Skip to main content

बाप्पाचा प्रॉब्लेम...!

लेखक झेल्या यांनी सोमवार, 19/01/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा मला झाली सर्दी नाकात झाली फारच गर्दी नाकावाटे फर्र् फर्र.. चालू नुसते दिवसभर खॉक् खॉक् अधून मधून त्यावर औषध सुंठ-लसूण बेजार खोकून नाक पुसून काय काय घेता मधामधून गणपती बापा मोरया सर्दीतून मज तार या तारलेस जर सर्दीतून शंभर मोदक देईन आणून बाप्पा म्हणाला खरं आहे तुझं ऐकून तर घे तू म्हणणं माझं... मलाही झाली आहे सर्दी नाकात झालीय् फारच गर्दी एवढसं नाक तुझं तर.. माझा जरा विचार कर...! -झेल्या
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2439
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

शेवट फार मस्त आहे! जे न देखे रवी, ते देखे कवी!! -अभिजित. (मिपा वरच्या आमच्या सदस्यखात्याची एक्स्टेंडेड आव्रुत्ती )

छान आहे मित्रा कविता, तुला अनुभव आहे वातट॑ सर्दीचा, २ दिवस मला ही होती सर्दी औषध घेतल॑ ६ डोस, प्रत्येकी ४ गोळ्या २ दिवस . डोम्बिवली फास्ट :- 9.33 pm. @ CST

In reply to by अनामिक

बाकी जबरदस्त टायमिंग साधून हा प्रश्न विचारलात... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

बाप्पाला स्वेटर घालणारे तुम्हीच तर नाही ना? =)) =)) =)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.