ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)शुक्रवार, 30/05/2008 15:16
१. बँगलोर मिपा कट्टा संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे अध्यक्ष श्री श्री डॉन बाबा बंगाली
२. बँगलोर मिपा कट्टा उप-संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे संचालक पुर्वाश्रमीचे अबब आणि आताचे सत् श्री सद्गुरू अभिज्ञ जी महाराज
३. आर्य (ह्याला अजून न भेटल्याने गुण कळले नाहियेत)
४. मिपा कट्ट्यांचा अधिक्रुत मिनीट्-किपर आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चा एकमेव सदस्य आपला नम्र ऍडी जोशी (म्हणजे मी)
तसा मुळचा विदर्भीयन
(च्यायला आमच्या विदर्भातले कोणीच नाही का ईथे)
---नितिन.
(पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)
बदलायची सोय आहे का?
मी मुळचा आउरंगाबाद(की खडकी (की संभाजीनगर))चा.तिथुन केवळ पोटापाण्यासाठी म्हणुन महारष्ट्राच्या
सांस्कृतिक राजधानित आलोय.
पुन्हा संधी मिळाल्यास, औ.बाद लाच कायम वास्तव्य असेल.(तुर्तास तरी तिथं माहिती तंज्ञान
हा उद्योग फारसा नसल्यानं ती शक्यता कमिच दिसते.)
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं!
अगदी तसेच म्हणायचे आहे
मी मूळचा मुंबईचा पण सध्या वास्तव्य दुबई / शारजा येथे. इथे कोणी मिपाकर आहे का हो? च्यामारी लोकं ठिकठिकाणी कट्टे भरवून राहिले आहेत, आणि इथे कोणीच नाही. :W : :''(
सभासद १००० आणि मतं फक्त पाउणशे...(अगदी १/१० पण नाही....)
बाकी या कौलाच्या कल्पनेची आयडिया मस्त होती. निदान आपले मिपाकर या भुतलावर कुठे कुठे पसरलेत ते तरी समजले.
मी मुळचा दहीसरकर (मुंबई ), गेली ८ वर्षे दुबईस्थित. पण सध्या कामा निमित्ते आफ्रिकाखंडात.
-गणपा
मुळ कोल्हापुर सध्या पुणे मुक्कामी.
म्हणजेच शुगर लॉबी वाला. :)
अवांतर : ११३ म्हणजे मी बराच जुना सदस्य आहे की मिपा चा. :)
................ https://picasaweb.google.co.in/zakasrao
जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं.
रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.
ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं!
(पक्का कोल्हापुरी) रम्या. परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.
अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल....
प्रतिक्रिया
वर्गी करण !!
या वर्गी करणाचा उपयोग कदाचीत मिपाचे मालक/ प्रशासक यांना पुढील कट्टा आयोजनास होईल.
(मिपाकरांना भेटण्यास उत्सुक) केळकर
सिडनी (Australia)
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
मुळचा पुणे
आता सिडनी (Australia)
नाशिककर
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
मूळ नाशिक शहरातला, आत्ता नाशिक, महिन्यापूर्वी लंडन-अल्जीरिया (येवून जावून) आणि पुढल्या आठवड्यात पुन्हा तिथेच.
किती देशांच पाणी प्यायलोय याचा काही हिशोब राहिला नाही आता.
ह्युस्ट् न
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
मुळचा पुणे
मी कोल्हापूरचा
In reply to वर्गी करण !! by अमोल केळकर
मी मुळ कोल्हापूरचा
सध्या मुंबई
सहमत!!!
सहमत!!!
अमेरिका
सध्याचे वास्तव्य : अमेरिका..वेस्ट कोस्ट
मूळ : पुणे
ईश्वरी
ठाणे....
मी ठाणेकर.....
मदनबाण.....
पुणे
सध्याचे वास्तव्य : पुणे
मूळ : खालापूर(रायगड जिल्हा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जो दुसरा टोल नाका आहे तिथे ("खालापूर टोल नाका"))
मी आहे..
ईस्ट कोस्ट अमेरिका.. पण २ महिन्यसाठी वास्तव्य भारतात.. पुणे, कोल्हापूर.. सांगली. इथे.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
मागल्या
सहा महिन्यापस्न इंग्लंडात होतो.
आता लवकरच पुन्हा भारतात येतोय,पुण्यात.
आपलाच,
मनोबा
मी पार्लेकर
मी पार्लेकर. मूळचा सातारकर
सध्या काही दिवस पुणेकर.
