्रिया

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 01/28/2010 - 16:38

Permalink

आम्ही

आम्ही फ्लिकरवरती अपलोड केलेली चित्रे दिसत नाहीत ... सारे प्रयत्न करून पाहिले... मदत द्या... _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 01/28/2010 - 16:41

Permalink

कन्नथिल

कन्नथिल मुथ्थुमित्ताल या नावाचा अर्थ ढोबळमानाने ( गालावरचा पापा) असा काहीसा होतो म्हणे... मात्र उच्चार स्पेलिंगप्रमाणे लिहिला आहे... चुकला असल्यास माफ करा आणि दुरुस्ती करावी...
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 01/28/2010 - 17:04

Permalink

०१ साली

०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा>>>>>>>>>> =)) =)) =)) परिक्षण आवडल. आता बघेन म्हणतोय पण सापडणार कुठे काय माहिती. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 01/28/2010 - 17:22

Permalink

दोनेक

दोनेक महिन्यांपूर्वी बघितला होता. खरच चांगला सिनेमा आहे. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 01/28/2010 - 18:50

Permalink

अरेरे

मधे कधीतरी कुठलातरी चॅनेल बदलताना हा सिनेमा एका आडवाटेतल्या चॅनेलवर चालू होता असे आठवते. ह्या सिनेमात श्रीलंकेतील कॉन्टॅक्ट / पोलीस/ मदतनीस भूमीकेत प्रकाशराज नावाचा नट आहे ना? एका मोकळ्या मैदानातून लोक स्थलांतर करत आहेत, मग गोळीबार का सुरुंग असे काही सिन आहेत का? असो नेक्स्ट टाईम. धन्यु मास्तर.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 01/29/2010 - 00:34

In reply to अरेरे by सहज

Permalink

करेक्ट

करेक्ट.. प्रकाशराज आहे... तोच सिनेमा तो... _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 01/28/2010 - 19:16

Permalink

चित्रपट

चित्रपट बघायची खूप उत्सुकता लागून राहिली आहे आता. मास्तर, चित्रपट मिळेल का बघायला? अवांतर: चित्रं सुधारली आहेत. आता सगळ्यांना दिसावीत बहुतेक. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 01/28/2010 - 20:51

In reply to चित्रपट by बिपिन कार्यकर्ते

Permalink

बिपिन अरे मी

नेटफ्लिक्सवर बघितला. इंग्रजी नामकरण "A Peck on the cheek" असं आहे. अप्रतिम सिनेमा. सर्वांचे अभिनय दृष्ट लागण्याजोगे आहेत. लहानगी कीर्तना तर सर्वात भावली. सिंहली-तमिळ वांशिक संघर्षाची स्फोटक पार्श्वभूमी असूनही मणिरत्नमने खूपच संयमित हाताळणी केली आहे त्याबद्दल त्याचे कौतुक वाटते. चुकवू नये असा सिनेमा. (ह्या सिनेमाबद्दल लिहिण्याचे मनात होते पण वेळाचे गणित जमेना. माझे काम केल्याबद्दल धन्यवाद मास्तर! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 01/28/2010 - 20:59

In reply to बिपिन अरे मी by चतुरंग

Permalink

नेटक्लिक्स

परीक्षण वाचून चित्रपट बघावासा वाटतो आहे. नेटफ्लिक्स वरती मागवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on गुरुवार, 01/28/2010 - 21:31

In reply to नेटक्लिक्स by धनंजय

Permalink

चांगले परीक्षण

चांगले परीक्षण झाले आहे. लगेच बघावासा वाटला. चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचीच कामे/अभिनय दृष्ट लागण्याजोगे आहेत. तुनळीवर सगळे भाग नाहीत, पण गुगल व्हिडीयोवर आहे - दुवा
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 01/29/2010 - 07:52

In reply to चांगले परीक्षण by सखी

Permalink

धन्यवाद ,

धन्यवाद , सखी. लगेच उतरवऊन घेतला आहे. महून मधून बघितला पण. मास्तर, चित्रपट खरंच उच्च आहे. धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 01/29/2010 - 00:44

