(सर्व काही आत आहे)
काव्यरस
आमची प्रेरणा: सर्व काही आत आहे
सहज सारे पोचते गद्या प्रमाणे,
विडंबनाचे माप या डोक्यात आहे!
असु देत आता काव्य हे भारी कितीही..
झोडण्याची खाज मम हृदयात आहे!
कल्पनेचे विश्व मज लावी ढुशी अन..
चाल दुडकी माझिया पायात आहे!
जे न देखे कवी तेच पाहतो मी!
ओळखाया खुसपटे डोळ्यांत आहे!!
अडचणींचा सामना करतो कसाही..
विडंबनाचा बाज वरवंट्यात आहे!!
पाहिले कित्येक मिपावर/मिपाकर पडीक!
आनंद, नुसता येऊनी पडण्यात आहे! :)
साधर्म्य कसले शोधता कडव्यात आता,
अर्थ सारा, नसलेल्या मुखड्यात आहे!
राघव
वाचने
2952
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
तू? यू टू?
विडंबन चांगले. तुझ्यातली ही तिरपी दृष्टी आत्ता दिसली. :)
In reply to आईशप्पथ... by श्रावण मोडक
धन्यु. (विडंबनाचा) प्रयत्न चालू असला म्हणजे झाले! ;)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
अरेच्या तुम्ही पण ? :O
वा ! =D>
चालु द्या ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
अरेच्या तुम्ही पण ? :O
वा ! =D>
चालु द्या ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
असु देत आता काव्य हे भारी कितीही..
झोडण्याची खाज मम हृदयात आहे!
अच्छा ये बात है... ;)
पाहिले कित्येक मिपावर/मिपाकर पडीक!
आनंद, नुसता येऊनी पडण्यात आहे!
सॉल्लीईईईईट्ट्ट....
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
भारी हो, राघव उर्फ आधीचे मुमुक्षू!
चांगले विडंबन. माझी कविता चांगली नसेल कदाचित, पण तुम्ही केलेलं हे विडंबन मात्र नक्कीच छान आहे.
पाहिले कित्येक मिपावर/मिपाकर पडीक!
आनंद, नुसता येऊनी पडण्यात आहे!
हे सगळ्यात जास्त आवडले.
- अजिंक्य.
:)
सॉल्लिड!!
साधर्म्य कसले शोधता कडव्यात आता,
अर्थ सारा, नसलेल्या मुखड्यात आहे!
हा टोला आवडला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कल्पनेचे विश्व मज लावी ढुशी अन..
चाल दुडकी माझिया पायात आहे!
वा! मस्त!
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
तू (ठुसकुलीसुद्धा सोडतोस हे माहित नव्हतं) ;)
विडंबनही करतोस हे आजच कळलं.
लगे रहो...
आपला,
(आश्चर्यचकित) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :)
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
=))
लै भारी राव !
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
अजिंक्य,
विडंबन हलकेच घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
त्यात धन्यवाद कसले मानताय?
माझी कविता काही फार जड नव्हती हो :)!
त्यामुळे विडंबन 'हलकेच' घेणं 'सोपं' गेलं.
(सुरुवातीला आश्चर्य जरूर वाटलं - कवितेला प्रतिसाद मिळण्याआधीच तिचं विडंबन होऊन त्यावरही प्रतिसाद आले तर दुसरं काय वाटणार!)
बट यू डोण्ट वरी, माझ्या सारख्या नवकवींचा हाच नारा असतो -
हलकी कविता, हलके विडंबन!!
लगे रहो. अशीच विडंबने करावीत. माझ्या कवितांचीही.
(त्या निमित्ताने माझ्याही कविता होतील की!)
-अजिंक्य.
आईशप्पथ...