ठाणे तिथे काय उणे!
आम्ही पण ठाणेकर.
मि मुम्बैकर
मि मुम्बैकर वास्तव्य भान्दुप पुर्व येथे
ठाणे!
ठाणेकर !!
पुणेकर
आम्ही पुणे जिल्ह्याच्या वायव्यभागातले. सध्या पुणेकर. पण पुणेरी नाही.
आपला,
(पुणेकर) आजानुकर्ण
मी मुंबईकर
मी मुंबईकर
सध्या चे
सध्या चे वास्तव्य चीन मध्ये....
तसा मी पुण्याचा................
पुणे
मु. पो. पुणे..
अवांतरः बाकी पुणे व मुंबई असे दोन वेगळे पर्याय असते तरी चालले असते :)
--
ध्रुव
धाग्याचे मूळ लेखक
In reply to पुणे by ध्रुव
केळकर साहेब नागपूरकडले दिसतात!
"तुम्हा पुण्या-मुंबईच्या लोकांच.." (संदर्भः पुलं; मुंबैकर,पुणेकर की नागपूरकर)
ह. घ्या. :)
नाही
In reply to धाग्याचे मूळ लेखक by पिवळा डांबिस
मी मुळचा सांगलीचा
सध्या मुंबई
पुणे?, मुंबई ?
In reply to पुणे by ध्रुव
का हो पुणे , मुंबई असे ध्रुवीकरण करत आहात? ;) (ह.घ्या.हे.वे.सां. न. ल.)
पुण्याचे पेशवे
अहो,
In reply to पुणे?, मुंबई ? by llपुण्याचे पेशवेll
अहोइ ध्रुवीकरण नाही :) पण निर्विवादपन पुणे मुंबई जिंकणार हे उघडच आहे. म्हणून म्हणल की वेगवेगळे पर्याय असते तर अजून मजा आली असती.
--
ध्रुव
लंडन!
राणीच्या राजधानीत, गेल्या १ वर्षापासुन!
(मुळचा पक्का पुणेकर असलेला) टिंग्या :)
िव्कास०१५
िव्कास०१५४
पुणेकर ....
दक्षिण भारतातली ४ डोकी
१. बँगलोर मिपा कट्टा संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे अध्यक्ष श्री श्री डॉन बाबा बंगाली
२. बँगलोर मिपा कट्टा उप-संचालक आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चे संचालक पुर्वाश्रमीचे अबब आणि आताचे सत् श्री सद्गुरू अभिज्ञ जी महाराज
३. आर्य (ह्याला अजून न भेटल्याने गुण कळले नाहियेत)
४. मिपा कट्ट्यांचा अधिक्रुत मिनीट्-किपर आणि 'बँगलोर सात्विक आहार प्रचार आणि योगासन प्रसार समिती' चा एकमेव सदस्य आपला नम्र ऍडी जोशी (म्हणजे मी)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा https://adijoshi.blogspot.com/
अहो केळ्कर...
मराठवाडा कसे मागे राहिल ?
हे घ्या माझे पहिले मत.....
सध्या पुण्यात असलो म्हणुन काय झाले. मुळचा मात्र मराठवाडयातलाच (औरंगाबादचा).
दिल्ली
दिल्ली प्रदेशी .. मराठीचा व मिपाचा झेंडा फक्त माझ्याच खाद्यांवर आहे हे मला माहीतच नव्हते....
स्वगतः
राजे, जबाबदारी वाढली आहे.... झेंडा फडकवत ठेवण्याची व सेना वाढवण्याची कामगीरी तुमच्याच शिरावर आहे. ;)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
दक्षिण भारततीय
आम्ही सांगलीचे आहोत पण बरीच वर्ष पुण्यात काढली (वाण नाही पण गुण लागला)
सध्या बेगळूरु (दक्षिण भारत)
आणि हो ! ऍडी भेटल्यावर गुण दाखवतो
(हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर)
आर्य
मी पण
In reply to दक्षिण भारततीय by आर्य
मी पण सांगलीचा सध्या मात्र नवी मुंबई
( विश्रामबागेतला पडिक ) केळकर
मी सुदधा
In reply to मी पण by अमोल केळकर
मी सुदधा एकेकाळचा विश्रामबागेतला पडिक. वालचंदला होतो. मूळचा सातारकर.
