Skip to main content

खाज!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/01/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
'माज!' वाचल्यावर 'खाज' सुटली नाही तर रंग्या कसला? तेव्हा सादर आहे .. कालचा 'गजकर्ण' थोडा आज आहे , आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कोणत्या वैद्याकडे मी जात नाही, आपल्या वैदूगिरीचा माज आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कालच्या 'पेल्यातले' तात्पर्य थोडे, अन उद्याचा 'बेवडा' अंदाज आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ घोरण्याचा ध्यासही आहे कधीचा, अंगणातच घोंगडी अन 'बाज' आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ तोंड मी कोठे कधी लपवू पाहातो ना जनाची वा मनाची 'लाज' आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2436
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

रंगाशेठ, एकदम जोर लावलाय .. चांगल आहे.. चालू दे.. केशवसुमार

In reply to by प्राजु

फटकेबाजी नव्हे, ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यासारखी फटकेबाजी. पण ही मंडळी मोठ्या दमाची आहेत हे खरं. ही काही अशी चार-दोन षटकात संपणारी नाहीत.