Skip to main content

मन

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी गुरुवार, 19/03/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.

मन.....
मन आभाळ आभाळ... मन पाऊस पाऊस..
मन आभास आभास... मन सुवास सुवास...

मन चांदवा चांदवा.... नभी चांदण्याचा थवा
मन पाखरु पाखरु.... मन पारवा पारवा....

मन वेल्हाळ वेल्हाळ... मन कल्लोळ कल्लोळ
मन तुफ़ान उधाण... मन पान सळ्सळ.....

मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी...
मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी.....

मन हवंस हवंस.... मन नकोसं नकोसं....
मन चांदणी पुनव... विना चंद्राची आवस......

मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर......
मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर....

मन काहुर-प्रतिक्षा... मन कासाविस आशा....
वाट पाहून पाहून..... मन विरह निराशा.....
वाट पाहून पाहून..... मन विरह निराशा....

- चंद्रशेखर

लेखनविषय:

वाचने 2222
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर......
मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर....

वाह महामुनी साहेब तोडलत....
एकदम ज ह ब र्‍या कविता.. येउ द्यात अजुन.
अणि हो मिपावर स्वागत :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य


In reply to by परिकथेतील राजकुमार

"मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी...
मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी....."

क्या बात है !!

येउ द्यात अजुनही !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..


मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर......
मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर....

वा खुप छान

बहिणाबाईंची
मन वढाय वढाय ... उभ्या पिकातल ढोर
आठवली.


मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकलं हाकलं, फिरी येतं शिरावर..

बहिणाबाईंच्या या काव्याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/


तुम्हाला आणि तुमच्या कवितेला नमन!!!!


In reply to by चन्द्रशेखर गोखले

आपलि दाद हा माझा सन्मान आहे !
खुप आभार ! आणखि बळ आले....


फ़ारच गोड कविता !!

मनाचं वर्णन कितीतरी लोकांनी कितीतरी प्रकारांनी केलंय..... !! तरीही त्याचा थांग लागत नाही हेच खरं!


In reply to by जयवी

आभार ! जयवी !
खरे आहे.... मनाचा थांग लागत नाहि हेच खरे.... !