संसदेच्या शाळेत...
मतदारसंघानी 'भूगोल' बदलला
नेत्यांनी 'इतिहासा'ला वापरले
नको ती 'भाषा' सर्वानी वापरली
कुणी कुणी' भाषे'ला वापरले
तीन पायांची शर्यत, जोडाफेक
कोलांट्यांसारखे 'खेळ' झाले
निवडणूकीच्या तमाशामध्ये
'नागरीकशास्त्रा'चे हसे झाले
संसदेच्या शाळेत कुणालाच
'नीतीशिक्षणा'ची नाही ओढ
यानंतर फक्त गणिताचा वर्ग
बेरजा, वजाबाक्या, आकडेमोड...
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2239
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
लौकिकाला साजेशी कविता.
वा
सद्य
हेच
In reply to सद्य by अनामिका
आवडली
नाहि आवडली
सॉलीड
मस्त कविता केलीये ...
वा ! मस्त !!
छान
मस्त
सध्याच्या
Prof.(Er.)Suresh