दिनांक २८ मे
हिन्दु हृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस.
काल त्या पुण्यश्लोकाच्या स्मरणाच्या एका कार्यक्रमाला जाण्याचा योग आला.
तिथे दोन शब्द बोलायचेही होते. मग म्हणून सावरकरांच्या साहित्य गाथेचा
धांडोळा घेत होतो. तो खालील कविता हाती लागली.
हे काय बंधु असतो जरि सात आम्हीं । त्वत्थंडिलीच दिधले असतें बळीं मी ॥
असें जावल्य शब्द लिहिणार्या या संन्यस्त योग्याचे हृदय असें कोमलही होते
या प्रत्ययाने मन भारावून गेले. तोच प्रत्यय समस्त सावरकर भक्तांसाठी :-
शीर्षक : वाट चुकलेले कोकरुं
कां भटकसि येथें बोलें । कां नेत्र जाहले ओले
कोणिं का तुला दुखविले । सांग रे ! १
धनि तुझा क्रूर कीं भारी । का माता रागें भरली
का तुझ्या पासुनि चुकली । सांग रे २
हा हाय कोंकरूं बचडे । किति बें बें करुनी अरडे
उचलोनि घेतले कडे । गोजिरें ३
मग थोपटुनी म्यां हातें । आणिले गृहातें त्यातें
तों नवल मंडळींना तें । जाहलें. ४
गोजिरें कोकरूं काळें । नउ दहा दिनांचे सगळें
मउ मऊ केश ते कुरळे । शोभले ५
लाडक्या असा कां भीसी । मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथि ना खासी कां बरें? ६
बघ येथें तुझियासाठीं । आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी । कां बरें? ७
हळु दूध थोडकें प्याले । मग त्वरें तोंड फिरवीलें
कोंकरूं बावरुन गेले । साजिरें ८
लटकून छातिसी निजलें । तासही भराभर गेले
विश्व हें मुदित मग केलें । रविकरें ९
घेउनी परत त्या हस्तीं । कुरवाळित वरचेवरती
कालच्या ठिकाणावरतीं । सोडिलें १०
तों माता त्याची होती । शोधीत दूर शिशुसाठीं
दगडांचे तरुंचे पाठीं । हाय रे ! ११
हंबरडे ऐकूं आले । आनंदसिंधु ऊसळले
स्तनिं शरासारखें घुसलें । किति त्वरें १२
कवि : वि. दा. सावरकर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2195
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहवा ..
मुदित
In reply to वाहवा .. by लिखाळ
वाहवा ..
वाहवा!
+१
In reply to वाहवा! by प्रमोद देव
मुदित केले
वा काय काव्य आहे!
अफाट आहे..!
In reply to वा काय काव्य आहे! by चतुरंग
+१
स्वातंत्र
हा हन्त हन्त!