लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - १
लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २
वसईचा किल्ला हातुन गेला आणी चवताळुन आई व काकुने ह्या वर्षात लग्न पार पाड्लेच जाईल असा ठराव मान्ड्ला. मी बाबाना व काकाला मधे टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही हतबल झालेले दिसले. लोक सुचवतिल तिकडे माझी पत्रिका जात असे पण ती जमत नसे हा भाग वेगळा =)). असेच एका ठिकाणी आई व बहीण दोघिहि एका ठिकाणी पत्रिका घेवुन गेल्या. मुलाच्या आईने उन्ची जमत नसल्याचे सान्गितले त्यांमुळे पुढे पत्रिका पहाण्याचा काही प्रश्नच उरत नव्ह्ता. पण त्या बाईनी त्याच ईमारतीतील त्यान्च्या एका मैत्रिणीच्या मुलाचे स्थळ सुचविले. त्यानी लगेच २रर्या मजल्यावरुन १ल्या मजल्यावर त्या मैत्रिणीला फ़ोन केला व त्याना ह्या पत्रिका घेवुन येत आहेत असे कळविले. ह्या दोघी लगेच १ल्या मज्ल्यावर आल्या. मुलाच्या आईला जुजबी पत्रिका पाहाता येत असल्य़ाने त्यानी लगेच पत्रिका जमत नाही असे सान्गितले. आणी त्या बाईनी आईला विचारले ह्या मुलीचे म्हणजे बरोबर असलेल्या बहीणीचे पण बघताय का, तसे आई म्हणाली नाही नाही, आधी मोठीचे मग हिचे. आणी दोघी बाहेर पडल्या.
मला जरा बरे नव्हते म्हणुन मी त्या दिवशी ऒफ़िसला गेले नव्हते. तोच एक ऒळ्खीच्या बाई घरी आल्या. आई कुठेय वैगरे विचारुन झाले. मग मलाच म्हणाल्या कि त्यान्च्या बहीणीचा नातु परदेशातुन आलाय आणी तुझी पत्रिका तिकडे जमलिये. मी म्हणाले, आई येउ दे मग काय ते तिच्याशी बोला, तर त्या म्हणाल्या तिच्याशी बोलुन झालय़. मला म्हणाल्या कि मुलगा शिकलॆला आहे, त्याच्या घरि काम्पुटर का काय ते पण आहे न त्या गोल क्यासेट तो ऎकतो =)) =)) आणी बाई गेल्या. तोवर ह्या दोघी घरी आल्या. तोच एक फ़ोन आला, आईनेच घेतला. मग कळ्ले त्या १ल्या मजल्यावरच्या बाईना बहिण खुप आवड्ली होती न तिला चक्क मागणीच घातली गेली होती, जुजबी पत्रिका पाहुन पुढे जायचे होते. आईने फ़ोन बाबाना दिला, मुलाचे वडिल बोलत होते त्यावर माझे बाबा म्हणाले कि नाही हो, मग माझ्या मोठ्या मुलीला वाईट वाटेल, त्यावर ते म्हणाले कि अहो काळ्जी करु नका, मी तुम्च्या मोठ्या मुलीकरिता स्थळ शोधेन. आई बाबा दोघेही कात्रित सापडल्य़ासारखे झाले होते. मग मीच त्याना म्हणाले कि व्हा पुढे. आणी दुसर्याच दिवशी बहिणीची पत्रिका पाठवली, जमली म्हणुन फ़ोन पण आला. आता दोघीन्च्या पत्रिका जुळ्ल्या होत्या, फ़क्त मुलगा पहाणे बाकी होते.
काय योगायोग असतात, दोघीना एकाच दिवशी दोन्ही घरी बोलावले गेले. नाही पण म्हणता येत नव्ह्ते मुलाना वेळ होता तसा कार्यक्रम आखला गेला होता. मी आईला म्ह्ट्ले बरे झाले, आप्ल्या घरी पसारा नाहि तो चहा पोह्यान्चा ते. ती त्यावर म्हणाली गप्प बस, कळ्ली तुझी अक्कल. ति बिचारी तणावाखाली असावी, असले २ नमुने वट्वायचे म्हणुन. सकाळी बहिणीला घेवुन आई बाबा मुलाच्या ओफ़िसला गेले, रविवार अस्ल्याने स्टाफ़ला सुट्टी होती. घर तर बघुन झाले होते म्हणुन आज ओफ़्फ़िस. पणशीकरान्क्डुन साबुदाणे वडे, पियुश वैग्रे मागवले गेले. कार्यक्रम आटोपला आणी हे लोक घरी आले. मी बहिणीला विचारले, मुल्गा कसा दिस्तो वैग्रे, तर हि बाव्ळी बरा दिस्तो एव्धेच म्हणे. मी म्हणाले होकार आला तर ही म्हणाली मग मिहि होकार देइन. मला मेलीला अन्दाज्च लागत नव्ह्ता. आईला विचार्ण्याची हिम्मत नव्ह्ती, ती परत तणावाखाली कारण मेन किल्ला तर सन्ध्याकाळी लढवायचा होता. मुलाच्या आईचा फ़ोन आला, मुलगी पसन्त होती तर आई म्हणाली पण तुम्चा मुल्गा कमी बोलला, समोरुन उत्तर आले कि तो निरिक्शण खुप करतो =)) व कमी बोलतो. आई बहिणीला म्हणाली बघ बाइ मुलगा सावळा आहे मग कट्कट चालणार नाही, तसा हिचा होकार ठाम होता.
