प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही
लेखनविषय:
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम रचना पाहून वादळाला झाला पसार नाही
प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही
मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला
पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!
कवितेत रोज लिहितो मी काहणी 'मनोहर'
वृतात खरडले पण प्रतिसाद फार नाही!
कविता करीत जातो कडवी पाहत नाही
हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ?
थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या
ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही
मी का न बडबडावे प्रस्थापितांप्रमाणे?
मी शाहजोग आहे! करतो विचार? नाही!!
गझलेत "केशवा"च्या , ना गझलियत जरा ही
ह्याच्या परीस कोणी इतका सुमार नाही
धिक्कार खूप झाला, वरती निषेध सुद्धा
वृतीत, "केशवा"च्या झाला सुधार नाही
वाचने
2758
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
वरीजनलपेक्षा भारी !
धिक्कार खूप झाला, वरती निषेध सुद्धा
वृतीत, "केशवा"च्या झाला सुधार नाही
हे मात्र खरं आहे ! :) (ह. घ्या )
-दिलीप बिरुटे
केशवा, एका विडंबनातून एकाचवेळी किती 'पक्षी' मारावेत याला काही 'सुमार'?
विडंबन मस्तच.
बे'सुमार' विडंबन! ;)
चतुरंग
थकतील वाचणारे मुक्ताफळांस माझ्या
ह्या शब्द-सागराला पण अंत, पार नाही
१००% सहमत!!!!!!!!!!!! धमाल विडंबन!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
वा गुरुदेव,
भलतेच फॉर्मात आहांत की!!!
मस्त आहे...
:)
निंदास्तुती जनांची, का व्यर्थ मनी धरावी?
काव्यात 'केशवा'च्या, कणही सुमार नाही
(म्हंजे काव्य हुच्च हाये आसं म्हनायचं हाय! नायतर हितले टवाळखोर लागतीन फिदफिदायला!!!)
:)
केसुगुर्जीकी जय हो!
मस्त रे केशवा! :)
हाणा .........खुपच छान
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ?
हे हे हे जबर्याच !
बेरोजगार
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
वा! मस्त हो केसुशेट !!
--अवलिया
कविता करीत जातो कडवी पाहत नाही
हा मोह लेखनाचा, की रोजगार नाही ?
. . . हे खरंच आहे.
मस्त!!! :)
प्रतिभेस केशवाच्या काही लिमीट नाही
खराटा
(रंग माझा वेगळा)
तसं आता हे ठरलेलंच असतं.. केसुंचे विडंबन वाचायचे अन् हसता हसता पुरेवाट करून घ्यायची!!!
लय भारी... ब्येश्टेश्ट!!
राघव
प्रतिसाद देणार्या आणि प्रतिसाद न देणार्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
:)