Skip to main content

मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे?

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 30/05/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 6555
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

तसा शुगर लॉबीच्या राजधानीचा....बारामतीचा :) हल्ली अठवड्याचे ५ दिवस मुंबईकर (भांडूप पुर्व) आणि विकांताला शनवार पेठ, पुणे-३० (म्हणजे फक्त पाठीवरची धोपटी टाकण्यापुरतं, बाकी रविवारी संध्याकाळपर्यंत आख्खं पुणं अखंडरित्या बोंबलत हिंडणे )

तसा मुळचा विदर्भीयन , अकोला पण सध्या वास्तव्य रायपुर ( छतीसगड ) शरुबाबा

मुळ गाव कडूस तालुका खेड जिल्हा पुणे हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या राजगुरूनगर्(खेडजवळ).

सध्या जर्मनी मूळचा पुणेकर (दिवसातला बराच काळ मिपावर :) ) --लिखाळ.

पुण्यात उगवलेलं आणि बंगळुरात पोचलेलं आणखी एक डोकं.

सध्या पुण्यात मूळ - सांगली (अजून एक विश्रामबागेतील पडीक) चावटमेला

अय्या म्हणजे मी एकटीच का इकडची ;) मूळची नागपुरी .... काही काळ मुंबापुरी... मग सौदी अरेबियाची वारी..... आणि आमच्या कुवेतमधे तेलाच्या विहिरी :)

In reply to by जयवी

आमच्या कुवेतमधे तेलाच्या विहिरी सध्या गोडेतेलाचा भाव काय आहे हो?

In reply to by प्रभाकर पेठकर

तुर्त तरी ७-८ महिने झाले, अफ्रिकेत कंपाला(युगांडा), नैरोबी(केनिया) मधे. मुळचा खवाट पुणेरी.... भविष्य : इस्ट एशिया नाय तर वाष्ट्रेलिया तात्या मला वोट देण्याचा ऑप्शन दिसत नाहीये. मी अजुन वोट दिलं नाहीये तरी. डायरेक्ट रिझल्ट दिसून राहिलाय. अवांतर : सौदी ला गेलो तर तेलाच्या हिरींमंदी भजे आन वडापाव तळीन म्हण्तो... "टारझन वडापाव वर्ल्ड चेन " वा क्या प्लानिंग हय. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

जन्मगावः मिरज कायम वास्तव्यः पुणे तातपुरते वास्तव्यः डर्मशडाट- जर्मनी (१२ देश, १०० गावचे पाणी पिलेला)केशवसुमार

जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं. रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं! (पक्का कोल्हापुरी) रम्या. परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.

अगबाई आमचे नाशिककर कुणीच नाही की काय? माझे माहेर - वडनेर भैरव जि. नाशिक सासर- जुन्नर पुणे सध्याचे वास्तव्य --- आपली पुण्यनगरी ,पुणे.

In reply to by वरदा

अग वरदा मुळची नाशिकची असले तरी आता पुण्याची पेशवीनच म्हणायची नाही का? गंमत म्हणजे नवय्राचं नाव श्रीमंत . म्हणुन मी पेशवीन !

In reply to by श्रीमंतपेशवे

मग पेशवीण म्हणायचं ना गं हे किती कन्फ्युजिंग आहे.....पेशवे का पेशवीण कळतच नाही ;) ह. घे. हे. सां. न. लगे

In reply to by श्रीमंतपेशवे

आम्च्याकडे दोन बैलं व्हती हैबत्या आन श्रीमंत्या...हैबत्या काळा आन श्रीमंत्या तांबडा होता पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by श्रीमंतपेशवे

अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल.... धन्यवाद, अमितकुमार

आत्तापर्यंत फक्त १०१ जणांनीच सध्या रहण्याची ठिकाणं सांगितलीत. बाकी मेंबरं कुठे कुठे रहातात ते पण कळूदे की !

पक्का पुणेकर... कसबा सदाशिव आणि कोथरूड... सध्या लंडन जवळ ... पुण्याला जाण्याची वाट पाहणारा... मैत्र..

मूळची ठाणेकर सध्या पुणेकर व्हाया कोकण,सोलापूर्,ठाण्याचा ग्रामीण भाग.

मी गेली २८ वर्षे सिंगापूरला आहे. मुळचा नागपूरचा.

