Skip to main content

पाउस (देवद्वार छंद)

लेखक मनीषा यांनी रविवार, 09/11/2008 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
वीज भारलेला गंध दाटलेला आसमंत ओला आसावला | तेज सौदामिनी चमकते नभी जळ कृष्णमेघी साचलेले | बेभान हा वारा रानात भरारा घुसळतो सारा चराचरा | टपोरे टपोरे थेंब पावसाचे झेलीत हा नाचे मोर रानी | अंग अंग ओले धरतीचे झाले नभ ते झुकले भेटीसाठी |

वाचने 3672
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

ख ल्ला स ! (पण छंद सुटलाय बर्‍याच ठिकाणी. दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळींचे यमक होत नाही...मास्तर कान धरणार आता तुमचा!!!)

वा वा, कविता आवडली. छान लिहिली आहे. आपला, (आनंदित) धोंडोपंत अवांतर - वर्गात असे हुशार विद्यार्थी असतील तर शिक्षकांना किती समाधान मिळत असेल. आमच्या एकाही मास्तराला आम्ही हा आनंद आयुष्यात मिळू दिला नाही. आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)