Skip to main content

निनावी नगर

लेखक जागु यांनी मंगळवार, 07/04/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक नगर असावं निनावी तेथे कुणी न राजा न राणी मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी रुपया नाणी नसो व्यवहारी असो माणूसकीची देणी घेणी अनाथ आश्रमे तेथे नसावी वृद्धाश्रमेही ओस पडावी कायद्याची वाट नसावी मंदीराला हाक असावी एकात्मतेची असो दिवाळी स्वार्थाची पेटावी होळी प्रेमाची बरसात असावी मायेची पालवी फुटावी पौर्णिमा येथेच खिळावी अमावस्येला जाग न यावी.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2374
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान जमलीये! आवडली. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

मनातील भावना सुरेखपणे शब्दबद्ध केल्यात. एखादी गोष्ट आठवायला प्रथम ती विसरावी लागते ;)

मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी अवा॑तरः एखाद्या गावात गेल॑ की ह्याची जाणीव होते.. सुहास

रामराज्याची कविता आवडली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

कविता आदर्शवादी, वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रामराज्यनिदर्शक वाटावी अशी. (व्यवहारी)बेसनलाडू