मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन

चंद्रशेखर महामुनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मन..... मन आभाळ आभाळ... मन पाऊस पाऊस.. मन आभास आभास... मन सुवास सुवास... मन चांदवा चांदवा.... नभी चांदण्याचा थवा मन पाखरु पाखरु.... मन पारवा पारवा.... मन वेल्हाळ वेल्हाळ... मन कल्लोळ कल्लोळ मन तुफ़ान उधाण... मन पान सळ्सळ..... मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी... मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी..... मन हवंस हवंस.... मन नकोसं नकोसं.... मन चांदणी पुनव... विना चंद्राची आवस...... मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर...... मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर.... मन काहुर-प्रतिक्षा... मन कासाविस आशा.... वाट पाहून पाहून..... मन विरह निराशा..... वाट पाहून पाहून..... मन विरह निराशा.... - चंद्रशेखर

वाचने 2185 वाचनखूण प्रतिक्रिया 12

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/19/2009 - 11:44
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर...... मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर.... वाह महामुनी साहेब तोडलत.... एकदम ज ह ब र्‍या कविता.. येउ द्यात अजुन. अणि हो मिपावर स्वागत :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनिल हटेला गुरुवार, 03/19/2009 - 12:00
"मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी... मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी....." क्या बात है !! येउ द्यात अजुनही !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

जागु गुरुवार, 03/19/2009 - 14:36
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर...... मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर.... वा खुप छान बहिणाबाईंची मन वढाय वढाय ... उभ्या पिकातल ढोर आठवली.

प्राजु गुरुवार, 03/19/2009 - 23:26
मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोरं किती हाकलं हाकलं, फिरी येतं शिरावर.. बहिणाबाईंच्या या काव्याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

जयवी Tue, 03/24/2009 - 12:16
फ़ारच गोड कविता !! मनाचं वर्णन कितीतरी लोकांनी कितीतरी प्रकारांनी केलंय..... !! तरीही त्याचा थांग लागत नाही हेच खरं!