सन्ध्याकाळ झाली, मी, काकु, आई व बाबा पोहोचलो. मुलाचे घर छान होते, एका बेडरुम मधे मस्त झोपाळा होता. मुलाची आई म्हणजे चक्क मनिमाउ, घार्या डोळ्यान्ची. बहिण दिसायला सुरेख, लग्न झालेली. मुलगा बाहेर गेलेला होता. मी झोपाळ्यावर बसले, हे सग्ळे बोलत होते. मुलगा आला व मला काकु बोलवायला आली. मुलगा मला जरा पात्रच वाट्ला, गचाळ टी शर्ट घालुन होता. त्याच्या बहिणीचा नवरा व हा सारखा हसे, त्यामुळे बाबाना पण तो पोरकटच वाट्ला. मग मला व त्याला बोलायला बेडरुमात पाठ्वले, मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले. मी त्याला विचारले, काही व्यसन वैग्रे नहि न? तसा म्हणाला कि सुपारीच ही नाही. मग मुलाच्या आईने मुलाला आत बोलावले. आणी बाहेर येउन मनिमाउ म्हणाली, मुल्गी पसन्त.
आता लग्नाची तयारी सुरु झाली. जवळच राहाते म्हणुन बहीणीचे होणारे सासु सासरे माझ्या आजीला भेटायला गेले होते. ती त्याना म्हणाली कि हे बघा, तुम्ही म्हणाल कि १०००-१२०० लोकाना जेवायला घाला तर ते मुळीच जमणार नाही. आम्ही मुलीना भरपुर शिकवलेय न ब्ला ब्ला ब्ला. ते म्हणाले अहो आमच्या काहीच अटी नाहित आम्ही सहजच तुम्हाला भेटायला आलोय. माझ्या बहिणीचा नवरा तिला भेटायला बोलवायचा. नविन नविन ड्रेस घेवुन द्यायचा. आमच्या ध्यानाने काहिहि दिले नाहि मला. उलट बावळट मला एकदा गाडीवरुन पाडणार होता. म्हणजे मी मागे बसायच्या आत ह्याने गाडी सुरु करुन पुढे नेली, नशिब मी बसले नव्हते नाहितर रस्त्यात फ़तकल मारले असते. लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला.
दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात आटोपली सुद्ध्धा. आणी पुढील ६ महिन्यात माझे बाबा अचानक गेले, कन्यादानाचे पुण्य मिळ्वुन. हेच लग्न न होता गेले असते तर आई वर केव्ढी जबाबेदारी आली अस्ती. स्वामी समर्थान्ची क्रुपा दुसरे काय.
याद्या
20934
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलय!
हम्म
+१
In reply to हम्म by अवलिया
+२
In reply to +१ by वल्लरी
"वैग्रे" हा
In reply to +१ by वल्लरी
मस्तच!!!
हो ना आणि
In reply to मस्तच!!! by बिपिन कार्यकर्ते
+ १ हेच म्हणतो!
In reply to हो ना आणि by संदीप चित्रे
मी तर
In reply to + १ हेच म्हणतो! by चतुरंग
शाहू
In reply to मी तर by टारझन
हा प्रतिसाद वाचुन लोळल्या
In reply to शाहू by JAGOMOHANPYARE
मागे आम्ही एकदा कोल्हापूरला
In reply to हा प्रतिसाद वाचुन लोळल्या by वपाडाव
हाहाहाहाहा
In reply to शाहू by JAGOMOHANPYARE
छानच,,,,
सही रे सही..!
+१
In reply to सही रे सही..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिलेयस...
हॅहॅहॅ
सुरेख.............
ह्म्म...
इनोदी अनुभव
त्याच्या
चुचे, मस्त
आणि तुझ्या
In reply to चुचे, मस्त by प्रभो
अवखळकरतै,
In reply to आणि तुझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
कैच्याकैच?
In reply to अवखळकरतै, by प्रभो
हे
In reply to कैच्याकैच? by ३_१४ विक्षिप्त अदिती
"व्यक्तीगत
In reply to हे by प्रभो
आणि तुझ्या
In reply to आणि तुझ्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगायायाया..
+१
In reply to अगायायाया.. by भडकमकर मास्तर
जबरी!
लेखन आवडले
मस्त
लेखन
पण
In reply to लेखन by रेवती
सुपर्ब!
छान.
हे रेकॉर्ड आहे काय?
तुझ्या
In reply to हे रेकॉर्ड आहे काय? by सुधीर काळे
जुन्या-जाणत्यांमध्ये कुणी "आनंदजी दोसा" आहे का?
In reply to तुझ्या by टारझन
:)
छान अनुभव सांगितलास गो...
ज्यांना तु
In reply to छान अनुभव सांगितलास गो... by धमाल मुलगा
मस्त!
मजा आली.....
सुन्दर
छान...
मस्त चुचु तै......
गचाळ टी
In reply to मस्त चुचु तै...... by वेताळ
गचाळ टी
In reply to गचाळ टी by पर्नल नेने मराठे
लग्न
खुपच छान ग
छान
छान. पहिला
ध्यान
५० वा
५१ वा
झोपाळा
व्वा
चुचु, मस्त आहे गं... बादवे,