नक्कीच
In reply to दक्षिण भारततीय by आर्य
हव तर कार्यक्रम करु विवीधगुणदर्शनाचा बेंगलोर मिपाव कट्टया वर :)
डन बॉस. पुढचा कट्टा सात्विक नसणार आहे. न घाबरता ये तू :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा https://adijoshi.blogspot.com/
दक्षिण भारतातली आणखी १ डोकी
तसा मुळचा विदर्भीयन
(च्यायला आमच्या विदर्भातले कोणीच नाही का ईथे)
---नितिन.
(पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)
जय विदर्भ
In reply to दक्षिण भारतातली आणखी १ डोकी by नि३
ओ नितिनभावं..म्या हाय पक्की विदर्भातली..कायले कालजी करता जी..
आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)
पुणे
मुळ मुंबईकर, नंतर मस्कतवासी, सध्या पुणे मुक्कामी. (मस्कत आणि मुंबईस येऊन-जाऊन).
हार्टफर्ट, स्टेट कनेटिकट.
मी सध्या अमेरिका, पण पुणे येथे वास्तव्यास.
इस्ट कोस्ट , अमेरिका
मुळचा दादर/ठाण्याचा.
शहाजीमहाराजांच्या जहागिरीत
सध्याचा मुक्काम शहाजीमहाराजांच्या जहागिरीत...बेंगलोर..
पण मुळ पेशव्यांच्या राजधानीत..पुणे
वास्तव्य
मूळः मुंबई
सध्या: लॉसेंजेलिस
अहमदनगर मूळ गाव
सध्या विल्मिंग्टन (मॅसाच्यूसेट्स, अमेरिका).
भारतात आल्यावर पुण्यातही वास्तव्य असते.
(कायम आभासी वावर 'मिपा'वर! ;))
चतुरंग
आमची मुंबई!
आम्ही मुंबईवाले!!
कौलातील प्रतिसाद
बदलायची सोय आहे का?
मी मुळचा आउरंगाबाद(की खडकी (की संभाजीनगर))चा.तिथुन केवळ पोटापाण्यासाठी म्हणुन महारष्ट्राच्या
सांस्कृतिक राजधानित आलोय.
पुन्हा संधी मिळाल्यास, औ.बाद लाच कायम वास्तव्य असेल.(तुर्तास तरी तिथं माहिती तंज्ञान
हा उद्योग फारसा नसल्यानं ती शक्यता कमिच दिसते.)
आपलाच,
मनोबा
पण मूळची पुण्याची...
सध्या मुम्बईमध्ये...
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
मराठी दौलतीच्या राजधानीत. ;)
सध्या: न्यू यॉर्क
मूळ वास्तव्यः मराठी दौलतीची राजधानी, पुणे. :)
पुण्याचे पेशवे
औरंगाबाद !!!
सर्व काही 'औरंगाबाद' ( मराठवाडा )
चित्र उपलब्ध नाही
बेळगांव कुठे आहे?
.
व्यंकट
अरे,
In reply to बेळगांव कुठे आहे? by व्यंकट
अरे व्यंकट, तू अमेरिकेत आहेस ना?
(येताना माझ्याकरता बाटली आणणार आहेस ना? मी पैसे देईन हो, परंतु ड्युटीफ्री मालाची मजाच वेगळी म्हणून सांगितलं! ;)
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं!
असो, कौलप्रस्तावक केळकर काय तो खुलासा करतीलच!
तात्या.
अगदी तसेच
In reply to अरे, by विसोबा खेचर
मिपासदस्यांचे मूळ वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा नसून सध्या वास्तव्य कुठे आहे हा मुद्दा आहे व त्याप्रमाणे कौल द्यायचा आहे असं मला वाटतं!
अगदी तसेच म्हणायचे आहे
सध्या कर्नाटकात -दक्षिण भारत
In reply to बेळगांव कुठे आहे? by व्यंकट
कितीही वाटले बेळगाव महाराष्ट्राचे तरी सध्या कर्नाटकात
( बेळगाव , निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे )
दुबई....
मी मूळचा मुंबईचा पण सध्या वास्तव्य दुबई / शारजा येथे. इथे कोणी मिपाकर आहे का हो? च्यामारी लोकं ठिकठिकाणी कट्टे भरवून राहिले आहेत, आणि इथे कोणीच नाही. :W : :''(
आमचो कोकण...