In reply to चित्रपट by बिपिन कार्यकर्ते

Permalink

चित्रे

चित्रे सुधारून दिल्याबद्दल धन्यवाद... ... चित्रपट नेटफ्लिक्सवरती उपलब्ध आहे म्हणताहेत रंगाकाका.. _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 01/28/2010 - 21:04

Permalink

चुरचुरीत आणि संक्षिप्त परिचय

श्री मास्तर, चुरचुरीत आणि संक्षिप्त परिचय आवडला. धनंजयप्रमाणे मीही नेटफ्लिक्स रांगेत लावला आहे. इंग्रजी नाव दिल्याबद्दल श्री चतुरंग यांचे आभार. I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 01/28/2010 - 21:34

In reply to चुरचुरीत आणि संक्षिप्त परिचय by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

नेटफ्लिक्सवर

थेट ऑनलाइनही बघता येईल. चकतीची वाट बघावी लागणार नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on गुरुवार, 01/28/2010 - 21:39

In reply to नेटफ्लिक्सवर by चतुरंग

Permalink

तिकडेच

रांगेत लावला आहे. (आधीचे बरेच पहायचे आहेत.) ............................. मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Fri, 01/29/2010 - 00:03

Permalink

तमिळतज्ञ ,संगीतप्रेमी हैयोहैयैयो यांची करामत

मित्र हो, "कन्नथिल मुथ्थुमित्ताल" या तमिळ सिनेमातील रेहमाननी म्हटलेल्या एका गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आपल्या साईटवरील तमिळतज्ञ हैयोहैयैयो यांनी त्या तमिळ गीताचा मराठीत अनुवाद करून ते गीत ए. आर.रहमान यांनी मराठीत गावे असा प्रेमळ आग्रह केला आहे. त्याला मान्यता देऊन ते गीत मराठीत गायला सोपे व्हावे म्हणून पुण्यातील वाद्यवृंदासमावेत प्रसिद्ध गायक श्री.ह्रषिकेश रानडे यांनी गाऊन त्या गीताला तयार केले आहे.काही कारणांनी ते गीत अद्याप मराठीतून रहमानांच्या आवाजात ऐकायला मिळायचा योग आलेला नाही. लवकरच तो येवो. मी हैयोंना विनंती करतो की त्यानी ते गीत व त्याची ध्वनी फीत या इथे जरूर संलग्न करावी. शशिकांत
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 01/29/2010 - 00:38

In reply to तमिळतज्ञ ,संगीतप्रेमी हैयोहैयैयो यांची करामत by शशिकांत ओक

Permalink

या

या माहितीबद्दल धन्यवाद... जरूर ते गाणे येथे चढवावे.. प्रतीक्षेत आहे _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 01/29/2010 - 06:51

Permalink

अप्लोड

गान अप्लोड करावे चे "चढवावे" भाषान्तर लै मस्त :P शिवाय या सिनेमात दलपती, रोजा,गुरू सारखं म्हातार्‍या खेडुत बायांचा नाच नाहीये ते एक बरं आहे =)) =)) =)) शिणुमा थोडा गम्भीर हाये .... मला पचायचा न्हाइ. पन परीक्शनाची इश्टाईल लै आवडली. *************** आम्ही काय कुणाचे खातो तो र्आम अम्हाला देतो
  • Log in or register to post comments

Submitted by फारएन्ड on Fri, 01/29/2010 - 07:12

Permalink

परिचयाबद्दल धन्यवाद

छान लिहीले आहे. बघायला पाहिजे हा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 01/29/2010 - 07:28

Permalink

छान

छान परिचय. रेहमानच्या आवाजात मराठी गाणे ऐकायची उत्सुकता आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/29/2010 - 07:49

Permalink

परिक्षण

परिक्षण आवडले... :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

Submitted by कालिन्दि मुधोळ्कर on Fri, 01/29/2010 - 13:01

Permalink

कण्णतिल

कण्णतिल मुत्तमिटाळ मधले एक अप्रतिम गाणे. ह्याचे शब्द/अर्थ अत्यंत आर्त आहे. कदाचित हैयो हैयैयो अनुवाद देऊ शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 01/29/2010 - 13:17

Permalink

वावा..

