एकदा मला झाली सर्दी
नाकात झाली फारच गर्दी
नाकावाटे फर्र् फर्र..
चालू नुसते दिवसभर
खॉक् खॉक् अधून मधून
त्यावर औषध सुंठ-लसूण
बेजार खोकून नाक पुसून
काय काय घेता मधामधून
गणपती बापा मोरया
सर्दीतून मज तार या
तारलेस जर सर्दीतून
शंभर मोदक देईन आणून
बाप्पा म्हणाला खरं आहे तुझं
ऐकून तर घे तू म्हणणं माझं...
मलाही झाली आहे सर्दी
नाकात झालीय् फारच गर्दी
एवढसं नाक तुझं तर..
माझा जरा विचार कर...!
-झेल्या
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2429
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!
उत्तम.....सर्दी!!
बाप्पाला
नाही नाही....तो मी नव्हेच...!
In reply to बाप्पाला by अनामिक
हा हा हा
हा हा हा ..
धन्यवाद!
मस्त!!
मस्त!!
झकास...