सह्याद्रिच्या कुशित रायगडाच्या पयथ्याशि ... लोणेरे (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग)
आपला मयुर
मूळ - मुंबई
मूळ - मुंबई, शिवाजी पार्क,
सध्या - वॉशिंग्टन डि.सी. जवळ, व्हर्जिनिया
मानस
जन्मभूमी
जन्मभूमी 'डो॑बिवली' पण कर्मभूमी 'पुण्यनगरी' नामक अदभुत नगरी
(पक्का पुणेरी) प्रसाद
डेट्रोईट
पण मुळचा पुणे..तिथे काय उणे..;)
मनाने सदासर्वकाळ सदाशिव पेठी पुणेकर पण..
सध्या देहाने सनिवेल कॅलिफोर्निया..
पक्का पुणेकर
पक्का पुणेकर, मागे काही काळ यूएस
- पक्या
सद्ध्या लॉस एंजेलिस..
मूळची पुण्याची...
https://bhagyashreee.blogspot.com/
सध्या सॅन होजे, कॅलिफोर्निया
त्या आधी दोन वर्षे राले,नॉर्थ कॅरोलायना
मूळः दादर(पूर्व),मुंबई
(दादरकर)बेसनलाडू
अटलांटा
मी मुळची मुंबईची
५ वर्ष बीजिंग चीन मधे
सध्या जॉर्जिया अमेरिकेत राहते.
मीनल.
सॅन रॅमोन - कॅलिफोर्निया (अमेरिका)
मुळ गाव...
मुक्काम वडगाव कोंड, पोष्ट गोरेगाव, तालुका माणगाव, जिल्हा रायगड...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
पश्चिम महाराष्ट्र!
अरे वा! मिपावरदेखील शुगरलॉबी दिसते! पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे म्हणून म्हटलं! :)
आणि त्याच्या खालोखाल अमेरीकन मंडळी! बापरे! काहीतरी तांत्रिक शक्कल लढवून मिपा केव्हा टेकओव्हर कळतील ते कळणारच नाही! :)
आपला,
(पश्चिम महाराष्ट्रप्रेमी शुगरलॉबी किंग) शरदतात्या पवार.
अजून एक
अजून एक डोकं बंगळुरुमधलं...
मूळची पुण्याची.
मुंबई जवळ
मु. पो. सासवने, ता. अलिबाग, जि. रायगड (ज्या गावात करमरकरांचे पुतळे आहेत, ते समुद्रकिनारी वसलेले सुंदर गाव)
सध्या सौदी अरेबिया.
प्रशांत
स्द्ध्या न्यूजर्सीत
पण मनानं केव्हाच ठाण्यात पोचलेय्...आईच्या कुशीत..... :(
अरे निम्मे लोक अमेरिकेत आहोत आपण एक टेलिकाँफरंस कट्टा भरवावा का? :-C
कोकण !
कोकण - - - - - अलिबाग. समुद्र किनारी. नारळी - पोफळींच्या बागेत. [ या कधितरी]
फक्त पाउणशे मतं....
सभासद १००० आणि मतं फक्त पाउणशे...(अगदी १/१० पण नाही....)
बाकी या कौलाच्या कल्पनेची आयडिया मस्त होती. निदान आपले मिपाकर या भुतलावर कुठे कुठे पसरलेत ते तरी समजले.
मी मुळचा दहीसरकर (मुंबई ), गेली ८ वर्षे दुबईस्थित. पण सध्या कामा निमित्ते आफ्रिकाखंडात.
-गणपा
मी बक्कल नं ११३
मुळ कोल्हापुर सध्या पुणे मुक्कामी.
म्हणजेच शुगर लॉबी वाला. :)
अवांतर : ११३ म्हणजे मी बराच जुना सदस्य आहे की मिपा चा. :)
................
https://picasaweb.google.co.in/zakasrao
रायगड
इंदापूर, ता.माणगाव, जि.रायगड (मुबई गोवा राष्ट्रिय महामार्ग)
इजिप्त ....
सध्या : इजिप्त
भारतात असताना : डोंबिवली
भविष्यात : दुबई / कुआला लांपुर / तेल अविव / साओ पाओलो - जिथे चांगली संधी मिळेल तिथे ...
मी मुंबईकर!
