(हे विडंबन नाही. पण प्रेरणा धन्याशेठची.)
आज का आलो इथे ?
थांबली पत्रे इथून
माझ्या नावावर येणारी.
पत्ता बदलवला तरी
"फॉरवर्डींग इज नॉट डन
टू अॅड्रेसेस बियाँड इंडिया"
पोस्ट ऑफिसाने सांगितले
वाटले होते,
घर स्वच्छ केले,
सगळे सामान 'शिप' केले.
पण,
अरेच्चा! आहे की बोचके
इथे बांधून ठेवलेले.
ह्या आतल्या खोलीत
माझ्या आठवणीत पहिल्यांदा
फट्का आईचा
मी खाल्लेला
पहिल्यांदा मैत्रिणीवर
हात जरा
इकडे तिकडे
फिरला ;-)
(त्या मस्तीत,
दार उघडेच,
भान कसे रहायचे,
मला?)
माता न तू वैरिणी
म्हणालो होतो तेव्हा
अर्थात,
मनातल्या मनात.
आज तिच्या
स्टराईल बेडचा
कोरेपणा, तसाच
नव्या धुतल्याचा.
हास्पिटलातल्या एसीत
"थंडी वाजते रे"
गोधड्या न्यायला आलो
मळलेल्या, कुबट वासांच्या
इंडिपेंडंट खोलीत
विजेच्या कडकडाटाने
घाबरलो होतो तेव्हा,
हाच कुबट वास
होता साथीला
आता हाच वास
माझ्या गतायुष्याची
आठवण
ह्या घराने कधीच
सोडली माझी साथ.
सरकार दरबारी
नोंद असू दे कसलीही,
पण माझे घरही,
मला समजते परागंदा ?
(ता. क. ही कविता लिहिताना "एनाराय" हे एकच शीर्षक डोळ्यापुढे आले होते. परंतु, एनाराय ह्या शब्दाला जी निगेटिव्हिटी आहे, त्यापेक्षा जास्त निगेटीव्हिटी मला अपेक्षित आहे, त्यामुळे कवितेचे शीर्षक आणि शेवटची ओळ बदलली आहे. धन्याशेटची कविता वाचताना, बा. भ. बोरकरांची "आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले, माझ्या परागंदा जीवा, आज माहेर लाभले" ही ओळ मनात घोळत असताना, ही कविता लिहिली. त्यामुळे चेंज ऑफ टायटल. पुन्हा एकदा, जियो धनंजय !)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5042
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा !! काय
च्यायला
In reply to व्वा !! काय by टारझन
जय
In reply to व्वा !! काय by टारझन
मी पण
In reply to व्वा !! काय by टारझन
टारझन, मलाह
In reply to व्वा !! काय by टारझन
छान कविता.....
मिपाकरांच
आता निवासी
In reply to मिपाकरांच by विंजिनेर
मस्तच. छान
दगडूशेट
In reply to मस्तच. छान by पाषाणभेद
ता. क.
कविता
छान कविता.
छानच कविता.
+१
In reply to छानच कविता. by घाटावरचे भट
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हॅहॅहॅ
शीर्षकातला बदल झाल्यावर कवितेचा आयाम एकदम बदलला!
सहमत
In reply to शीर्षकातला बदल झाल्यावर कवितेचा आयाम एकदम बदलला! by चतुरंग
रंगा, ह्या
In reply to शीर्षकातला बदल झाल्यावर कवितेचा आयाम एकदम बदलला! by चतुरंग
हो ना तो शब्द लिहिल्यावर मला जरा शंका
In reply to रंगा, ह्या by घाटावरचे भट
मी सर्जन ?
In reply to हो ना तो शब्द लिहिल्यावर मला जरा शंका by चतुरंग
कविता आवडली
असेच म्हणतो
In reply to कविता आवडली by बेसनलाडू
गुलजार महान
सहजा
In reply to गुलजार महान by सहज
पुष्पक
In reply to सहजा by मिसळभोक्ता
सुंदर...
नक्कीच
In reply to सुंदर... by बिपिन कार्यकर्ते
दोन घरांची तगमग
वोह कागज
वा! सुरेख
आवडली