कुणीतरी ......
मला पण विचारा ना रे
मला काय हवंय ते !
निर्जीव .....
विकल्या जाणार्या
वस्तुंमध्ये नाहीये मी !
त्यांनाही .....
नाही जमले कधी
या गांधीला खरीदणे !
महाग .....
होता खुपच तेव्हाही
हा निष्कांचन म्हातारा !
एकटा .....
पडलोय मी आता
त्या कागदी तुकड्यांवर !
कंटाळा .....
येतो एकटे बसण्याचा
कार्यालयांच्या भिंतीवर !
नकोय .....
नोटेवरचा एकटेपणा
भिंतीवरचा अलिप्तपणा !
हृदयात .....
थोडीशी तुमच्या विचारात
हवीय जागा आचरणात !
विशाल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1931
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
वा!
सुरेख!! विश
वेगळेच
वा वा! सुरेख!
वेगळीच
कस्चं