मास्तर ,परीक्षण आवडले. चित्रपट पहायची उत्सुकता आता वाढली आहे,वर दुवे आहेत, आता लवकरच पाहते. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 01/30/2010 - 16:55

Permalink

चाबूक परिक्षण !

कीर्तना या लहानगी चे चेहर्यावरील हावभाव अप्रतिम ! त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड म्हणून ) =)) =)) ०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा , असे एक मत वाचले =)) =)) =)) =)) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sat, 01/30/2010 - 18:18

Permalink

छान

छान परिक्षण! आता वेळ काढून नक्की बघणार.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Sun, 01/31/2010 - 07:55

Permalink

बर्‍याच दिवसांनी मास्तर भेटले

उत्तम परिक्षण! मास्तरांनी सुचविलेला पिक्चर वा नाटक सहसा बेकार मामला असत नाही (बारा वर्षांची तपश्चर्या!) पाहिला पाहिजे..
  • Log in or register to post comments

Submitted by हैयो हैयैयो on Sun, 01/31/2010 - 16:07

Permalink

मराठीकरणामागील सारांश + मिपाकरांस आवाहन!

मराठीकरणामागील सारांश + मिपाकरांस आवाहन! श्रीलंकेमध्ये इ.स. २००१ चे घनघोर नागरी युद्ध आरंभिले जावून अनेक निष्पाप नागरिकांचे निष्कारण बळी गेले. सदरचे युद्ध चालू असताना होणार्‍या नरसंहारामुळे मद्देशीयसुहृद्विद्वान श्री. ए.आर. रहमान अत्यंत उद्विग्न झाले होते, आणि त्या मनस्थितीत त्यांनी 'कन्नत्तिल मुत्तमिट्टाल' ह्या चलच्चित्रपटासाठी सदरील गीताची रचना केली. त्यास श्री. वैरमुत्तु ह्यांचे अत्यंत परिणामकारक शब्दही जोडीस लाभले. हे गीत निरागस भावनांचे प्रकटीकरण म्हणून पडद्यावर येते....... मध्यंतरीची कथा श्री. ओक सरांनी लिहिल्याप्रमाणे. ......दीदींनी "हैयो, ह्याच गाण्यासारखी रहमानची आणि इळैयराजाची इतर ७-८ गाणी - जी मराठी लोकांना माहिती नसतील ती - मराठीत करून तमिळ संस्कृतीची मराठी लोकांना एक ओळख करून देण्याचा एक प्रयत्न करा" असा आदेश अत्यंत प्रेमळ आवाजात दिला आहे. ...त्यानुसार जसा वेळ मिळेल तसे काम चालु आहे. ह्या सार्‍या कार्यक्रमास कमीतकमी साधारण ३० लाख रु. खर्च येईल अशी अपेक्षा आहे. मिपाकरांनी सढळहस्ते मदत करावी! ;-) ----------- हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments

Submitted by शशिकांत ओक on Mon, 02/01/2010 - 20:42

Permalink

श्री.हैयोह

श्री.हैयोहैयैयो व अन्य मित्र हो, अभिनंदन!!! दीदींच्या आशीर्वादानेच हे शक्य आहे. आम्हाकडून शक्य तितकी मदत होईलच. आपला दीदींशी कसा व कोणत्या कारणाने संपर्क घडला हे जाणण्याची मिपाकरांना उत्सुकता आहे. कळवावे. शिवाय हक्काभंगाची चौकट न मोडता त्या गीताचे मराठीबोल सादर करायला विनंत करतो. शशिकांत
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com