मला नाही वाटत बरं
तूच हातानी
जेवुन घे ना बाळा....
काप-या स्वरात
आई बोलली....
केवळ तिच्या समाधानासाठी
मी कशीबशी खिचडी खाल्ली
बेसिन मध्ये हात धुताना..
डोळ्यातिल आसवं
हातावर ओघळली...!
बरं वाटेल ना तिला..?
मनात शंकेची
पाल चुकचुकली...!!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1670
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप हळव्या भावना!
का रे
पुन्हा निशब्द..
सुचवणी
सुचवणी