तसे राजे (स्व : संबोधन ) मूळ्चे नासिकचे..... पूर्ण महाराष्ट्र पादांर्कात केल्यावर स्वारी आता उत्तरेकडे....सध्या छावणी अहमदाबाद.............. धन्यवाद, अमितकुमार

अस्मादिकांचे मूळ गाव मोखाडा (जि. ठाणे). पुढे शिक्षण आणि करीयर नाशिकमध्ये. पण आता करीयरसाठीच होळकरांच्या इंदुरमध्ये (मप्र) वास्तव्य.

मी मुंबैकर, आणि वास्तव्य पार्ले व अंधेरीच्या सीमेवर. हेरंब

मूळचा डोम्बिवलीचा सध्या हैदराबाद (आन्ध्र प्रदेश).

मी मु॑बईचा , गिरगावचा.

In reply to by शेवटचा बाजीराव

गिरगावातले....तुम्ही कुठे होतात गिरगावात्..ते पांजर्पोळाच्या चाळीत होते....

म्हणजे मुळचो कोकणातलो नंतर मुंबईत दिवस काढले आता निवृत्त झाल्यावर हयसर अमेरिकेत क्यालिफोरनीयात स्यान होझेत मुक्काम "कृष्ण उवाच" लिहिण्यात वेळ घालवतंय. सामंत

४ वर्षांपासुन पुण्यात. मुळ गावः अहमदनगर. http://sucheltas.blogspot.com

#:S मूळ-डोंबिवली सध्या-सुंगाइ पेटानी,केडा,मलेशिया

:D पंधरा देशाचे पाणी व....?? पिलेला, सध्या देंहिक वास्त्यव्य -वॉशिंग्टन डि.सी. जवळ मेरीलॅन्डला आहे. :D

[( सध्या स्कॉटलंड मधे आहे परतीचे वेध लगलेले आहेत.......................... [( मी संदीप,एक वाचक

नमस्कार, आम्ही इथलेच म्हणजे " श्रीस्थानक " ( ठाणे ) हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अरे, सोलापुरातला मी एकटाच दिसतो आहे! एकला चलो रे! डुप्लिकेट डॉक्टर, सचीन जी

मागिल ५० पिड्या पुण्यात (नारायण पेठ ;) )माझ्यासकट , पुधील पिध्यांचे माहित नाहि... जिथे कमी तिथे आम्ही ..:)

नायजेरिया-त मराठी बाणा जिवंत ठेवणार्‍या अनेक शिलेदारांपैकी एक! - ९६-मराठा!

मी मुळचा त्र्यंबकेश्वरचा..सध्या मुंबईत (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

खूप प्रतीसाद आले आहेत. पण ग्राफ अद्यवत केला आहे असे वाटत नाही. कृपया तो करावा.

मूळ : नागपूर नन्तर : पुणे (तिथे काय उणे ) सध्या : मिलवॉकी (उ. अमेरिका)

पश्चिम महाराष्ट्रत वास्तव्य असलेला मी ....

नगर, नाशिक, पुणेकर सध्या - लॉस एंजेल्स, पुढच्या महिन्यापासुनचा मुककाम परत वॉशिंग्टन डी. सी.

मी ठाण्याचा...सध्या दुबई.. राजा.

सध्या मुक्काम मेलबर्नला अप्पा

मूळची -ठाणेकर सध्या वास्तव्य -कुवैत

मी पुण्याची........ :)

कायमची आमची मुंबई Sweet Sonu * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

मूळचा नागपूर, विदर्भाचा. सध्या वास्तव्य: बंगलोर.

मी लवकरच ऍटलांटाजवळ अल्फारेटा इथे जाणार आहे. तिथे कोणी मिसळपाववाला आहे का ?

मला वाट्त मी एकटाच आहे नागपूरचा

मी मुंबईकर बाकी मला कुठे ही फिरायला आवडते

मुळ मुम्बै.... पन गेल्या वर्षभरापासुन आमेरिका (मार्ल्बोरो) इथे....

मी मुंबईकर ... सध्या वास्तव्य डेट्रोइट, मिशिगन, अमेरिका इथे....

मी ठाणेकर..... :) स्प्रुहा

सध्याचे वास्तव्य : अमेरिका. मूळ : मुंबईं

सध्याचे वास्तव्य : अमेरिका. मूळ : मुंबईं

मुळः अ़कोला सध्या: Amsterdam, The Netherlands(युरोप), क्षमस्व!! पण मराठी मधे लिहिता आले नाही. :S ---किट्टु

चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मुळ गाव - सातारा सध्या वास्तव्य - अमेरिका - व्हर्जिनिया