Skip to main content

पाउस (देवद्वार छंद)

लेखक मनीषा यांनी रविवार, 09/11/2008 03:21 या दिवशी प्रकाशित केले.

वीज भारलेला
गंध दाटलेला
आसमंत ओला
आसावला |

तेज सौदामिनी
चमकते नभी
जळ कृष्णमेघी
साचलेले |

बेभान हा वारा
रानात भरारा
घुसळतो सारा
चराचरा |

टपोरे टपोरे
थेंब पावसाचे
झेलीत हा नाचे
मोर रानी |

अंग अंग ओले
धरतीचे झाले
नभ ते झुकले
भेटीसाठी |


वाचने 3690
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

ख ल्ला स !
(पण छंद सुटलाय बर्‍याच ठिकाणी. दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळींचे यमक होत नाही...मास्तर कान धरणार आता तुमचा!!!)


वा वा,
कविता आवडली. छान लिहिली आहे.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत

अवांतर - वर्गात असे हुशार विद्यार्थी असतील तर शिक्षकांना किती समाधान मिळत असेल. आमच्या एकाही मास्तराला आम्ही हा आनंद आयुष्यात मिळू दिला नाही.

आम्हाला इथे भेट द्या: https://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)