संजय अभ्यंकर
https://smabhyan.blogspot.com/
म्या बक्कल लंबर ३८३
तसा शुगर लॉबीच्या राजधानीचा....बारामतीचा :)
हल्ली अठवड्याचे ५ दिवस मुंबईकर (भांडूप पुर्व)
आणि विकांताला शनवार पेठ, पुणे-३० (म्हणजे फक्त पाठीवरची धोपटी टाकण्यापुरतं, बाकी रविवारी संध्याकाळपर्यंत आख्खं पुणं अखंडरित्या बोंबलत हिंडणे )
तसा मुळचा
तसा मुळचा विदर्भीयन , अकोला
पण सध्या वास्तव्य रायपुर ( छतीसगड )
शरुबाबा
तोक्यो जपान
मुळ गाव कडूस तालुका खेड जिल्हा पुणे
हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या राजगुरूनगर्(खेडजवळ).
जर्मनी
सध्या जर्मनी
मूळचा पुणेकर
(दिवसातला बराच काळ मिपावर :) )
--लिखाळ.
बिल्ला नंबर कसा शोधायचा ?
माझा स्वतःचा बिल्ला नंबर [ सभासद क्रमांक ] कसा कळु शकेल?
सध्या वास्तव्य-
पुणे.
फक्त पुणे
पक्क्या पुण्याचाच
बंगळुरात
पुण्यात उगवलेलं आणि बंगळुरात पोचलेलं आणखी एक डोकं.
सध्या पुण्यात
सध्या पुण्यात
मूळ - सांगली
(अजून एक विश्रामबागेतील पडीक) चावटमेला
सध्या कुवेत (आखात)
अय्या म्हणजे मी एकटीच का इकडची ;)
मूळची नागपुरी .... काही काळ मुंबापुरी... मग सौदी अरेबियाची वारी..... आणि आमच्या कुवेतमधे तेलाच्या विहिरी :)
भाव?
In reply to सध्या कुवेत (आखात) by जयवी
आमच्या कुवेतमधे तेलाच्या विहिरी
सध्या गोडेतेलाचा भाव काय आहे हो?
अफ्रिका
In reply to भाव? by प्रभाकर पेठकर
तुर्त तरी ७-८ महिने झाले, अफ्रिकेत कंपाला(युगांडा), नैरोबी(केनिया) मधे.
मुळचा खवाट पुणेरी....
भविष्य : इस्ट एशिया नाय तर वाष्ट्रेलिया
तात्या मला वोट देण्याचा ऑप्शन दिसत नाहीये. मी अजुन वोट दिलं नाहीये तरी. डायरेक्ट रिझल्ट दिसून राहिलाय.
अवांतर : सौदी ला गेलो तर तेलाच्या हिरींमंदी भजे आन वडापाव तळीन म्हण्तो... "टारझन वडापाव वर्ल्ड चेन " वा क्या प्लानिंग हय.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
डर्मशडाट
जन्मगावः मिरज
कायम वास्तव्यः पुणे
तातपुरते वास्तव्यः डर्मशडाट- जर्मनी
(१२ देश, १०० गावचे पाणी पिलेला)केशवसुमार
माझं
जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं.
रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.
ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं!
(पक्का कोल्हापुरी) रम्या.
परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.
नाशिक हुन पुणे
अगबाई आमचे नाशिककर कुणीच नाही की काय?
माझे माहेर - वडनेर भैरव जि. नाशिक
सासर- जुन्नर पुणे
सध्याचे वास्तव्य --- आपली पुण्यनगरी ,पुणे.
अय्या
In reply to नाशिक हुन पुणे by श्रीमंतपेशवे
पेशवीणबाई आणि नाशिकच्या?
माहेर म्हंटल
In reply to अय्या by वरदा
अग वरदा
मुळची नाशिकची असले तरी आता पुण्याची पेशवीनच म्हणायची नाही का?
गंमत म्हणजे नवय्राचं नाव श्रीमंत . म्हणुन मी पेशवीन !
ह्म्म्म्म
In reply to माहेर म्हंटल by श्रीमंतपेशवे
मग पेशवीण म्हणायचं ना गं हे किती कन्फ्युजिंग आहे.....पेशवे का पेशवीण कळतच नाही ;) ह. घे. हे. सां. न. लगे
हैबत्या आन श्रीमंत्या
In reply to माहेर म्हंटल by श्रीमंतपेशवे
आम्च्याकडे दोन बैलं व्हती
हैबत्या आन श्रीमंत्या...हैबत्या काळा आन श्रीमंत्या तांबडा होता
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
नमस्कार....
In reply to नाशिक हुन पुणे by श्रीमंतपेशवे
अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल....
धन्यवाद,
अमितकुमार