मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्यू.पी.एस (QPS) आणि पी.आय.पी (PIP)

देवदत्त · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवून जर कॅसेट पुढे ढकलली तर त्याचा उपयोग होतो. मला साधा कॅसेट प्लेयर व ह्या कार टेप प्लेयर मधील हा फरक का ते तेव्हापासून अजून नाही कळले. साध्या टेप मध्ये जर आम्ही गाणे वाजत असतानाच कॅसेट पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर मोठे लोक म्हणायचे, 'असे नाही करायचे. त्याने कॅसेट खराब होते.' मग ह्या कार टेप मध्ये त्यांनी ही सुविधा का दिली? तर ह्या QPS फायदा हा की ते बटण दाबून कॅसेट पुढे ढकलली की पुढच्या गाण्याला थांबायचे. ह्यामागचे तंत्रज्ञान नंतर कळले, माझ्या माहितीनुसार ते Quick Position Search होते. पुढील मोकळी जागा मिळाली की थांबायचे. त्यामुळे एखादे गाणे नाही आवडले की लगेच पुढच्या गाण्यावर जाता येत असे. अर्थात आता सीडी/डीव्हीडी मुळे हे खूप सोपे झाले आहे, तरी तेव्हा हे चांगलेच वाटायचे. पण एकदा काहीतरी बिघाड झाल्याने तो टेप दुरूस्तीला दिला होता त्यानंतर ती सुविधा नाही वापरता आली. :( काही वेळा वाटते हाच नाही पण असाच प्रकार सध्याच्या दूरदर्शन संचामध्ये आला तर किती चांगले होईल. एखादा कार्यक्रम पाहताना जर जाहिराती चालू झाल्या की हे बटण दाबून दुसर्‍या वाहिन्या चाळायच्या. ह्या वाहिनीवरील जाहिरात संपली की लगेच आपोआप सुरू झालेला कार्यक्रम पाहता येईल :) बहुतेक सर्वच दूरदर्शन संचामध्ये तरी वाहिन्या बदलत राहिले तरी आपण पाहत असलेला कार्यक्रम सुरू झालेला आहे की नाही पाहण्यासाठी मध्येच ती वाहिनी लावून पहावे लागते. पण आमच्या घरी, निदान मला तरी, ह्याचा तेवढा त्रास होत नाही. कारण आमच्या संचातील पी.आय.पी (PIP) तंत्रज्ञान. जाहिरात सुरू झाली की मी लगेच लहान खिडकीत दुसर्‍या वाहिन्या चाळायला लागतो. तसेच लहान खिडकीत सध्याची वाहिनी चालू ठेवून दुसर्‍या वाहिनीवर एखादा कार्यक्रम पाहता येतो. ह्याचा फायदा क्रिकेट सामना सुरू असतानाही होतो. लहान खिडकीत क्रिडा वाहिनी सुरू ठेवायची आणि सोबत आपला आवडता कार्यक्रम पहायचा. आणि हो, एक सिनेमा तर कोणी पूर्णपणे ह्याच खिडकीत पाहू शकतो, 'पुष्पक' ;). त्या लहान दूरदर्शन खिडकीला आवाज नाही असे नाही. पण मग त्याला हेडफोन लावून बसावे लागते. तोही प्रकार केला आहे. घरातले सर्व एखादा कार्यक्रम पाहत असले की मी माझा आवडता सिनेमा किंवा कार्यक्रम लहान खिडकीत पाहत बसायचो. असो, पण CAS च्या नियमानंतर किंवा मग डीटीएच घेतले की मग हा फायदा नाही घेता येणार. तेव्हा फक्त मग सीडी/डीव्हीडी प्लेयर लावून ठेवता येईल त्या खिडकीत. तो नियम येईल तेव्हा येईल. तोपर्यंत ह्याचा फायदा घेत राहू.

वाचने 2553 वाचनखूण प्रतिक्रिया 8

टारझन 04/12/2009 - 01:08
क्यु.पी.एस. माहित नव्हता .. पण पी.आय.पी. माहीत होतं !! त्यावेळेस नविन नविन केबल आली तेंव्हा "पी.आय.पी."चा गुपचुप चॅनल पहायला छाण उपयोग होत असे. भारी आहे पी.आय.पी. :) ह्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती थोडक्यात .. आणि मस्तंच ! देवदत्त साहेब, लेख वाचून डोळे पाणावले.. !! - (पी.आय.पी) टारझन

पाषाणभेद 04/12/2009 - 01:39
"पण CAS च्या नियमानंतर किंवा मग डीटीएच घेतले की मग हा फायदा नाही घेता येणार. तेव्हा फक्त मग सीडी/डीव्हीडी प्लेयर लावून ठेवता येईल त्या खिडकीत" का? नियमात किंवा तंत्रज्ञानात काही बदल होणार आहेत का? आणि तुमचा टिव्ही कोणत्या मेक चा आहे व मॉडेल नं काय आहे? ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी

देवदत्त 04/12/2009 - 20:26
काय टारझन राव, फक्त टीव्ही बद्दल वाचून डोळे पाणावले. जर त्यातील मालिकांबद्दल लिहिले तर ओक्साबोक्शी रडावे लागेल ;) ते जाऊ दे. बाकी, मलाही आता त्या QPS बद्दल कुठेच काही लिहिलेली माहिती मिळत नाही आहे. पाषाणभेद, माझा टिव्ही २९" बीपीएल सेलेस्टेरॉन आहे. आणि एक सांगायचे राहिले. CAS चा नियम नाही, पण कारण असे आहे की ह्या टीव्हीत दोन ट्यूनर आहेत. एक मोठ्या पडद्याचा, एक PIP चा. म्हणून दोन्हीमध्ये वेगवेगळ्या वाहिन्या दिसतात. जेव्हा सेट टॉप बॉक्स लावावा लागेल तेव्हा त्यातून येणारी वाहिनीच टिव्हीवर दिसेल. त्यामुळे टीव्हीच्या दोन्ही ट्यूनरचा फायदा होणार नाही.

In reply to by देवदत्त

पाषाणभेद 05/12/2009 - 02:11
ढण्यवाड वा दोन ट्यूनर. मस्तये. एकूनच तुमी टेक्नॉलाजी चा पुर्न लाभ घ्येवू र्‍हायले तर. ------------------------ आमच्या घरच्या टिव्हीवर सासू-सून टाईप मालीकांचा रतीब चालू असतो. माझी बायको सिरीयल्स बघते, मी त्यातील बायका बघतो. पासानभेद बिहारी

बिपिन कार्यकर्ते 06/12/2009 - 17:48
वेगळ्याच विषयावरचा माहितीपूर्ण लेख. छान. बिपिन कार्यकर्ते