Skip to main content

सर्व काही आत आहे

लेखक अजिंक्य यांनी मंगळवार, 08/09/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
सहजसोपे भासते कविता प्रसवणे, गोषवारा माझिया डोक्यात आहे ||१|| असूदे भारी कितीही लेखणी ही, पेलण्याची शक्ति या हातात आहे ||२|| कल्पनाविश्वात करितो मी विहार, दौडण्याची शक्ति या पायात आहे ||३|| जे न देखे रवी तेही पाहतो मी, दूरवरची चमक या डोळ्यात आहे ||४|| अडचणी येती कितीही अन कशाही, सोसण्याची धमक या धमन्यांत आहे ||५|| पाहिली सृष्टीत या दुःखे कितीक, तरीही आनंद या हृदयात आहे ||६|| प्रश्न का बाहेरचे पडतात मजला, पाहिजे ते सर्व काही आत आहे ||७||
लेखनविषय:

वाचने 1401
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

प्रतिसादाआधीच विडंबन आलेलं पाहून मला वाटायला लागलं होतं की सगळे विडंबनच वाचतील बहुतेक! पण तुमचा प्रतिसाद पाहून बरं वाटलं. धन्यवाद प्राजुताई. - अजिंक्य

प्रश्न का बाहेरचे पडतात मजला, पाहिजे ते सर्व काही आत आहे वा! सुरेख काव्य! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी